चादर ट्रेक - २

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in भटकंती
1 May 2021 - 11:05 pm

चादर ट्रेक १

चादर ट्रेक - २

दिवस पहिला लेह
विमानतळावरून आम्ही गाडीने आमच्या हॉटेलवर पोहचलो. लेह येथे हिवाळ्यात जनजीवन तसे अत्यंत शांत असते. फार कुठे हालचाल दिसत नाही. त्याच शांततेचा अनुभव आम्ही आमच्या राहत्या हॉटेलात घेत होतो. दूरवर डोंगररांगा आणि पोह्यावर शेव पसरावी तसा पसरलेला बर्फ. बूट आणि मौजे काढून बर्फात अनवाणी चालायचा अनुभव घेतला. आतापर्यंत फ्रिजमधला बर्फ हातात घेतला होता पण या बर्फाचा स्पर्श वेगळाच. आपल्या इथल्या थंडीत दातावर दात आपटतात पण तिथे पूर्ण अंग व्हायब्रेट मोडवर गेल्याप्रमाणे थरथरत होत.

1
हॉटेल १

2
हॉटेल २

3
शो ऑफ

आमच्यासाठी एक ट्रेनर बोलावला होता जो आपल्या भारतीय संघासाठी फुटबॉल खेळला होता, त्याने आमच्याकडून काही शारीरिक व्यायाम करून घेतले.

3
स्ट्रेचिंग

पिण्यासाठी आणि बाथरूमसाठी सतत गरम पाणी होते. नाश्त्याला दुधातून कॉर्न फ्लॅक्स आणि गरमागरम पराठे. हॉटेलची जबाबदारी असलेला अब्दुल हा कारगिल भागातून कामासाठी आलेला आणि दुसरा राजबीर हिमाचल प्रदेशातून आलेला. राजबीरने हॉटेल मॅनेजमेंट केलेले परंतु कामासाठी लडाख जवळ केलेले. रूममध्ये एकत्र जमून गप्पांचा फड रंगला, मग कोणी कशी तयारी केली, काय काय खाऊ आणला आहे याची देवाणघेवाण झाली.

वातावरणाशी जुळूवुन घेण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आपण समुद्र किनारी राहणारी माणसे. या अश्या प्रतिकूल वातावरणाचा त्रास हा झालाच आमच्या पैकी काही जणांना ' HIGH ALTITUDE SICKNESS' चा त्रास झालाच. काही जणांना इस्पितळात देखील दाखल करावे लागले. शार्दुल दादाला प्रचंड उलट्या झाल्या, विशाखाला, अविनाशला ऑक्सिजन मास्क लावावा लागला. येथील इस्पितळातील कर्मचारी, डॉक्टर देखील अत्यंत नम्र आणि प्रेमळ यानेच आपण अर्धे अधिक बरे होतो. ते नेहमी हसतमुख आणि आपल्यासारख्या पर्यटकांशी बोलण्यास उत्सुक असतात. कुठेही जायचं असेल तर गाडी बोलवावी लागते आणि दर हा ५०० फिक्स असतो. त्यांना दुसऱ्या दिवशी इस्पितळातून सोडले.

आपण म्हणतो ना 'पहिली रात्र सैतानाची' त्या प्रमाणेच लेह येथील पहिली रात्र खरेच सैतानाची होती. थंडीमुळे आम्हाला नीट झोपही लागत नव्हती आणि श्वास देखील नीट घेता येत नव्हता. विचार करत होतो; कशाला आलोय येथे या जीवघेण्या थंडीत तेव्हा मनातं विचार फक्त भगव्याचा येत होता, शिवाजी महाराजांचा येत होता ध्येय पक्के होते. लेहच्या चादरीवर भगवा फडकवणे, वाटचाल अत्यंत खडतर होती. पहिली रात्र कशीतरी ढकलली.
उद्या लेहच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी बाजारात फेरफटका मारायला जाणार होतो.

दिवस दुसरा लेह

आजचा दिवस होता इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा. नंदू दादाने सांगितल्या प्रमाणे आम्ही जास्त पाणी पित होतोच आणि थंडीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न देखील करत होतो. सकाळीच थोडी स्ट्रेचिंग करून अंग मोकळं केलं, थोड्याफार उड्या आणि पुश अप मारून अंगात ऊर्जा निर्माण करायचा प्रयत्न केला.

नाश्ता करून आम्ही ' शांती स्तूप' या भगवान गौतम बुद्धांच्या देखण्या स्तूपाकडे प्रयाण केले. आमच्या हॉटेल जवळच असल्यामुळे आम्ही चालतच निघालो.

4

5
शांती स्तूपाच्या वाटेवर

अर्थात आम्हाला वातावरणाशी जुळूवुन घेण्यासाठीच तो प्रयत्न होता. काय बघू, किती बघू असं झालं. शांती स्तूप हा बऱ्यापैकी उंचीवर असल्यामुळे लेह शहराचे सुंदर दृश्य दिसत होते.

6
वाटेवरून शांती स्तूपाचे होणारे दर्शन

7

8

दूरवर दिसणाऱ्या डोंगररांगा

9
सहज टाईमपास

10

12
प्रार्थना स्थळ

14

13

15

अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांचे जन्मापासून महानिर्वाणापर्यंत सुंदर शिल्पे येथे कोरलेली आहेत. वरती देहभान हरपून जावी अशी भगवान बुद्धांची सुंदर मूर्ती आहे. ते शांत भाव पाहून मनातले ताण तणाव सगळे दूर पळून गेले.

16
भगवान बुद्ध

17

18

19
भगवान बुद्ध यांचा जन्म

20
दुष्टांवर मिळवलेला विजय

21
भगवान बुद्ध यांचे महापरिनिर्वाण

22

23
शांती स्तूप

25
शांती स्तूपाचा मागच्या बाजूने फोटो काढण्याचा प्रयत्न

26

पॅनोरमा

27
स्तूपाजवळील एक वास्तू

इथून दिसणारा लेह चा आसमंत खरेच सांगत होता जगात कुठे शांतता, प्रेम कुठे असेल तर येथेच आहे येथेच आहे.

28
स्तूपाजवळून दिसणारे लेह शहर

25
स्तूपाच्या मागच्या बाजूने बाजाराकडे जाण्याच्या मार्गावर बनवलेल्या वास्तू

आणि याची प्रचिती आम्हाला लेह शहरात प्रत्येक माणसाला भेटल्यावर त्यांच्या प्रेमळ स्वभावावरून येतच होती. लेह बाजारात फिरताना आमच्या शब्द कोशात 'जुले' अर्थात स्थानिक भाषेत नमस्कार असा होतो याची भर पडली.

26
जागोजागी बांधलेले देखणे प्रार्थना चक्र

27

28

29
जागोजागी मंत्र कोरलेले दगड ठेवलेत

30
बाजारात विकण्यासाठी ठेवलेल्या वस्तू

31
विकण्यासाठी ठेवलेल्या काश्मिरी शाल

32

बाजारातील एका देखण्या वास्तुवरची कलाकुसर

सगळ्यांना 'जुले' करतच आमचा बाजारात फेरफटका मारत गमबुटच्या खरेदीसाठी मिलिटरी वस्तूंच्या दुकानात गेलो. चादर वर चालण्यासाठी लागणारे गमबूट घेतले. आमच्या सोबतच्या पटवर्धन काकांनी मुंबईहून त्यांच्या मित्राचे गमबूट आणले होते ते इथल्या वातावरणात आल्यावर दगडाहून कडक झाले होते, मग त्यांनी सुद्धा नवीन गमबूट आणि एक्स्ट्रा हातमौजांचा जोड घेतला. तिथल्याच एका स्थानिक दुकानात जाऊन जेवलो.

