कविता

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
21 Jul 2021 - 10:47 pm

खोल ह्रदयात उमटला, नादमय विणेचा झंकार,
सावळे रूप विठाईचे, जाहले नयनात साकार !!
मकरकुंडले डुलती कानी, पीतांबर झळके कटीवर,
वारक-यांची वाट पाहत, उभा ठाकला विठू वीटेवर !!
टाळ मृदुंगाची धून, कानी गुंजते मधुर ,
दर्शनाची ओढ लागे, पाय चालती भर्भर !!
दोन वरीस वारी नाही, आसावले भेटीस मन,
कामात चित्त लागेना, वारीतच गुंतले ध्यान !!
वारीतला गुलाल बुक्का, उधळण भक्तीरंगाची,
पाहतसे वाट भक्तांची, चंद्रभागाही पंढरीची !!
उदास तु ही पांडुरंगा, रूक्मिणीही उदासली,
वैष्णवांच्या मेळ्यावीना, सूनी पंढरी भासली !!
एकच मागणे तुझ्या पायी, संकट हे आता टळू दे,
वातावरण सारे निवळू दे, भक्तांना दर्शन मिळु दे !!
पुढच्या वारीत आता , गर्जु दे नाम "पांडुरंग" ,
तुझ्या दर्शनाने नीवू दे, आम्हा भक्तांचे अंतरंग !!
-वृंदा

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2021 - 2:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है सुरेख. पांडुरंग भेटीची आस, ओढ, उत्कटता सुरेख उमटली आहे.
आवडली रचना.

एकच मागणे तुझ्या पायी, संकट हे आता टळू दे,
वातावरण सारे निवळू दे, भक्तांना दर्शन मिळु दे !!

अगदी अगदी...!

मकरकुंडले डुलती कानी, पीतांबर झळके कटीवर,

विठ्ठलाच्या कानात मत्स्य कुंडले असूनही मकरकुंडले का म्हटल्या जातात कोणास ठाऊक.

पण रचना आवडली लिहिते राहा....! सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.!

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

22 Jul 2021 - 2:09 pm | प्रचेतस

विठ्ठलाच्या कानात मत्स्य कुंडले असूनही मकरकुंडले का म्हटल्या जातात कोणास ठाऊक.

कदाचित दोन्ही जलचर असल्याने जनरीक म्हणून वापरत असतील असे वाटते. मात्र ती मत्स्यकुंडलेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2021 - 2:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित दोन्ही जलचर असल्याने जनरीक म्हणून

मत्स्य आणि मकर ( दोन्ही जलचर) असे म्हणून दोन्ही म्हणत असाल पण पटलं नाही.
काही तरी वेगळं असेल. कुछ तो होगा. आता जरा गुगळून पाहिलं
विकार बिकार वगैरे असं काही दिसलं. पण, कुंडले मत्स्यच का ?
याचं उत्तर शोधलं पाहिजे. अभ्यास करावा लागेल.

वल्ली सर..! तुम्ही करा ना जरा अभ्यास. प्लीज.

- दिलीप बिरुटे

मत्स्य आणि मकर ( दोन्ही जलचर) असे म्हणून दोन्ही म्हणत असाल पण पटलं नाही.

ह्याचं एक कारण असंही असू शकते. विठ्ठलाची ही मूर्ती मूळ नव्हे. मूळ मूर्ती माढ्याला गेली असे रा. चिं. ढेरे म्हणतात. मूळ अभंगात मकरकुंडले असा उल्लेख आहे तेव्हा कदाचित मूळ मूर्तीला मकरकुंडले असू शकतील, इस्लामी आक्रमणानंतर पुनर्स्थापित झालेल्या मूर्तीला मत्स्य कुंडले कोरली असावीत असेही असू शकेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2021 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंढरपुरच्या पांडुरंगाचा बराचसा प्रवास या गावाहून त्या गावाला आणि
त्या गावाहून पुन्हा इकडे, तो प्रवास माहिती आहे.

मूळ मूर्ती माढ्याला गेली असे रा. चिं. ढेरे म्हणतात. मूळ अभंगात मकरकुंडले असा उल्लेख आहे तेव्हा कदाचित मूळ मूर्तीला मकरकुंडले असू शकतील

पण मित्रा, माढ्याच्या मूर्तीच्या कानात मत्स्य कुंडलेच नाहीत. दोन्ही कानात शंखाकार कुंडले आहेत. (आमच्याच धाग्याची जाहिरात) असो, इकडे कवयित्रिच्या धाग्यात अवांतर प्रतिसाद नको. आपण एक नवा धागा सुरु करु ’ विठ्ठल विठ्ठल ’

-दिलीप बिरुटे

हा केवळ ढेरे यांचा सिद्धांत आहे. मूळ मूर्ती माढा येथीलच आहे असे माझे म्हणणे नाही. मूळ मूर्ती कदाचित भग्न झालेलीही असेल.

VRINDA MOGHE's picture

22 Jul 2021 - 2:42 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद !