कटितटपीतदुकूलविचित्र.....

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
4 May 2021 - 2:25 pm

"शब्द हे शस्त्र आहेत", हे वचन आपण सगळेच नेहमी ऐकतो. शब्द हे जपून वापरा, ते फार सामर्थ्यवान असतात. त्यांचा अर्थ तर काही वेळा माणसाच्या मनाचा (माझ्या मते जीभेचाही) चेंदामेंदा करतो.

मला अनेक शब्द कोड्यात टाकतात. त्यांचे अर्थ तर मला कळत नाहीतच पण त्यांचे उच्चारही कठीण वाटतात. काही शब्द उच्चारताना तर जीभ वळतच नाही."चटईला टाचणी टोचली" किंवा "काळे राळे,गोरे राळे,राळ्यात राळे मिसळले." सारखी अवघड शब्दरचना नाही हं! पण अनेक शब्दांचे उच्चार आणि अर्थ मला गोंधळात टाकतात. माझी एक लहानपणीची मैत्रीण होती. ती खूप सावकाश शब्द उच्चारायची. तिच्या तोंडून 'चें ग रा चें ग री','ग ड ब ड गोंधळ', प ळ वा प ळ वी ' असे शब्द ऐकताना गंमत वाटायची. हसू यायचं.

मला अनेक हिंदी गाण्यांचे शब्द समजत नाहीत. अर्थ समजत नाही.
"चिलमन, चष्मेबद्दूर, जुस्तजू, इनायत, तहकिकात, तकल्लुफ, मुपलिस,"असे कितीतरी शब्द.

"चलो कि चलके सियासी मुकमिरोसे कहो
कि हमको जंगो जदल के चलन हे नफरत है"

किंवा

"गुजिश्ता जंगमें घर ही जले मगर इस बार"

किंवा

"तसव्वुरात की परछाईयाॅ" असे शब्दप्रयोग केले की मी फाफलते.

हिंदी गाण्यात "हिवडा में नाचे मोर" म्हटल्यावर मी मोर नक्की कुठे नाचतोय हे न कळल्यामुळे गोंधळात पडले. मग हिवडा शब्दाचा अर्थ हृदय आहे हे कळले.

"जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश बहाले हिजरा तुम्हारा दिल है" हे गाणं इतक्यांदा ऐकूनही आईशप्पथ मला त्याचा उच्चार करता येत नाही, आणि अर्थही कळलेला नाही. आत्ताही लिहीण्यातली चूकभूल देणे घेणे.

"बंबईसे आया है बाबूजी नन्हा" असेच गाण्याचे शब्द आहेत असे मला वाटत होतं. आणि एवढा मोठा घोडा देवानंद 'नन्हा' कसा असं मला आश्चर्य वाटत असतानाच एका मैत्रिणीने तो शब्द "चिनोन्ना" असा दाक्षिणात्य आहे असं समजावलं.
शाळेतील वयात प्रतिजैविक 'पेनिसिलीन' या साध्या शब्दानं दांडी उडविली होती. नंतर कॉलेज शिकताना "ऑन्थाॅपाॅमार्फालाॅजी"-(मानववंशशास्त्र) हा शब्द जिभेवर घाव घालून गेला होता.
संस्कृतमध्ये "भिद्यादुर्यदुदारदर्दुरदरीदीर्घादरिद्रद्रुमाः।" हा श्लोक पाठ करताना जीभेला पक्षाघात झाला.

ज्यात"माय सिन"- ऊर्फ "माझे पाप" हा शब्द आहे अशी अनेक ॲंटिबायोटिक्सची नावं उच्चारताना तिरपीट उडते. क्लोरोमायसिटिन की कायसेसे नाव,त्याने दचकवलं होतं.

आयुर्वेदातही अशीच औषधींची जीभेला योगासने करायला लावणारी नावे आहेत,"कार्पासमूलासव,मकरध्वज, बृहत् वातचिंतामणी,सारस्वतारिष्ट,त्रयोदशांगगुग्गुळ,खदिरादित्वक्!!

कोरोना आला आणि अनेक नवे शब्द कळले. लाॅकडाऊन, जनता कर्फ्यू, पाॅझिटिव्ह, निगेटिव्ह, स्वॅब टेस्ट,क्वारन्टाईन,पॅनडेमिक इ.इ.

रेमडेसीवीर हे असंच एक औषध. प्रथम उच्चारणात तो शब्द जिभेवर चढतच नाही. घटवावा लागतो. अनेक रिपोर्टर्सची,न्यूज रीडर्सची,बाईट देणाऱ्या पुढाऱ्यांची, यू ट्यूब वरच्या राजकीय विश्लेषकांची हा शब्द उच्चारताना बोबडी वळल्याचं दर्शकांनी ऐकलेलं आहे. मला तर सुरुवातीला रेमडेसीवीर हे नाव ऐकल्यावर ते "रामदेसीवीर",असं पतंजलिचं औषध आहे असं वाटलं. आणि त्याचा भ्रष्ट इंग्रजी उच्चार रेमडेसीवीर करताहेत अशी खात्री पटली.

