सध्या मी काय पाहतोय ? भाग ९

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
23 Jan 2022 - 7:42 pm

पुष्पा द राइज पार्ट 1... युट्युबवर वेगवेगळी गाणी शोधताना / पाहताना अचानक या चित्रपटातील नुकतेच अपलोड झालेले स्वामी स्वामी हे तेलगु भाषेतील गाणे पाहण्यात आले होते.
त्या नंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला. अल्लू अर्जुन ची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्या सारखाच असे तो ट्रेलर पाहुन वाटले. या चित्रपटातील समंथाच्या आयटम साँग च्या शब्दावरुन काहीसा वाद निर्माण करण्यात आला होता...हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा मला वाटतं दुसर्‍याच दिवशी याची प्रिंट टेलिग्रामवर उपलब्ध झाली होती, ती प्रिंट मी क्षणभर पाहिली तर ती डब्बा होती. काही दिवसांनी हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर येईल तेव्हा पाहु असे विचार करुन लगेच ती प्रिंट डिलीट करुन टाकली.शेवटी हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर आला आणि मी तो पाहिला. हा चित्रपट पुष्पा सिरीज चा पहिला भाग आहे, होय याचा दुसरा भाग देखील येणार आहे हे तुम्हाला या चित्रपटाचा शेवट पाहताना लगेच कळते.चित्रपटाची सुरुवात अ‍ॅनिमेशन ने होते... आंध्रप्रदेशातील शेशाचलम जंगलातच मिळणार्‍या रक्त चंदनाच्या तस्करी आणि त्यातील सिंडिकेटवर आधारित हा चित्रपट आहे. पुष्पा राज ची मजुर ते सिंडेकेट ऑपरेटर असा प्रवास या भागात आपल्याला पहायला मिळतो. यासाठी त्याची हिंम्मत , हुशारी आणि अर्थातच हाणामारी यामध्ये त्याला मदत करते. या चित्रपटात पुष्पा राज चा एकच मोठा विक पॉइंट आहे तो म्हणजे तो त्याच्या पित्याची अनौरस अवलाद आहे. यावर जो मीठ चोळतो त्यावर पुष्पा राज लयं भडकतो. लहनपणी वडिलांचे नाव त्याच्या नावापुढे लावण्यास त्याचा सावत्र भाऊ ज्या प्रकारे नाकारतो त्याचा परिणाम बाल पुष्पा राज च्या मनावर होतो आणि एक खांदा त्या अनामिक ताणाने / दु:खा ने उंचावला जातो... हाच उंचावलेला खांदा घेऊन पुष्पा राज अख्या चित्रपटात त्याच्या राउडी स्टाईल ने वावरतो.
चित्रपटात अभिनेत्रीला विशेष काम नाही, गाण्यात हिरो भोवती नाचणे आणि अर्धे उरोज आवडीने दाखवणे या पलिकडे तिच्या वाट्याला काहीच नाही,बाकी जो भी हय वह सब पुष्पा राज और पुष्पा राज ही हय.
या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन मध्ये श्रेयस तळपदे ने पुष्पा राज या व्यकीरेखेला आवाज दिला आहे. त्याचा आवाज या पुष्पा राज च्या व्यक्तिरेखेला आणि पर्याया ने अल्लू अर्जुन अगदी योग्य जुळला आहे. अगदी अधे-मधे एखाद दुसारा मराठी शब्द देखील कानावर पडतो. :) अल्लू अर्जुन ने या उत्तम आवाजा बद्धल श्रेयस तळपदे चे आभार देखील मानले आहेत.

कुजके कराचीवुड :-
अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत देखील येवुन गेला. मराठीत सगळ्यांना माझा नमस्कार असे त्याच्या साऊथ टोन मध्ये म्हणुन मराठी लोकांचे मन जिंकुन गेला. :) पण या सुपरस्टारला खिजवण्याचा प्रयत्न कराचीवुडच्या लाळघोट्या प्रश्न कर्तांनी केला. मुझे किसी ने कहा आप साऊथ के सॉलमॉन खॉण है | असे कर्मद्ररिदी बोलणे करुन याची सुरुवात झाली. [ कुठे अल्लू अर्जुन आणि कुठे अभिनयाच्या नावावर माकड चाळे करणारा माजुरडा म्हातार बाबा. ही म्हणजे सिंव्ह आणि माकड यांची तुलना करण्याचा मूर्ख प्रयत्न ! ] सॉलमॉन खॉण आपको पसंद है ? और कोनसा बॉलुवुड का स्टार आपको पसंद है ? [ किती चाटायची ? ] आपको पर्सनली करना हो तो कोनसे अ‍ॅक्टर की और कैनसी बॉलिवूड मुव्ही करना चाहोगे. [ हा महा कर्मदरिद्री प्रश्न ! अरे फुकणीच्यांनो... [दक्षिणेतील चित्रपट आणि गाणी यांचे रिमेकवर म्हातारा बाबा माकड उड्या मारतो, अल्लू अर्जून नव्हे ] काय बोलायचे ते पण तुम्हाला कळत नाही असे दाखवुन अपमान करणे चालुच. या सर्वांवर अजिबात न रागवाता अगदी कुल राहुन त्याची कुल उत्तरे अल्लू देऊन असला भुकड्डपणा करणार्‍या बाईचे तोंड बंद केले.
असो... तर या चित्रपटाचा पुढच्या भागाची वाट पाहणे आता आले आहे, तेव्हा ती पहावी असे म्हणतो.

मदनबाण.....

कलाचित्रपटप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

23 Jan 2022 - 9:04 pm | उपयोजक

काही प्रतिभावंत पैशांसाठी पंजाबीफाईड बॉलीवूडसमोर शरणागती पत्करतात. उदा. दिल है छोटासा सारखं अप्रतिम संगीत देणारा रहमान "हाय मेरी परमसुंदरी" सारखं तद्दन छपरी गाणं बनवतो. हे रहमाननं संगीतबद्ध केलंय हे पटायला जड जातंय. :(

Bhakti's picture

25 Jan 2022 - 5:25 pm | Bhakti

परमसुंदरी गाण्यातले हे शब्द मी परत परत रिवांइड करून ऐकते,किती सुंदर गायली आहे श्रेया घोषाल.

मुझे गहनों से बढ़ के सपनों की चाहत है
जिन सपनों को सच हो जाने की आदत है

धर्मराजमुटके's picture

23 Jan 2022 - 9:20 pm | धर्मराजमुटके

चित्रपट पाहिला पण केवळ मसाला आणि स्टाईल आहे. कथा नाही. एकदा बघायला ठीक. सामी सामी गाणं मात्र सगळीकडे धुमाकुळ घालत आहे. ते आवडले.

अ‍ॅमझॉन प्राईम वर नया सफर ही कोविड काळात घडलेल्या घटनांवर आधारित मालिका पाहिला. मनाला भिडणार्‍या गोष्टी आहेत. आवडली.

तर तेलुगू प्रेक्षक त्यांचे सिनेमे उचलतात तसे मराठी लोक करतात का?

हो.
सैराट आठवा. झिंगाट गाणं केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिकांना पण ठेका धरायला लावण्याइतपत जबरदस्त झालं होतं. त्यानंतरची दोन तीन वर्षे कोणत्याही वरातीत हे गाणं वाजल्याशिवाय वरात / सार्वजनिक कार्यक्रम पुर्ण होत नव्हते.
अवांतर : सामी सामी हे गाणे तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी असे चार भाषांत उपलब्ध आहे पण त्यातील तेलुगू चे बोल जास्त श्रवणिय वाटले.

मदनबाण's picture

24 Jan 2022 - 11:43 pm | मदनबाण

सामी सामी हे गाणे तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी असे चार भाषांत उपलब्ध आहे पण त्यातील तेलुगू चे बोल जास्त श्रवणिय वाटले.
होय मला तेलगू गाणेच अधिक श्रवणिय वाटले आहे.

काही काळा पूर्वी कोणी तरी मिमी चत्रपटातील आयटम साँग परम सुंदरी इथे कुठल्या तरी प्रतिसादात दिले होते... मी ते गाणं पाहिलं [ पहिल्यांदा इतकं आवडलं नाही] मग या चित्रपटाचा ट्रेलर पहायचा विचार केला... असेच अजुन एका चित्रपटाचा चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला, जो एका सत्य घटनेवर आधारीत आहे.चित्रपटाचे नाव आहे कागज. या दोन्ही चित्रपटातील समान दुवा म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठी. केवळ आणि केवळ पंकज त्रिपाठी या चित्रपटात असल्याने मी हे चित्रपट पाहिले आणि मला ते आवडले देखील. सरळ साधे कोणताही मसाला नसलेले पण भावनेला हात घालणारे हे दोन्ही चित्रपट एक वेळ पाहण्यास काहीच हरकत नाही.

याच बरोबर The Matrix Resurrections हा चित्रपट पाहण्याचे महापाप देखील मी केले. तुम्ही जर आधीच्या मॅट्रिक्स चित्रपटाच्या भागांचे पंखे असाल तर चुकुन देखील हा चित्रपट पाहु नका ! [ मी आधीच्या सर्व भागांचा विशेष चाहता असेल आधी कधी मूड रेड पिल चा झालाच तर हे भाग सांभाळुन जवळ ठेवले आहेत. ] तर हा चित्रपट म्हणजे महावाटोळे आहे. या वाटोळ्यात ट्रिनीटीचे उत्कट प्रेम पाहण्याचे समाधान देखील या चित्रपटात नसेल तर चित्रपटात उरले तरी काय ? त्यात प्रियांका चोपडीण उर्फ जोनस बाई चक्क उगाच यात हजेरी लावुन आहेत. वेळेचा अपव्यय करायची आणि डोक्याला शॉट लावुन घ्यायची खुमखुमी आली असेल तर हा चित्रपट पाहण्याचे पातक तुम्ही करायला हरकत नाही. याचा ट्रेलर द्यावा इतका भाव सुद्धा या चित्रपटाला मला देण्याची मला इच्छा नाही.

भरीस भर म्हणुन वेळ मिळाला तेव्हा अ‍ॅक्शन थ्रिलर Anna [ 2019 ] पाहिला, एक रशियन सुंदरी केजीबीची ऑफर स्विकारते आणि अंडर कव्हर एजंट बनुन ती जी काही हाणामारी करते ती या चित्रपटात पहायला मिळते.

जाता जाता :- आर्या सिझन पहायला सुरुवात केली आहे.

या वेस सिरीजमुळे बडे अच्छे लगते है हे गाणं अनेकांच्या ओठांवर परत आलं. :) @ भक्ती तुमच्या चॅनलवर हे गाणं असलेल माझ्या नजरेत आलं बरं का ! :)

विशेष :- लता दीदी अजुनही आयसीयूत आहेत, त्यांच्या तब्येतीस आराम पडावा ही प्रार्थना ! _/\_ त्यांनीच गायलेलं गाणं जे गेले २-३ दिवस मी सतत ऐकतो आहे ते आज सहीत दिल आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Sama Na Hota... :- Zameen

मित्रहो's picture

25 Jan 2022 - 12:11 pm | मित्रहो

मी अजून पुष्पा बघितला नाही. साधारण (काही अपवाद वगळता) तेलुगु सिनेमामधे वीस मिनिटात रक्त सांडायलाच हवे. पुष्पा मोठा चित्रपट आहे, स्मगलिंगवर आहे तर रक्त सांडणारच.

अवांतर मी कागज हा सिनेमा बघितला नाही. सत्यकथेवर आधारीत आहे असे वाचले होते. मी पूर्वी मिपावर मराठी दिनाच्या निमित्ताने लिहलेली कथा जिता असल्याचा दाखला सुद्धा काहीशी तशीच आहे. असे माझ्या बायकोने सांगितले. त्यावेळेला त्या सत्य घटनेविषयी कल्पना नव्हती

@ भक्ती तुमच्या चॅनलवर हे गाणं असलेल माझ्या नजरेत आलं बरं का ! :)

हे हे 😁
पुष्पा मधली तेलगूच गाणी जास्त छान वाटली.

विशेष :- लता दीदी अजुनही आयसीयूत आहेत, त्यांच्या तब्येतीस आराम पडावा ही प्रार्थना ! _/\_ त्यांनीच गायलेलं गाणं जे गेले २-३ दिवस मी सतत ऐकतो आहे ते आज सहीत दिल आहे.
माझ्या पिढीला लता दीदींना गाताना पाहता आलं, त्यांना लाईव्ह पर्फॉरमन्स देताना अनुभवता आलं. या सर्व बाबतीत आपण भाग्यवान ठरलो. आज गानकोकीळा आपल्यात राहिल्या नाहीत या बद्धल अतीव दु:ख झाले आहे.

लता मंगेशकर यांच्या अगणित आठवणी आपल्या सोबत आहेत आणि त्या तश्याच कायम राहणार आहेत... त्यांनी गाणी गायलेली आपल्याला ठावूकच आहेत परंतु त्यांनी किशोर कुमार यांची मुलाखत देखील घेतली होती. [ किशोर कुमार यांची शेवटची मुलाखत आणि लता दीदींनी बहुतेक घेतलेली ही एकमेव मुलाखत असावी.] अशी ती मुलाखात आज दीदींना श्रद्धांजली देताना इथे देऊन जातो.

लता दीदींच कुठलं एक अतिशय आवडतं गाणं सांगा असं म्हंटल तर ते सांगण सुद्धा फार कठीण आहे, कारण कोणतं सांगाव ? हे निवडण देखील महाकठीण !
आज असचं एक निवडक गाणं देतो आणि या असामान्य गानसम्राज्ञीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. _/\_

मदनबाण.....

ज्वालामुखी 99 मधलं गाणं ,खुप उशीरा ऐकलंय.
https://youtu.be/t46ljSODXtk
रेहमानची जादू!

कुमार१'s picture

25 Jan 2022 - 7:58 pm | कुमार१

प्राईम वर पाहिला .आवडला
सात बायकांच्या विविध भूमिका मजेशीर आहेत
त्यांच्यामध्ये एकटा सिद्धार्थ चांदेकर बिच्चारा !

राघवेंद्र's picture

25 Jan 2022 - 8:17 pm | राघवेंद्र

स्टिव्ह आहे ना.

चित्रपतील शेवटचा कायप्पा चॅट मस्त आहे

राघवेंद्र's picture

25 Jan 2022 - 8:13 pm | राघवेंद्र

हे मराठी पुष्पाचे हे मराठी गाणे खूप प्रसिद्ध झाले आहे.

सिरुसेरि's picture

26 Jan 2022 - 12:04 pm | सिरुसेरि

काहि food vlogs हे मनोरंजक आणी माहितीपुर्ण वाटले . काही food vlogs च्या लिंक खाली दिल्या आहेत .

https://www.youtube.com/watch?v=yVTmr9qEeBM&list=WL&index=10 -- MARATHI Maharashtrian Veg Food | Vada Pav, Misal Pav, Jowar Bhakri, Thalipeeth, Srikhand & More

https://www.youtube.com/watch?v=I2GuLfYGhmM&list=WL&index=20 -- PURNABRAMHA Maharashtrian Vegetarian Cuisine

https://www.youtube.com/watch?v=bwKghEXbcBI -- Famous ALEPAK & Sugarcane Juice Tradition At SHEETAL RASAVNTI GRUHA!

https://www.youtube.com/watch?v=NjiTOTjKJao --- Mumbai Vada Pav & Maharashtrian Street Food

मदनबाण's picture

26 Jan 2022 - 1:11 pm | मदनबाण

@ उपयोजक
असे मास्टरपीस देणारा रेहमान मला आता दिसतच नाही. :(

@ मित्रहो
मी पूर्वी मिपावर मराठी दिनाच्या निमित्ताने लिहलेली कथा जिता असल्याचा दाखला सुद्धा काहीशी तशीच आहे.
ओक्के.

@ कुमार१
तुमच्या प्रतिसादामुळे मला हा चित्रपट प्राईमवर आल्याचे कळले आणि कालच पाहिला. चांगला आहे.
सिद्धार्थ चांदेकर बिच्चारा !
खरयं... अख्खे शुटिंग त्याने कोणत्या धीराने पूर्ण केले असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न केला ! :)))

@ राघवेंद्र
होय, चॅट मधील संवाद आणि ही कल्पना मस्त आहे, शेवटी तो वैतागुन ग्रुप सोडतो. :))) तम्ही दिलेले गाणे पाहिले. :)

@ सिरुसेरि
अगदी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अशीच एका फूड व्ह्लॉग माझ्या पाहण्यात आला होता... लयं त्रास झाला व्हता मला त्यावेळी !
त्या व्ह्लॉग चा दुवा :- https://www.youtube.com/c/anubhavsapra/videos

=======================================================================================

बरेच काळ माझे माझ्यासाठी मेकॅनिकल ऑटोमॅटीक वॉच घेण्याचे स्वप्न होते, पण ते घेण्यासाठी खिसा बर्‍यापैकी हलका करावा लागणार होता. शेवटी बराच काळ धीर धरल्यावर अपुन के हात पे वह घडी जम ही गई. बराचा रिसर्च आणि वाचन केल्यावर मी तो ब्रांड निवडला...त्यातल्या त्यात सगळ्यात स्वस्त आणि उत्तम दर्जा या दोन्ही गोष्टी मला त्यात अढळल्याने मी ती खरेदी पूर्ण केली.
असो... तर घडळ्यांवर रिसर्च करताना मी अनेक प्रकारचे आणि अनेक लोकांचे व्हिडियो पाहिले.असेच व्हिडियो पहाताना मला एका उत्तम चॅनलवर घड्याळ्याच्या एका ब्रँड बद्धल कळले ज्यांची घड्याळे अफलातुन आहेत... ज्याला तुम्ही आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणाल अशीच ही घड्याळे आहेत. अश्या त्या निर्म्यात्यांच्या घडाळ्याचे २ वेगळे व्हिडियो देतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeans

हातातील,गजराची,भिंतीवरील टोल्याची गड्याळे दुरुस्तीचा. मजा असे.
माझे आवडते मेकॅनिकल ऑटोमॅटीक वॉच म्हणजे सिको५

माझे आवडते मेकॅनिकल ऑटोमॅटीक वॉच म्हणजे सिको५
सिको म्हणजे दर्जा ! मला वाटतं त्यांची हाय एंड ची घड्याळे ग्रँड सिको या ब्रॅन्ड नेम खाली विकली जातात. मला देखील सिकोच भावले पण तेव्हढे बजेट नव्हते. मग सिकोवर बराच वेळ खर्च केल्यावर मला लक्षात आले की त्यांनी एनट्री लेव्हल ची घड्याळे अल्बा [ Alba Founded in Japan in 1979 ] या ब्रॅन्ड नेम खाली विकली जातात. [ From SEIKO WATCH CORPORATION, JAPAN ] ही कंपनी काही काळा पूर्वीच हिंदूस्थानात आली असुन मग मी यांच्या ऑफिशिअल पोर्टल वरुनच माझे घड्याळ विकत घेतले. :) [ The word Alba means dawn (or light, hope or new beginnings; in Spanish/Italian ]
ओफिशिअल पोर्टल वरुन घेण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बाजारात किंवा इतर ऑनलाईन पोर्टलवर चायनीज कंपन्यांनी बनवलेली ब्रँडेड कंपन्यांची अगदी हुबेहुब दिसणारी [ रेप्लिका ] घड्याळे खरी म्हणुन विकली जातात.अगदी रोलेक्स ची कॉपी देखील मिळते. त्यामुळे ओरिजिनल सेलर / कंपनीकडुन मेकॅनिकल वॉच विकत घेणे हे कधीही उत्तम.
या कंपनीवर असलेला एक लेख देखील नजरेत आला होता :-
Alba Watches: The Underrated Watch Brand with a Seiko Lineage
मेकॅनिकल ऑटोमॅटीक मला विशेष आवडण्याचे कारण म्हणजे त्याचा सेकंद काटा जी मुव्हमेंट करतो ते पाहताना मनाला एक वेगळेच समाधान मिळते जे Quartz मध्ये शक्य नाही.
त्यांच्या इंडियन युट्युब चॅनल वरील एक व्हिडियो इथे उदा. म्हणुन देऊन ठेवतो.

या घड्याळ्याच्या चावीच्या पोझिशन वरुन लगेच लक्षात येते की हे सिकोचेच उत्पादन आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.

वेगवेगळ्या रचना असतात. त्यात सिकोची फुल शटल होती. हाताच्या थोड्याश्या हालचालींत स्प्रिंग गुंडाळली जात असे.

मेकॅनिकल ऑटोमॅटीक मला विशेष आवडण्याचे कारण म्हणजे त्याचा सेकंद काटा जी मुव्हमेंट करतो ते पाहताना मनाला एक वेगळेच समाधान मिळते जे Quartz मध्ये शक्य नाही.
शक्य आहे हो.
असे Quartzचे घड्याळ मी चार वर्षांपूर्वी घाटकोपर स्टेशन (प.) येथे फुटपाथवर दोनशे रुपयांत घेतले आहे ते मी अजून वापरतो. विडिओ उद्या टाकेन.

त्यात सिकोची फुल शटल होती
यावर अधिक माहिती असेल तर सांगा, मला फक्त मुव्हमेंट टाईप माहिती आहे.

