शिक्षण : येस प्राईम मिनिस्टर वे

साहना's picture
साहना in काथ्याकूट
28 Jul 2021 - 11:43 pm
गाभा: 

BBC ने एस प्राईम मिनिस्टर म्हणून जी सिरीज काढली होती ती माझी अत्यंत आवडती आहे. जुनी असली तरी १००% आवाज सुद्धा तितकीच "रेलेवंट" ठरते. ह्याची भारतीय स्वरूपे सुद्धा आली होती पण जास्त चालली नाहीत.

येत्या मन कि बात मध्ये सुप्रीम लीडर "नवीन शिक्षण पॉलिसी" विषयावर बोलणार आहेत म्हणे. ह्या पॉलिसीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. हि पॉलिसी डेड ऑन अरायवल आहे असे मी आधी लिहिले होते आणि त्याची भरपूर थट्टा केली होती. दाखवण्यासारखे काहीच नसल्याने सुप्रीम लीडर नक्की काय बोलतात हे पाहणे लक्षवेधक ठरेल.

पण त्या निमित्त्ताने हा खालील youtube एपिसोड पहा

https://youtu.be/1e9gq9sYIuA

अन्य सम्बन्धित बतम्या

- महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड ह्यांनी खाजगी शाळांवर पुनः दंडुका उभारत त्यांच्या फी मध्ये जबरदस्तीने १५% कपात केली आहे. हि कपात फक्त हिंदू लोकांनी चालविल्या खाजगी शाळांवर असून बोंबे स्कॉटिश वगैरे शाळांवर हा जुलूम चालत नाही.
- भारत सरकारने परीक्षांवर १८% GST लावला आहे त्यामुळे CFA, GRE इत्यादी परीक्षा महाग होतील.

प्रतिक्रिया

मिपाकरांच्या प्रतिक्रिया वाचणे रोचक ठरेल...

व्हिडीओ लिंक चुकीची आहे : बरोबर लिंक खालील

https://youtu.be/1e9gq9sYIuA

रावसाहेब चिंगभूतकर's picture

29 Jul 2021 - 11:14 am | रावसाहेब चिंगभूतकर

आश्चर्य आहे. CFA, GRE इत्यादी परीक्षा मध्ये भारत सरकारचे योगदान काय? या परिक्षा देशा बाहेरच्या इन्स्टिट्यूट्स कडून घेतल्या जातात ना?