मदतकार्यातले पर्यटन - गांधारपाले लेणी.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
28 Jul 2021 - 12:13 am

पुर, वादळ, भूकंप अशा नैसर्गीक आपत्तीच्या प्रसंगी आपण सगळेच मानवधर्माला जागुन यथाशक्ती मदतकार्यात सहभागी होतो त्याप्रमाणे काल दिनांक २६ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड शहर आणि परिसरातील वाड्या, वस्त्यांमधील पुरग्रस्त रहिवाशांना अन्नवाटप करण्यासाठी मित्रांबरोबर जाणे झाले.

प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी होऊन ८०० खऱ्याखुऱ्या गरजूंच्या हातात ताजा, गरम गरम मसुर पुलाव मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य व दिसलेला आनंद पाहुन लाभलेले समाधान आणि हे काम करत असताना मधे मिळालेल्या दिड एक तासाच्या फावल्या वेळात अगदी अनपेक्षीतपणे नितांत सुंदर अशा सह्याद्रीच्या कुशीत, गांधारपाले गावाजवळ ई.स. दुसऱ्या शतकात खोदलेला प्रचीन बौद्ध लेणीसमुह पहायला मिळाल्याने कालचा दिवस आमच्यासाठी विशेष ठरला.

अशी आस्मानी संकटे कोसळल्यावर राज्यातुनच नव्हे तर देश-विदेशातुनही मदतीचा ओघ सुरू होतो. वितरणातील त्रुटींमुळे काही जणांना नको तितकी मदत मिळते तर अनेक गरजू मदतीपासुन वंचीत रहातात.
अनेकदा येणाऱ्या मदतीचे प्रमाण खुप जास्त असल्याने त्यातल्या अन्नपदार्थ आणि नाशिवंत वस्तुंचे वाटप व्यवस्थीत होऊ न शकल्याने त्या वाया तरी जातात किंवा स्थानीक लोकप्रतीनीधी व त्यांच्या चेले-चपाट्यांकडुन ती सामुग्री फक्त त्यांच्या समाजातील लोकांत, खात्रीच्या मतदारांत वाटणे तसेच परस्पर विकुन टाकणे असे गैरप्रकार होत असल्याचे पुर्वानुभव गाठीशी असल्याने अशा प्रकारच्या मदतकार्यात आमच्या खास वर्तुळातील मित्रमंडळींचा प्रत्यक्ष सहभाग असेल तरच आम्ही त्यात आप आपला वाटा उचलतो अन्यथा अलिप्त राहणे पसंत करतो.

परवा संध्याकाळी ग्रुपमध्ये महाडला जाउन मदतकार्य करण्याची कल्पना मांडली गेली तेव्हा सकाळी निघुन उशीर झाला तरी रात्री घरी परत येणे शक्य असल्याने मी धरून चारजण प्रत्यक्ष तिथे जाण्यासाठी तयार झालो आणि बाकीच्यांनीही साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात आपला वाटा उचलला.

२६ तारखेला सकाळी मसुर पुलाव बनवण्या साठी लागणाऱ्या भाज्या आणि मसाल्यांची खरेदी उरकुन आचारी ठरलेल्या ठिकाणी पोचल्यावर अकरा वाजता आम्ही चार मित्र आणि दोन आचारी व त्यांच्या मदतीसाठी तीन कामगार असे एकुण नऊजण एक पजेरो आणि दुसरी जिनिओ पिकअप अशा दोन गाड्यांमधुन निघालो.

वाटेत वडखळला एका हॅाटेल व्यावसायीक मित्राकडुन मोठाली पातेली/टोप व ईतर भांडीकुंडी आणि गॅस सिलेंडर पिकअप मध्ये चढवून पुढे
अतिवृष्टीमुळे दुर्दशा झालेल्या मुंबई-गोवा हायवेवरच्या खड्ड्यांमधुन मार्गक्रमण करत दुपारी तीन वाजता एकदाचे महाडजवळ पोचलो.