शक्य आहे हो.असे Quartzचे घड्याळ मी चार वर्षांपूर्वी घाटकोपर स्टेशन (प.) येथे फुटपाथवर दोनशे रुपयांत घेतले आहे ते मी अजून वापरतो. विडिओ उद्या टाकेन.
अच्छा, हे मला माहित नव्हते... कारण वॉच बीट रेट / फ्रिक्वेन्सी ही Quartz ची आणि मेकॅनिकलची भिन्न असते असेच माझे समजणे होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.

कंजूस's picture

8 Feb 2022 - 12:32 pm | कंजूस

क्वार्टझ घड्याळ
विडिओ
घड्याळाची लिंक

१)यांत्रिक घड्याळात सेकंदला अडीच वेळा गतीचे नियमन करता येईल असे गिअर ( चक्रे फिरवणे) ठेवणे सोपे जाते. ते थोडे जलदही करता येते. ( यांत्रिक stop watch).

२)भिंतीवरच्या लंबकाच्या घड्याळात सेकंदाला एकदा नियमन करता येते.

३)क्वार्टझ घड्याळातला क्वार्टझ क्रिस्टल सेकंदाला ३२७६८ वेळा गतीचे नियमन करू शकतो. त्यात एक माइक्रो चिप आइसी वापरून सेकंदाला एकदा गिअर फिरेल असे सामान्यपणे केलेले असते. पण ते सेकंदाला दोन, अडीच, पाच,दहा,शंभर. . वेळा चक्रे फिरतील असेही करणे हा माइक्रो चिपचा खेळ आहे.

-------
घड्याळाची अचुकता वाढवायची असेल तर गतिनियमन किती वेळा करता येईल यावर वाढत जाते. म्हणजे असं की सेकंदाला अडीच वेळा गतीमध्ये थोडासा फरक झाला तरी घड्याळ बरेच पुढे/मागे पळते. पण सेकंदाला ३२७६८ वेळा गती नियमन करू शकणाऱ्या रचनेत ३२७६० किंवा ३२७७० असा फरक झाल्यास घड्याळ फारसे पुढे मागे झालेले समजणार नाही.

म्हणजे की यांत्रिक घड्याळात महिन्यात अधिक/उणे एक मिनिट अचुकता आणणे अवघड असते पण क्वार्टझ घड्याळात एक वर्षात एक मिनिट अधिक/उणे अचुकता आणणे फारसे अवघड नाही.
(अगदी थोडक्यात दिले आहे.)

क्वार्टझ घड्याळांची माहिती देणारे बरेच लेख शोधले तर सापडतील. उदाहरणार्थ हा एक.

सीको ५ किंवा इतर यांत्रिक घड्याळातील रचना दाखवण्यासाठी माझ्याकडे घड्याळे नाहीत. पण नेटवर सापडले तर देईन.

कंजूस's picture

8 Feb 2022 - 12:35 pm | कंजूस

Open in new tab केल्यास विडिओ चालतोय.

व्हिडियो पाहिला. वेळ काढुन पोस्ट केल्या बद्धल धन्यवाद. तुम्ही दिलेली सगळी माहिती आवडली.

सीको ५ किंवा इतर यांत्रिक घड्याळातील रचना दाखवण्यासाठी माझ्याकडे घड्याळे नाहीत. पण नेटवर सापडले तर देईन.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहब्बत सरेआम नही बस एहसास होना चाहिए, हम उन्हे चाहते हैं ये पता सिर्फ उन्हें होना चाहिए।

कुमार१'s picture

29 Jan 2022 - 9:35 pm | कुमार१

आताच सह्याद्री वाहिनीवर मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमांतर्गत सत्यजित प्रभू यांचे सिंथेसायझर वादन व मुलाखत पाहिली.
अतीव सुंदर !
शनिवार आणि रविवार मिळून सह्याद्रीवर जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते अतिशय उत्तम असून मनाला समृद्ध करतात.

गंगुबाई काठियावाडी- ट्रेलर मस्त आहे. हा पाहावा लागणार.

गेहराईयां सुद्धा पाहण्यासारखा वाटतोय- दीपिका आणि सिद्धांत दोघेही भारीयेत.

Bhakti's picture

8 Feb 2022 - 9:09 am | Bhakti

गेहराईया,टायटल ट्रॅक! मस्तच आहे.
https://gaana.com/song/gehraiyaan-title-track-from-gehraiyaan

मदनबाण's picture

12 Feb 2022 - 11:10 am | मदनबाण

आर्या चा दुसरा सिझन पाहुन संपवला... हा सिझन फार डिप्रेसिंग आहे, शेवटाचा भाग तेव्हढा जरा सहन करवला. हल्ली डिप्रेसिंग कंटेंट चुकुन सुद्धा पाहु नये असे वाटतं.

काल KIMI पाहिला, दीड तासाचा फास्ट पेस असलेला थ्रिलर मुव्ही आहे ज्यात अ‍ॅलेक्सा सारख्याच डिव्हाइसचा [ किमी ] वापर दाखवण्यात आलेला आहे.
अभिनेत्री / मॉडल / सिंगर Zoë Isabella Kravitz ने Angela Childs ची भूमिका अप्रतिमपणे साकारली आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williams

खटपट्या's picture

13 Feb 2022 - 9:05 am | खटपट्या

पुष्पराज पाहिला
समालोचन खुप चांगलं लिहीलं आहेस रे बाणा.
कथा पहाता चित्रपट दोन तासात संपायला हवा होता. शेवटची ३० ते ४५ मिनीटे उगाच पाणि घालून सिनेमा वाढवला आहे.
बाकी आपल्या श्रेयस तळपदे ने दीलेला आवाज आवडला.

मदनबाण's picture

13 Feb 2022 - 11:20 am | मदनबाण

@ कुमार१ :-
हल्ली सह्याद्री हाच एक चांगला मराठी चॅनल उरला आहे असे वाटायला लागले आहे. इतर मराठी वाहिन्यांवर दर्जाहीन मालिकांची गर्दी झालेली आहे. हल्लीच अँग्री ऑल्ड मॅन विक्रम गोखले देखील या मालिकांवर बरसले होते. [ कोणी काय पहावे हा व्यक्तीगत मामला आहे, पण त्यामुळे दर्जाहीन मालिकांची निर्मीती काही थांबत नाही. ]
मध्यंतरी सह्याद्री ट्युन इन केला होता तेव्हा परत मला संगीत नाटक पहायला मिळाले होते, नारदमुनी अर्जुनाला त्रीदंडी सन्यास घेण्याची सुचना करत होते. :) बहुतेक संगीत सौभद्र होते.

@भक्ती :-
तुकडे -तुकडे गँगला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहान द्यायला हीच दिपिका पोहचलेली पाहिली आहे, तेव्हाच ही माझ्या मनातुन कायमची उतरली ! देशविघातक कृत्यांमध्ये प्रत्यक्ष / प्रत्यक्षपणे त्याला प्रोत्साहन देणारे कुठल्याही चित्रपटात / जाहिरातीत असता कामा नये, यांना कोणतेही काम मिळता कामा नये. जेव्हा यांची पैशांची मस्ती आणि नशा उतरेल तेव्हाच यांचे पाय जमिनीला लागतील. [ दिपिकाला कोणीतरी पैसे दिल्या शिवाय ती जेएनयु मध्ये गेली नसणार, हे कराचीवुडवाले पैसे घेतल्या शिवाय हसुन सुद्धा दाखवणार नाहीत ]
या कारणास्तव मी दिपिकाला टाळतो व तीचे नवे काही पाहत नाही.

@ खटपट्या सेठ :-
ओक्के, आता कराचीवुड मधुन बातम्या येत आहेत, सगळ्या पोरींना अल्लू बरोबर काम करायच... अरे तो म्हातार बाबा सॉलमॉन खॉण आहे ना ? बसा त्याची चाटतं अल्लू कशाला हवाय ? :)))

मी चक्क जे लो चा Marry Me पाहिला ! मला वाटलं मी हा चित्रपट सलग १५ मिनीटे सुद्धा पाहु शकणार नाही, पण पाहिला. ठीक आहे येव्हढच म्हणेन.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

कंजूस's picture

13 Feb 2022 - 9:10 pm | कंजूस

हे करावे लागते कल्लाकारांना. इतर लोक हेच करतात ते गुळमुळीत करतात. पण कलाकार अभिमानाने ताठ मानेने करतात.
महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहा.

अँग्री ओल्डमॅन विक्रम गोखले यांचा एबी आणि सीडी चित्रपट पाहिला... बीग बी यांचा यात कॅमियो आहे. संपूर्ण कुटुंबा सकट पाहिला आणि सगळ्यांना आवडला.
[ शर्वरी लोहकरे मला लयं आवडते, मी तिच्यासाठी विशेष करुन पाहिला. ;) जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा सुकट बोंबील होती, आत्ता टम्म पुरी झालीये ! :))) ]

काला टिपी म्हणुन बॉम्बे टु गोवा पाहिला... काही दिवसांपूर्वी एक हॉरर मुव्ही पाहिला... चित्रपटाचा अर्धा भाघ मला आवडला पण नंतर निराशा झाली.

जाता जाता :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sahvena Anurag... :- Panghrun

मदनबाण's picture

18 Mar 2022 - 11:41 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "No nation has friends only interests." - Charles de Gaulle

मदनबाण's picture

30 Mar 2022 - 10:41 pm | मदनबाण

पावनखिंड चित्रपटाचा अनुभव विशेष आवडला ! :) प्राईमवर पाहिला.
मला राजं आलं राजं आलं... हे गाण प्रचंड आवडलं.

आता...शेर शिवराज ची वाट पहायची ! [ तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kelewali... :- Pandu

मदनबाण's picture

1 Apr 2022 - 11:27 am | मदनबाण

असले भिकार चित्रपट कोण पाहतो ?? असा प्रश्न आमच्या टेलिग्राम ग्रुप मधल्या एका मिपाकर मित्राने केला होता... तेव्हा आपण हा उध्योग करुया असा विचार करुन मोठ्या धाडसाने हा संपूर्ण चित्रपट पाहिला. खरं तर भाऊ कदम चा अभिनय आणि २ गाणी या पलिकडे चित्रपटात काहीच नाही ! :))) सगळे डबल मिनिंग संवाद अगदी ओढुन-ताणुन लिहल्याचे आणि उगाच म्हणुन दाखवले आहेत.उदा. गाजर हलवा... हळुच लावा [ ही पावडर आहे. ] असे सोनाली बै हळुच फोनवर सांगतात इ इ इ.
तर, हा चित्रपट पाहण्याचा उध्योग मी केला तो तुम्ही करु नका ! :)))

जाता जाता :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- Chandramukhi

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2022 - 5:34 pm | चौथा कोनाडा

नशिब पांडू .....
........ तो क्या करेगा बंडू !

मी शक्यतो असल्या चित्रपटांच्या नादीच लागत नाही, त्या पेक्षा छान छान सिनेमे उपलब्ध असतात.
मागच्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर "सायकल" सिनेमा पाहीला. पहावाच असा निरागसतेचा सुंदर स्पर्श असलेला सिनेमा !
https://www.youtube.com/watch?v=w6dbGBgrB2c
यातलं भाऊ कदम यांचं काम भारी झालंय !

सायकल -कोकणातला निसर्ग, निरागस कथा , मस्त!

पहावाच असा निरागसतेचा सुंदर स्पर्श असलेला सिनेमा !
पहायला हवा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)

मदनबाण's picture

4 May 2022 - 11:09 pm | मदनबाण

पहायला हवा...
चित्रपट पाहिला. नितांत सुंदर कोकण पहायला मिळाले आणि कथा देखील. चित्रपटातील सगळे अँगल्स सुंदर घेतले आहे. दिप्ती लेले ने छोटीशी भुमिका असली तरी उत्तम अभिनय केला आहे याच प्रमाणे मिथिला ने देखील सहज सुंदर काम केले आहे. सगळ्या कलाकारांनी यात उत्तम अभिनय केल्यामुळे चित्रपट सुंदर वाटला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milke | Asha Bhosle | Suresh Wadkar :- Parinda [ 1989 ]

धर्मराजमुटके's picture

11 Apr 2022 - 10:57 pm | धर्मराजमुटके

आज ही चित्रफिती पाहिली.
पटला आणि आवडला.

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2022 - 5:39 pm | चौथा कोनाडा

सहमत

मदनबाण's picture

16 Apr 2022 - 12:17 pm | मदनबाण

शर्माजी नमकीन हा कॉमेडी ड्रामा असलेला चित्रपट आहे, ऋषि कपूर यांचा शेवटचा आणि त्यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिलेला हा चित्रपट परेश रावल यांनी पूर्ण केला.
हलका-फुलका हा चित्रपट मला आवडला. :)

धर्मवीरचा ट्रेलर पाहण्यात आला आहे :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hanuman Chalisa

मदनबाण's picture

18 Apr 2022 - 10:23 pm | मदनबाण

हल्लीच Death on the Nile हा मिस्टरी क्राईम ड्रामा यांच संमिश्रण असलेला चित्रपट पाहिला. ठीक ठाक वाटला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 12:10 pm | टर्मीनेटर

काल KGF Chapter 2 पाहिला!

मार्च 2020 नंतर थेटरात जाऊन पाहिलेला हा पहिलाच चित्रपट. कुठल्याही चित्रपटाकडून निव्वळ मनोरंजन ही एकमेव अपेक्षा मी बाळगत असल्याने हा वेगवान चित्रपट मला आवडला!

काल पासुन डोक्यात बिजली बिजली जे शिरले ते उतरण्यास तयार नव्हते... मग उगा यावर अधिक काय सापडते ते पहावे म्हणुन शोध घेतला असता, खालील २ लयं भारी व्हर्जन्स दिसले. एन्जॉय माडी ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Music is the medicine of the mind.

मदनबाण's picture

21 May 2022 - 8:07 pm | मदनबाण

यावेळी जरा हटके वाटावे असे चित्रपट पाहिले आहेत...MORBIUS पाहिल्यावर यावेळी जरा चांगली कथा आणि उत्तम चित्रिकरण मला पहायला मिळाले असे वाटले.
कथा मनुष्य आणि वटवाघुळ यांच्या संबंधाच्या पुढे सरकलेली आहे. क्षणभर मला वटवाघुळ आणि करोना व्हायरस यांची आठवण झाली ! मला प्रथमच समजले की व्हॅम्पायर प्रजातीचे वटवाघुळे केवळ रक्त पिउन स्वतःचे पोट भरतात.
दुसरा चित्रपट पाहिला तो म्हणजे Everything Everywhere All At Once. मल्टीव्हर्स संकल्पनेवर आधारीत हा चित्रपट आहे.

चित्रपट बद्धल मी म्हणीन कैच्याकै... तुमच्या मेंदुला आपल्या युनिव्हर्स मध्ये ठेवुन हा चित्रपट पहावा... :)))

बादवे.... काही काळा पुर्वी BLOODSHOT देखील पाहिला होता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Anjathey Jeeva Official Video | Full HD | Jodi | A.R.Rahman | Prashanth | Simran | Vairamuthu

कुमार१'s picture

21 May 2022 - 8:38 pm | कुमार१

मॉडर्न लव मुंबई ही ६कथांची मालिका आलेली आहे.
पहिल्या चार आवडल्या; पाचवी नाही; सहावी अजून बघायची आहे.
आधुनिक काळातील प्रेम कथा असे स्वरूप आहे
दुसरी कथा समलिंगी पुरुषांच्या विवाहावर आहे.

कुमार१'s picture

29 May 2022 - 5:29 pm | कुमार१

दोन दिवसांपूर्वी मी सह्याद्री वाहिनीवर ‘दास्तान-ए- बडी बांका’ या नावाचा मुंबई विषयक सुरेख मराठी कार्यक्रम पाहिला. हा द्विपात्री प्रयोग आहे- एक पुरुष तर एक स्त्री निवेदक.

गेल्या पन्नास वर्षातील मुंबईच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीचा सुरेख धांडोळा त्यात घेतला आहे. काही वाक्ये डोळ्यांच्या कडा ओलावतात.
अशा या सुंदर मराठी कार्यक्रमाला उर्दू शीर्षक का दिले ते समजले नाही.

मदनबाण's picture

1 Jun 2022 - 10:24 pm | मदनबाण

कामा निमित्त्याने माझे माझ्या हापिसातल्या एका दाक्षिणात्य मुली बरोबर कधी कधी बोलणे होते, मागच्या आठवड्यात कामा बरोबरच कॉल मध्ये जरासे अवांतर बोलणे झाले असता तीने मला हा चित्रपट सुचवला. एस एस राजमौली यांचा हा जबरदस्त अ‍ॅक्शानपट त्यांनी अतिशय उत्तमपणे साकारला असुन यातील ग्राफिक्स देखील तितकेच चांगले आहे. कितीही मारहाण झाली तरी काही वेळातच शून्य वेदना आणि गायब झालेल्या जखमा इ.इ.इ. आणि सामन्य माणसात अमानवीय शक्ती असु शकते यावर संपूर्ण विश्वास ठेवुन हा चित्रपट पहावा. या चित्रपटा बरोबरच तीने मला केजीएफ आणि केजीएफ पार्ट २ देखील बघण्यास सांगितले आहे. ती म्हणाली पहिला पार्ट जरा हळु आहे पण दुसरा भाग जबरदस्त आहे. हे दोन्ही चित्रपट पाहण्याचा विचार आहे.

बर्‍याच काळाने बॉन्डपरट पाहण्याची निर्माण झाली होती, त्यामुळे मागच्या वर्षी रिलीज झालेला No Time To Die पाहिला. बॉन्डपटात अपेक्षित असलेला मसाला आणि जबदस्त चेसिंग सीन्स असलेला हा चित्रपट पहाण्या सारखा आहे, पण शेवट काही खास वाटला नाही.

जाता जाता :- काश्मिर फाईल्स पाहिला. जवळपास सगळंच आधी पासुन माहित होत...पण चित्रपटात त्या घटना कश्या चित्रीत केल्या गेल्या आहेत ते पाहण्यासाठीच हा चित्रपट पाहिला. विवेक अग्नीहोत्री यांच्या बद्धल कालच एक बातमी वाचनात आली होती, त्याचा दुवा खाली देवुन ठेवतो.
'They have cancelled me': Vivek Agnihotri lashes out at 'Hinduphobic' Oxford Union over scrapped event, sends legal notice

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jun 2022 - 1:30 am | अमरेंद्र बाहुबली

कश्मिर फाईल्स मीही कालच पाहीला, “शांताप्रींयांचे” ओला हु ऊबेर घोषणांसहीतचे चित्रीकरण करायला फार हिंमत लागते प्रोड्युसर डायरेक्टर ला खरंच सलाम.
केजीएफ-१ हा दाढीपट पाहीला होता. त्यात हिरोईनीला दाढी नव्हती म्हणून ती मला ओळखता आली, नाहीतर पहीला तासभर कोणता दाढीवाला कोण आहे हे काही कळतंच नव्हतं. देशीदारूचे दोन पेग मारल्यावर जसं कुणीतरी बोलतं अगदी तसंच हिरोला बोलताना पाहून प्रचंड मानसीक धक्का बसला पुर्ण सिनेमाभर त्याची देशी दारूची नशा ऊतरला नव्हती, त्या नशेत तो गरूडाला हा मैरून येतो. (देशी दारूत किती ताकद असते ते हा सिनेमा पाहून कळतं) त्यामुळे केजीएफ- २ पहायची हिंमत होत नाहीये. पण आता पाहू म्हणतो.

कितीही मारहाण झाली तरी काही वेळातच शून्य वेदना आणि गायब झालेल्या जखमा इ.इ.इ. आणि सामन्य माणसात अमानवीय शक्ती असु शकते यावर संपूर्ण विश्वास ठेवुन हा चित्रपट पहावा.

खीखीखी. आर ह्या पेक्षा आमचा बाहुबली बरा. MIT मध्ये ईंजीनिअरींग केली होती त्याने, त्याचा वापर करून तो धरण बांधतो.
MIT - माहीष्मती ईंस्टीट्युट ओफ टेक्नोलाॅजी.

नि३सोलपुरकर's picture

2 Jun 2022 - 1:23 pm | नि३सोलपुरकर

MIT - माहीष्मती ईंस्टीट्युट ओफ टेक्नोलाॅजी .... लोल ,हा हा .

मदनबाण's picture

11 Jun 2022 - 5:34 pm | मदनबाण

बर्‍याच वर्षांनी मी या Scream सिरीज मधला / प्रकारातील चित्रपट पाहिला... याचाही शेवट मला आवडलेला नाही.

पेट पुराण पाहिले :-

एकदा टीपी म्हणुन पाहु शकता.

जाता जाता :- आश्रभ पर्व ३ पहायला सुरु केली आहे. :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Megha Chhaye Aadhi Raat...

कुमार१'s picture

26 Jun 2022 - 9:34 am | कुमार१

सह्याद्री वाहिनीवर मो ग रांगणेकर यांचे संगीत कुलवधू पाहिले.
खूप जुने नाटक
नवरा कारकून, पगार साठ रुपये तर बायको सिनेमा कंपनीत नटी, पगार पंधराशे रुपये.
यातून जो पुरुषी अहंकार उभा राहतो त्याचे सुंदर चित्रण. संगीत पदे सुद्धा छान आहेत.