किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
12 Jul 2025 - 11:35 am

किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’
===============


मी काही वर्षांपूर्वी विशिष्ट उद्देशाने (समाजाला जागे करण्याच्या) तयार केलेला शब्द प्रयोग काही जणांना अपमान कारक वाटतो. बरं ’किडकी प्रजा’ हे शब्द कुणा विशिष्ट गट किंवा समूहाला टारगेट करून अपमानित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. एखाद्या महालात राहणार्‍या व्यक्तीपासून ते रस्त्यावर राहणार्‍या व्यक्तीपर्यंत कुणीही "किडू" शकतो. मग मला धमक्या पण दिल्या जातात. पण ’पोपट मेला आहे, हे सर्व सार्वत्रिक सत्य कुणालाही स्वीकारायचे नसते.

पण योगायोग असा की आजच फेबुकृपेने असे कळले की मागील वर्षी म्हणजे २०२४ साली ऑक्सफर्ड शब्दकोशाने ’ब्रेन रॉट’ या शब्दाला वर्ड ऑफ द इयर चा मान दिला. मग मी याची शहानिशा केली तेव्हा गार्डीयनमध्ये आलेली ही बातमी सापडली-

https://www.theguardian.com/media/2024/dec/02/brain-rot-oxford-word-of-t...

ब्रेन रॉट्ची व्याख्या अशी केली गेली आहे -Brain rot is defined as “the supposed deterioration of a person’s mental or intellectual state, especially viewed as the result of overconsumption of material (now particularly online content) considered to be trivial or unchallenging”.

थोडक्यात ब्रेन रॉट म्ह० मेंदूचे सडणे - जे जैविक पातळीवर पण अनेक कारणांनी घडत असते. पण ब्रेन रॉट आम्हाला चालतो पण "किडकी प्रजा"मात्र आम्हाला चालत नाही.

आता या दुटप्पी हलकटपणाला "सडक्या मेंदूची", आय मिन ब्रेन रॉटची लक्षणे का मानू नयेत?

समाजबातमी

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

12 Jul 2025 - 7:06 pm | गामा पैलवान

अवांतर :

मेंदू गंजणे असा वाक्प्रयोग मराठीत असतांना आजून वेगळा ब्रेन रॉट कशाला आणायचा?
-गा.पै.

युयुत्सु's picture

12 Jul 2025 - 7:14 pm | युयुत्सु

मेंदू सडणे ही मेंदू गंजण्यापेक्षा जास्त गंभीर समस्या आहे. गंज प्रयत्न करून काढता येतो. 'सडणे' थांबवणे भयंकर अवघड असते.

गामा पैलवान's picture

12 Jul 2025 - 10:34 pm | गामा पैलवान

युयुत्सु,

मेंदूची गंजसफाई करण्यासाठी विविध कोडी वगैरे उपलब्ध आहेत. मेंदूचे सडणे थांबवायला काही उपाय आहेत का? माझ्या मते सडण्याआधी मेंदूवर गंज चढंत असावा. तर गंजण्याच्या प्रक्रियेतनं सडण्याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली याबद्दल काही मर्यादादर्शके उपलब्ध आहेत का ?

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

13 Jul 2025 - 6:45 am | युयुत्सु

श्री० गा०पै०

सडणे जन्मजात असेल तर उपाय जवळजवळ शून्य. पण नंतर चालू झाले असेल तर आपल्या आयुष्यात नेमका कशाचा अतिरेक आणि कशाचा अभाव हे ओळखणे, ते मनोमन स्वीकारणे आणि मग प्रयत्नपूर्वक तो अतिरेक/अभाव कमी करणे हा सडणे थांबवण्याचा प्रभावी उपाय ठरतो. पण एकट्याने केलेले प्रयत्न त्यासाठी पुरे पडत नाहीत. त्यात आजुबाजूच्या लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो - तुम्ही पार्टीत पिणार नसाल आणि तुमच्या निर्णयाचा आदर होणार नसेल तर काहीही उपयोग नसतो.

आता एक उदा० देतो. हे कदाचित अतिरेकी विधान वाटेल. पण भारतात साखरेचा वापर (आणि साखरे नंतर मैदा) जर निम्म्यावर आणता आला तर भारतीयांचे आरोग्य वेगाने सुधारेल. ज्यात त्यात , विशेषतः बटाटेवड्यात साखर घालणे हा पुणेकरांच्या मेंदू सडण्याचा महत्त्वाचा मर्यादादर्शक आहे. हा हा हा हा!