महाडपासुन जवळपास तीन कि.मी. अलीकडे एका मित्राचा मेहुणा रहात असलेल्या ‘स्काय प्लाझा’ नावाच्या ईमारतीच्या पार्कींग मधल्या सर्व गाड्या बाहेर काढुन ती जागा साफसुफ करून आम्हाला जेवण बनवण्यासाठी त्या सोसायटी मधल्या रहिवाशांनी उपलब्ध करून दिली होती.

आचारी आणि त्यांचे मदतनीस स्वयंपाकाच्या तयारीला लागल्यावर आमच्याकडे बऱ्यापैकी थोडा मोकळा वेळ होता. तिथून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर प्राचीन ‘गांधारपाले’ लेणी असल्याचे कळल्यावर तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी आम्ही चौघांनी लेण्यांकडे आमचा मोर्चा वळवला.

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

ह्या लेणीसमुहाजवळ त्यांच्याविषयी अधिकृत माहीती देणारे कुठलेही फलक पुरातत्व खात्यातर्फे लावलेले नाहीयेत. विकीपिडीया वरील माहीती नुसार ही लेणी ई.स. १३० च्या आसपास बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांच्या कारकिर्दित निर्माण केली गेली.
जाणकार मिपाकरांनी वरील माहितीत अधिक भर घालावी अशी नम्र विनंती.

लेणी पाहुन साडेपाचच्या सुमारास परतलो तेव्हा पुलावचा पहिला घाणा काढण्यासाठी भलेमोठे पातेले पेटलेल्या शेगडीवर चढवले होते.
तासाभरात तयार झालेल्या पहिल्या घाण्यातील पुलावचे पॅकींग करून एक टीम दोन माहितगार स्थानीक तरूणांना सोबत घेऊन चार किमी अंतरावरच्या मदतीपासुन वंचीत राहीलेल्या गावात जाऊन गरमागरम ताजा पुलाव आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून आली.

19

20

अशाप्रकारे तीन घाण्यांमध्ये तयार केलेल्या मसुर पुलावच्या आठशे पिशव्या गरजु लोकांपर्यत पोहोचवून आमच्या मदतीसाठी सर्वतोपरी झटलेल्या सोसायटीतील सर्व रहिवाशांना कृतज्ञतेपोटी पुलाव खायला घालुन निघल्यावर घरी पोचायला रात्रीचे दोन वाजले.

(अशा पद्धतीने घाऊक प्रमाणात स्वादिष्ट मसुर पुलाव तयार करतानाचा व्हीडीओ मी चित्रीत केला आहे, पुढेमागे तो व्हिडीओ शेअर करीन.)

प्रतिक्रिया

कंजूस's picture

28 Jul 2021 - 4:13 am | कंजूस

केवळ मदतकाम करण्याची इच्छा होते पण ते प्रत्यक्षात राबवणे अवघड असते. नियोजन आणि अडचणी असतात. तयार अन्न गरजूंना वेळेवर हवे असते आणि ते वाटपही आपल्याकडून वेळेवर व्हावे लागते.
नैसर्गिक आपत्तींमध्ये पूर आल्याने होणारे नुकसान फार असते . घरही सामानासह जाते, आप्त जातात, आणि पूर असेपर्यंत रोजचे विधी करायचीही सोय असत नाही. शिधा मिळाला तरी अन्न शिजवता येत नाही. पाणीच पाणी चहुकडे पण पिण्यासाठी नाही. अशा वेळी जनतेला उचलून दुसरीकडे नेणे हाच पर्याय उरतो. एकूण मदतकाम अवघड होते.

( बाकी राजकारणावर न बोललेच बरे, त्याचा महापूर टीवी चानेल्सवर दाखवत आहेतच.)

तुमच्या मित्रगणांचे कौतुकच आहे आणि वाटपाचा फोटो टाळलात हे आवडले.

