या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
---------
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- पहिली माळ - पांढरे पक्षी
दुसरी माळ - लाल
तिसरी माळ - निळा
चौथी माळ- पिवळा
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- चौथी माळ- पिवळा
पाचवी माळ - हिरवा
सहावी माळ -करडा
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- सातवी माळ - केशरी पक्षी
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग-आठवी माळ - मोरपंखी
नववी माळ -गुलाबी
-------------------
आभार - पक्षीमित्रांनी पाठवलेली काही सुंदर प्रकाश चित्रे लेखामध्ये डकवली आहेत त्यांचे मनापासून आभार.
जेष्ठ मिपाकर कंजूस भाऊ यांनी गूगल वरून मिपावर फोटो कसे अपलोड कार्रवेत यावर एक साधी सोपी रेसिपी डकवली आहे. माझया सारख्या तंत्रन्यानी मागासवर्गीया साठी फारच उपयुक्त आहे. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून हा धागा समर्पित करावा आसा विचार मनात आला. तर त्यावरच एक चित्ररूपी धागा काढावा म्हणून हा प्रपंच......
वर्षा ऋतू संपत आला आहे तरी वर्षाराणी अजूनही वसुंधरे बरोबर फुगडी खेळताना दिसतेय. रंगाची उधळण सर्वत्र झाली आहे आणि नर नारी पावसाने बेजार झाली आहेत.निसर्गात विविध प्रकारचे रंग भरले आहेत.नवरात्राचा उत्सव चालू आहे.महिला रांगोळीद्वारे,निसर्ग पाने,फ़ुले आणि पक्षयांद्वारे तर कुशल चित्रकार कुंचले आणि चित्रफलकाचा वापर करून रंगांची लयलूट करत आहेत. मी छायाचित्रक वापरून निसर्गातले रंग एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे . बघा कसा वाटतो . त्यातले पहिले पुष्प.
बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !
दिनभर देई ठाणं, रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं कोवळं ऊन छान
बाई या पावसानं !
फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
मातीत पखरण
बाई या पावसानं !
नदीनाले एक झाले, पूर भरुनीया चाले
जिवलग कोठे बाई पडे अडकून
नच पडे चैन !
बाई या पावसानं !
-कवी अनिल
सर्व रंगाची उधळण एकाच धाग्यात केली तर खूप मोठा धागा होईल म्हणून एक एक रंगाचा धागा वेगळा काढण्याचा मानस आहे.
नवरात्रितील नऊ रंगांचा उद्देश हा देवीच्या नऊ रूपांचे गुणधर्म आणि शक्तींना आपल्या जीवनात समाविष्ट करणे आहे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा, समृद्धी, आणि आध्यात्मिक वाढ साधता येते. श्रीमंत-गरीब, लहान थोर, स्त्री-पुरुष एकच रंग परिधान करून भगवती बरोबर एकात्मकता साधताना दिसतात. हे रंग केवळ एक फॅशन नसून, देवीच्या प्रति भक्ती आणि सणाच्या उत्साहात अधिक खोलवर सहभागी होण्याचा एक मार्ग आहे. प्रत्येक रंगाची स्वतःची विशिष्टता असून, तो आनंद, शांती, आणि शक्तीचे प्रतीक असतो.
पहिली माळ - पांढरा
दुसरी माळ - लाल
तिसरी माळ - निळा
चौथी माळ- पिवळा
पाचवी माळ - हिरवा
सहावी माळ -करडा
सातवी माळ - केशरी
आठवी माळ - मोरपंखी
नववी माळ -गुलाबी
-------------------------
-----
-------------------------
-----
-------------------------
------
-------------------------
-----
-------------------------
------
-------------------------
-----
-------------------------
--------
-------------------------
-------
-------------------------
--------
ताजा कलाम- पंधरावे प्र.चि.( Indian whaite eye ) चष्मेवाल्याची पिल्ले भांडताना दिसली ,तिसरे पिल्लू दोघांचे भांडण बघत होते. अचानक दिसले पटकन टिपले. मोठी चित्रफीत आहे याची.