हाताशी वेळ होता मग काय भटके थोडीच शांत बसणार. बाजाराच्या खालच्या अंगाला असलेल्या नाक्यावर जाऊन स्थानिक लोकांना विचारणा केली असता पत्थर साहिब, मॅग्नेटिक हिल ला जात येईल असे कळले. पॅंगॉंग लेकला जाण्याचा रस्ता बर्फामुळे अजून चालू झाला नव्हता.

एक स्थानिक गाडी ठरविली आणि निघालो भटकंतीला.'पत्थर साहिब गुरुद्वारा' येथे गुरु नानक साहेबांनी एका राक्षसाला भक्ती मार्गाची अनुभूती दिली आणि हो खरंच त्या पवित्र वास्तूत आपणही शांत राहून उपासना केली तर आपल्यालाही याचीच प्रचिती येते. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात, गुरु नानकजी सिक्कीम, नेपाळ, तिबेट आणि यारकंद येथे गेले होते आणि त्यानंतर ते श्रीनगरमार्गे पंजाबला परतत होते. परतीच्या प्रवासात, त्यांनी लेहजवळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक आख्यायिका म्हणते की या भागात एक राक्षस राहत होता, लोकांना छळ करीत होता आणि दहशत घालत होता. स्थानिकांना असहाय्य वाटले आणि त्यांनी सर्वशक्तिमान देवाला मुक्तीसाठी प्रार्थना केली; तेव्हा गुरु नानकजी यांनी त्यांची बाजू ऐकली आणि त्यांना त्रासातून वाचवण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या भेटीनंतर, गुरु नानक जी नदीच्या काठावर स्थायिक झाले, त्यांनी लोकांना प्रवचन देऊन आशीर्वाद दिला आणि त्यांच्यामध्ये आशेचे प्रतीक बनले. लोक त्याला नानक लामा म्हणू लागले, यामुळे राक्षसाला राग आला. तो चिडला आणि त्याने गुरु नानकजींना ठार मारण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सकाळी गुरु नानक जी ध्यान करीत असतांना, राक्षसाने त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने डोंगरावरुन एक मोठा दगड ढकलला. दगड उंचावरून घरंगळत येत असल्यामुळे त्याने वेग पकडला आणि तो टेकडीवरुन खाली कोसळला, परंतु जेव्हा त्या दगडाचा गुरु नानकजींना स्पर्श झाला, तेव्हा तो मेणासारखा वितळला आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकाराचा ठसा उमटला. इतके होऊनसुद्धा गुरु नानकजी शांतपणे ध्यानधारणा करीत राहिले. याचा त्या राक्षसाला प्रचंड राग आला त्याने नानकजींना चिरडण्यासाठी पायाने तो दगड ढकलायला सुरुवात केली. पण मेणाप्रमाणे वितळलेल्या दगडावर त्याच्या पायाचा ठसा उमटला. हे पाहून, राक्षसाला लाज वाटली, आणि गुरु नानकांच्या सामर्थ्यवान आणि अध्यात्मिक बुद्धिमत्तेच्या तुलनेत त्याला त्याच्या दुबळेपणाची जाणीव झाली. त्याने गुरूंची क्षमा मागितली. तेव्हा गुरु नानकजींनी राक्षसाला त्याच्या दुष्कृत्यांचा त्याग करण्यास आणि दहशतवादापासून दूर राहून शांततापूर्ण जीवन जगण्यास सांगितले. तेव्हापासून, त्या राक्षसाच्या पावलाच्या ठसा असलेल्या आणि नानकजींची शरीराची छाप असलेल्या मोठ्या दगडांसह ही जागा पवित्र मानली जात आहे. आज येथे गुरुद्वारा उभा आहे, भारतीय सैन्याच्या पंजाब आणि शीख रेजिमेंटद्वारे गुरुद्वारा पथर साहिबची देखभाल केली जाते. शिखांच्या दहाही गुरूंच्या तसबीर आणि त्यांची माहिती गुरुद्वारात लावलेली आहे. आत फोटो काढण्यास मनाई आहे. त्या पवित्र अशा दगडासमोर नतमस्तक झालो.