टर्मीनेटर's picture

28 Jul 2021 - 1:32 pm | टर्मीनेटर

महाड परिसरात पुराने खुप वाताहात झाली आहे. कित्येक ठिकाणी रस्त्यांवर गुढघाभर चिखल असुन तो साफ करण्यासाठी स्थानीक यंत्रणेच्या मदतीला अनेक स्वयंसेवक आणि BMC चे कर्मचारी अविरत राबत आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्याची उंची २२ फुटांपर्यंत होती. कित्येक लोकांच्या घरातले सर्व सामान आणि गाड्या वाहुन गेल्या आहेत. जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे.
मदत म्हणुन आलेल्या साहित्यातील डाळ, तांदुळ, गहू, साखर व चहा पावडर काही महीने पुरेल इतकी मिळाल्याचे अनेकांनी सांगितले पण सद्यस्थीतीत घरात गॅस, शेगडी, चुल असे काहीच राहीलेले नसल्याने त्याचा वापर करता येत नाहीये.
वीज आणि पाणी पुरवठा खंडीत असल्याने गरीब व श्रीमंत असे सगळेच लोक घरात पाणि घुसल्याने चिखलात माखलेले सर्व कपडे डोंगरावरून वहात येणाऱ्या पावसाच्या पाण्यात धुत असल्याचे दृष्य ठिकठीकाणी दिसत होते.
अनेक ठिकाणी वाहुन आलेल्या पाळीव/भटक्या जनावरांचे मृतदेह आता कुजल्याने पसरलेली दुर्गंधी असह्य आहे.
एकंदरीत सद्यपरिस्थीती पहाता जनजीवन सुरळीत होण्यास अजुन किमान पंधरा दिवस तरी लागतील असं वाटतय.

तुषार काळभोर's picture

28 Jul 2021 - 4:47 pm | तुषार काळभोर

पुर्ण प्रतिसादाशी सहमत.

कंजूस's picture

28 Jul 2021 - 4:31 am | कंजूस

फोटो आवडले. शिलालेखाचाही आहे. धन्यवाद.

ते बौद्ध भिक्षु विहार आहेत. इ.पू. चौथ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत वाढत जाणारा बौद्ध धर्म इथे होणाऱ्या विरोधाने आठव्या शतकापर्यंत दुसऱ्या देशांत पसरला. महाडच्याच चवदार तळ्यापाशी भारत स्वतंत्र झाल्यावर आंबेडकरांच्या प्रयत्नाने पुनर्जीवित झाला हा योगायोगच.

१९९५ला चिपळूणपर्यंत कोकण रेल्वे सुरु झाली आणि त्याने वीर स्टेशनाला उतरून रायगडफाट्यास (५ किमी~) बसने जाताना या लेण्या बसमधूनच खालून दिसल्या होत्या. एक बाजूस लेण्यांचा डोंगर आणि दुसरीकडे नदी असे छान दृष्य आहे. पुढे कोकण रेल्वेनेच कोकण/कर्नाटकला प्रवास झाल्याने लेणीदर्शन नाहीच झाले.

प्रचेतस's picture

28 Jul 2021 - 9:25 am | प्रचेतस

लेख आवडला.
पाल्याची लेणी कित्येकदा रायगडला जाता येता दिसली आहेत पण कधी जायचा योग आलेला नाही. फोटो आवडले.

तुम्ही ही लेणी पाहीली नसल्याचे वाचुन आश्चर्यही वाटले आणि तुमच्याकडुन ह्या लेण्याबद्दल विस्तृत माहिती मिळण्याची आशा मावळल्याने थोडी निराशाही झाली.

प्रचेतस's picture

28 Jul 2021 - 2:36 pm | प्रचेतस

लेणी पाहिली नसली नसली तरी लेण्यांबद्द्ल काही माहिती आहेच. ही महायान शैलीतली लेणी असून साधारण इसवी सन दुसर्‍या शतकानंतरची असावीत.
तुम्ही दिलेल्या शिलालेखाचा अर्थ स्वैर अर्थ असा-"कुमान कानभोज विष्णूपालित याने लेणे, चैत्य, ओवर्‍या, टाके आणि लेण्यांचा पथ हे धर्मादाय केले आहेत"

टर्मीनेटर's picture

29 Jul 2021 - 4:07 pm | टर्मीनेटर

माहितीसाठी आभार!