सुरुवातीच्या काळात ट्रंपसाहेब रागावल्यावर आपण अमेरिकेला हायड्रोक्सिक्लोरोक्विन नावाचं औषध निर्यात केलं होतं. ते नावही लक्षात राहायला कठीण आणि जिभेला व्यायाम करायला लावणारं होतं. "डाॅक्सिसायक्लिन,(सर्व औषधांचे उच्चार माझ्या कुवतीनुसार, आगाऊ क्षमस्व), "डेकथामेथासोन,""टोसिलिझूमॅब" ही औषधांची नावही जीभेला आकर्णधनुरासन करायला लावणारी. कोरोना काळात प्लाझ्मा हे काय प्रकरण आहे ते नव्यानेच कळलं. काॅनव्हालसेंट प्लाझ्मा ट्रिटमेंट हे नाव ऐकल्यावर भीती वाटली.
औषधांची नाव कसं सोपं हवं. दुकानात जाऊन दुकानदाराकडे,"अहो जरा एक टोसीलिझूमॅब द्या हो ."असं कसं मागायचं? त्यातून प्रिस्क्रिप्शनवरच्या गिचमिड्या अक्षरातून टोसीलिझूमॅब बरोबर वाचणं केवळ जगन्नियंत्यालाच शक्य आहे.

सरळ ,साधे ,सोपे असावेत शब्द. आणि आयुष्यही!

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 May 2021 - 2:30 pm | कंजूस

ममामिया.
युरेका.

मराठी_माणूस's picture

4 May 2021 - 2:55 pm | मराठी_माणूस

मस्त, शिर्षकाचा अर्थ काय ?

मुक्त विहारि's picture

4 May 2021 - 6:10 pm | मुक्त विहारि

अगदी हेच मनांत आले होते

श्रीगुरुजी's picture

4 May 2021 - 3:03 pm | श्रीगुरुजी

"बंबईसे आया है बाबूजी नन्हा" असेच गाण्याचे शब्द आहेत असे मला वाटत होतं. आणि एवढा मोठा घोडा देवानंद 'नन्हा' कसा असं मला आश्चर्य वाटत असतानाच एका मैत्रिणीने तो शब्द "चिनोन्ना" असा दाक्षिणात्य आहे असं समजावलं.

हा लेख उघडण्याच्या क्षणापर्यंत हे बोल "बंबईसे आया है बाबूजी नाना" असे आहेत ही माझी समजूत होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2021 - 3:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी लेखन खुसखुशीत मजा आगया. आभार.

आपण लेखात लिहिलेले शब्द संपूर्ण वाचायची कसरत करावी लागली. बाकी, "जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश बहाले हिजरा तुम्हारा दिल है" याचा अर्थ आणि लयीत म्हणने ही खरी कमाल आहे. अर्थ माहिती नाही पण शब्द उच्चारण करावे लागतात. आपण लिहिलेला हा शब्द भिद्यादुर्यदुदारदर्दुरदरीदीर्घादरिद्रद्रुमाः।" यातलं फ़क्त भिद्यापर्यंत वाचलं आणि सोडून दिलं. पण आपण लिहिलंय म्हणून दुस-या फ़ेरीत सावकाश वाचलं आणि शब्दाच्या टोकाला पोहचलो. सध्या फ़ुफ़्फ़ुसात हा शब्दही ब-याचदा फ़ुफूस असे ऐकायला येते. शब्दाची गम्मत आहेच.

आजी लिहिते राहा. शब्दांनी लेखन वाचायला मजा आली.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2021 - 3:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रस्त्यावर विनामास्क फ़िरणा-यांना नागरिकांना पोलिसांनी आर्थिक दंड न देता ”भिद्यादुर्यदुदारदर्दुरदरीदीर्घादरिद्रद्रुमाः’ हा शब्द अगदी बरोबर, असा पंचवीस वेळा उच्चारायला लावावा. आत्ता रस्त्यावरील रहदारी कमी होते. ;)

-दिलीप बिरुटे

आज्जे , कुठल्या श्लोकातून घेतलाव तो शब्द ...

आंद्रे वडापाव's picture

4 May 2021 - 5:05 pm | आंद्रे वडापाव

कमरेच्या काठावरील पिवळे वस्त्र विचित्र ?

स्वलिखित's picture

4 May 2021 - 7:48 pm | स्वलिखित

मी पण असाच हिशोब लावला होता , पण शेवटी विचित्र असा शब्द असल्याने नेमका कशासाठी असा शब्द प्रयोग झाला हे कळलं नाही ,
फक्त लेखाचं नाव लिहिण्यासाठी असा शब्द प्रयोग जमलाय खास

सुक्या's picture

5 May 2021 - 12:42 am | सुक्या

लंगोट ???

तुषार काळभोर's picture

5 May 2021 - 3:02 pm | तुषार काळभोर

शीर्षकाचा भाग महिषासुरमर्दिनी स्तोत्रात येतो.
कटितटपीतदुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे।
चंद्रप्रकाश देखील फिका पडेल इतक्या तेजस्वी रेशमी वस्त्रांनी जीची कंबर सुशोभित आहे

अयगिरी नंदिनी या नावाने सुद्धा हे स्तोत्र परिचित आहे.
ऐकायला खूप छान आहे.
(आणि वाचायला म्हणायला अवघड पण नादमय).

ही मला आवडणारी स्तोत्राची दोन वर्जन्स.
१. राजलक्ष्मी संजय यांनी म्हटलेलं.
https://youtu.be/442ewPgXHQ0

२. कुलदीप पै यांनी संयोजन केलेलं आणि नऊ कन्यकानी गायलेलं
https://youtu.be/Np28O3Y_P2o

शाम भागवत's picture

6 May 2021 - 9:27 am | शाम भागवत

मला ए रेहमान यांनी दिलेल्या लावलेल्या चालीतले ऐकायला आवडते. ठेका धरत म्हणत असताना कधी पाठ होऊन जाते तेच कळत नाही. मात्र सुरवातीला हातात कागद घेऊन लक्षपूर्वक ऐकायला लागते.

चौथा कोनाडा's picture

4 May 2021 - 5:30 pm | चौथा कोनाडा

मजा आली वाचताना.
मध्यंतरी "श्री लक्ष्मीनॄसिंह करावलंबम स्रोत्र" पाठ करण्यासाठी प्रयत्न सुरु होता. उच्चार करताना बोबडी वळली, प्रयन्त सोडुण दिला !

ब्रम्हेन्द्र-रुद्र-मरुदर्क-किरीट-कोटि-संघट्टितांघ्रि-कमलामलकान्तिकान्त।
लक्ष्मीलसत्कुचसरोरुहराजहंस लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्‌

संसार-सागर विशाल-करालकाल-नक्रग्रहग्रसन-निग्रह-विग्रहस्य।
व्यग्रस्य रागदसनोर्मिनिपीडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहिकरावलम्बम्‌॥5॥

टवाळ कार्टा's picture

4 May 2021 - 6:05 pm | टवाळ कार्टा

=))

सतिश गावडे's picture

4 May 2021 - 9:09 pm | सतिश गावडे

"जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश बहाले हिजरा तुम्हारा दिल है" हे गाणं इतक्यांदा ऐकूनही आईशप्पथ मला त्याचा उच्चार करता येत नाही, आणि अर्थही कळलेला नाही. आत्ताही लिहीण्यातली चूकभूल देणे घेणे.

या निरीक्षणाशी तंतोतंत सहमत. हे गाणंही कितीही वेळा ऐकलं तरी शब्दांचे नेमके उच्चार काय आहेत हे कळतच नाही. त्यात अर्थाची वेगळीच तर्‍हा. याच्या पुढची ओळ "सुनाई देती हैं जिसकी धडकन, हमारा दिल या तुम्हारा दिल है" इतकी सोपी असताना पहीली ओळ अनाकलनिय लिहीण्याची अवदसा गीतकाराला का सुचली असावी कळत नाही.

कदाचित पहीली ओळ हिंदीशी थोडेफार साम्य असणार्‍या एखाद्या परकीय भाषेतील असेल.

आंद्रे वडापाव's picture

4 May 2021 - 9:29 pm | आंद्रे वडापाव

नुकतीच ताटातूट झालेलं बिच्चारे हृदय

त्याच्याकडे असं रागेरागे शत्रुत्व भावनेने पाहू नका प्लिsssज

आणि कृपया हिजरा असं नाही तर उर्दू हिज्र असा शब्द आहेतो. हिज्र म्हणजे सेप्रेशन separation

सतिश गावडे's picture

4 May 2021 - 11:13 pm | सतिश गावडे

आणि कृपया हिजरा असं नाही तर उर्दू हिज्र असा शब्द आहेतो.

आता तुम्हाला उर्दू येतंय म्हणा किंवा उर्दू शब्दांची ओळख आहे म्हणून म्हणा तुम्हाला माहिती आहे तो शब्द. ज्यांना उर्दू येत नाही त्यांना कसं कळावं काय शब्द आहे ते. :)

गवि's picture

4 May 2021 - 11:39 pm | गवि

गाणे ऐकून पाहिले.

गाण्यात हा शब्द हिजरा किंवा हिज्रा असाच ऐकू येतो. आणि गूगलवर देवनागरीत सर्च केल्यासही हिजरा असाच शब्द दिसला.

हिज्र हा निश्चित मूळ शब्द असावा. पण ऐकू काय येते त्यावरही मनात शब्द बरेच पक्के होतात.