प्रतिक्रिया
28 Sep 2025 - 5:31 pm | अभ्या..
नवरात्रीतील नऊ रंगांचा उद्देश हा देवीच्या नऊ रूपांचे गुणधर्म आणि शक्तींना आपल्या जीवनात समाविष्ट करणे आहे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा, समृद्धी, आणि आध्यात्मिक वाढ साधता येते. श्रीमंत-गरीब, लहान थोर, स्त्री-पुरुष एकच रंग परिधान करून भगवती बरोबर एकात्मकता साधताना दिसतात. हे रंग केवळ एक फॅशन नसून, देवीच्या प्रति भक्ती आणि सणाच्या उत्साहात अधिक खोलवर सहभागी होण्याचा एक मार्ग आहे. प्रत्येक रंगाची स्वतःची विशिष्टता असून, तो आनंद, शांती, आणि शक्तीचे प्रतीक असतो.काहीही...अचाट
२००३ च्या नवरात्रात महाराष्ट्र टाइम्सने आपला खप वाढवण्यासाठी केलेल्या ह्या कँपेनला अध्यात्म, संस्कृती आणि परंपरा चिकटली का?
.
बाकी फोटो छान, टिपिकल.....
मिपावर चढवता आले ही अचिव्हमेंट कौतुकास्पद.
28 Sep 2025 - 6:04 pm | कर्नलतपस्वी
आम्हीं प्रसाद म्हणून देतो,तुम्हीं लाडू म्हणून खा.
वालेंनटाईनला चाकलेटी आणी गुलाबाची फुलं तशीचा नवरात्रातील रंग. सगळीकडेच बाजार....
त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला मी
पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी.
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी
-कवी अनिल कांबळे
ज्याच्यामुळे समाजात सकारात्मक पसरते ते सर्व उत्तमच. बाकी ही नऊ रंगाची कल्पना उत्तर भारतात आगोदर पासून बघीतली होती.
28 Sep 2025 - 6:42 pm | अभ्या..
वा वा,
छान गोल गोल उत्तर.
असो
कवी अनिल कांबळेच्या ह्याच कवितेतील उरल्या दोन ओळी उदधृत करुन मी आपला निरोप घेतो.
"रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु
वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी"
28 Sep 2025 - 5:39 pm | अमरेंद्र बाहुबली
धागा आवडला!
28 Sep 2025 - 5:42 pm | पाषाणभेद
नऊ दिवस नऊ रंग पक्षी
छान कल्पना आहे. मटा सारखी.
28 Sep 2025 - 5:46 pm | स्वधर्म
लेख चांगला आहे. बाकी अभ्या यांनी म्हटल्याप्रमाणे म.टा. ची ही मार्केटिंग केंपेन होती आणि तयार कपड्यांच्या व्यापार्यांनी तिला पध्दतशीर धार्मिक रूपक म्हणून प्रसिध्द केले. दररोज वेगळ्या रंगाचे कपडे खपवण्यासाठीची केवढी जबरदस्त युक्ती!
28 Sep 2025 - 6:11 pm | कर्नलतपस्वी
तसेही सणासुदीला आया बहिणींना कपडे घायायची हौस असते. मकर संक्रातीला काळी चंद्र कळा नेसण्याचा प्रघात पूर्वापार चालूच आहे ना. वटसावित्री पौर्णिमेला हिरवी साडी हिरवा चुडा घालून पुजेला जातातच ना....
28 Sep 2025 - 10:54 pm | Bhakti
संक्रांतीला काळी साडीची फॅशन माहिती होती.पण काळी चंद्र कळा साडीला महत्व हे फार नंतर समजलं.आता परत चंद्रकळा साडीची पुन्हा लोकप्रियता वाढली पण विविध रंगातील!
28 Sep 2025 - 6:20 pm | कंजूस
सुंदर.
आपली आवड. आपला छंद. वीस वर्षांपूर्वी फोटोग्राफर्सना आपले फोटो लोकांना दाखवायचे तर प्रदर्शन भरवून दाखवावे लागत असे. खूप खर्चिक गोष्ट होती. आता काम झाले सोपे. उत्साह वाढला. प्रेक्षकांचीही झाली सोय.
28 Sep 2025 - 10:58 pm | Bhakti
पिवळ्या रंगाचा पक्षी नाव सांग ना...सांग ना ,ही लावणी आवडते.
या फोटोतल्या पिवळ्या रंगाचे पक्षी पाहून छानच वाटलं.फोटो फार आवडले.
29 Sep 2025 - 10:27 am | Bhakti
* पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगना
29 Sep 2025 - 6:58 am | कर्नलतपस्वी
"शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते
आणि साळीचे उगाच अंग शहारून येते"
कविवर्य ना धो महानोर आणी इतर निसर्ग कवींच्या घरी रंग पाणी भरतात आणी कवीतेद्वारे आणखीनच गडद होतात.
धन्यवाद.