33
दगडात गुरु नानकजींच्या पाठीच्या बाजूचा आलेला आकार

34
गुरुद्वारा पत्थर साहिब

त्यानंतर आम्ही 'मॅग्नेटिक हिल' हा निसर्गाच्या आणखीन एक आविष्कार पाहिला. चोहो बाजुंनी पर्वताने वेढलेला हा रस्ता. येथे मार्किंग केलेल्या जागी आपली गाडी उभी करून ठेवली तर ती एका विशिष्ट दिशेला ओढली जाते याचे प्रात्यक्षिक पाहिले; मनोमन निसर्गाला नमस्कार करून परतीच्या प्रवासाला लागलो. पुन्हा रात्री हॉटेल मध्ये थंडीचे संकट. तापमान -२८ डिग्री. येथे तुम्हाला ती सहनच करावी लागते. यातच कालचा थकवा त्यामुळे झोप लागलीच परंतु तुटक-तुटक. मग आठवत होते 'पाण्यातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याचे वंशा तेव्हा कळे'. उद्या आमची वैद्यकीय तपासणी होणार होती. चादर ट्रेक करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करावीच लागते, जर तुम्ही त्याच्यात उत्तीर्ण झालात तरच पुढे ट्रेक करता येतो अन्यथा नाही. कितीतरी जण चादर ट्रेकचं स्वप्न घेऊन आलेले वैद्यकीय तपासणीत फिट न ठरल्यामुळे इथून नाईलाजाने परत गेलेत.

जगप्रवासी

क्रमशः

बाजारातून पत्थर साहिब येथे जाईपर्यंत अंधारून आल्यामुळे फोटो काढता आले नाहीत. गुरुद्वारा पत्थर साहिबचे फोटो जालावरून साभार

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

1 May 2021 - 11:47 pm | संजय पाटिल

फोटो दिसत नाहित......

अमर विश्वास's picture

2 May 2021 - 12:09 am | अमर विश्वास

फोटो परत गंडले कि हो ...

कंजूस's picture

2 May 2021 - 4:02 am | कंजूस

Create link केल्यावर
photos dot app dot goo dot gl...
अशी लिंक येते ती उपयोगाची नसते. तो फोटो 'open in new tab' करा. अड्रेस बारमध्ये lh3 dot googleusercontent ...... अशी लिंक दिसत नसेल तर पुन्हा एकदा 'open in new tab' करा आणि
lh3 dot googleusercontent ...... अशी आल्यावर कॉपी करून वापरा.

गॉडजिला's picture

2 May 2021 - 3:59 pm | गॉडजिला

मस्त वर्णन केलयं...

माय फेवरीट.

सौंदाळा's picture

2 May 2021 - 7:32 pm | सौंदाळा

फोटो दिसत नाहीत त्यामुळे रसभंग होतो. लेख छानच

गोरगावलेकर's picture

3 May 2021 - 8:31 am | गोरगावलेकर

फोटो दिसले असते तर अधिक चांगला वाटलाअसता लेख.

Bhakti's picture

3 May 2021 - 10:10 am | Bhakti

छान!

शांती स्तूप हा बऱ्यापैकी उंचीवर असल्यामुळे लेह शरीराचे सुंदर दृश्य दिसत होते. >> जरा भाषा कडे लक्ष द्याल का? शरीर की शहर

नरेन.'s picture

3 May 2021 - 11:48 am | नरेन.

भाषे कडे लक्ष द्याल का?

जगप्रवासी's picture

4 May 2021 - 10:02 am | जगप्रवासी

फोटोकडे लक्ष देताना भाषेकडे दुर्लक्ष झाले. निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. दुरुस्ती करतो.

चौथा कोनाडा's picture

3 May 2021 - 12:32 pm | चौथा कोनाडा

नेहमी प्रमाणे सुंदर भटकंती वर्णन ! फोटो दिसले तर चार चाँद लागतील लेखाला !

जगप्रवासीसाहेब, मदत घ्या ज्येष्ठ मिपाकरांची / समं अन येऊ द्या लवकर फोटो !

कंजूस's picture

3 May 2021 - 1:13 pm | कंजूस

अगोदर "anyone with the link can view the photo"
हे केल्यानंतरच लिंक कॉपी करा.

जगप्रवासी's picture

4 May 2021 - 9:57 am | जगप्रवासी

चेक करतो आणि कंजूस काकांनी सांगितल्या प्रमाणे सेटिंग्ज बदलून बघतो.

कंजूस's picture

4 May 2021 - 10:02 am | कंजूस

तुमच्या डिवाइसात तुम्ही लॉगिन असता त्यामुळे लेख preview केल्यावर तुम्हाला फोटो दिसतात. पण ते इतरांना दिसणार का हे पाहण्यासाठी ते एका एचटीएमेल टेस्टर app मध्ये टाकून पाहावे लागतात.

प्रचेतस's picture

4 May 2021 - 10:06 am | प्रचेतस

गणेशा झालाय.

कंजूस's picture

4 May 2021 - 11:47 am | कंजूस

मी HTML Css. Js. Tester app ( More Share Corp यांचे )) https://play.google.com/store/apps/details?id=com.moreshare.htmlcssjstester )

वापरतो.

जगप्रवासी's picture

4 May 2021 - 8:56 pm | जगप्रवासी

वैयक्तिक व्यनि करतोय

कंजूस's picture

6 May 2021 - 11:54 am | कंजूस

दक्षिण धृवावर गेल्यासारखं वाटतंय.

तरीही
आणि याची प्रचिती आम्हाला लेह शहरात प्रत्येक माणसाला भेटल्यावर त्यांच्या प्रेमळ स्वभावावरून येतच होती. लेह बाजारात फिरताना आमच्या शब्द कोशात 'जुले' अर्थात स्थानिक भाषेत नमस्कार असा होतो याची भर पडली.
या परिच्छेदानंतरचे फोटो आलेले नाहीत.

फोटोंची संख्या पंधरा - वीस ठेवा म्हणजे धागा_ लेख उघडायला अडचण येत नाही.

जगप्रवासी's picture

6 May 2021 - 1:24 pm | जगप्रवासी

तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बाकीचे फोटो अपलोड करेन. सर्व वाचकांचे धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

6 May 2021 - 5:51 pm | चौथा कोनाडा

दिसले, दिसले, दिसले ... काही फुटू दिसले !
अर्थातच सुंदर आहेत ! आता मजा आली वाचताना. इतर फोटो देखिल येऊ द्यात !

छान लेख !!
.. पण अर्ध गणेशा झालाय...फोटो लि॑क्स पुन्हा रिफ्रेश करा प्लिज

फोटो अपलोड केलेत, देवाकडे प्रार्थना कि यावेळेला तरी दिसू देत. याहीवेळेला नाही दिसले तर पुढच्या वेळेपासून फक्त वर्णन नो फोटो.

कामामुळे वेळ मिळत नाहीये. पुढचा धागा लवकरच टंकेन.

एक वेगळा जीमेल वापरून त्याने लॉगिन करून ब्लॉगवर टाका.
ब्लॉगवरचे फोटो दिसतातच. आणि ते इकडे आणणे फारच सोपे आहे कारण ते पब्लिक डोमेनमध्येच असतात.

मुक्त विहारि's picture

15 May 2021 - 3:48 pm | मुक्त विहारि

प्रवास वर्णन आवडले

छान भटकंती वर्णन, निम्मे फोटो दिसले, निम्मे नाही.