अधिक नीट शोध घेतल्यास मुळात ते मस्ती नसून मिस्किन आहे असं दिसतं. पण आंजावर अनेक ठिकाणी अगदी "जिहाले मस्ती मुकुंद" वगैरे काहीही दिसतं आहे.

पण, आजींनी तिथे चूकभूल शक्यता आधीच वर्तवली असल्याने ते असो..

अगदी बरोबर एकदा एका भारताबाहेरील होंशी गाण्ययांच्या समूहात निवेदन करणाऱ्याला मी विचारले होते कि बाबारे एकतर येथे भारतातून सर्व भाषिक आहेत त्यातील अनेकांना हिंदी सुद्धा समजत नाही आणि तू मारे उर्दूतील निवेदन करतोस? तो वरमाला.. म्हणाला माफ करा माझ्य लक्षात आले नाही मी लखनौ चा आहे मी हिंदी कार्यक्रमाचे निवेदन कररव्याचे म्हणून उर्दूत केलं गृहीत धरले कि सगळ्यानं समजते ( आणि तो धर्माने मुस्लिम होता पण प्रश्न तो नव्हता )

उर्दू हि एक गॉड आणि नाजूक भाषा आहे आणि कविता या साहित्यक प्रकारला ती खूपच शोभते किंवा उर्दू भाषेत कविता शोभंते हे अगदी खरे आहे आणि त्या भाषेबद्दल आवड आहेच ... पण मला काही मूलभूत प्रश्न बरेच वर्ष पडलआ आहे

माझ्य सारखया हिंदी संस्कृत आणि मराठी शिकलेल्याला हिंदी कुठे संपते आणि उर्दू कुठे सुरु होते हे कळत नाही !

- हिंदी चित्रपटात व्यक्तिरेखा हि हिंदी भाषिक असते ( आणि बहुतेकदा नाव शर्मा, वर्मा , त्यागी , भाटिया असते ),, सर्वसाधारण उत्तर प्रदेशातील हिंदी भाषिक रोजच्या जीवनात पूर्ण उर्दूत बोलत नाही .. उर्दू चा प्रभाव असणार हे जरी खरे असले तरी संवाद हिंदीतून आणि चित्रपटातील गाण्यात एकदम क्लिष्ट ( पण मधुर वाटणारी ) उर्दूत कसे काय गाणे ? हे काही वास्तव वाटत नाही .. पण मधुर वाटते म्हणून हा मुद्द्दा कोणी लक्षात घेत नाही बहुतेक

तुम्ही एक पाहिलेत का गुलझार ( कार्ला / पंजाबी आडनाव ) बोलताना उर्दूत बोलतात हिंदीत नाही !
असो
दूसरे कोडे
- अनेक हिंदी भाषिक कलाकार स्कुटर / स्कुल या शब्दांचा उच्चर इ - स्कुटर / इ - स्कुल असा का करतात ?
- अनेक तामिळ भाषिकइंग्रजीत बोलताना वाक्याचं सुरवातीला एक मीच मीच किंवा चं असा काहीसा उच्चार का करतात ?

हिंदी भाषिकाना स पासून सुरू होणारी जोडाक्षरे उच्चारता येत नाहीत. म्हणुन तर इस्टेशन , इस्लो , इस्पिरीट असे उच्चारतात
पंजाबी भाषेत जोडाक्षर हा प्रकारच नाही. त्यामुळे त्यांचे जोडाक्षरयुक्त शब्द सटेशन , सलो, सपरीट , धरमिंदर जितींदर असे येतात.
हिंदी भाषेत अ‍ॅ हा उच्च्चारही लिहीता येत नाही. त्यामुळे लिहीताना देखील ते बैन्क, कैश , मैरीड असे लिहीतात.
तेच गुजराथी भाषिकांची गम्मत वेगळीत. त्यांना ऑ आणि अ‍ॅ हे ओ आणि ए वाटतात. तर ए आणि ओ हे अनुक्रमे अ‍ॅ आणि ऑ असे उच्चारतात.
म्हणजे बेटसमन नी बोल मारला. किंवा चालो स्नेक खावा होल मा.
आणि जॉग फोल मधे पाणीखूप असते.

वामन देशमुख's picture

5 May 2021 - 1:23 pm | वामन देशमुख

गुजराथी भाषिकांची गम्मत वेगळी

बरोबर, "क्रिकेट में सचिन एक नंबर बेटिंग करता है." हा आरोप एखादा गुजरातीच करू शकतो!

वामन देशमुख's picture

5 May 2021 - 1:24 pm | वामन देशमुख

पहीली ओळ हिंदीशी थोडेफार साम्य असणार्‍या एखाद्या परकीय भाषेतील असेल

ही ओळ पर्शिअन (की पेशावरी?) भाषेतील आहे असे मागे एका चर्चेत कुणीतरी सांगितले होते. या भाषेचे हिंदीशी साम्य नाही.

