-
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
---------
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- पहिली माळ - पांढरे पक्षी
दुसरी माळ - लाल
तिसरी माळ - निळा
चौथी माळ- पिवळा
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- चौथी माळ- पिवळा
पाचवी माळ - हिरवा
सहावी माळ -करडा
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- सातवी माळ - केशरी पक्षी
आठवी माळ - मोरपंखी
नववी माळ -गुलाबी
----------------------------
आभार - पक्षीमित्रांनी पाठवलेली काही सुंदर प्रकाश चित्रे लेखामध्ये डकवली आहेत त्यांचे मनापासून आभार.
लहानपणी श्रीमंतीची व्याख्या जरा वेगळी होती गोट्या,लोलक,चुंबक,मोरपंख ज्याच्याकडे आहि तो खरा श्रीमंत पुस्तकात ठेवलेले मोरपंख काढून पुढच्या बेंचवर बसलेल्या मुलाच्या कानवरून फिरवणे त्याला त्रास देणे हा आवडता उद्योग असायचा कित्येकवेळा शिक्षकांचा माराही खावा लागला आपल्या पुढच्या बेंचवरचा मुलगा जास्त हुशार असेल तर वर्गात त्याचे विचलीत करण्यात तर आणखीनच मजा येत असे
असो, महागौरी देवीच्या साडीचा आजचा रंग मोरपंखी. रंगाचे नाव मोराच्या पिसावरून पडले आहे. मोरपिसात सारे रंग एकवटले आहेत. भगवान कार्तिकेयाचे वाहन मोर, हा अतिशय सुंदर पक्षी आहे हे सांगावयास नको. हा एक स्वमग्न पक्षी असून पावसाळ्यात याचा नृत्याविष्कार अद्भुत असतो. पुण्यातील तळजाई टेकडी ,आनंदवन ,वानवडी आणि भोर भाटघर धरणाच्या मागील पर्वतावर याचे अद्भुत नृत्यदर्शन झाले. घन घन माला नभी ग्रासल्या कोसळती धारा, असे वातावरण आणि आनंदवन मध्ये दोन मोर बेभान होऊन नाचत होते ते बघताना मी ही भान हरपून नखशिखांत भिजलो होतो अर्थात माझ्या लाडक्या छायाचित्रकाची मात्र काळजी घेताच शूटिंग केले चित्रफीत संग्रही आहे मोठा आहे त्यामुळे डकवता येत नाही कायप्पावर ऑन डिमांड मिळेल.
-
-
-
-
-
-
-
प्रतिक्रिया
30 Sep 2025 - 11:42 pm | कंजूस
मोराचे फार सुरेख फोटो मिळाले आहेत.
1 Oct 2025 - 10:55 am | गोरगावलेकर
मुंबईत मोरांचे दर्शन तसे दुर्मिळच पण दोन महिन्यांपूर्वी ह्यांच्या मित्राच्या सौजन्याने राजभवन परिसर पाहता आला .

त्यावेळी परिसरात मुक्तपणे फिरणारे मोर दिसले होते . येथील मुक्कामात पाहिलेले बंकर , चौपाटी , देवी मंदिर, सूर्योदय आणि सूर्यास्त पॉईंट सर्वच आवडले .
1 Oct 2025 - 6:54 pm | कर्नलतपस्वी
कंजूस भाऊ आणी गोरगावलेकर ताई.
2 Oct 2025 - 9:01 am | कंजूस
राजभवनावर बुकिंग करून अगदी सकाळी सहाला जाता येते.
बघू कधी योग येतो.