प्राचीन ज्ञानाचे पुनरुत्थान (डिजिटलीकरण) आणि प्रकाशन - पतंजलिचे महत्वपूर्ण योगदान

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
28 Jul 2021 - 5:07 pm

भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली. तरीही कालप्रवाहात लाखो ताडपत्री पाण्डूलिपी निश्चित जिवंत राहल्या असतील. देशाला स्वतंत्रता मिळाली. पण आपले दुर्भाग्य गुलामी मानसिकता असलेल्या काळ्या साहेबांचे राज्य भारतात आले. आपल्या प्राचीन ज्ञानाविषयी त्यांच्या मनात आदर कमीच. विदेशी आक्रांतान्पासून आपले ज्ञान काही प्रमाणात वाचले पण काळ तर सर्वच नष्ट करणारा असतो. जीर्णशीर्ण पाण्डूलिपी किती काळ जिवंत राहणार. आपल्या सरकारी तंत्राने हि भारताचे प्राचीन ज्ञान सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले आहे. पण सरकारी तंत्राचीहि 'दिनभर चलेअढाई कोस' वाली गत असते.
चित्र
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात डिजिटल स्वरूपात प्राचीन ज्ञान सुरक्षित केले जाऊ शकते. पण ते करणे अचाट मेहनतीचे कार्य आहे. पाण्डूलिपी कुणापाशी आहेत त्याची माहिती मिळविणे. त्यांच्या पर्यंत कसे पोहचायचे. त्यांची परवानगी घेऊन, त्या जीर्णशीर्ण ताडपत्री पुस्तकांना दुरुस्त करणे. त्यासाठी भाषा विशेषज्ञ आणि दुरुस्ती कार्य करणाऱ्या तकनिकी लोकांची गरज. त्यानंतर पांडूलिपींचे डिजिटलीकरण करणे आणि शेवटी त्यांना सुरक्षित ठेवणे. ज्यांनी परत मागितली त्यांना परत करणे. दुर्लभ आणि मूल्यवान ग्रंथांचे प्रकाशत करून प्राचीन ज्ञान जनतेसमोर आणणे, इत्यादी. ह्या सर्व कार्यांत हजारो लोकांच्या अचाट मेहनत शिवाय, वेळ आणि धनाचीहि गरज लागते. शिवाय गुलाम मानसिकता असलेले सरकारी तंत्र किंवा जनताहि तुमच्या कार्याचा गौरव करणार नाही. मीडियाही तुमच्या कार्याची माहिती जनतेला देणार नाही. तरीही एका व्यक्तीने हे कार्य करण्याचा विडा उचलला. पतंजली आपल्या नफ्याचा ७० टक्के रिसर्च वर खर्च करते. शेकडो कोटींचा पीआरआईचा खर्च त्यातून भागतो.
चित्र २ स्वामी रामदेवांनी कार्य हातात घेतले आणि मोठ्या प्रमाणावर हे कार्य करण्याचा निश्चय केला. आचार्य बालकृष्णच्या नेतृत्वाखाली पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट, पतंजली युनिव्हर्सिटी सहित या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था या कार्यात गुंतल्या. कुणालाही आश्चर्य वाटेल एवढे अचाट कार्य ६० हजारच्यावर पाण्डूलिपी ज्यात ५० हजारांच्यार ताडपत्री स्वरूपातले ग्रंथ, तब्बल १९ विषय - अलंकार शास्त्र, आयुर्वेद, ब्राम्हण ग्रंथ, दर्शन, धार्मिक ग्रंथ, ज्योतिष, काव्य, कोश, मंत्र, नीती ग्रंथ, पाकशास्त्र, पुराण, संस्कृत-साहीत्य, स्त्रोत्र, तंत्र, उपनिषद, वेद, व्रत, व्याकरण इत्यादी. १४ भाषा- देवनागरी, शारदा, श्री, गुरुमुखी, फारसी, संस्कृत, उर्दू, बंगाली, मल्याळी, मराठी, नेपाली, ओडीया,तमिळ तेलगु. २६ लाखांहून जास्त पाने.

