२१५

सारिका होगाडे's picture
सारिका होगाडे in जनातलं, मनातलं
1 Jul 2021 - 6:14 am

२१५
(कृपया मानसिक त्रास होणाऱ्या लोकांनी हा लेख वाचू नये.)

आंतरजालावर जी माहिती दिसते ती सगळी खरीच असते असे नाही आणि सर्व सत्य घटनांची माहिती आंतरजालापर्यंत पोहोचतेच असेही नाही. त्यापैकीच हे एक हत्याकांड आहे जे दशकानुदशके लपवून ठेवण्यात आले, घडत गेले, आणि कोणालाही त्याचा पत्ता नाही. स्थानिक लोकांनाही कळायला खूप वेळ लागला पण जेव्हा कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र आज उघडपणे ही बातमी जगासमोर आली आहे आणि आंतरजालावर उपलब्ध आहे. कॅनडावरचा हा डाग मात्र कधीही धुवून निघणार नाही, असे दिसते.

आज कॅनडामध्ये २१५ हा काळा आकडा आहे असे म्हणू शकतो. जून महिन्याच्या सुरुवातीला २१५ लहान मुलांचे शव एका शाळेच्या अंगणात सापडले. ही शाळा म्हणजे "रेसिडेन्शिअल स्कुल". ब्रिटिशांनी (यावर्षी मला समजले कि ते खरे ब्रिटिश नाहीच मुळी, ते तर जर्मन होते जे ब्रिटिशांचे नाव लावून गेली २-३ शतके राज्य करत आहेत.)
जसे भारतात 'फोडा आणि राज्य करा' ही पद्धत वापरली, आपल्या संस्कृतीतील सर्व पुस्तके जाळली, गुरुकुल पद्धत बंद केली वगैरे सर्व आपल्याला माहीत आहे.
जसे आफ्रिकेमध्ये सुदृढ तरुण आफ्रिकनला त्याच्या मुलासमोर मारले जात असे, जेणेकरून त्याच्या मुलाला पटते की आपल्या वडिलांपेक्षासुद्धा ही माणसे मजबूत आहेत आणि तो मुलगा पुढे जाऊन कधीही ब्रिटिशांबरोबर मारामारीचे विचार करत नाही.

तसे कॅनडामध्ये त्यांनी काय पद्धत वापरली?
बरीच शतके जे लोक आधीपासूनच इथे राहत होते त्यांना 'नेटिव्ह कॅनडिअन्स / इंडिजिनिअस / अबोरिजिनल' असे म्हणतात. त्यांची भाषा, राहण्याची पद्धत, अन्न, कपडे, सगळे काही वेगळे होते, सुंदर होते. एवढ्या थंडीमध्ये कसे राहायचे, निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाबरोबर कसे राहायचे, त्यांना खूप चांगले माहित होते आणि अजून बरच काही.
साधारण १८५० च्या दरम्यान कॅनडा सरकार (= पोप + राणीचे राज्य) यांनी रेसिडेन्शिअल स्कुल बांधले आणि नेटिव्ह लोकांना मुलांना पाठवण्यास सांगितले. १८९४ पासून मात्र या लोकांना या शाळेत जाण्याची सक्ती केली गेली. ही शाळा ५ ते १८ वर्षांच्या मुलामुलींना सक्तीची होती. उन्हाळ्यात (जुलै- ऑगस्ट) २ महिने मुले सुट्टीत घरी जाऊ शकत होती. सप्टेंबरमध्ये मुलांना परत शाळेत येणे सक्तीचे होते.

सक्ती म्हणजे काय केले जात होते?
कॅनेडियन पोलीस घरी यायचे घ्यायला आई-वडिलांनी मुलांना नाही पाठवले, नाही जाऊ दिले तर त्यांच्या डोक्याला बंदूक लावून मुलांना घेऊन जायचे.
मारामारीत पालक वारले आणि नंतर मुलेही शाळेत जाऊ लागली, अजून कोणाचा जीव जाऊ नये म्हणून.
पालक मुलांना लपवून ठेवायचे पण हे नाझी सारखेच, त्यांना बरोब्बर मुलांचा वास यायचाच आणि यादीमध्ये असलेली सर्व मुले जोपर्यंत शाळेत पोहोचत नाहीत तोपर्यंत ते थांबत नव्हते.

