फसवून/जुलमाने धर्मांतर

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
4 Oct 2021 - 7:29 pm
गाभा: 

योगींनी मागच्या वर्षी उत्तरप्रदेशात बेकायदेशीर धर्मांतराविरोधी अध्यादेश आणला.
https://en.m.wikipedia.org/wiki/Prohibition_of_Unlawful_Religious_Conver...

या विषयसंबंधाने काही शंकांचे निरसन व्हावे.

१. एखाद्या अडचणीत सापडलेल्या हिंदूला भरपूर पैसे देऊन मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनवले आहे हे एखादी हिंदू संघटना किंवा पोलिस ते कोर्टात सिद्ध कसं करणार? मुस्लिम/ख्रिश्चन धर्मप्रसारकाकडून लठ्ठ पैसे मिळाल्यावर तो धर्मांतरीत मुस्लिम/ख्रिश्चन ते कबूल करेल का?

२. लवजिहादमधे फसवून हिंदू मुलीशी मुस्लिम मुलाने लग्न केलं असेल तर ती मुलगी आपल्याला फसवलं असल्याचं का मान्य करेल? सज्ञान मुलगी स्वमर्जीने त्या मुस्लिम मुलासोबत लग्न करुन गेली असेल तर पोलिस हा लव्हजिहादचा प्रकार आहे हे कसं सिद्ध करणार? काय पुरावे गोळा करतील?

३. ऐतिहासिक काळात ज्या हिंदूंना तलवारीचा धाक दाखवून किंवा कोणतेतरी आमिष दाखवून मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनवलं गेलं असेल त्यांचं काय? त्यांना कायद्याच्या कक्षेत कसे आणणार? की हा कायदा ऐतिहासिक काळात जुलमाने मुस्लिम/ख्रिश्चन बनवलेल्यांसाठी नाहीच?
असेल तर मग सध्याच्या भारतीय मुस्लिम/ख्रिश्चनांच्या पूर्वजांना जबरदस्तीने मुस्लिम/ख्रिश्चन बनवण्यात आले होते हे कोर्टात कसे सिद्ध करणार?

४. ख्रिश्चन धर्मप्रसारक पैसे वाटून किंवा अन्य आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मियांची संख्या वाढवतात.यामागे पाश्चात्य देश, तिथले धनाढ्य यांची प्रचंड ताकदवान लॉबी तसेच भारतातले हिंदू धर्माबद्दल अजिबात आपुलकी नसलेले लोभी, पाठीचा कणा नसलेले राजकारणी हे सुद्धा असतात. या सर्वांना विरोध करणं इतकं सोपं आहे का? एखाद्या राजकीय व्यक्तीचा पैसे वाटून ख्रिश्चन बनवणार्‍या संस्थेशी संबंध आहे हे सिद्ध करणे इतके सोपे आहे का?
काही संघटना, वैचारीक गट, व्यक्ती या ख्रिश्चन धर्मप्रसारकांना मदत करणार्‍या राजकीय पक्षांना कधी थेट तर कधी छुप्या मार्गाने पाठींबा देत असतात.ते कसे थांबणार?

प्रतिक्रिया

hrkorde's picture

4 Oct 2021 - 7:35 pm | hrkorde

बैल गेला नि झोपा केला

उपयोजक's picture

5 Oct 2021 - 2:19 pm | उपयोजक

स्पष्ट लिहा जे वाटतंय ते

hrkorde's picture

6 Oct 2021 - 4:55 pm | hrkorde

मी जे स्पष्टपणे लिहिले होते , ते इथून कधीच उडवले आहे

Nitin Palkar's picture

4 Oct 2021 - 8:17 pm | Nitin Palkar

धर्मांतराचे जे काही प्रकार सध्या दिसताहेत त्यामध्ये कुठेही अन्य कोणत्याही धर्मातून हिंदू धर्मात आले अथवा आणले असे दिसत नाही. हिंदू धर्मातून मात्र अनेक धर्मांत गळती होताना दिसतेय. त्याला कुठेतरी पायबंद बसावा या साठी हे पाऊल आवश्यकच आहे. काय उपयोग होईल असा विचार करत बसून राहण्यापेक्षा ही सुरुवात नक्की योग्य आणि गरजेची आहे.

शानबा५१२'s picture

5 Oct 2021 - 6:57 pm | शानबा५१२

पुर्णपणे सहमत!

लवजिहादमधे फसवून हिंदू मुलीशी मुस्लिम मुलाने लग्न केलं असेल तर ती मुलगी आपल्याला फसवलं असल्याचं का मान्य करेल? सज्ञान मुलगी स्वमर्जीने त्या मुस्लिम मुलासोबत लग्न करुन गेली असेल तर पोलिस हा लव्हजिहादचा प्रकार आहे हे कसं सिद्ध करणार? काय पुरावे गोळा करतील?

सज्ञान, स्वमर्जीने, तरी पोलीस कसे सिद्ध करणार बरे????????

कूटप्रश्नच....

३. ऐतिहासिक काळात ज्या हिंदूंना तलवारीचा धाक दाखवून किंवा कोणतेतरी आमिष दाखवून मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनवलं गेलं असेल त्यांचं काय? त्यांना कायद्याच्या कक्षेत कसे आणणार?

आणणार म्हणजे काय ? आज स्वतःहून हिंदू होण्यास ते स्वतंत्र आहेत ना? मग नक्की काय वेगळे होणे अपेक्षित आहे ?

१. एखाद्या अडचणीत सापडलेल्या हिंदूला भरपूर पैसे देऊन मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनवले आहे हे एखादी हिंदू संघटना किंवा पोलिस ते कोर्टात सिद्ध कसं करणार? मुस्लिम/ख्रिश्चन धर्मप्रसारकाकडून लठ्ठ पैसे मिळाल्यावर तो धर्मांतरीत मुस्लिम/ख्रिश्चन ते कबूल करेल का?

पोलिसांनी/सरकारने अश्या गरजूंना आपला धर्म विकून पोट भरण्याची वेळ येऊ नये अशी सोय करायला हवी, पण ते सोशलिझम कम्युनिझम आहे, त्यामुळे ते नकोच. त्यापेक्षा आपण त्यांना कोण पैसे देणार नाहीत ह्याची काळजी घेऊ.
(स्पष्टीकरण- कोणाच्या मदतीआधी त्याने आपला धर्म बदलावा हि अपेक्षा साफ चूकच आहे, आणि त्यात मदत्त करणे हा दुय्यम हेतू असू शकतो. पण जर, हि मदत अत्यंत मागास आदिवासीनना, गरिबांना होत असेल, तर त्यांची material condition सुधारणे हे त्यांच्या शाश्वत आत्म्याच्या well-being पेक्षा मला फार फार फार जास्त महत्वाचं वाटत.)

गॉडजिला's picture

4 Oct 2021 - 9:15 pm | गॉडजिला

material condition सुधारणे हे त्यांच्या शाश्वत आत्म्याच्या well-being पेक्षा मला फार फार फार जास्त महत्वाचं वाटत
सुवर्णाक्षरात कोरुन ठेवण्याजोगे वाक्य… प्रथम अर्थ, मग काम, मग धर्म अन शेवटी मोक्ष.

काय उपयोग होईल असा विचार करत बसून राहण्यापेक्षा ही सुरुवात नक्की योग्य आणि गरजेची आहे.
१००% मान्य
आणि दुसरे हि महत्वाचे कि धार्मिक संस्थांना बाहेरून जो पैसा येतो त्याच्या वापराकडे लक्ष ठेवणे

राहुल गांधी बोलला मी हिंदू आहे , तर किती हिंदू लोकांनी त्याला हिंदू ग्रंथ पाठवले आणि ये आमच्यात म्हणून सांगितले ?

Rajesh188's picture

5 Oct 2021 - 9:37 am | Rajesh188

फसवून धर्मांतर म्हणजे काय हे काही समजले नाही.जुलमाने धर्मांतर होत असेल तर प्रचलित कायद्या अंतर्गत पण सरकार कठोर कारवाई करू शकते.सरकार नी तो अधिकार वापरावा.
धर्मात बांधून ठेवायला हिंदू धर्म कमी पडत आहे का असा एक प्रश्न मनात येतो..
मुस्लिम लोक धर्मांतर करत नाहीत कारण धर्म बदलण्याची हिम्मत च होणार नाही अशी व्यवस्था च त्या धर्मात आहे.

रात्रीचे चांदणे's picture

5 Oct 2021 - 10:34 am | रात्रीचे चांदणे

फसवून धर्मांतर म्हणजे काय हे काही समजले नाही.
लग्नाचे अमिश दाखवून बरीच धमांतरे केली जातात, तर पैशांची आमिष दाखवूनही धर्मांतरे चालू आहेत.

धर्मात बांधून ठेवायला हिंदू धर्म कमी पडत आहे का असा एक प्रश्न मनात येतो..
धर्मात बांधून ठेवायला हिंदू धर्म नक्कीच कमी पडत आहे कदाचीत आपण गरजेपेक्षा जास्तच सहिष्णू असल्यामुळे हे होत असेल. केवळ 70 वर्षापूर्वीच आपल्या देशाचे धर्मामुळेच तुकडे झाले आहेत. भारतातील एकमेव मुस्लिमबहुल राज्य काश्मीर तिथूनही हिंदूंना हकलवून लावले गेलं. धर्मनिरपेक्ष हा शब्द सर्वात जास्त हिंदूच हिंदू विरोधात वापरताना दिसतात.
त्यामुळे योगी सरकार ने धर्मांतरविरोधी कायदा आणला आहे तो योग्यच आहे. इतके दिवस ज्यांचे फसवून धर्मांतर केले असेल त्यांना त्यांच्या मूळ धर्मात परत आणले पाहिजे. त्यासाठी आर्थिक मदतीची तरतूदही केली पाहिजे.

hrkorde's picture

5 Oct 2021 - 1:10 pm | hrkorde

नेपाळ , भूतान , ब्रह्मदेश , लंका , मालदीव , इंडोनेशिया हेही तुकडे पडलेच आहेत , पण ते मुस्लिम धर्मावरून पडलेले नाहीत

hrkorde's picture

5 Oct 2021 - 1:32 pm | hrkorde

फाळणी म्हटलं की लगेच मुसलमान व ख्रिसचनवर ढकलून मोकळे होतात

मुस्लिम धर्म 1500 वर्षांपूर्वी आला
ख्रिसचन 2000 वर्षांपूर्वी आला.

त्याच्याआधीच जगात 200-400 देश अस्तित्वात होते , मग ह्यांना वेगळं कोणत्या परमात्म्याने केले होते म्हणे ?

सुरिया's picture

5 Oct 2021 - 10:44 am | सुरिया

ज्यांचे फसवून धर्मांतर केले असेल त्यांना त्यांच्या मूळ धर्मात परत आणले पाहिजे. त्यासाठी आर्थिक मदतीची तरतूदही केली पाहिजे..........
हायला, डबल धमाका.
पैले क्रिस्ती व्हायला फादर पैशे देणार. मग परत हिंदू व्हायला महाराज मदत देणार.
बिझनेस होईल काही जणांचा.
जे काही करायचे ते पहिला धर्म बदलण्याच्या आधीच करायला हवे.
निदान बेसिकली सोडावा धर्म असे वाटलेच नाही पाहिजे.
.
किंवा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाहेरच्या श्रध्दास्थान यांचे महत्व कमी किंवा बंदच करायला पाहिजे. नेशन फर्स्ट. नेशनातले लोकल धर्मगुरू सेकंड. मग काय करायचे ते करा म्हणाव.

Rajesh188's picture

5 Oct 2021 - 11:09 am | Rajesh188

दर शुक्रवारी मुस्लिम समज नमाज अदा करण्याच्या निमित्ताने एकत्र येतात.त्या मुळे त्यांचे बोंडींग राहते.
ख्रिस्त धर्मात पण रविवारी सर्व चर्च मध्ये जमा होतात त्या मुळे त्यांचे bonding राहते.
आणि दोन्ही धर्मातील लोकांची उपस्थिती मशीद,चर्च मध्ये चांगली असते.अगदी ६० ते७० टक्के तरी लोक हजर राहत असतील.सरासरी महिन्याचा हिशोब केला तर.
हिंदू धर्मात असे काही घडत नाही .नियमित मंदिरात जाणाऱ्या लोकांची संख्या नगण्य आहे.
उस्ताव मध्ये हिंदू एकत्र येतात.हिंदू चे bonding वाढते.
म्हणून दिवाळी,गणेश ustav,दही हंडी, दसऱ्याच्या मिरवणुका,ह्यांना टार्गेट केले जाते .
जेणेकरून हिंदू एकत्र येणार च नाहीत.

गॉडजिला's picture

5 Oct 2021 - 12:03 pm | गॉडजिला

आहे.

स अर्जुन's picture

5 Oct 2021 - 1:38 pm | स अर्जुन

एकदम बरोबर बोललात ....

hrkorde's picture

5 Oct 2021 - 1:41 pm | hrkorde

बाबर आणि इंग्रज येण्याआधी हे सगळे सणहिंदू साजरे करतच होते ना ?
मग रहायचे होते तसेच गुण्यागोविंदाने.
कशाला एकमेकांचा काटा काढायला बाबर अन फिरंग्याना आमंत्रण दिले ?

Rajesh188's picture

5 Oct 2021 - 2:04 pm | Rajesh188

आता जो धार्मिक द्वेष आहे त्या वेळी तेवढं धार्मिक द्वेष नव्हता.
धार्मिक द्वेष भारतात कसा वाढला ह्या वर विचार करणे गरजेचे आहे.

चौकस२१२'s picture

5 Oct 2021 - 4:51 pm | चौकस२१२

धार्मिक द्वेष भारतात कसा वाढला ह्या वर विचार करणे गरजेचे आहे.
केला विचार ... २ मिनिटांचे काम आहे ,, २ अब्राहमीक धर्मांचे विस्तारीकरणाचे धोरण हे ते कारण
हाय काय नि नाय काय !

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Oct 2021 - 1:59 pm | अमरेंद्र बाहुबली

योगींचे हिंदूत्वाबद्दलचे काम खरंच वाखाणण्याजोगे आहे. पण मध्येच शेतकर्यांवर गाडी घालणे, अपरात्री प्रेते जाळणे, ऊन्नाव कांड ह्या गोष्टा पाहील्या तर हे जंगलराज पार्ट २ वाटते. प्रशासनात थोडी शिस्त आणून योगीनी असेच हिंदूत्वाचे काम चालू ठेवले तर पंतप्रधान म्हणून योग्य ऊमेदवार असतील. महाराष्ट्र भाजपनेही असा कट्टर हिंदूत्ववादी नेता म्हणून महाराषट्रात ऊभा करायला हवा. चंद्रकांत पाटील नी तत्सम नेते… असो.

चौथा कोनाडा's picture

5 Oct 2021 - 5:45 pm | चौथा कोनाडा

कोर्टात कायद्याने काय काय सिद्ध होईल ही गुंतागुंतीची बाब आहे.
पण या कायद्याच्या वचकाने काही गोष्टी वेळीच थांबवता आल्या तर ते मोठे यश मानावे लागेल.
या वर लोक सावध होत असून लोकचर्चा सुरु झाल्याचे दिसते.
ही एक आश्वासक सुरुवात नक्कीच आहे !