आता विचार करा या अफाट कार्यासाठी हजारो लोकांशी/ संस्थांशी संपर्क करावा लागला असेल. अनेक भाषाविदांची मदत घ्यावी लागली. या पवित्र कार्यासाठी अधिकांशी विद्वानांनी कसले हि मानधन घेतले नाही. पण त्यांच्या येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च तर होताच. शिवाय पगारी कर्मचार्यांची फौजहि.

डिजिटलीकरण नंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पुस्तकांचे प्रकाशन. इथेहि समस्या होती. एक-एक पुस्तकाच्या अनेक पाण्डूलिपी आणि पाठभेद. विद्वानांच्या मदतीने प्रामाणिक प्रती तैयार करून एव्हढ्या कमी कालावधीत अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित केले. डिजिटलीकरण नंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पुस्तकांचे प्रकाशन. त्यांची नावे- सिद्धसार - संहिता (रविगुप्त- विरचित), योगशत्तम (अमितप्रभ्यम् - विरचित), योगशास्त्र-वैद्यवल्लभ (रुपनयन - विरचित), आयुर्वेद-महोदधी/ सुषेण-निघन्टु (सुषेण वैद्य- विरचित), भोजनकह्तुलम् (रघुनाथ सुरी -विरचित), अजीर्णमर्त मंजरी (काशिनाथ-विरचित), रुचिवधु- गल्- रत्नमाला (परप्रणव - विरचित), हरमेखला (मधुक-विरचित), योगरत्न समुच्चय (चंद्रात- विरचित), वैद्यशतश्लोकी (अवधान सरस्वती- विरचित), चंद्र निघन्टु/ मदनादी-निघन्टु (चंद्रनंदन-विरचित), हृद्यदीपक-निघन्टु (भोपदेव विरचित), राज- निघन्टु/ सोढलनिघन्टु (सोढल विरचित), मदनपाल -निघन्टु (नृप मदनपाल-विरचित), वैद्य प्रसारकम् (वैद्य गदाधर-विरचित ).
चित्र ३

चित्र ४
हे कार्य सतत चालणारे कार्य आहे. काळात विस्मृत झालेले ज्ञान विज्ञानाची पुस्तक रुपी रत्ने एका महाऋषीच्या प्रयत्नाने पुन्हा प्रगट होणार आहेत. आपण त्यांच्या कार्याचा गौरव तर करीत नाही. पण इथल्या आसुरी प्रवृत्ती मात्र पूर्ण शक्तीने त्यांच्यावर प्रहार करीत आहे. या काळात आपले काय कर्तव्य आहे, हे आपल्याला कळले पाहिजे. असो.

खालील लिंकच्या आधारावर हा लेख आहे.

https://www.patanjaliresearchinstitute.com/ayurvedic_manuscripts.php#

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

28 Jul 2021 - 5:30 pm | चौथा कोनाडा

खुप छान माहिती !
फार महत्वाचे कार्य आहे !
टीम पतंजलीला मनापासुन वंदन !

कंजूस's picture

28 Jul 2021 - 5:53 pm | कंजूस

काम का होत नाही याचे उत्तर म्हणजे
१) यातून मला काय मिळणार?
२) मोठ्या संस्थांमध्ये काम करणार एक आणि श्रेय लाटणार दुसरा.

आणि तिसरं म्हणजे या ग्रंथातील संहितांंप्रमाणे औषध करण्यापेक्षा त्यातील वनस्पतींच्या प्रमाणात थोडा फेरफार करून वेगळे नाव देऊन 'proprietory medicine' म्हणून विकणे यात फायदा जास्ती.
उदाहरणार्थ संहितेतील काही प्रसिद्ध औषधे -
महानारायण तेल - सांधे आणि स्नायुदुखीसाठी.
महामंजिष्टादि काढा . रक्तशुद्धीसाठी.
अशोकारिष्ट - महिलांच्या आरोग्यासाठी.
पुनर्नवादि काढा - सूज नष्ट करणे

हे ग्रंथ मोठ्या औषध कंपन्यांनी केव्हाच मिळवले असतील. त्यांच्या संग्रहात असतीलच.