काय व्हायचे शाळेत? असे काय शिकत होती ही मुले?
सर्वात आधी त्यांचे केस कापणे, अगदी बारीक असा कट करणे. शाळेने दिलेला गणवेषच घालणे. मुलांना घरची कोणतीही आठवण जवळ ठेवू दिली जात नव्हती. सर्व काही जाळून टाकले जात होते.
कोणाशीही बोलताना इंग्रजीमध्ये बोलणे सक्तीचे होते. मुलांच्या मायबोलीत बोलणे, विचार करणे सुद्धा वर्ज्य होते.
या शाळांचा एकाच उद्देश होता, नवीन पिढीला इंग्रजाळवणे. त्यांची मूळ संस्कृत नष्ट करणे.
जेवताना पण सर्व हालच होते. रोज तेच तेच कोणालाही न आवडणारे जेवण दिले जात होते. मुलांनी ननचे ऐकले नाही तर कडक शिक्षा दिली जायची. उपाशी ठेवणे, मुलांना त्यांच्या शक्तीबाहेरची कामे सांगणे. शाळेच्या बाहेरही जाता येत नसे. या शाळा शहरांपासून खूप लांब बांधल्या होत्या त्यामुळे जवळ कोणीच भटकत नव्हते. चुकून कोणी आलंच तर शाळेच्या आत जाऊ शकत नाही कारण २४ तास सैनिक पहारा देत असत.

तरीही बऱ्याच मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, काही बंदुकीच्या गोळीने गेली तर काहींना पकडण्यात यश आले, अशा मुलांचे तर खूपच हाल केले जायचे.
चाबकाचे फटकारे पासून ते बलात्कार आणि खून असे सगळे तिथे घडत होते. उपासमारीने मुले मारत होती. ऐकत नाही, पळून जातात किंवा अजून काही कारण असो, त्यांचा खूनही केला जात होता.
शाळेत दिवसभर एकच शिकवले जायचे, देव एकच आहे आणि तो म्हणजे जीजस. त्याचीच प्रार्थना करायची आणि इंग्रजीमध्येच बोलायचे.

या सगळ्या जाचातून जर मुले वाचलीच, आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जाऊ शकली तर त्यांची काय अवस्था असणार आहे? चिडचिड, राग यातच २ महिने जायचे. आईवडील प्रयत्न करायचे त्यांना परत ठीक करण्यासाठी पण सगळे व्यर्थ. काही मुले आत्महत्या करायची.
दरवर्षी १० महिने हे सर्व सोसणे आणि वयाच्या १७-१८ वर्षापर्यंत हे सोसणे, याचा त्यांच्या मनावर खूप परिणाम होत होता आणि दारू पिणे, ड्रुग्स घेणे याचा सहारा ती घेऊ लागली. १२वी नंतर आता पुढे काय याचा विचारही ते करू शकत नव्हते. संपूर्ण पिढी वाया जाऊ लागली.

साधारण १९५० मध्ये लोकांमध्ये जागरूकता सुरु झाली. कारण या लोकांचा त्रास सुरु झाला, चोऱ्या, मारामारी, ड्रुग्स घेऊन पडून राहणे, भीक मागणे, ही लोकं असे का करतात याचा शोध घेण्यात आला आणि जागरूकता सुरु झाली.
१९९६ मध्ये शेवटची रेसिडेन्शिअल स्कुल बंद करण्यात आली. (फक्त २५ वर्षांपूर्वी, बघा फार लांब नाही.)

आज काय परिस्थिती आहे?
यांच्या पुढच्या पिढीला पब्लिक किंवा प्रायव्हेट शाळांमध्ये इतर मुलांसारखेच छान वागवले जाते. पण आपली भाषा, आपली संस्कृती, याची त्यांना काहीच माहिती नाही आणि ती परत शिकण्यासाठी काहीही स्रोत उपलब्ध नाही. त्यांची संस्कृती संपूर्णपणे लोप पावलेली आहे. एका अर्थाने कॅनेडियन सरकारला (= पोप + राणी) जे हवं होत ते झालं आहे.

एक उदाहरण: माझ्या सहकार्याच्या वडिलांना ज्या पोपने त्रास दिला होता इतकी वर्षे, तो त्यांच्याच घराजवळ राहतो आणि वडिलांनी त्याला बघितल्यावर त्याचा खूप कसा करावा हा एकच विचार त्यांच्या मनात होता. २-३ पिढ्यांचे जीवन त्यांनी बरबाद केले आहे. आता नवीन पिढी यातून बाहेर पडून जगण्याचा प्रयत्न करत आहे.
कॅनेडियन सरकार आणि लोक ही बातमी वाचल्यानंतर काय पावले उचलत आहेत, याबद्दल पुढील लेखात सांगू शकते.
हा लेख वाचल्यानंतर अनेक प्रश्न पडले असतील, ते तुम्ही खाली लिहा, मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.
आज कॅनेडियन संस्कृती कशी आहे याबद्दल सांगायलाही आवडेल.
२१५ नंतर अजून एका शाळेत शव सापडत आहेत. एकूण १५० रेसिडेन्शील स्कुल आहेत.

जाता जाता अजून थोडं:
शाळेत गणवेश घालणे ही संस्कृती आपल्याकडे इंग्रजांमुळे आली, तर इथे फक्त रेसिडेन्शिअल स्कुल आणि अनाथ मुलांची शाळा, याठिकाणीच गणवेश सक्तीचा आहे.
खाजगी शाळांमध्ये गणवेश नाहीये. तुम्हाला जे कपडे आवडतात ते घालून तुम्ही शाळेत या, जी केशरचना आवडते ती करून तुम्ही शाळेत या. थोडक्यात तुम्ही तुमच्यावर जसे प्रेम करता तीच छबी घेऊन शाळेत या, हा उद्देश.
भारतात आपण मुलांना शाळेत गणवेश घालून पाठवतो यामागे कुठेतरी त्यांना हा संदेश देतो की तुम्ही जसे आहात तसे शाळेत जाण्यास पात्र नाही, तुम्हाला बदलावे लागेल आणि तिथेच त्याच्या बालमनात सर्जनशीलता मरायला सुरुवात होते, खुंटत जाते.

अधिक माहिती:
https://en.wikipedia.org/wiki/Canadian_Indian_residential_school_system
https://www.cbc.ca/news/canada/british-columbia/tk-eml%C3%BAps-te-secw%C...
https://www.cbc.ca/news/canada/saskatchewan/cowessess-marieval-indian-re...

धन्यवाद.

संस्कृतीइतिहासविचार

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2021 - 9:40 am | श्रीगुरुजी

बापरे, फारच भयंकर आहे हे. या लोकांना पकडून काही शिक्षा झाली आहे का?

युद्धातले विजेते इतिहास लिहितात, त्याप्रमाणे WW १,२ चा इतिहास एकांगी कळला आहे असं वाटतं... इंग्रज हे जर्मन लोकांपेक्षा कांकणभर सरस आहेत अस वाटायला लागलंय..

आफ्रिकेतील लूट https://youtu.be/SPqMxRO8_2U

गुल्लू दादा's picture

1 Jul 2021 - 10:06 am | गुल्लू दादा

क्रूरतेचा कळस. अजून वाचायला आवडेल. धन्यवाद.

कॉमी's picture

1 Jul 2021 - 10:07 am | कॉमी

महत्वपूर्ण लेख.
अमेरिका आणि कॅनडा, स्थानिक इंडीयन लोकांवर अनन्वित अत्याचार करूनच देश करतच देश स्थापन झाले आहेत. सॅन्ड क्रीक हत्याकांड सेंटेनियल पुस्तकातून माहीत झालेले.

मुलांच्या हत्याकांडाचा आणि सांस्कृतिक जेनोसाईडला विरोध म्हणून कॅनडा दिवस साजरा करू नये अशी मागणी होत आहे असे वाचलेले.

युनिफॉर्म्स बद्दल सुद्धा संपूर्ण सहमत.

+ ऑस्ट्रेलिया + न्यूझीलंड + हवाई + ....

सुबोध खरे's picture

1 Jul 2021 - 10:28 am | सुबोध खरे

भयंकर प्रकार आहे हा.

याच गोऱ्या कातडीचे चोर लोक आम्हाला सहिष्णुता शिकवतात.

मराठी_माणूस's picture

1 Jul 2021 - 4:32 pm | मराठी_माणूस

लोकसत्ते मधे रोज एक लेख असतो लहानसा , सदराचे नाव आहे "नवदेशांचा उदयास्त".
वाचल्यावर कळते की खरे असंस्कृत लोक हे युरोपिअन आहेत. जिथे जिथे गेले , तिथली संस्कृती नष्ट करणे, तिथल्या लोकांवर अत्याचार करणे, लूट करणे असे उद्योग त्यांनी केलेले आहेत.

चौथा कोनाडा's picture

1 Jul 2021 - 5:39 pm | चौथा कोनाडा

खुपच भयंकर आहे हे !
२१५ आणि ते ही २१५ लहान मुलांचे मृतदेह ? वाचून अंगावर काटा आला !

चौथा कोनाडा's picture

1 Jul 2021 - 5:40 pm | चौथा कोनाडा


भारतात आपण मुलांना शाळेत गणवेश घालून पाठवतो यामागे कुठेतरी त्यांना हा संदेश देतो की तुम्ही जसे आहात तसे शाळेत जाण्यास पात्र नाही, तुम्हाला बदलावे लागेल आणि तिथेच त्याच्या बालमनात सर्जनशीलता मरायला सुरुवात होते, खुंटत जाते.


खरं आहे !

गॉडजिला's picture

1 Jul 2021 - 5:57 pm | गॉडजिला

भारतात आता गुरुकुल पध्द्त सुरु व्हायला हवी ज्याला जशी जमेल तशी गुरुदक्षिणा द्यायची मुभा असावी आचार्याचा जो पट्टशिष्य असेल तो सोडून इतरांना सखोल तयार केले जाऊ नये...

मुलांचे आधुनिक शिक्षण ही अजून उतक्रान्तीच्या मागावरील प्रक्रिया आहे आता लर्न फ्रॉम होमही होत आहे...

त्यांनी मुलांवर अत्याचार न करता आधुनिक शिक्षण दिले असते तर नक्की फायद्याचे ठरले असते वरील उदाहरणात दोष शिक्षण पध्द्तीचा दिसत नसून ती नृशन्स पध्द्तीने राबवणाऱ्या नालायक लोकांचा दिसतो

भारतांत (फक्त) हिंदू साठी हे बे कायदेशीर असून सदर गुरूला तुरूंगाची हवा खायला मिळेल.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2021 - 6:26 pm | श्रीगुरुजी

बापरे, फारच भयंकर आहे हे. या लोकांना पकडून काही शिक्षा झाली आहे का?

कोणाला पकडणार ? ते मरून कित्येक वर्षे झाली असतील कि.

सारिका होगाडे's picture

2 Jul 2021 - 3:36 am | सारिका होगाडे

काही गेले आहेत. जे जिवंत आहेत त्यांनी सरकारच्या सांगण्यावरूनच हे केले आहे. कॅनडामध्ये अजूनही राणीचे राज्य आहे, कोण शिक्षा करणार याना. जसे मी लेखात लिहिले आहे, माझ्या सहकार्याच्या वडिलांनी पोपला बघितले. तो पोप अजूनही मस्त जीवन जगत आहे, सगळं काही करून. इथे अजूनही चर्चमध्ये अशा गोष्टी चालतात.

गामा पैलवान's picture

1 Jul 2021 - 7:11 pm | गामा पैलवान

सुबोध खरे,

याच गोऱ्या कातडीचे चोर लोक आम्हाला सहिष्णुता शिकवतात.

हा भयंकर प्रकार आहे हे खरंय. पण याला युरोपीय लोकांचा पाठिंबा नव्हता. हे अत्याचार करणारे युरोपीय उमराव, दर्यावर्दी व्यापारी, पोपचे चमचे वगैरे होते. या प्रकारांचा सामान्य जनतेशी काहीही संबंध नव्हता. गोऱ्या जनतेच्या मागे दडून हे अत्याचारी आपली खरी ओळख लपवीत आले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

गॉडजिला's picture

1 Jul 2021 - 7:23 pm | गॉडजिला

तसेही गोरे तसेच वागले जसे एका जित्या राष्ट्राने हारलेल्या राष्ट्राशी वागले पाहिजे...

आधुनिकता ही गोर्यांची सगळ्या जगाला दिलेली फार मोठि देणगी आहे, यापुढे जगातील तथाकथित यच्चावत विकसीत संस्क्रुत्या फुस्क्या ठरल्या हा काही जोक न्हवे

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2021 - 9:55 pm | टवाळ कार्टा

हा प्रतिसाद डोक्यावरून गेला

पण त्यांनी जगाला धर्मापलिकडील जगाचीही देणगी दिली... ज्ञान तर विविध संस्कृतीमधे पुर्वापार आहे पण आधुनिकतेची सांगड नसल्याने त्या सर्व प्राचिन संस्कृत्या आज म्युजिअमचा भाग आहेत जिवनाचा नाही.

गामा पैलवान's picture

1 Jul 2021 - 7:23 pm | गामा पैलवान

सारिका होगाडे,

माझ्याकडचा जुना मजकूर चाळला तेव्हा हे इंग्रजी चित्र सापडलं :

https://i.imgur.com/F77rahT.jpg

कितपत खरंय ते माहीत नाही. पण बराच सत्यांश असणार.

आ.न.,
-गा.पै.

सारिका होगाडे's picture

2 Jul 2021 - 3:39 am | सारिका होगाडे

हा संपूर्ण लेख याचाच सारांश आहे. या फोटोमध्ये लिहिलेले सर्व खरे आहे. धर्माबद्दल करवणे, इंग्रजी शिकवणे आणि खून करणे हेच चालत होते या शाळांमध्ये.

शाम भागवत's picture

1 Jul 2021 - 7:44 pm | शाम भागवत

हिंदू = सहिष्णुता

मुक्त विहारि's picture

1 Jul 2021 - 8:23 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद .....

आपल्या कडे पण हीच परिस्थिति आहे ....

हिंदू तितका मेळवावा ....

त्यांनी ज्या पद्धतीनं ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला, ते बघता अताचे middle East wale सारखेच आहेत म्हणायचे... फक्त middle East wale उशिरा जागे झाले एवढंच

गॉडजिला's picture

1 Jul 2021 - 11:26 pm | गॉडजिला

middle East wale सारखेच आहेत पण आता काळाच्या जरा मागे आहेत.

सारिका होगाडे's picture

2 Jul 2021 - 3:43 am | सारिका होगाडे

मी जिथे जिथे राहिले, तिथे नन माझ्या घरी येऊन मला धर्माबद्दल करायला सांगतात. अगदी स्पष्टपणे नाही पण त्यांचा मूळ उद्देश तोच असतो. आणि ते खूप चिवट आहेत, हाकलून दिले तरी परत येत राहतील. मी अतिथी देवो भव यानुसार त्यांना घरी येऊ देते, त्यांच्याशी बोलते आणि प्रश्न विचारते ज्याची ते उत्तरे देऊ शकत नाहीत. मग मी हिंदू सनातन धर्माबद्दल त्यांना माहिती द्यायला सुरुवात करते. त्यांना ती पटते सुद्धा पण स्वीकार नाही करू शकत.

गॉडजिला's picture

2 Jul 2021 - 3:50 pm | गॉडजिला

आपण अगदी योग्य करत आहात...

चौकस२१२'s picture

2 Jul 2021 - 10:17 am | चौकस२१२

जगभर पाश्चिमात्यांनी राज्य करतांना स्थानिकांवर अन्याय केलं हे खरे आहे ... पण पुढे त्यातून स्वतःवर कोरडेओढण्याचा शहाणपणा पण ते दाखवत आहेत हे विसरू नका... दुसरे असे कि आपण ( भरात चीन संस्कृती इत्यादी ) किती महान आहे हे नुसते उर बडवून काही होणार नाही , प्रयत्न आणि धर्माला बाजूल ठेऊन ( धार्मिक दृष्टीने म्हणतोय सामाजिक दृष्टितने नव्हे ) विन्यायाची साथ घेऊन "आपले" म्हणून जे काही शोध आहेत त्याला पुढे आणणे हे केले तर पुढे जाऊ नाहीतर बसू नुसते "आपला बाप्या " करीत
असो
देशातील सर्व धार्मिक संस्थांना चौकशी ला समोर जावे लावण्याचे धाडस एक पाश्चिमात्य सरकार ने दाखवले ( ख्रिस्ती बाहुल असून !) .. पहा
https://www.childabuseroyalcommission.gov.au/religious-institutions

याशिव्या कोणता यौरोपीनं कसा होत आणि त्याने कसे राज्या केले यात पण फरक आहे
सालाझार चा गोवा आणि ब्रिटिशांचा भारत यात फरक होता असे ऐकलंय

सहमत. कॅनेडियन लेफ्ट-लिब्स या घटनांवर सतत बोल्ट आहेत आणि रिपेरेशन्स मागत आहेत.

चौकस२१२'s picture

2 Jul 2021 - 10:34 am | चौकस२१२

सध्या काळजी हि जास्त करून हिंदू परिवारातील हिंदू शीख फूट पडणे, जैन हिंदू फूट , लिंगायत / हिंदू फूट याबद्दल वाटते
खास करून हिंदू शीख .. अजूनही ते "शेतकरी आंदोलन" हे शिकांविरुद्धचे युद्ध असे जगभर भासवण्यात येते आहे .. कारण कि त्यामागे असलेला पैसा भारतातात राहणाऱ्यांना ते कदाचित जाणवत नसेल पण बाहेर जाणवते

मी स्वतः काही नेटिव्ह अमेरिकन आणि एस्किमो सोबत वेळ घालवला असून ह्या लोकांना कश्या पद्धतीने आज सुद्धा ख्रिस्ती मिशनर्यांनी अक्षरशः ब्रेनवॉशेड झोंबी बनवून ठेवले आहे हे पहिले आहे.

दिगोचि's picture

2 Jul 2021 - 1:32 pm | दिगोचि

आजच्या व्रुत्तपत्रात वाचलेल्या महितीप्रमाणे आतापर्यन्त तेथे ११४८ अन्मार्कड (अचिन्हन्कित) ग्रेव सापडल्या आहेत. याचा अर्थ मेलेल्याना तसेच पुरले आहे. जेम्व्हा लोक आपल्या धर्माची शिकवण काय हे विसरतात तेम्व्हा असे अत्याचार घडतात. कॅथोलिक चर्च कडून हे घडले आहे. ही मुले एका शाळेच्या हॉस्टेलमधे रहात होती. याचा बदला म्हणुन दोन चर्हे जाळली आहेत. कॅथोलिक या शब्दाचा अर्थ उदारमतवादी असा आहे. या शब्दाला या मिशनरी लोकानी काळिमा फासला आहे. ऑस्ट्रेलियातहि नेटि लोकान्वर अत्याचार घडले आहेत. त्यासाठी १० वर्शापूर्वी एका पन्तप्रधानाने त्या पहिल्या नागरीकान्ची माफी मागितली होती. आज आम्ही कोणत्याही समारम्भात पहिल्यान्दा त्याच्या वडिलधार्या माणसन्चे आभार मानतो व मगच कार्यक्रमाला सुरवात करतो. अर्थात असे करण्याने झालेले अत्याचर भरुन येत नाहीत. असो.