गामा पैलवान's picture

13 Jul 2025 - 2:32 pm | गामा पैलवान

युयुत्सु,

सडणे आणि गंजणे यांतला फरक कृपया विशद करावा, ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

13 Jul 2025 - 2:57 pm | युयुत्सु

गंजणे आणि सडणे

गंजणे - एखादी वस्तू किंवा क्षमता न वापरल्या मुळे वाया जाणे
सडणे - एखादी वस्तू किंवा क्षमता चुकीचा वापर, आघात इ अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात अकार्यक्षम होणे

गरज पडल्यास या व्याख्या आणखी घासून-पुसून चकचकीत करता येतील...

गामा पैलवान's picture

14 Jul 2025 - 1:31 am | गामा पैलवान

युयुत्सु,

या व्याख्या मेंदूच्या संदर्भात हव्या होत्या. माझ्या मते गंजणे हा बुद्धीशी संबंधित आहे, तर सडणे हा प्रकार मेंदूच्या उतीशी संबंधित आहे. मेंदू सडलेला इसम तरीही बुद्धिवान असू शकतो. याउलट मेंदू न सडटा उत्तम असला तरी न वापरल्यामुळे बुद्धीवर गंज चढलेला असू शकतो.

आता या दोन्ही गोष्टी जनुकांद्वारे पुढील पिढीत संक्रमित कशा होतात यावर प्रकाश टाकावा अशी विनंती आहे. यासंबंधी काही विदा/लेखन उपलब्ध आहे का?

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

14 Jul 2025 - 7:46 am | युयुत्सु

The Epigenetics Revolution: How Modern Biology Is Rewriting Our Understanding of Genetics, Disease, and Inheritance by Nessa Carey
An introductory overview of epigenetics, explaining how gene expression changes can be inherited and affect health, without altering DNA. Highly recommended for lay readers.reddit.com+6 more
Epigenetics: How Environment Shapes Our Genes by Richard C. Francis
Discusses how external factors like diet and stress lead to epigenetic changes that can be passed to offspring, with real-world examples from animals and humans.amazon.comjournals.uchicago.edu
Inheritance: How Our Genes Change Our Lives—and Our Lives Change Our Genes by Sharon Moalem
Blends genetics and epigenetics, showing how lifestyle influences gene expression and inheritance, with insights into diseases and personal health.goodreads.comamazon.com
**Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life by Eva J. Jablonka and Marion J. Lamb
Argues for an expanded view of evolution, incorporating epigenetic and other non-genetic systems of inheritance. A bit academic but influential.direct.mit.edu
Epigenetic Inheritance and Evolution: The Lamarckian Dimension by Eva Jablonka and Marion J. Lamb
Explores how epigenetic mechanisms revive ideas of acquired trait inheritance, challenging neo-Darwinism.

युयुत्सु's picture

14 Jul 2025 - 8:22 am | युयुत्सु

बाय द वे : हे पश्चिमेकडून आलेले, जगातल्या मातब्बर विद्यापीठे आणि त्यांच्या प्रयोगशाळानी निर्माण केलेले ज्ञान आहे. त्याची अ‍ॅलर्जी असल्यास काहीही उपयोग होणार नाही... उदा० काही मठ्ठ लोक उत्क्रांती फक्त नैसर्गिक निवडीतून घडते असा दावा करतात. पण आता हे मत विज्ञानाने टाकून दिले आहे. Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life हे पुस्तक त्यासाठी महत्त्वाचे आहे.

युयुत्सु's picture

14 Jul 2025 - 9:15 am | युयुत्सु

वर मी साखरे बद्दल काही अतिरेकी वाटतील विधाने केली होती. मागे कधी तरी इन्शुलीन पातळी वाढली की टेस्टेस्टेररॉन ची पातळी कमी होते असे वाचले होते.पण आत्ताच हे ताजे संशोधन माझ्या कालरेषेवर (टाईमलाईनवर) टपकले. रक्तातली साखर थोडी जरी वाढली तरी पुरूषांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो.

https://neurosciencenews.com/blood-sugar-sexual-decline-neuroscience-294...

आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते.

अशा संशोधनाला सहसा लोक दोन प्रकारचे प्रतिसाद देतात- काही लोक 'त' वरून ताकभात ओळखतात आणि वेळीच शहाणे होतात. बाकीचे अर्धवट हे अजून पुरेसे सिद्ध झालेले नाही असे समजून आपला मूर्खपणा मागील अंकावरून पुढे चालू ठेवतात आणि इतरांची पण दिशाभूल करत राहतात.