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2021 - 7:30 pm | टवाळ कार्टा

हे काम जितके कौतुकास्पद आहे तितकेच "कोरोनिल" बनवून मातीचे पाय दाखवून दिलेत :)

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2021 - 7:37 pm | टवाळ कार्टा

आणि डॉक्टरांबद्दल उधळलेल्या मुक्ताफळांबद्दल बोलायलाच नको

विवेकपटाईत's picture

30 Jul 2021 - 5:33 pm | विवेकपटाईत

"कोरोनिल"
प्रतिसादचा लेखाशी काही एक संबंध नाही. तरीही हा खिल्ली उडविण्याचा विषय नाही. हेच एक मात्र प्रामाणिक औषध आहे ज्याचे सेल लेवेल, अनिमल लेवेल इत्यादी सर्व ट्रायल झाले आहे. सर्व शोध जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे. यावरची शोधांची पुस्तिका हि त्यांनी ज्या दिवशी अर्थात फेब. महिन्यात मी हि तिथे होतो कारण आमचे मंत्री तिथे होते (मी एप्रिल महिन्यात वाहतूक मंत्रालयातून निवृत्त झालो). प्रकाशित केली आहे. त्यांचे रिसर्च इंस्टीट्युट देशातील सर्वात उन्नत इंस्टीट्युट पैकी एक आहे. ५०० अनुसंधान्कर्ता तिथे कार्य करतात. अधिकांश पीएचडी. बाकी त्याच्या हरिद्वार इथे कार्य करणाऱ्या १५००० कामगार पैकी एक हि दगावला नाही. त्यांच्या शिक्षण संस्था एक हि दिवस बंद झाल्या नाही. (पतंजली गुरुकुलम ) आणि आचार्य कुलम (फक्त दोन महिन्यांच्या सुट्टी साठी). सकाळी आस्था लाऊन पहा किमान १००० रुग्ण योगग्राम मध्ये ७ ते १५ दिवस राहून प्राकृतिक चिकित्सा, योग आणि गरज असेल तर आयुर्वेदिक औषध घेतात. अर्थात रोज १०० रुग्ण नवीन येत असतील. यातच सर्व आले.

कपिलमुनी's picture

31 Jul 2021 - 11:39 pm | कपिलमुनी

काहीही फेकू नका
मुळात कोरोनील औषध म्हणून विकतात का याची आधी चौकशी करा.

टवाळ कार्टा's picture

1 Aug 2021 - 7:09 pm | टवाळ कार्टा

एखाद्याला कोविड झाला तर त्याला "फक्त कोरोनिल" देउन बरे करता येईल का?

निनाद's picture

18 Aug 2021 - 11:43 am | निनाद

चांगला आणि विवेचनपूर्ण प्रतिसाद. हा खिल्ली उडविण्याचा विषय नाहीच. अशा वेळी दुर्लक्ष्य उत्तम. पण इतर वाचक आहेत आणि लेखकाशी सहमती ही आहे हे दर्शवण्यासाठी हा प्रतिसाद!

चौथा कोनाडा's picture

28 Jul 2021 - 10:08 pm | चौथा कोनाडा

एवढ्या चांगल्या धाग्यावर "कोरोनिल" फवारायचंच होतं का ?

ही मूळ पुस्तके कुठे पाहायला मिळतील? वरच्या साईटवर काही सापडली नाहीत. निदान पुस्तकांचे नाव, लेखक, अंदाजे तारीख इतका कॅटलॉग तरी जालावर टाकला असता तर कळलं असतं की कोणते ग्रंथ आहेत आणि किती जुने आहेत. नुसत्या पुणे पुराभिलेखगारातच ५ कोटी कागद असावेत, त्यामुळं फक्त १६ पुस्तकांचा इतका गाजावाजा करणं पटलं नाही. यात अर्थात मार्केटिंग आणि प्रसिद्धी आहेच, पण मूळ काम तरी जालावर टाकायला हवं होतं.

गॉडजिला's picture

29 Jul 2021 - 8:26 pm | गॉडजिला

शब्दा शब्दाशी सहमत...

राघव's picture

29 Jul 2021 - 10:06 pm | राघव

चांगला उपक्रम.
मनो म्हणतात तशी माहिती दिल्या गेली तर आणिक चांगले. अर्थात् जे आहे तेही नसे थोडके.

विवेकपटाईत's picture

30 Jul 2021 - 6:06 pm | विवेकपटाईत

उत्तम प्रतिसादासाठी धन्यवाद.
ही मूळ पुस्तके कुठे पाहायला मिळतील.
दिव्य प्रकाशनच्या वेब साईट वर सर्व पुस्तके अंत्यंत स्वस्तात मिळतील. (https://www.divyaprakashan.com/# ) मी हि एक पुस्तक भोजन कुतूहलम रघुनथ सुरि, आपला मराठी माणूस(३५० वर्षांपूर्वी) हिंदी अनुवाद आणि २०० हून जास्त चित्र, उत्तम कागद, फक्त ४०० रुपये. विकत घेतले . बहुतेक प्रिंटींग कास्ट यापेक्षा अधिक असावी. (या पुस्तकाच्या शोधनसाठी मुंबईच्या प्रसिद्ध वैद्य एस डी कामथ यांचे योगदान महत्वपूर्ण आहे).

पुणे पुराभिलेखगारातच .... पुणे आणि दिल्ली सरकारी अभिलेखागारात लाखो पांडूलिपी निश्चित असतील. तरीही लाखो जनते जवळ आहेत, त्या नष्ट होण्याआधी सुरक्षित करणे आवश्यक. त्या याशिवाय भारत सरकारच्या संस्थांनी किती जुन्या पाण्डूलिपी डिजिटल आणि प्रकाशित केल्या ??? कारण जुन्या जर्जर पाण्डूलिपींचे शोधन करणे अत्यंत कठीण कार्य आहे. एकाच ग्रंथांच्या अनेक पाण्डूलिपी असतात. त्यात पाठभेद हि असतात. अनेक आयुर्वेद आणि संस्कृत विद्वानांची चर्चा केल्या शिवाय पुस्तक रुपात प्रकाशित करणे अशक्य कार्य आहे. शिवाय हे फक्त काही वर्षातले कार्य आहे. भविष्यातहि संख्या वाढणारच.

अरविंद कोल्हटकर's picture

8 Aug 2021 - 9:06 am | अरविंद कोल्हटकर

वर उल्लेखिलेल्या भोजनकुतूहल (कर्ता रघुनाथपण्डित) ह्या ग्रन्थाचा परिचय करून देणारे ३ लेख मी २०१४ साली ऐसीवर लिहिले होते.
भाग १
https://aisiakshare.com/index.php?q=node/2726
भाग २
https://aisiakshare.com/index.php?q=node/2921
भाग ३
https://aisiakshare.com/node/2990

बापूसाहेब's picture

29 Jul 2021 - 10:55 am | बापूसाहेब

पतंजली चे अभिनंदन असं कही सुरू केल्याबददल.

जुन ते वाईट आणि आउटडेटेड.. आणि परदेशी ते चांगल ही मनस्थिती आजच्या पिढीची आहे. आपल्याच गौरवशाली परंपरा आणि ज्ञान याबद्दल असणारा अकारण न्यूनगंड..
एकदा मी माझ्या ऑफिस मधे एका मुलीने विको ची क्रीम लावली होती तर ग्रुप मधल्या इतर मुलींनी तिची टर उडवली होती.

एकदा पतंजली चा साबण वापरते म्हणून माझी मैत्रीण तिच्या रूममेट ची मजा घेत होती.. ( BTW - ती ( माझी मैत्रीण) dove साबण वापरते. )

विवेकपटाईत's picture

30 Jul 2021 - 6:11 pm | विवेकपटाईत

मी गेल्या तीन वर्षांपासून शेविंग क्रीम ते साबण शेम्पू पतंजलीच्या वापरतो (कारण त्या सर्वांवर "हिरवे टॅग") असते. फिनायल जागी गोनायल आणि राख, लिंब आणि कडू लिंब पासून बनलेले डीशवाश वापरतो. पाण्याचे प्रदूषण कमी होते आणि केंसर पासून बचाव हि.