त्या शिलालेखावरील पाली की मोडी भाषा तुम्हाला वाचता येते ह्याचे कौतुक वाटले 🙏

प्रचेतस's picture

29 Jul 2021 - 4:47 pm | प्रचेतस

लिपी ब्राह्मी आणि भाषा प्राकृत आहे, मला ही लिपी पूर्ण वाचता येत नाही, अगदी थोडी अक्षरे समजतात. कार्ले लेणीतील शिलालेख ही लिपी वाचण्यासाठी आदर्श आहेत कारण ते अगदी ठळक कोरले गेले आहेत.

अच्छा! मला मोडी, पाली, ब्राम्ही, प्राकृत अशा कुठल्याच भाषा / लिपीतले गमभन देखील कळत नाही. तुम्हाला त्या थोड्याफार तरी वाचता येतात हेच कौतुकास्पद आहे 🙏
कार्ले लेणी बघितली आहेत पण शिलालेख नाही आठवत, कदाचित त्यातले काही समजत नसल्याने मी ते बारकाईने बघितले नसावेत.
एक कट्टा ठरवाच आता लेणीदर्शनाचा!

प्रचेतस's picture

29 Jul 2021 - 6:52 pm | प्रचेतस

नक्कीच करूयात तसा कट्टा.
घारापुरी लेणी दर्शनाचा तसा एक जाहीर कट्टा झाला होता.

यांचे विडिओ किती लांबीचे, आणि कसे घ्यावेत तसेच फोटो कोणते घ्यावेत हे सांगितले तर तसे करता येईल आणि मग त्यावर नोंदी प्रचेतसकडून घेता येतील.

Bhakti's picture

28 Jul 2021 - 9:42 am | Bhakti

महाड हे गाव मी चार वेळा थोडं थोडं पाहिलं आहे त्यामुळे मला त्याविषयी आत्मियता आहे.तुम्ही केलेली मदत योग्यवेळीच आणि योग्य प्रकारे केली आहे.फोटो नाही दिसले पण.
लेणी पाहाव्या लागतील.

फोटो दिसले,Idea सोडून Jio वापरल्यावर.

संजय पाटिल's picture

28 Jul 2021 - 11:04 am | संजय पाटिल

हि काय भानगड आहे? मलापण airtel वापरल्यावर दिसले, VI वरून नाही दिसत.. :(

आज सकाळपासुन माझ्या दोन्ही VI सिम्सना Jio चे नेटवर्क दाखवतय! एकाही सर्वीस प्रोव्हायडरची सेवा खात्रीलायक राहीली नाहीये. पोर्ट तरी कुठे करावे तेच समजेनासं झालंय.

कंजूस's picture

28 Jul 2021 - 2:45 pm | कंजूस

0.5 mb ते 2.5mb आहे आणि VI / IDEA नेटवर्क एवढे फास्ट नाही. त्यामुळे लोड होत नसणार.
( कधीकधी VI network settings 4g वरून खाली 3g केल्यावर धावते. )

सुमो's picture

28 Jul 2021 - 10:59 am | सुमो

दोन्हीही छान. 👌

लेणीदर्शन आणि आपत्तीग्रस्तांना मदत म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधलेत.. 👍

स्मिताके's picture

30 Jul 2021 - 3:22 am | स्मिताके

असेच म्हणते. आणि पुलावाची रेसिपीदेखील छान.

सरिता बांदेकर's picture

28 Jul 2021 - 1:45 pm | सरिता बांदेकर

तुम्ही खरंच खूप चांगला उपक्रम राबवलाय.
पण सगळीकडे दरडी कोसळत असताना लेणी बघायला त्या अवघड रस्त्यावरून जाणे म्हणजे खरंच ग्रेट.
पण काळजी घेत जा.

सरिता बांदेकर's picture

28 Jul 2021 - 1:45 pm | सरिता बांदेकर

तुम्ही खरंच खूप चांगला उपक्रम राबवलाय.
पण सगळीकडे दरडी कोसळत असताना लेणी बघायला त्या अवघड रस्त्यावरून जाणे म्हणजे खरंच ग्रेट.
पण काळजी घेत जा.