सुबोध खरे's picture

14 Jul 2025 - 10:00 am | सुबोध खरे

आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते.

जीव शास्त्राचे मूलभूत अज्ञान
असले कि असे होते.

बचकाभर साखर खाणे म्हणजेच रक्तातील साखर वाढणे असे केवळ त्या माणसाला मधुमेह असेल तर होईल.

सामान्य निरोगी माणसाने बचका भर साखर खाल्ली तर त्या माणसाच्या शरीरात ताबडतोब इन्स्युलिन तयार होऊन हि पातळी विशिष्ट मर्यादेतच राहील.

ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (GTT) ज्या माणसांनी केली आहे त्यांना हा अनुभव आहे. ७५ ग्राम साखर खाल्ल्यावर २ तासांनी रक्तातील साखर तपासली जाते.

१०० ग्राम पेक्षा जास्त साखर खाल्ली तर उलटी होऊन तुमचे शरीर ती बाहेर टाकेल. जिज्ञासूंनी ( स्वतःच्या जबाबदारी वर) करून पाहावे

तुमच्या घरात उत्तम दर्जाच्या वोल्टेज स्टॅबिलायझर असेल तर वोल्टेज कितीही वर खाली झाले तरी घरच्या उपकरणांना काही इजा होणार नाही तसेच आहे हे.

एकदा मुद्दा मांडला कि तो कितीही टोकाला जाऊन समर्थन करत राहायचे याचे हा लेख म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

एखाद्या व्यक्तीचा पुनरुत्पादनाच्या काळ संपला कि इपिजेनेटीकच काय पण जेनेटिक बदल झाले तरी त्याचा पुढच्या पिढीवर काहीही परिणाम होणार नाही. हा एक मोठा मुद्दा सर्वज्ञ सतत नाकारत आलेले आहेत. कितीही वेळा आणि कितीहि तर्हेने समजावले तरी मीच बरोबर हाच हेका चालू आहे.

सगळी भारतीय प्रजा किडलेली च आहे आणि मी सांगतो त्या मार्गाने गेला नाहीत तर तुमचा सर्वनाश अटळ आहे हेच एक पालुपद लावून बसलेले आहेत.

यांच्या सर्व लेखात किती तरी मुद्दे सहज खोडून काढण्यासारखे आहेत. पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण एक तर हे बदलणार नाहीतच आणि मिपाकर सुज्ञ आहेतच

याला काही उपाय नाही पालथ्या घड्यावर पाणी.

युयुत्सु's picture

14 Jul 2025 - 10:21 am | युयुत्सु

काही नीच प्रवृतीचे लोक समाजाची सतत दिशाभूल करत राहतात आणि समाज हताशपणे ते सहन करत राहतो, या पेक्षा दूसरे दूर्दैव कोणते.

साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. याबद्दल हा नाठाळ आअणि विकृत मनुष्य का बोलत नाही.

मिपा या माणसाला हाकलून का देत नाही?

सुबोध खरे's picture

14 Jul 2025 - 11:24 am | सुबोध खरे

तारतम्य आणि मध्यममार्ग ही मानवी जीवनातील अंतीम सत्ये आहेत

))=((

ROFL

सुबोध खरे's picture

14 Jul 2025 - 11:45 am | सुबोध खरे

साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात.

The average age of women at the time of their first pregnancy in Pune, India, is approximately 21.36 years, according to a study published by the National Institutes of Health (NIH). This is based on a study of maternal nutrition in Pune, according to the National Institutes of Health (NIH). Another study of antenatal mothers in Pune found that the majority of women in the study were between 21 and 25 years old. The mean age across the study population was 22.31 ± 2.93 years.

बाविसाव्या वर्षी किती मुलींना मेटाबोलिक सिंड्रोम होईल इतका साधा विचार येत नाही का हो तुमच्या डोक्यात?

आणि एकदा मुलं होऊन गेली कि एपिजेनेटिक किंवा जेनेटिक समस्या पुढच्या पिढीत जाणार नाहीत हे सांगण्यासाठी कोणत्या डॉक्टरची आवश्यकता नाही.

काहीही करून आपला मुद्दा सिद्ध करायचाच हा दुराग्रह कशासाठी?

मुळात पाया भुसभुशीत असला कि इमारत फार दिवस टिकत नाही

इतकी चिडचिड प्रकृतीस बरी नव्हे!

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2025 - 8:47 pm | प्रसाद गोडबोले

ब्रेन रोटच्या अर्थात सडक्या मेंदूच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!

कानडाऊ योगेशु's picture

14 Jul 2025 - 9:36 am | कानडाऊ योगेशु

युयुत्सु सर,एक वैयक्तीक प्रश्न विचारु इच्छितो.
तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.?
म्हणजे तुम्ही तुमची अपत्ये जन्माला घालण्यापूर्वी पत्नीला ह्याची कल्पना दिली होती का?
अथवा जर तुमचे/ची अपत्ये फॅमिली प्लॅनिंग करत असतील तर त्यांना ह्या धोक्याबद्दल कल्पना दिली आहे का?
वरील प्रश्न गंभीरपणे विचारत आहे.

<तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.?>

प्रश्न मनापासून आवडला आणी त्याचे प्रामाणिक उत्तर असे आहे - ताजे संशोधन (मिळेल त्या मार्गाने) मिळवून जीवनशैलीत बदल करणे याची सुरुवात माझ्या वडीलांना १९८१ पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा पासून झाली. त्यांच्यावर डॉ०नी तेव्हा जी बंधने घातली ती मी आणि माझ्या आईने आपल्यावर पण घालून घेतली. तेव्हा पासून मी माझ्या कुटुंबाला सतत शिकवत असतो. माझी मुलगी, माझी पत्नी आणि मला जवळून ओळखणारे डॉ० मला अतिशय गंभीरपणे घेतात.

अधिजनुकशास्त्राचा आणि माझा परिचय डॉ० जगन्नाथ दीक्षितांमुळे दहा वर्षापूर्वी झाला. त्यामुळे माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला हे ज्ञान उपलब्ध नव्हते. पण माझी कन्या मला गंभीर पणे घेत असल्याने तीच्या पिढीच्या तूलनेत खुपच शिस्तप्रिय आणि जबाबदारीने वागत आली आहे. उदा० साखर विष आहे, ताणाचे दूषपरिणाम तिच्या गळी उतरविण्यात मी चांगलाच यशस्वी झालो आहे.

रामचंद्र's picture

14 Jul 2025 - 11:10 am | रामचंद्र

त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत यासाठी मधुमेह असलेल्या मध्यमवयीन व्यक्तीने आपल्या आहारातून कोणते पदार्थ लगेच बंद करावेत असे तुम्ही सांगाल?

युयुत्सु's picture

14 Jul 2025 - 11:20 am | युयुत्सु

बुंदसे गई हौद नही आती...

त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत...

मुळात जिथे हायपोग्लायसिमिया सारखे धोके आहेत तिथे काहीही त्वरित होईल अशी अपेक्षा ठेवू नये. जे काही करायचे ते टप्प्याटप्प्याने मनोमन स्वीकारून करावे. अनेक ठिकाणी चांगले डॉ० मधुमेह निवारणाचे कार्यक्रम करत आहेत. त्यांचा सल्ला घ्यावा. अशा प्रयत्नात मन दगा देते तेव्हा स्वतःला चुचकारून, प्रसंगी स्वतःला माफ करून प्रयत्न चालू ठेवावेत.

तारतम्य आणि मध्यममार्ग ही मानवी जीवनातील अंतीम सत्ये आहेत - १००१ श्री श्री तारतम्य श्री युयुत्सु महाराज.:))

रामचंद्र's picture

14 Jul 2025 - 11:41 am | रामचंद्र

धन्यवाद, जवळचा आणि सोपा मार्ग नाही एवढं खरं!

कसलाही शेंडाबुडखा नसलेले संशोधन संदर्भाशिवाय टाकायचे आणि सतत दिशाभूल करत राहायचे हे मिपा संपादक कधी थांबवणार?

वयाच्या सातव्या वर्षापासून इन्शुलिन रेझिस्टन्स चालू होतो असे संशोधन सांगते-
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3322712/

त्यामूळे प्रजननपूर्व काळात दूषपरिणाम चालू झालेले असतात. त्याची परिणती आणी इतर ताण आणि प्रदूषण यांचे प्रजननपूर्व दूष्परिणाम मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत, हे या माणसाला माहित नाहीत का?

सुबोध खरे's picture

14 Jul 2025 - 6:21 pm | सुबोध खरे

परत तेच

इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही?

मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत.

याचे दर वर्षी मी काही हजार रुग्ण गेली कित्येक वर्षे पाहतो आहे.

पण

मीच हुशार आहे

मी हुशारच आहे

आणि

मी हुशार आहेच

हेच पालुपद किती वर्षे आळवणार?