चलत मुसाफिर's picture

14 May 2021 - 4:39 pm | चलत मुसाफिर

'जिहाले मिस्की' हे मूळ काव्य अमीर खुसरोचे आहे. त्यात एक ओळ फारसी व दुसरी ब्रजभाषेत (चू.भू.द्या.घ्या.) अशी बांधणी केलेली आहे. गुलजारने पहिली फारसी ओळ तशीच ठेवून दुसरी ओळ बदललेली आहे.

उत्तर भारतीय शेरोशायरीच्या जगात कवीची एखादी ओळ किंवा कवितेचा मुखडा मुळाबरहुकूम घेऊन पुढची रचना नव्याने लिहिणे याला मूळ रचनेचा सन्मानच समजले जाते. मराठीत मात्र असे कुणी केल्यास साहित्यिक हाणामारी होईल.

सर टोबी's picture

4 May 2021 - 9:51 pm | सर टोबी

आज्जी आणि कुमार १ यांच्या मुळे मिपावर काहीतरी नंदादीपासारखे सौम्य वातावरण अनुभवायला मिळते. या दोघांनी त्यांच्यातले लहान मूल कायम ठेवले आहे. त्यांना सलाम!

आज्जींना काही शब्दांचे अर्थ माहित नसतील हे विस्मयकारक वाटते. पण ते खरे असेल तर माझ्याकडून हि छोटीशी मदत:

  • चिलमन: पडदा; खासकरून मुस्लिम घरात चटई सारखा असतो तो.
  • जुस्तजु: ओढ, ध्यास
  • तहकीकात: तपास
  • तकल्लुफ: तसदी

इनायतचा अर्थ ईर्षा असावा का अशी शंका येते.

अमेरिकन त्रिशंकू's picture

5 May 2021 - 3:14 pm | अमेरिकन त्रिशंकू

इनायत = कृपा

अमेरिकन त्रिशंकू's picture

5 May 2021 - 10:14 pm | अमेरिकन त्रिशंकू

तकल्लुफ: तसदी संकोच

Bhakti's picture

4 May 2021 - 10:02 pm | Bhakti

मस्त खुमासदार लिहलय.
बाकी अवांतर :
Fungi ,Chimera या शब्दान्चे वेगवेगळे उच्चार ऐकताना हसुन हसुन पुरेवाट होते :)

गामा पैलवान's picture

5 May 2021 - 2:17 am | गामा पैलवान

आजी,

लेख खुसखुशीत आहे. बऱ्याचदा किचकट म्हणजे भारी काहीतरी असा गैरसमज आढळून येतो. असो.

इथे अनेकांचा इंग्रजीशी व्यवस्थित परिचय आहे. पण फ्रेंच भाषेचे उच्चर बघितले तर दिसायला रोमन लिपी पण वाचायला फे फे उडते. सध्या हे गाणं ऐकतोय : https://www.youtube.com/watch?v=k93UbIkB2Q0

पहिल्या दोन ओळी :
J'ai pensé qu'il valait mieux ( जे पान्से किल् वाले म्यू )
Nous quitter sans un adieu ( नू किटे सान्स आनादियू )

बोंबला तिच्यायला ! या जन्मी काय फ्रेंच जमणार नाय आपल्याला.

आ.न.,
-गा.पै.

टीप : या धुनेवरनं हिंदीत जब कोई बात बिगड जाये हे असंच सरगमी गीत ( = मेलडी साँग ) काढलं आहे.

चलत मुसाफिर's picture

14 May 2021 - 4:44 pm | चलत मुसाफिर

ते Nous avons quitte sans un adieu असे असावे. अर्थ: आपण निरोप न घेताच गेलो/ निघालो.

मी फ्रेंचच्या चार परीक्षा पास केल्या आहेत. वाचलेले समजते, कामापुरते बोलूही शकेन. पण आजही फ्रेंच सिनेमा, बातम्या वगैरे पाहण्याऐवजी उपशीर्षके वाचत बसावे लागते. संवाद/ बोलणे समजणे जड जाते.

मदनबाण's picture

5 May 2021 - 8:25 am | मदनबाण

आजी तू महिषासुरमर्दिनि स्तोत्र वाचतेस काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja

वामन देशमुख's picture

5 May 2021 - 1:33 pm | वामन देशमुख

आजी, मस्त खुशखुशीत लिहिण्यात तुम्हाला खरंच मिपावर तोड नाही. मस्त वाटले वाचून!

सवांतर: भारतीय उपखंडातील बहुतेक भाषांच्या लिपी ह्या phonetic म्हणजे उच्चारानुरूप असतात हे येथील लोकांचे सुदैवच म्हणावे लागेल. रोमन लिपिआधारित बहुतेक युरोपिअन भाषा या बाबतीत फारच मागासलेल्या आहेत.

