पारनेर -१ (ढोकेश्वर लेणी )

Bhakti's picture
Bhakti in भटकंती
29 Aug 2021 - 10:10 pm

सध्या इतकी व्यस्तता झाली आहे की १०-२० किमीची भटकंतीही सुसाह्य झाली आहे.घर की मुर्गी दाल बराबर सारख ण करता आसपासच्या ठिकाणांना करोनातला आधार म्हणून डावलून कसे चालेल.टाकळी ढोकेश्वरची लेणी (गुहा) पाहण्याचा सूटसुटीत बेत आखला .
“श्रावण मासातली हिरवाई पाहत रस्ता कापत होतो.रस्त्याच्या दुतर्फा देवबाभाळाची आणि पिवळ्या रंगांच्या फुलांनी मांडव घातला होता.शेतातली पिकं,झेंडूची फुले ,सूर्यफुल मन मोहित करीत होती.एक हिरवाईने नटलेला डोंगर दिसला येतांना थांबूया इथे ठरवले.हवेत आल्हाददायक गारवा जाणवत होता.मनोमनी पावसाची इच्छा बाळगत होते.
एक तासांत ढोकेश्वर कमान आली.गावापुढचा रस्ता कच्चा थोडा होता.तलावाचा पूल ओलांडल्यावर उंचावर असलेल ढोकेश्वर मंदिराची तटबंदी दिसू लागली.”किल्ला किल्ला “पोरगी ओरडू लागली.(तिला मंदिर आवडत नाही किल्ला पाहायचा अशी शेंडी लावून घराबाहेर काढल होत)
१.तटबंदी
१
.नागमोडी पायऱ्या, मधे कमान ही रचना आवडली. तटबंदी पेशवेकालीन बांधली आहे.
२.पायऱ्या
2
थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताला यादवकालीन शंकराचे मंदिर आहे .मंदिरावरच्या दगडांवर वेगवेगळे फुले कोरलेली आहेत ,तर एक वेगळेच चिन्ह कोरलेले दिसले.मंदिरातीलं पिन्डीसमोर एक गोमुख कि नंदी आहे. मंदिराचे छत रचना त्रीमित्रिक भासते.समोर एक दगडात बांधलेली समाधी आहे.
३.छत
3
४.वेगळा पक्षी
4
5
डाव्या बाजूला शरभ कोरलेली एक शिळा आहे.त्यावर भस्म लावून या मूर्तीची आणखीन हानी होत आहे हे कोण सांगणार?आणि कोणाला? वाईट वाटलं.शरभ हा आठ पायांचा अशंत: सिंह आणि अंशतः पक्षी स्वरूपातील काल्पनिक प्राणी आहे.तो सामर्थ्यवान असून सिंहालाही मारू शकतो.तर बौध्द जातक कथांनुसार शरभ हा बुद्धाच्या पुर्वाव्तारांपैकी एक आहे.(Wikipedia)
५.शरभ
9
पुढे पायऱ्या चढून कमान लागली आणि आणखीन पायऱ्या चढून तीच जिला पाहण्यासाठी डोळे आसुसले होते ती लेणी दिसली .पण माझ दुर्दैव ती बंद होती.तेव्हा जाळीतूनच आतल्या मूर्तींना न्याहाळाव लागलं आपण अंतर फार नसल्याने बऱ्यापैकी पाहता आल्या.
पहिल्यांदा बाहेर यमुना आणि नर्मदा या भव्य अशा सुंदरी भासणाऱ्या कोरलेल्या मूर्ती आहेत.
yy
ee
zz
त्यांचा पायाशी सुबक अशा मूर्ती आहेत तर वरील बाजूसही सुंदर असे आकाशातून त्यांना नमन करणारे देवगण कोरलेले आहेत. मंदिर चार मुख्य खांबांवर तोलले आहे .खांब अतिशय सुंदर नक्षीकाम आणि जातक कथेतील प्राणी कोरलेले आहेत.तसेच खांबाखालील दगडांवर मूर्ती कोरल्या आहेत ज्या वाद्य वाजवत आहेत असा भास होत आहेत.
dd
मंदिरात डाव्या बाजूला सप्तमातृका पट आहे.शेवटी मोदक घेतलेला गणपती आहे.
उजव्या बाजूला शिवतांडव भव्य मूर्ती कोरलेली आहे ,जिच्या दोन्ही बाजूंना वेटोळे घातलेले फणाधारी नाग आहेत.समोर दोन खांब आणि प्रवेशद्वाराजवळ दोन आयुधधारी द्वारपाल आहेत.त्यांच्या आजूबाजूस,त्रिशूळपुरुष,कुबेर व इतर मूर्ती कोरल्या आहेत.
मंदिरात दोन नांदी आहेत.एक समोर तर एक उजवीकडे?दोन कसे हे समजले नाही.
बाहेर आल्यावर उजव्या हाताला वर चढून एक टाकी आहे पण तिथे जाण्यास बंदी आहे.त्याकडे जाणारी पायऱ्यांची रचना विशेष दगडात खुबे पाडलेली आहे.विचारपूस केली असत पहाटे चार ते सहा मंदिर खुले अपाहता येईल असे समजले आम्ही उभयतांना एकमेकांकडे पाहिले हसावे कि रडावे समजेना .
ss
पायऱ्या उतरत उन्ह तरीही चांगलच चढल होत,पावसाळ्यातही पाऊस नव्हता यंदा दुष्काळ जास्त पडला आहे.
त्यामुळे जवळच्या तलावापाशी काही वेळ रेंगाळलो .आम्हा दुष्काळातल्या लोकांना एव्हढ पाणी म्हणजे काय आंनद !!!संथ पाण्याकडे पाहत नकळत ओळी गुणगुणल्या 
तलाव
sd
कार्जुनेचा बेत रद्द केला कारण पोरीच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते,बरोबर आणलेल्या पोळी भाजीला खाण्यास तिने साफ नकार दिला ,तेव्हा बापाच काळीज हळहळळलं आणि बायको हरली. माघारी फिरलो.जातांना मात्र नेप्तीच्या भेळीला थांबलो.एक भेळ दोघांना सरता सरत नाही,मटकी,काकडी आणि बरोबरीला तळलेली मिर्ची हि याची खासियत आहे.
भेळ
kj
ज्यूस पिऊन पोरगी जरा शांत झाल्यावर ,अजून एक लावलेली शेंडी सनफ्लावर दाखवले आणि गाडी खुश झाली.
hh
आता अभ्यासक मिपाकर प्रचेतस यांचा हा ढोकेश्वरवरचा लेख वाचून हि भटकंती सुफळ संपर्ण करा
https://www.misalpav.com/node/29094

-भक्ती

प्रतिक्रिया

मात्र नेप्तीच्या भेळीला थांबलो.एक भेळ दोघांना सरता सरत नाही,मटकी,काकडी आणि बरोबरीला तळलेली मिर्ची हि याची खासियत आहे.
भेळ ती पण दोघांना सरता न सरणानी ? यासाठी तर जावेच लागेल.

कंजूस's picture

30 Aug 2021 - 6:48 am | कंजूस

फोटो हाई साईजचे टाकले आहेत. ७,४ एमबीचे. लहान करायला हवेत.
वल्लीचा लेख पुन्हा वाचला. आत्मुसबुवा नेहमीप्रमाणे हसवतात.

लेण्यापर्यंत गाडी नेली की काय (स्माईलीने अर्धा प्रतिसाद उडवला ... )

मनो's picture

30 Aug 2021 - 8:17 am | मनो

शरभाचे शिल्प नेहेमी किल्ल्याच्या दारावर असते. हे पण दारावरच असावे. तिथून खाली पडल्यावर वेगळ्या जागी स्थापून पूजा चालू झालेली दिसते. नगरमध्ये बरीच वर्षे राहूनही हा भाग पाहायचा राहून गेला होता, तो तुमच्या फोटोंमधून आत्ता पाहता आला, धन्यवाद!

गोजिरा, कंकाका,मनो धन्यवाद!

गोजिरा, कंकाका,मनो धन्यवाद!

प्रचेतस's picture

30 Aug 2021 - 1:32 pm | प्रचेतस

हा सर्वच परिसर भटकायला एकदम आदर्श आहे. प्राचीन मंदिरे, लेणी, नैसर्गिक नवले सर्व काही येथे आहे.

श्रीगणेशा's picture

30 Aug 2021 - 3:19 pm | श्रीगणेशा

नगर माझं मूळ गाव. अजूनही जाणं-येणं होतं बऱ्याचदा. पण टाकळी ढोकेश्वर लेण्यांबद्दल प्रत्यक्ष ऐकलं नव्हतं.

जवळचं एक ठिकाण: जामगावचा किल्ला/वाडा:
भाळवणीहून डावीकडे काही किलोमीटरवर जामगाव येथे महादजी शिंदे यांनी बांधलेला भुईकोट किल्ला/वाडा आहे. रयत शिक्षण संस्थेचे डी. एड. कॉलेज आहे तिथे, त्यामुळे जपला गेला आहे व्यवस्थित.

नेप्तीची भेळ प्रसिद्ध झाली आहे गेल्या काही वर्षांत.
नगरच्या आजूबाजूच्या परिसरात आता बरीच पर्यटन स्थळे उजेडात येऊ लागली आहेत. शहराच्या गुणात्मक प्रगतीचं ते निदर्शक आहे.

गाववाले दिसतोय आपण ;)

Bhakti's picture

15 Sep 2021 - 5:18 am | Bhakti

_/\_

७ जुलै ला आम्ही विपश्यना केंद्र बनवण्यासाठी टाकळी ढोकेश्वर आणी कान्हूरपठार च्या मध्येच काकनेवाडीला १० एकर जागा घेतली आहे.

सुक्या's picture

15 Sep 2021 - 4:21 am | सुक्या

माझा अगदी जवळचा मित्र ईगतपुरी च्या विपश्यना केंद्रावर क्लासेस घेतो. बहुदा तुमची ओळख असेलच पण काही मदत लागली तर जरुर सांगा.

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2021 - 4:54 pm | चौथा कोनाडा

मस्त भटकंती. फोटो ही आटोपशीर !
टाकळी ढोकेश्वर लेण्या माझ्या बादलीयादीत आहेत. बघू कधी योग येतो ते !

प्रचेतसच्या हा ढोकेश्वरवरचा लेखाची लिंक दिली हे बेष्टच झाले !

प्रचेतस , श्रीगणेशा,चौकोकाका धन्यवाद!

गोरगावलेकर's picture

30 Aug 2021 - 10:30 pm | गोरगावलेकर

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले .
हा भाग अजून पाहिलेला नाही त्यामुळे लेख विशेष भावला.

टर्मीनेटर's picture

31 Aug 2021 - 3:26 pm | टर्मीनेटर

छान! फोटोही आवडले (दुसरा फोटो दिसत नाहीये).
आता माझ्यासाठी अपरिचीत असलेल्या ह्या लेण्यांबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी प्रचेतसरावांचा लेख वाचणे ओघाने आलेच :)
लेखाच्या लिंक साठी धन्यवाद.

गोरगावलेकर, टर्मीनेटर धन्यवाद!

नीलकंठ देशमुख's picture

4 Sep 2021 - 6:39 pm | नीलकंठ देशमुख

छान वर्णन .वाचून ही जागा पाहावी असे मनात आले.

धन्यवाद, मंदिर असल्याने सध्या करोना काळात बंद आहे.नंतर नियम बदलल्यावर नक्की भेट द्या.