युयुत्सु's picture

14 Jul 2025 - 6:52 pm | युयुत्सु

इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही?

फरक असला तरी इन्स्युलिन रेझीस्टन्स मुळे येणारा हायपरिन्शुलेनेमिया हा तितकाच धोकादायक असतो. साखरेचे कंझंपशन त्यात निर्णायक असते.

मी हुशार आहे की नाही, माहित नाही. बहुधा नाही, कारण कुणी मला हुशार म्हणत नाही. पण मी कोडगा नक्कीच नाही!

तुम्हीच स्वतः;ला हुशार म्हणता मग जग काय म्हणतं त्याने काय फरक पडतो.

तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय.

मग जागा काय समजतं त्याने काय फरक पडणार आहे?

चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले?

फरक असला तरी

आश्चर्य आहे तुम्ही ही गोष्ट स्वीकारली.

आज पाऊस आहे नाही तर सूर्य कुठे उगवला आहे ते पाहिलं असतं

तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय.

डिग्र्यांचा फाफटपसारा फक्त डॉ०नीच मिरवायचा असा कायदा आहे का?

<चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले?>

मुळात लोक चार बुकं वाचतात ते डॉ० होण्यासाठी हा अडाणीपणाचा (किंवा मेंदू सडण्याचा) अस्सल नमूना आहे. लोकांनी अज्ञानी राहावं आणि आपल्याला कायम मखरात ठेवावं अशी सुप्त इच्छा असली की असे विचार बळावतात.

सुबोध खरे's picture

15 Jul 2025 - 10:47 am | सुबोध खरे

डॉक्टर

कुठल्याही सामाजिक स्थळावर आपल्या डिग्र्यांची जाहिरात करत फिरत नाही.

इंडियन मेडिकल कॉउंसिल कायद्याप्रमाणे याला बंदी आहे.

मी आधुनिक वैद्यकाबद्दल बोलतोय आहे.

इतर प्रणाली( आयुर्वेद युनानी होमेपदी इ) बद्दल नव्हे

आणि मी कधीही कुणाला माझ्याकडे या किंवा माझं लेखन/पुस्तक वाचा किंवा माझी आरती ओवाळा असे लिहिलेले नाही.

किंवा लोकांना अक्कल नाही आणि मी शिकवणार आहे असा हि दावा केलेला नाही.

किंवा

अमुक तमुक याला मिपा वरून हाकलून द्या किंवा कोणालाही शिव्या देत नाही.

बाकी तुम्ही (स्वघोषित) सर्वज्ञ आहात. सुज्ञ असाल अशी अपेक्षा.

गामा पैलवान's picture

14 Jul 2025 - 12:26 pm | गामा पैलवान

युयुत्सु आणि सुबोध खरे,

जनुकशास्त्र की अधिजनुकशास्त्र या वादांत मी पडंत नाही. मला फारशी माहिती नाही. तुम्ही दोघे तत्ज्ञ आहात अशी माझी धारणा आहे. तर मला माहीत असलेलं एक प्रकरण सांगतो.

माझ्या ओळखीच्या ( इंग्लंडमधल्या ) एका गृहस्थांना तीव्र मधुमेह आहे. वय वर्षे सुमारे ४५+ त्यांच्या वडिलांकडून आला असावा असं इथले ( इंग्लंडातले ) डॉक्टर लोकं म्हणतात. त्यांना मूल हवं आहे. बायको तिशीची आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं पडलं की मधुमेही बापाचं वय इतकं जास्त असल्यास अर्भकास मधुमेहाशिवाय इतर व्याधीही जन्मत:च असू शकतात. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर शुकाणू बलवान नसल्याने असं घडतं, इति डॉक्टर.

वरील प्रकरणांत जनुकीय व अधिजनुकीय असे भाग पाडता येतील काय ? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावं, ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

Bhakti's picture

15 Jul 2025 - 1:39 pm | Bhakti

अवांतर
इथे जेनेटिक,इपिजेनेटिक शब्द,चर्चा वाचून आठवलं.
युट्यूबवर मला सतत DNA Awaking -DNA Repattern Workshop ची जाहिरात पाहायला मिळते.खरचं DNA Repattern काय सहज गोष्ट असते का? काहीही जाहिरातबाजी करतात .

युयुत्सु's picture

15 Jul 2025 - 3:58 pm | युयुत्सु

एक उद्बोधक मुलाखत

https://www.youtube.com/watch?v=NRFOd91Gln8