अप्रकाशित विनोदी साहित्य हवे आहे

विनिता००२'s picture
विनिता००२ in जनातलं, मनातलं
14 Apr 2022 - 12:55 pm

नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो,

'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…

आपण विनोदी साहित्य लिहीत असाल...जसे की विनोदी कथा, चुटकुले, नाटुकले इत्यादी तर आपण आपले स्वलिखित 'अप्रकाशित साहित्य' आम्हांला देऊ शकता. (फार ओढून ताणून केलेले विनोद नकोत, तसेच व्हॉट्सअप विनोद नकोत. कुठलेही कमरेखालचे विनोद नकोत.) निखळ फॅमिली ड्रामा हवा. उदा. वागळे की दुनिया, तारक मेहता का उल्टा चष्मा...आपल्या पुलंचं साहित्य.

निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....!

अट एकच....साहित्य अप्रकाशित हवे...कुठल्याही माध्यमात ते प्रकाशित नको. तसा करार केला जाईल.

लगेच संपर्क साधा…

विनिता - ७७०९०७३००८

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

14 Apr 2022 - 7:38 pm | प्रसाद गोडबोले

शुभेच्छा !

विनोदी लेखन करणार्‍या आमच्या मित्रांना सदर मेसेज फॉरवर्ड करत आहोत .

आता अवांतर :
मिसळपाववर कोणी जेन्युईन विनोदी लेखन करणारे तुम्हाला कदाचित कोणीच सापडणार नाही. २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाले अन मिसळपाव मोदी समर्थक अन मोदीद्वेष्टे अशा दोन गटात विभागला गेला. त्यानंतर तुम्ही कोणत्याही धाग्यावर जावा तुम्हाला कोणी ना कोणी हा वाद काढताना दिसेल. नजिकच्या मिपावर वाचलेले जेन्युईन विनोदी लेखन मला आठवतच नाही. जे काही विनोद आहेत ते सारे राजकीय ढंगानेच आहेत , काथ्याकुट ह्या विभागात !

उदाहरणार्थ : कझाकस्तान मधील अशांतता पाहुन भारतात अशांतता व्हावी हे डोहाळे लागलेले प्रतिसाद .
किंवा पाच पैकी चार राज्यात बहुमताने सरकार स्थापन करुन पंजाबमध्ये मोदीला त्याच्या धोरणांचा कसा फटका बसला ह्यावर चर्चा करणारे प्रतिसाद !
किंवा स्त्री लंगिकतेच गुढ ह्या माहीतीपुर्ण धाग्यात आलेले मायावती अन ममता ह्यांचे उल्लेख .
किंव्वा कश्मीरफाईल्स धाग्यावर हा चित्रपट कसा द्वेष निर्माण करतो असे प्रतिपादन करणारे प्रतिसाद !

हे सर्व आमच्यासाठी भयंकर विनोदी आहे . =))))

पण मुळ निखळ , न बोचणारा , अराजकीय विनोद मिपावरुन हरवला तो हरवलाच . हे केंद्राचे अन भाजपाचे कारस्थान आहे . मिसळपाव ला बदनाम करु नका. मिसळपाव दिल्लीपुढे झुकणार नाही =))))

आता २०२४ मध्ये राहुलजीं पंतप्रधान झाले की मिपावर रिनेसान्स होऊन परत एकदा उच्च दर्जाच्या विनोदी साहित्याची लाट येईल ह्यात आम्हाला संशय नाही .

=))))

विनिता००२'s picture

15 Apr 2022 - 8:15 am | विनिता००२

चालायचंच.....राजकारणी निखळ विनोद चालतील...:)

इरसाल's picture

15 Apr 2022 - 11:12 am | इरसाल

आता २०२४ मध्ये राहुलजीं पंतप्रधान झाले की
माझा पण हाच होरा आणी मनापासुन इच्छा आहे. एकंदरीत भारतात आणी मिसळपावावर दुखी आत्मे वाढलेत. निदान त्यांच्या निमीत्ताने तरी २०२४ पासुन विनोदांचा शिडकावा होईल भारतात. ( खरतर त्यांची कुवत जगावर विनोदांचा शिडकावा करण्याची आहे...पण ते एक असोच)

मुक्त विहारि's picture

14 Apr 2022 - 10:14 pm | मुक्त विहारि

उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम! (https://www.misalpav.com/node/37288)

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने (https://www.misalpav.com/node/23849)

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२ (https://www.misalpav.com/node/23962)

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -३ (https://www.misalpav.com/node/24058)

मुक्त विहारि's picture

14 Apr 2022 - 10:31 pm | मुक्त विहारि

त्यांचे लेखन खालील ठिकाणी मिळेल ....

https://www.misalpav.com/user/1509/authored

सौन्दर्य's picture

14 Apr 2022 - 10:45 pm | सौन्दर्य

नमस्कार. मी तुमच्या व्यक्तिगत आयडीवर संपर्क करू शकतो का ? मी भारताबाहेर राहतो म्हणून हा प्रश्न.

विनिता००२'s picture

15 Apr 2022 - 8:13 am | विनिता००२

नक्कीच!

व्हॉट्साप करु शकता का??

विनिता००२'s picture

16 Apr 2022 - 9:27 am | विनिता००२

नमस्कार
संपर्काला काही प्रॉब्लेम असेल तर सांगावे.

विनिता००२'s picture

15 Apr 2022 - 8:14 am | विनिता००२

सगळे प्रतिसाद पाहीले. प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी :)

मला 'अप्रकाशित साहित्य' हवे आहे..जे कुठेच, कुठल्याच माध्यमात प्रकाशित नको.

धर्मराजमुटके's picture

15 Apr 2022 - 12:52 pm | धर्मराजमुटके

अप्रकाशित विनोद असे काही नसते हो. फक्त तो विनोद बहुसंख्यांनी ऐकलेला / वाचलेला नसावा.

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Apr 2022 - 1:41 pm | चेतन सुभाष गुगळे

अप्रकाशित विनोदी साहित्य

हा नेहमीच्या विनोद / चुटकुले यांच्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार धागालेखिकेला अपेक्षित असावा. माझ्याकडे असे काही अप्रकाशित साहित्य आहे. ते मी पाठवून देईन.

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Apr 2022 - 1:53 pm | चेतन सुभाष गुगळे

https://bookhungama1.rssing.com/chan-58572808/article312.html

कदाचित असं काहीतरी अपेक्षित असावं. धागालेखिका यांनी खुलासा करावा.

विनिता००२'s picture

15 Apr 2022 - 5:23 pm | विनिता००२

अप्रकाशित म्हणजे जो ऐकणार्‍यांन्साठी नवीन असेल....आधी कुठेच ऐकलेला नसेल, छापलेला नसेल.

नवा कोरा असेल....एव्हडा खुलासा पुरे असावा.

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Apr 2022 - 1:47 pm | चेतन सुभाष गुगळे

निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....!

विनोदा शिवाय इतर विषयावर भविष्यात पॉडकास्ट करण्याचा विचार आहे का?

विनिता००२'s picture

15 Apr 2022 - 5:21 pm | विनिता००२

नक्कीच आहे :)

अनिंद्य's picture

17 Apr 2022 - 2:16 pm | अनिंद्य

लेख पाठवलाय.

बघा जमतं का.