इथे "भिद्यादुर्यदुदारदर्दुरदरीदीर्घादरिद्रद्रुमाः।" या बहुधा सर्वाधिक तार्किक अश्या देवनागरी लिपीतील शब्द वाचताना फेफे उडते, तिथे Streichholzschächtelchen, Estadounidense, Inébranlablement या रोमन लिपीतील शब्दांना काय म्हणावे?

त्यावर उपाय म्हणून IPA आधारित एक फोनेटिक लिपी आहे. या लिपीचा आधार घेऊन शब्दकोश रोमन लिपीतील शब्दांचे उच्चार कसे करायचे हे दाखवतात.

बाकी, याबाबतीत रोमन लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषांपैकी, इंग्लिश हीच भाषा सर्वात कमी त्रासदायक आहे, त्याखालोखाल स्पॅनिश (इस्पॅनिऑल). बाकी वर सांगितल्याप्रमाणे फ्रेंच आणि जर्मन (डॉइश) या भाषांतील शब्दोच्चार, रोमन लिपीचा आधार घेऊन समजून घेणे हे सर्वसाधारण मानवाला अवघडच म्हणावे लागेल.

अवांतर: भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेचे नाव इंडियन नसून हिंदी हे आहे. चीनमध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेचे नाव चायनीज नसून काय आहे?

स्मिता.'s picture

6 May 2021 - 3:53 pm | स्मिता.

ज्या भाषेला आपण चाजनीज म्हणतो ती भाषा मॅन्डेरिन (हा पण उच्चार बरोबर आहे की नाही याची खात्री नाही) आहे.

उपयोजक's picture

6 May 2021 - 7:18 pm | उपयोजक

मंत्रीण म्हणजे मंत्र्यांची(राजनैतिक अधिकारी) भाषा या भारतीय संस्कृतोद्भव संदर्भातून बनलेला आहे.

गामा पैलवान's picture

7 May 2021 - 1:52 am | गामा पैलवान

वामन देशमुख,

सवांतर माहितीबद्दल धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

;)
असं जरी नसलं तरी आम्ही तुमच्या लेखांची आवर्जून वाट पाहतो.

आमच्या शाळेत एक व्याख्याते आले होते. ज्ञानेश्वरांनी संस्कृत गीता लोकांच्या रोजच्या भाषेत आणली, हे सांगताना त्यांनी दोन उदाहरणं दिली.
दुग्धशर्करायुक्तशीतघनगोलगट्टू
लोहपथगामिनीअग्निरथमार्गदर्शकविद्युतचलितहरितरक्तवर्णीयपट्टीका

किंवा पुण्यातल्या एका फाईन डाईनच्या मेन्यू मधलं एक वर्णन
Luscious Indian Sweet Dish prepared from whole fried milk balls soaked with sweet syrup.
He कसं भारदस्त वाटतं!

सिरुसेरि's picture

5 May 2021 - 7:00 pm | सिरुसेरि

"बंबईसे आया है बाबू सलोना " असे वाटत होते . असेच ऐकायला आणी समजायला अवघड शब्द म्हणजे - " इफ्तदा ए इश्कमे " , " रंगरेज " ( अंग्रेज सारखा भासणारा हा शब्द मध्यंतरी अनेक गाण्यांमधे वापरला गेला . ) नौशेर्वान ए आदील या अवघड नावाचा चित्रपट आहे ज्यामधील सी. रामचंद्र यांचे संगीत गाजले होते . ( सेम टू शिनशिनाकी बुबलाबु ) . प्रेमनाथ यांच्या "आबे हयात" या अवघड नावाच्या सिनेमातील "मै गरीबोंका दिल हूं , वतनकी जुबां " हे गाणे लक्षात राहिले आहे . दिलिप कुमार यांच्या "ज्वार भाटा" या सिनेमाच्या नावाचा अर्थ समजला नाही .

मराठी_माणूस's picture

5 May 2021 - 7:25 pm | मराठी_माणूस

ज्वार भाटा = भरती ओहोटी

अमेरिकन त्रिशंकू's picture

5 May 2021 - 9:50 pm | अमेरिकन त्रिशंकू

तो शब्द इफ्तदा नसून इब्तदा आहे. अर्थ - सुरूवात

इब्तदा ए इश्क - प्रेमाची सुरुवात

सिरुसेरि's picture

5 May 2021 - 7:05 pm | सिरुसेरि

एक तर्क - रंगरेज या शब्दाचा अर्थ कदाचित रंगारी ( कपडे रंगवणारा ) असावा . ( संदर्भ - पाकिझा मधील "इन्ही लोगोंने ले लीना दुपट्टा मेरा " या गाण्यातील "हमरी ना मानो सैया रंगरजियासे पुछो " हि ओळ . )

सिरुसेरि's picture

5 May 2021 - 7:10 pm | सिरुसेरि

एक शंका - अनेक शास्त्रीय संगीतावर आधारीत चीजांमधे "लंगर" हा शब्द ऐकु येतो . ( जसे की " लंगर मोरी " .) या लंगर शब्दाचा नक्की अर्थ काय असावा ?