चला कोणी तरी चांगला उपक्रम राबवतोय हे समाधान आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front

जुइ's picture

30 Jul 2021 - 2:13 am | जुइ

काका बर्‍याच दिवसांनी मिपावर दिसत आहात. तुमच्या पाकृ देखिल येऊद्यात.

Rajesh188's picture

30 Jul 2021 - 5:59 pm | Rajesh188

मुळात प्राचीन ग्रंथ,प्राचीन साहित्य भारतात आहे का?
सर्व प्राचीन साहित्य ब्रिटिश घेवून गेले तिथे त्यांनी त्या वर अभ्यास केला आहे.
आपल्या ल त्या वर संशोधन करायचे असेल तर ब्रिटन मधून साहित्य मागवावे लागेल.तेथील जाणकार लोकांची मदत घ्यावी लागेल.

विवेकपटाईत's picture

30 Jul 2021 - 6:18 pm | विवेकपटाईत

सर्व प्राचीन साहित्य ब्रिटिश घेवून गेले... विचित्र प्रतिसाद आहे. आज कोट्यावधी पाण्डूलिपी सरकारी अभिलेखागारात आहे. लाखो अजूनही मठ, मंदिर, जनते कडे आहेत. बाकी या कार्यात त्यांनाहि अनेक संस्थांची आणि व्यक्तींची हजारो लोकांची मदत घ्यावी लागली आहे. त्याशिवाय असे कार्य संपन्न होत नाही. हे न संपणारे कार्य आहे.

आपण त्यांच्या कार्याचा गौरव तर करीत नाही. पण इथल्या आसुरी प्रवृत्ती मात्र पूर्ण शक्तीने त्यांच्यावर प्रहार करीत आहे.

या वाक्याला मिपावर वजन प्राप्त व्हावे म्हणुन म्हणतो की कार्य कितीही महान असेल ते आता एका खाजगी कंपनीच्या टॅग खाली आले आहे याचा फायदा तोटा काही असेल ना

पतंजलि ची त्रिफळा पावडर यात हरडा, बेहेडा व आवळा चूर्ण सम प्रमाणात १:१:१ वापरून चूर्ण तयार केले आहे असे लिहलेले असते झंडू, वैद्यनाथ आणि इतर अनेक कंपन्या हेच प्रमाण वापरले आहे असेच लिहतात पण आयुर्वेद चा विद्यार्थी हे नक्की सांगेल वरील तीनही पावडर सम प्रमाणात वापरल्या जातात हे सत्य असले तरी त्रिफळा बनवायचे हे अचूक प्रमाण न्हवे

पण ह्याचा अर्थ हा नाही की प्राचीन ज्ञान जे हस्तलिखित स्वरूपात आहे त्याचा अभ्यास कोणीच केला नाही.तर खूप लोकांनी त्याची जुळवा जुळव करून त्याचे योग्य जतन नक्कीच केले असणार .
आयुर्वेद आणि योग ह्या फक्त दोन च क्षेत्रात पतंजली नी अभ्यास केला असेल आणि त्याचा उपयोग उद्योग वाढ करण्यासाठी केला आहे.भांडवली नफा कमावण्यासाठी केला आहे.
प्राचीन ज्ञान जतन करण्यासाठी नाही.
अगदी गणित,ग्रह गोल,नक्षत्र,सौर रचना,काम शास्त्र, समाज शास्त्र, वास्तू रचना शास्त्र,विविध वनस्पती,हवामान,प्राणी ,पक्षी अशा विविध विषयावर प्राचीन काळी लिखाण झाले आहे.
त्या बाबतीत पतंजली नी काय कार्य केले आहे.
ह्या विषयी पण लिहा.
रिटा,शिकेकाई,हळद,आले,आणि अशा अनेक गोष्टी बाबतीत लोकांना माहिती होती.
ते तोंडी ज्ञान एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे
आले आहे
योग कोणते आहे आहेत आणि ते कसे करायचे हे लोकांना पतंजली च्या जन्माच्या अगोदर पासून माहीत आहेत .
बाबा रामदेव मुळे लोकांना ते माहीत पडले असे नाही.
विविध उद्योगपती त्यांचे उत्पादन पतंजली च्या नाव आडून विकत आहेत असा पण लोकांना दाट संशय आहे.

विवेकपटाईत's picture

18 Aug 2021 - 10:22 am | विवेकपटाईत

उपयोग उद्योग वाढ करण्यासाठी केला आहे.भांडवली नफा कमावण्यासाठी केला आहे.
प्राचीन ज्ञान जतन करण्यासाठी नाही

2. पतंजलिचा पूर्ण नफा कुणाच्याही खिश्यात जात नाही. संपूर्ण नफा रिसर्च आणि सामाजिक कार्यात खर्च होतो. पांडुलिपी संबंधित कार्य पीआरआय हरिद्वार मध्ये जाऊन डोळ्यांनी बघून खात्री करून घ्या.
3. भारतातील सर्वात मोठे हेर्बेनियम पीआरआय येथे आहे. https://www.patanjaliresearchinstitute.com/prf_herbarium.php
4. Museum of Plant Illustrations https://www.patanjaliresearchinstitute.com/museum_of_plant_illustrations...
Patanjali Museum of plant illustrations is a unique collection of coloured canvas paintings and black and white line diagrams of medicinal plants found all around the world. In this museum 30,000 canvas paintings and 35,000 black and white line diagrams on drawing sheets will be displayed according to World Herbal Encyclopedia. These paintings will be beneficial for students, research scholars and scientific community interested in medicinal plants.
५. भारतात आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या 900 औषधी वनस्पति हर्बल गार्डन मध्ये संरक्षित केल्या आहेत. https://www.patanjaliresearchinstitute.com/patanjali_herbal_garden.php
६. जगात 60000 वनस्पतींचा विभिन्न देसी प्रणालींमध्ये औषधी उपयोग होतो. त्या सर्वांची ओळख प्रथमच WORLD HERBAL ENCYCLOPEDIA च्या माध्यमांनी जगाला माहिती देण्याचे कार्य. 1000 पानांचे 100 खंड पैकी 20 चे प्रकाशन झाले आहे. पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. पहिल्या खंडाचे प्रकाशन प्रधान मंत्रीच्या हस्ते झाले होते.https://www.patanjaliresearchinstitute.com/world_herbal_encyclopedia.php

७. TAXONOMY WORK https://www.patanjaliresearchinstitute.com/taxonomy_work.php
8. वरील कार्य पीआरआय चे आहेत. पतंजलिच्या एकाच संस्थेचे.
विविध उद्योगपती त्यांचे उत्पादन पतंजली च्या नाव आडून विकत आहेत असा पण लोकांना दाट संशय आहे.
देशातील सर्वात मोठा फूड पार्क हरिद्वार येथे आहे आणि दूसरा मोठा फूड पार्क बल्लिपुरा आसाम मध्ये आहे.गूगल सर्च करून यांचे विशाल आकार पाहू शकता. आसाम पार्क मध्ये त्यांच्या खर्चाने युद्धक विमान उतरु शकतील असा मजबूत रास्ता ही बनविला आहे. याशिवाय देशात ८० च्या वर कारखाने त्यांचे आहेत. patanjali food park assam

टवाळ कार्टा's picture

18 Aug 2021 - 4:49 pm | टवाळ कार्टा

पतंजलिचा पूर्ण नफा कुणाच्याही खिश्यात जात नाही. संपूर्ण नफा रिसर्च आणि सामाजिक कार्यात खर्च होतो.

=))

योग कोणते आहे आहेत आणि ते कसे करायचे हे लोकांना पतंजली च्या जन्माच्या अगोदर पासून माहीत आहेत .

सांगा बरे योग कोणते आहेत अनते कसे करायचे ते ?

गामा पैलवान's picture

18 Aug 2021 - 11:26 pm | गामा पैलवान

विवेकपटाईत,

अतिशय स्तुत्य कार्य आहे. परिचय करवून दिल्याबद्दल धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.