टर्मीनेटर's picture

28 Jul 2021 - 2:04 pm | टर्मीनेटर

@ Bhakti, सुमो आणि सरिता बांदेकर
प्रतिसादासाठी आपले मन:पुर्वक आभार 🙏

@ Bhakti : जरूर बघा, छान आहेत लेणी!

@ सुमो : हो, एक तीरमे दो निशाने 😀

@ सरिता बांदेकर : हो, यापुढे नक्की काळजी घेण्यात येईल. आपुलकीच्या सल्ल्यासाठी धन्यवाद 🙏

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Jul 2021 - 2:45 pm | ॲबसेंट माइंडेड ...

स्तुत्य उपक्रम. फोटोही छान आहेत.

गोरगावलेकर's picture

28 Jul 2021 - 3:07 pm | गोरगावलेकर

आपले व आपल्या सोबत असलेल्या सर्वांचे कौतुक. लेणीचे फोटो आवडले.
मुंबई ते महाबळेश्वर जाण्यासाठी नेहमीच दोन पर्याय असतात. एक पुणे मार्गे व एक पोलादपूर मार्गे. रस्ता खराब असला तरी मला पोलादपूर मार्गानेच प्रवास आवडतो आणि प्रत्येक वेळी महाडच्या अलीकडे रस्त्याहून दिसणाऱ्या या गुफा खुणावतात. पुढल्यावेळी नक्की बघू असे म्हणत आजपर्यंत पाहणे राहूनच गेले आहे.

टर्मीनेटर's picture

29 Jul 2021 - 4:11 pm | टर्मीनेटर

मुंबई - गोवा प्रवासात मी पण आधी अनेकवेळा ही लेणी लांबून पाहिली होती, पण तुमच्यासारखेच वर जाऊन पाहणे कधी झाले नव्हते. त्यादिवशी ध्यानीमनी नसतानाअगदी अनपेक्षितपणे पाहण्याचा योग आला!

गोरगावलेकर's picture

3 Aug 2021 - 2:59 pm | गोरगावलेकर

या लेण्यांप्रमाणेच आमच्या गावी जाताना नाशिकच्या अलीकडे महामार्गाहून पांडव लेणी दिसते. गेल्या २५-३० वर्षात कित्येकदा येथून प्रवास केला आहे पण थांबून लेणी बघणे कधी झाले नाही.
उद्या परत एकदा गावी जाण्याचा योग आहे. या वेळी मात्र लेणी पाहूनच पुढे जाण्याचा विचार आहे.

पांडवलेणीवर फार पूर्वी येथे लिहिले होते. आजोळ असल्याने कित्येकदा जाणे झालेय तिथे, अद्भुत आहेत.

टर्मीनेटर's picture

3 Aug 2021 - 3:20 pm | टर्मीनेटर

लगेच तुमचा लेख शोधून वाचतो!
मामाडे लेनेस वलुरकेस
हा तुमचा लेख कार्ले लेण्यातील प्राकृत भाषेतले शिलालेख आठवत नसल्याने पुन्हा वाचला! फारच छान माहिती आणि फोटो आहेत.

चौथा कोनाडा's picture

5 Aug 2021 - 2:03 pm | चौथा कोनाडा

मामाडे लेनेस वलुरकेस हे खुप सुंदर लेखन आहे. असे लेखन फार क्वचितवेळा वाचण्यात येते. याचा उल्लेख आला की मला प्रचेतसच्या व्यासंग, कल्पनाशक्ति आणि लेखनशैलीचे प्रत्येक वेळी कौतुक वाटत राहते !

प्रचेतस
👌

Bhakti's picture

5 Aug 2021 - 4:08 pm | Bhakti

सहमत.

टर्मीनेटर's picture

3 Aug 2021 - 3:13 pm | टर्मीनेटर

सातवी की आठवीत असताना शालेय सहलीत पांडव लेणी बघितली होती. आता त्यांची वैशिष्ट्ये आठवत नसल्याने पुन्हा पाहावी लागतील.

आपले आणि आपल्या सहकार्‍याचे विशेष कौतुक...
फोटो आवडले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा

चौथा कोनाडा's picture

28 Jul 2021 - 5:28 pm | चौथा कोनाडा

मदत करण्याच्या आप्ल्या धडपडीला सलाम !

लेणीदर्शन फोटोवृतांत छानच !

खूपच उपयुक्त मदत. मसूर पुलाव सुंदर दिसतोय. तुमचे आणि सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
ही लेणी महामार्गावरुन जाताना पाहिली आहेत पण कधी थांबुन जाणे झाले नाही.

@ मदनबाण, चौथा कोनाडा, सौंदाळा आणि अबसेन्ट माईंडेड
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

स्वच्छंदी_मनोज's picture

29 Jul 2021 - 5:53 pm | स्वच्छंदी_मनोज

मदत पोहोचवण्याचा उत्तम उपक्रम...

लेण्यांबद्दल - किमान तिन वेळा बघीतली आहेत, पावसाळ्यात आणी थंडीमधेही. जरी रस्त्यावरुन जाताना दिसल्या तरी बहुतांश लोक नुसती धावती नजर फिरवून जातात पण लेण्या मात्र अप्रतीम अहेत. लेण्यांचे मुळ नाव पाले लेण्या असे आहे पण डोंगरापलीकडून वाहणार्‍या गांधारी नदीकाठच्या गांधार गावावरुन याला गांधारपाले लेण्या असे नाव पडले.
महाड शहराच्या सभोवतालच्या परीसरात दोन लेणी समुह आहेत. गांधारपाले आणी कोळ. मी दोन्ही बघीतले आहेत. कोळ लेणी समुह त्यामानाने छोटा आहे फक्त ७ लेण्या आहेत आणी बर्‍याचश्या भग्न आणी बुजलेल्या. वरच्या फोटो क्रमांक १८ मधे अगदी उजवीकडे दिसणार्‍या डोंगरपायथ्याला कोळ गाव आहे. तिथेच ह्या लेण्या आहेत.

टर्मीनेटर's picture

29 Jul 2021 - 6:24 pm | टर्मीनेटर

@ स्वच्छंदी_मनोज
फार छान माहिती दिलीत! पुढच्या कोकण भेटीत कोळ लेणीही पाहण्याचा नक्की प्रयत्न करणार. पाले लेणी समूहाजवळ कोणतेही माहिती फलक लावलेले नसल्याने त्यांचा इतिहास समजला नव्हता. इथे कंजूस काका, प्रचेतस आणि तुमच्याकडून चांगली माहिती मिळत आहे.
आपले मनःपूर्वक आभार 🙏

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jul 2021 - 1:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेणी आवडली, लेण्यांना भेट द्यायचे निमित्तही प्रशंसनिय आहे.
"स्पर्धे साठी नाही" या धाग्यात तुम्ही जो जे फोटो टाकले होते ते याच सहली दरम्यानचा का?
ते पण मस्त आहेत.
आता मसुर पुलावचा धागा बघतो.
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

3 Aug 2021 - 1:45 pm | टर्मीनेटर

"स्पर्धे साठी नाही" या धाग्यात तुम्ही जो जे फोटो टाकले होते ते याच सहली दरम्यानचा का?

नाही ते वेगळे होते, हे २६ तारखेचे, त्याच्या काही दिवसा नंतरचे आहेत.

गरजवंतांना मदत करण्याचे उत्तम काम केलेत, अभिनंदन !

लेण्यांवर पर्यटकांनी आपापली नावे (अमोल, लखन इत्यादी) कोरलेली बघून राग, दुःख, क्षोभ, करुणा असे अनेक भाव दाटून आले. आपला वारसा आपल्याला जाड झाला आहे हेच खरे.

धन्यवाद 🙏

लेण्यांवर पर्यटकांनी आपापली नावे (अमोल, लखन इत्यादी) कोरलेली बघून राग, दुःख, क्षोभ, करुणा असे अनेक भाव दाटून आले.

असले उद्योग करणाऱ्यांची काय मानसिकता असावी हा प्रश्न अशा ठिकाणी गेल्यावर हमखास अस्वस्थ करतो!

कुमार१'s picture

4 Aug 2021 - 11:25 am | कुमार१

छान लेख व सुंदर उपक्रम !!