कुमार१'s picture

5 May 2021 - 7:11 pm | कुमार१

खुसखुशीत लेख.
...
सर टोबी , धन्यवाद !

अमेरिकन त्रिशंकू's picture

5 May 2021 - 10:10 pm | अमेरिकन त्रिशंकू

रंगरेज - कपडे रंगवणारा
बजजवा - कपड्याचा व्यापारी

सिरुसेरि's picture

6 May 2021 - 5:55 pm | सिरुसेरि

छान माहिती . कदाचित बजजवा या व्यवसायावरुनच पुढे बजाज हे उपनाम प्रचलित झाले असावे .

अमेरिकन त्रिशंकू's picture

6 May 2021 - 8:51 pm | अमेरिकन त्रिशंकू

मूळ शब्द बजाजच आहे. गाण्यात बसवण्याकरता बदलला आहे.
रंगरेज - रंगरज़वा, सिपाही - सिपहिया, बाज़ार - बज़रवा

उपयोजक's picture

6 May 2021 - 7:27 pm | उपयोजक

मय से मीना से ना साकी से
मय से मीना से ना साकी से
ना पैमाने से
दिल है मेरा
आपके आ जाने से
आपके आ जाने से
आपके आ जाने से
आपके आ जाने से

गुल से गुंचों से ना बुलबुल के
गुनगुनाने से

यातल्या ठळक शब्दांचे अर्थ काय आहेत?

तुषार काळभोर's picture

6 May 2021 - 7:53 pm | तुषार काळभोर

मय = मद्य
मिना = मद्य पात्र/सुरई
साकी = पात्रात/चषकात मद्य ओतणारा, पाजणारा.
पैमाना = मद्याचा चषक
गुल = फुल
गुंच = कळी

*गुंच शोधावा लागला. बाकी माहिती होते. एकवचन गुंच असच आहेका, खात्री नाही.

चलत मुसाफिर's picture

14 May 2021 - 4:48 pm | चलत मुसाफिर

'गुंचे लगे है कहने' असे मिथुन चक्रवर्तीच्या एका सुरुवातीच्या चित्रपटात गाणे आहे. यूट्यूबवर उपलब्ध आहे. 'गुच्छ' असा अर्थ तर नसावा?

आंद्रे वडापाव's picture

6 May 2021 - 7:56 pm | आंद्रे वडापाव

मय = दारू
मीना = ग्लास
साकी = बारटेंडर
पैंमाना = "पेग" चे मापटे
गुल = गुलाब
गुंचा = कळी
बुलबुल = एक सुंदर पक्षी

तुषार काळभोर's picture

6 May 2021 - 8:24 pm | तुषार काळभोर

किती ही अरसिकता!

आंद्रे वडापाव's picture

6 May 2021 - 8:28 pm | आंद्रे वडापाव

नाही नाही..
उलट दारू ग्लास वैगरे मटेरिअलिस्टिक जगात कवीचे हृदय रमत नाही..
तर आपल्या प्रियतमेच्या आगमनाच्या शीतल छायेच्या अपेक्षेत, भीषण जगाच्या वणव्यात होरपळून निघालेले त्याचे हृदय तो...

जाऊ देत
:)

उपयोजक's picture

6 May 2021 - 11:05 pm | उपयोजक

धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

7 May 2021 - 12:18 pm | चौथा कोनाडा

गापुची-गापुची गम-गम
किशिकी-किशिकी कम-कम

चा अर्थ काय असावा ?

आंद्रे वडापाव's picture

7 May 2021 - 12:36 pm | आंद्रे वडापाव

टेलेफोनधुनमे हसनेवाली मेलबॉर्न मछली मचलनेवाली
डिजिटलमे सूर है तराशा मॅडोना है या नताशा
झाकीरहुसका तबला तू है क्या ?

याचा अभ्यास करा मग तुम्हाला कळेल ...
:)

कॉमी's picture

7 May 2021 - 1:41 pm | कॉमी

मला वाटलं कायतरी रॅप वैगेरे असेल,
व्हीडो पहिला तर काय कमाल.
गाणे, पोशाख, नृत्य सगळंच अवर्णनीय.
https://youtu.be/EbYfxW6ULGI

चौथा कोनाडा's picture

10 May 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !

जिसमें सुर हैं तराशा
मॅडोना हैं या नताशा
जाकिरहुसेन तबला तू हैं क्या ...
(मनिषा कोयरालाच्या नितंबावर तबला वाजवतो)
लै हसलो या गाण्याला !

सिरुसेरि's picture

7 May 2021 - 7:47 pm | सिरुसेरि

"कुवलय तव मुख तिला , अजि कमला विनवी तुला मला " या ओळीचा अर्थ काय ?

आमचा मित्रपरिवार एखाद्या कन्यकेने त्यांना 'दिल' दिला नाहीतर हेच गाणे म्हणत असे !

"जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश बहाले हिजडा तुम्हारा दिल है !"

भरपूर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

एकामागून एक प्रतिसाद वाचून त्यांना उत्तरे लिहिण्यामुळे काहींना एकाहून अधिक उत्तरे लिहीली असू शकतील.

मराठी माणूस-तुम्ही आणि अनेकांनी विचारलं आहे की शीर्षकाचा अर्थ काय?तर सांगते.

मूळ महिषासुरमर्दिनी स्तोत्रातली ओळ अशी-
"कटितटपीतदुकूलविचित्रमयूखतिरस्कृतचंद्ररुचे"
त्याचा अर्थ जिच्या कमरेच्या कडेला परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या रेशमी वस्त्रातून म्हणजे साडीतून निघणाऱ्या विचित्र म्हणजे रंगीबेरंगी किरणांनी चंद्राच्या तेजाला फिके पाडले आहे,अशा हे महिषासुरमर्दिनी तुझा विजय असो.

चार ओळींच्या श्लोकातली ही पहिली ओळ आहे.

मुक्तविहारी-हो का!

श्रीगुरुजी-नाना? हाहाहा.मलाही असे ऐकू यायचे अधुनमधून.

प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-तुमच्या सविस्तर अभिप्रायाबद्दल धन्यवाद. "लिहिती राहेन"असं आश्वासन देते. तुमचाच दुसरा अभिप्राय"विनामास्क फिरणाऱ्यांना 'भिद्यादुद्यदुदारदर्दुरदरी'हा शब्द २५वेळा म्हणायला लावावा. "हा हा हा.

स्वलिखित-शीर्षक महिषासुरमर्दिनी स्तोत्रातून घेतलंय.सुरुवातीलाच स्पष्ट केलंय.वाचून बघा.

आंद्रे वडापाव-तुमचं उत्तर तुम्हाला मिळाले आहे.

स्वलिखित-आता लक्षात आलंच असेल.

सुक्या-तुमचा अंदाज चुकला. सर्वात वरची ओळ वाचा.

तुषार काळभोर-बरोबर.

शाम भागवत-खरंच.बरोबर.

चौथा कोनाडा-बोबडी वळली?हाहाहा!

टवाळ कार्टा-धन्यवाद.

सतीश गावडे-काय माहीत?उर्दू भाषा आहे.
तुम्हांला कळलाय की अर्थ!

आंद्रे वडापाव-तुम्ही बरोबर अर्थ सांगितला आहे.

गवि-तुमचं निरीक्षण बरोबर.मीही चुकभूल देणे घेणे ,म्हटलेच आहे.

चौकस-तुमचं म्हणणं पटलं.

विजुभाऊ-तुमचं निरीक्षण करेक्ट.

वामन देशमुख-ती ओळ उर्दूत आहे. तुमचा जोक आवडला. हसू आले.

सर टोबी-मदतीबद्दल धन्यवाद.

टोबी, तुम्हाला माझं लिखाण नंदादीपासारखं वाटतं या कौतुकाबद्दल आभार.

अमेरिकन त्रिशंकू-धन्यवाद.अर्थाबद्दल.

Bhakti-"मस्त, खुमासदार शैलीत लिहिलंय"या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

गामा पैलवान-लेखन खुसखुशीत"- आभारी आहे.

मदनबाण-मी महिषासुरमर्दिनी स्तोत्र वाचत नाही. पण मला ते माहीत आहे. त्याचा नाद मला आवडतो.

वामन देशमुख- "खुसखुशीत लिहिण्यात तुम्हाला आणि कुमार १ला मिपावर खरंच तोड नाही."- हा तुमचा अभिप्राय समाधान देणारा. धन्यवाद.

स्मिता-खरंय.

उपयोजक-बरोबर.

तुषार काळभोर-"तुमच्या लेखाची वाट बघत असतो."अभिप्राय वाचून समाधान वाटले.

सिरुसेरी-तुम्हीही काही कठीण आणि गमतीदार शब्द दिलेत. करमणूक झाली. हसू आले.

मराठी माणूस-खरंच.

अमेरिकन त्रिशंकू-बरोबर.

सिरुसेरी-शक्यता आहे. तुमचा तर्क!

कुमार १-धन्यवाद.

अमेरिकन त्रिशंकू-बरोबर. तुमचा अंदाज खरा ठरला.

उपयोजक-आंद्रे वडापाव आणि तुषार काळभोर यांनी तुमच्या शब्दांचे अर्थ सांगितले बघा!

सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

कंजूस- वाचून आनंद. धन्यवाद.

लेख खूप वाचकांनी वाचला.आणि खूप जणांनी प्रतिक्रिया दिल्या. या घसघशीत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार,