५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
2 May 2021 - 9:02 am
गाभा: 

आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 9:06 am | श्रीगुरुजी

सद्यस्थिती -

बंगाल - भाजप ७५, तृणमूल ८७, कॉंग्रेस+ ४
आसाम - भाजप+ २६, कॉंग्रेस+ ४
पुदुच्चेरी - भाजप+ ५, कॉंग्रेस+ ४
केरळ - भाजप ३, कॉंग्रेस+ ५७, डावे+ ८०
तामिळनाडू - अद्रमुक+ ३२, द्रमुक+ ४२

रात्रीचे चांदणे's picture

2 May 2021 - 9:07 am | रात्रीचे चांदणे

मतमोजणीचे टेबल्स कमी असल्यामुळे निकाल यायला उशीर लागण्याची चिन्हे आहेत. पोस्टल मतांमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर.

प्रसाद_१९८२'s picture

2 May 2021 - 10:04 am | प्रसाद_१९८२

तृणमूल भाजापापेक्षा दहा जागांनी पुढे आहे. आसाममधे परत भाजपा सरकार येणार असे दिसते.
नंदिग्राम मधे ममताबानो ८००० मतांनी पिछाडीवर आहे.

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 10:20 am | श्रीगुरुजी

सद्यस्थिती -

बंगाल - भाजप १०४ तृणमूल १८२, कॉंग्रेस+ ६
आसाम - भाजप+ ७०, कॉंग्रेस+ ३९
पुदुच्चेरी - भाजप+ ९ , कॉंग्रेस+ ५
केरळ - भाजप २ , कॉंग्रेस+ ९९ , डावे+ ८९
तामिळनाडू - अद्रमुक+ ९८ , द्रमुक+ १३२

- पंढरपूर - भालके (राष्ट्रवादी) १७४१२, औताडे (भाजप) १७२१८

- ममता ७२८७ मतांनी मागे

- अंदाजापेक्षा तामिळनाडूत अद्रमुकची चांगली कामगिरी

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 10:42 am | श्रीगुरुजी

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक -

मंगल आवडी (भाजप) - ७०,८१३
सतीश जारकीहोळी (कॉंग्रेस) - ६७,४९३
शुभम शेळके (शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समिती पुरस्कृत) - १९,२८९

संजय राऊतने शेळकेंसाठी बेळगावात सभा घेऊन भाजपला सडकून शिव्या घातल्या होत्या. शेळके जिंकणारच अशी व्याघ्रगर्जना केली होती. परंतु शेळके खूपच मागे पडलेले दिसताहेत.

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 10:42 am | श्रीगुरुजी

- पंढरपूर - भालके (राष्ट्रवादी) २१,३३४, औताडे (भाजप) २३,५००

धनावडे's picture

2 May 2021 - 12:00 pm | धनावडे

आसाम सोडून बाकी सगळ्या EVM ठीक आहेत.

मुक्त विहारि's picture

2 May 2021 - 12:27 pm | मुक्त विहारि

परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे शिष्यगण, असेच म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही....

शाम भागवत's picture

2 May 2021 - 12:45 pm | शाम भागवत

19 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 892 मतांनी आघाडीवर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 19 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 892 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 55559
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 54664

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 1:08 pm | श्रीगुरुजी

औताडे ६,०५६ मतांनी आघाडीवर

ममता १,५०० मतांनी आघाडीवर

पंढरपूरातील ही चौविसावी फेरी होती. अजून किती बाकी आहेत, ते काही माहीत नाही.

नावातकायआहे's picture

2 May 2021 - 2:03 pm | नावातकायआहे

एकुण ३८

शाम भागवत's picture

2 May 2021 - 2:14 pm | शाम भागवत

🙏

नावातकायआहे's picture

2 May 2021 - 1:50 pm | नावातकायआहे

दिदी जोरात. मोदी आणि शहा पराभूत!

आवताडे ६६३२ मतांनी आघाडीवर.

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 1:52 pm | श्रीगुरुजी

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक -

मंगल आवडी (भाजप) - २,३७,११६
सतीश जारकीहोळी (कॉंग्रेस) - २,४७,०६२
शुभम शेळके (शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समिती पुरस्कृत) - ८१,७७१

रमेश आठवले's picture

2 May 2021 - 9:40 pm | रमेश आठवले

मागच्या विधानसभा निवणुकी बंगाल मध्ये तीन जागा आणि २०२१ मध्ये ८० च्या जवळपास. याला पराभव म्हणता का तुम्ही ?

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 7:12 am | मुक्त विहारि

समजावून सांगण्यात अर्थ नाही ...

शाम भागवत's picture

2 May 2021 - 1:55 pm | शाम भागवत

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 28 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 7003 मतांनी आघाडीवर

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 2:03 pm | श्रीगुरुजी

सद्यस्थिती -

बंगाल - भाजप ८१, तृणमूल २०७ कॉंग्रेस+ २
आसाम - भाजप+ ८१, कॉंग्रेस+ ४५
पुदुच्चेरी - भाजप+ ८, कॉंग्रेस+ ३
केरळ - भाजप १, कॉंग्रेस+ ४१, डावे+ ९८
तामिळनाडू - अद्रमुक+ ८७, द्रमुक+ १४६

- पंढरपूर - भालके (राष्ट्रवादी) ८२,१२७, औताडे (भाजप) ८९,०३७

पंढरपूरात मतमोजणीच्या ३० फेऱ्या पूर्ण झाल्यात. अजून १० फेऱ्या व १५,००० मते मोजायची शिल्लक आहेत. औताडेंचा विजय जवळपास नक्की झालाय.

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 2:10 pm | श्रीगुरुजी

बंगाल विधानसभा निवडणुकीचे सर्व संस्थांंचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज संपूर्ण चुकलेले दिसतात. ममता २०१६ पेक्षा (२०४) जास्त जागा जिंकताना दिसते (२०७). भाजपचा विजयरथ ८१ वरच रूतलाय. भाजप १०० च्या पुढे जाणार नाही हे प्रशांत किशोरांचे भाकीत खरे ठरताना दिसतंय. २०१६ मध्ये कॉंग्रेस (४४) व डावे (४२) यांनी एकत्रित ८६ जागा जिंकल्या होत्या. २०२१ मध्ये त्यांना फक्त २ जागा मिळताहेत. एकंदरीत बंगालमध्ये भाजपचा मोठा अपेक्षाभंग होतोय.

गॉडजिला's picture

2 May 2021 - 4:02 pm | गॉडजिला

भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 2:40 pm | श्रीगुरुजी

ममता पुन्हा ३,५०० मतांनी मागे

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 3:00 pm | श्रीगुरुजी

इतर पोटनिवडणुकींचे निकाल -

- तिरूपती (लोकसभा): मड्डीला गुरूमूर्ती (वाय एस आर कॉंग्रेस) तेलगू देसम उमेदवारापेक्षा २,०६,०९५ मतांनी पुढे

- सॉल्ट (उत्तराखंड विधानसभा): भाजपचे महेश जीना १२२५ मतांनी पुढे

- नागार्जुन सागर (आंध्र प्रदेश): नोमुला भगत (तेलंगणा राष्ट्रीय समिती) १०,२८९ मतांनी पुढे

- राजस्थान विधानसभा पोटनिवडणुक: ३ पैकी २ जागांवर कॉंग्रेस व १ जागेवर भाजप पुढे

- मिझोराम: मिझो नॅशनल फ्रंटचा उमेदवार २९५० मतांनी पुढे

- दमोह (मध्य प्रदेश): कॉंग्रेसचे अजय टंडन भाजपपेक्षा २६०७ मतांनी पुढे

- कर्नाटक विधानसभा: १ जागेवर भाजप व १ जागेवर कॉंग्रेस पुढे

- मधूपूर (झारखंड): झामुमोचा उमेदवार ४६०७ मतांनी पुढे

- मोरवा (गुजरात): भाजप उमेदवार ८६८० मतांनी पुढे

- मल्लपुरम (केरळ लोकसभा): मुस्लिम लीग ६१,४२२ मतांनी पुढे

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 3:01 pm | श्रीगुरुजी

ममता १००० मतांनी मागे

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 3:08 pm | श्रीगुरुजी

ममता ४,५०० मतांनी मागे

शाम भागवत's picture

2 May 2021 - 3:14 pm | शाम भागवत

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 34 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 3:20 pm | श्रीगुरुजी

ममता पुन्हा १९०० मतांनी पुढे

रात्रीचे चांदणे's picture

2 May 2021 - 3:30 pm | रात्रीचे चांदणे

पश्चिम बंगाल मधील कूच बेहर येथील भाजपा कार्यालयाची आणि उमेदवार मिहीर गोस्वामी यांच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

शाम भागवत's picture

2 May 2021 - 3:37 pm | शाम भागवत

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 35 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4395 मतांनी आघाडीवर

रात्रीचे चांदणे's picture

2 May 2021 - 3:44 pm | रात्रीचे चांदणे

36 व्या फेरी अखेर भाजपाचे समाधान आवताडे 4102 मतांनी आघाडीवर

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 3:50 pm | श्रीगुरुजी

ममता ६ मतांनी मागे

प्रसाद_१९८२'s picture

2 May 2021 - 4:20 pm | प्रसाद_१९८२

बंगाल मधे भाजपाचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे.
निवडणुकी पूर्वी अमित शहांसहित भाजपाच्या इतर नेत्यांनी २०० + जागा निवडुन येतील अश्या ज्या बाता मारल्या होत्या त्यांच्या निम्म्या जागा देखील त्यांना निवडुन आणता आल्या नाहीत. 'दो मई, दिदी गयी' या सारखी विधाने करुन पंतप्रधान मोदींनी बंगाल निवडणुकीला इतकी प्रतिष्ठेची करुन ठेवली की आता तीच वक्तव्ये त्यांच्यावर उलटली. उद्या नॉटी संपादकाचा हग्रलेख लिहिताना भलताच चेव चढणार आहे.

आजानुकर्ण's picture

2 May 2021 - 7:27 pm | आजानुकर्ण

१९८२,

थर्ड वर्ल्ड देशातल्या निवडणुकीवर तुमचे भलते लक्ष ब्वॉ... हग्रलेखाची अगदी मिटक्या मारत, जिभल्या चाटत वाट पाहताय वाटतं. बाकी इंग्लंडची राणी काय म्हणते?

आजचे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहून वाटतंय, बांगला हिंदूंचा १९ जानेवारी १९९० हा दिवस २०३० च्या आधी येतो का नंतर हे आता पाहायचे. तोपर्यंत, काश्मिरातल्या गिरीजा टिंकूसारखाच अनुभव, बंगालातील असंख्य काफिर महिलांनादेखील येईल. अर्थात, देशाचे सेक्युलर फॅब्रिक टिकवण्यासाठी हे आवश्यकच आहे, नाही का?

आजानुकर्ण's picture

2 May 2021 - 7:35 pm | आजानुकर्ण

अहो असंख्य काफिर महिलांपैकीच एक काफिर महिला राज्याची मुख्यमंत्री होतेय... यापेक्षा आणखी काय हवं... हिंदू धर्म भारतीय जुमला पार्टीला आंदण दिलाय की काय

कॉमी's picture

2 May 2021 - 8:33 pm | कॉमी

भाजपचे तेवढेच हिंदू बाकी सगळे मुसलमानच, या आयडी साठी. कुठे पण कायपण करून हिंदू मुस्लिम जोडून आपले एक्सपर्ट टॉक्सिन द्यायचे.

अभ्यास वाढावा ,

आजानुकर्ण's picture

2 May 2021 - 10:23 pm | आजानुकर्ण

स्वलिखित प्रतिसाद द्यायला जमत नाही तर किमान आयडी तरी बदला. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा.

स्वलिखित's picture

3 May 2021 - 6:54 am | स्वलिखित

अभ्यास वाढावा

अपेक्षेप्रमाणे, तृणमूलच्या शांतीप्रिय गुंडांनी जाळपोळ सुरु केली आहे.

टिवटिव एक, टिवटिव दोन आणि ही बातमी.

आणि आता चक्क भाजप कार्यकर्त्याचा खून!

प्रभू श्री राम बंगालातील भाजप कार्यकर्ते, रास्वसं स्वयंसेवकांचे रक्षण करो.

गजवा ए हिंद होईल का?

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 4:44 pm | श्रीगुरुजी

ममता १,२०० मतांनी विजयी

आग्या१९९०'s picture

2 May 2021 - 4:45 pm | आग्या१९९०

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी १२०० मतांनी जिकल्या.

केरळ मध्ये पिनरई विजयन आणि LDF यांचे मोठे यश, मागच्या वेळेपेक्षा ८ जागा जास्त घेऊन जनतेचा विश्वास अजून आहे हे दिसले. आत्ता भाजपाची एकही लीड नाही दिसत.

बंगालमध्ये काँग्रेस आणि लेफ्ट भुईसपाट. त्रिनमूल आणि ममता यांचा मोठ्ठा विजय. पेला होबे.

आसाम मध्ये भाजपावर विश्वास कायम.

आग्या१९९०'s picture

2 May 2021 - 4:50 pm | आग्या१९९०

बदाढी ओ बदाढी

चंद्रसूर्यकुमार यांचे विश्लेषण वाचायला आवडेल

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 5:18 pm | श्रीगुरुजी

औताडे ३,७१६ मतांनी विजयी

या निकालांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतील याविषयी लिहितो.

काँग्रेसचा या निवडणुकांमध्ये पुरता पराभव झालेला दिसतो. आसामात बी.पी.एफ या भाजप आघाडीपासून दुरावलेल्या पक्षाला एकत्र घेऊन आणि बद्रुद्दिन अजमलच्या ए.आय.यु.डी.एफ पक्षाला बरोबर घेऊनही भाजपला सत्तेतून हुसकावणे काँग्रेसला शक्य झालेले दिसत नाही. केरळमध्ये एकदा डावे आणि एकदा काँग्रेस हा कल गेल्या अनेक वर्षांपासून होता. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीने केरळमधील २० पैकी १९ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. स्वतः राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेवर निवडून गेले होते. तरीही विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र डाव्या आघाडीने आरामात विजय मिळवलेला दिसतो. बंगालमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे तर तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या कृपेने १५ च्या आसपास जागा मिळतील. काँग्रेसच्या या निराशाजनक कामगिरीचा पक्षावर आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर नक्की काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल वगैरे २३ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असे पत्र लिहून गांधी कुटुंबियांविरूध्द क्षीण का होईना आवाज उठवला होता. राहुल गांधींमध्ये निवडणुक जिंकून द्यायची कुवत नाही हे गेल्या काही वर्षात सिध्द झाले आहेच. ते परत एकदा अधोरेखित झाल्यानंतर या २३ नेत्यांसह अन्य काही नेते गांधी घराण्याला आव्हान देणार का हा प्रश्न कळीचा ठरेल. यातून काँग्रेसमध्ये फूट वगैरे काही पडणार नाही. काही नेत्यांना पक्षातून काढणे किंवा त्यांचे जाणीवपूर्वक महत्व कमी करणे हे प्रकार होऊ शकतील. आतापर्यंत अनेक नेते काँग्रेसमधून बाहेर पडले पण तरीही पक्षावर त्यांच्या जाण्याचा फार परिणाम झाला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आताइतका काँग्रेस पक्ष कधीच कमकुवत नव्हता. तेव्हा असे प्रकार होणे पक्षाला परवडणारे नाही.

ममतांनी बंगाल तिसर्‍यांदा जिंकला आहे. या विजयानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे आणायच्या हालचाली सुरू होतील ही शक्यता आहे. तृणमूलला युपीए मध्ये घेऊन ममतांना युपीएचा चेहरा (पर्यायाने पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार) बनविणे हा एक पर्याय असेल किंवा काँग्रेस सोडून इतर प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी (१९९० च्या दशकात झाली होती त्याप्रमाणे) करून त्याचे नेतृत्व ममतांकडे देणे हा दुसरा पर्याय असेल. या प्रस्तावित आघाडीत जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, अखिलेश यादव, केजरीवाल, हेमंत सोरेन, कदाचित नवीन पटनायक हे नेते जाऊ शकतील.

या दोन पैकी काय होईल (की काहीच होणार नाही) हे येणारा काळच ठरवेल. मात्र या घडामोडीचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल हे बघणे रोचक ठरेल. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे मतदार विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये फरक करत असतो. लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान निवडायचा असल्याने लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांना फायदा होतो. याची अनेक उदाहरणे आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुक झाली. त्यात ११९ पैकी विधानसभेची अवघी एक जागा भाजपला मिळाली होती. पण त्यानंतरच पाच महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील लोकसभेच्या १७ पैकी ४ जागा भाजपने जिंकल्या. डिसेंबर २०१८ मध्ये भाजपचा मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्येही पराभव झाला होता. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र या राज्यांमधील एकूण ६५ पैकी ६२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी हा निकष ठेवला असता तर अर्थातच तितक्या जागा भाजपला जिंकता आल्या नसत्या. हे का झाले? कारण लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रात कोण सरकार स्थापन करू शकेल या मुद्द्यावर लोकांनी मते दिले आणि तिथे मोदींचे पारडे आपोआप जड झाले. अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आता विधानसभा निवडणुक झालेल्या चारपैकी तीन राज्यातील मुख्यमंत्री बर्‍यापैकी लोकप्रिय होते- किमान त्यांना स्वतःचा जनाधार राज्यात होता. तामिळनाडूच्या पलानीस्वामींना तसा फार जनाधार होता असे वाटत नाही पण इतर तीन मुख्यमंत्र्यांना नक्कीच जनाधार होता. बंगालमध्ये ममतांना आव्हान द्यायचे तर भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार होते? बोंब तिथे होती. आसामातही तरूण गोगोई गेल्यानंतर काँग्रेसकडे तसा लोकप्रिय चेहरा राहिला नाही. तेव्हा सरबानंद सोनोवाल या लोकप्रिय मुख्यमंत्र्याला आव्हान काँग्रेसकडून कोण देणार? प्रश्न तिथे होता. केरळमध्ये काँग्रेसकडील रमेश चेनिथल्ला आणि ओम्मेन चंडी हे चेहरे विजयन यांना पुरे पडू शकले नाहीत.

आता हेच चित्र राष्ट्रीय पातळीवर नेले की २०२४ मध्ये मोदींना आव्हान द्यायला काँग्रेस सशक्त असणे किती गरजेचे आहे हे समजेल. मोदी लोकप्रिय आहेत, मोदींना भरपूर जनाधार आहे यात काही वाद असायचे कारणच नाही. अशा लोकप्रिय मोदींना आव्हान द्यायचे असेल तर अखिल भारतीय पातळीवर लोकप्रिय (किमान ओळखीचा) चेहरा तरी विरोधी पक्षांनी पुढे आणणे गरजेचे आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव होऊनही काँग्रेसला पूर्ण देशात जवळपास १२ कोटी मते होती. हा आकडा खूप मोठा आहे. विरोधी पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला त्या खालोखाल अडीच कोटी मते होती. तेव्हा २०२४ मध्ये काँग्रेसकडून मोदींना आव्हान देणारा कोणता चेहरा पुढे आला तर पक्षाचे राष्ट्रीय अस्तित्व या कारणाने फायदा होऊ शकेल. ममता बॅनर्जी बंगालमध्ये कितीही लोकप्रिय असल्या तरी हिंदी भाषिक राज्ये, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक वगैरे राज्यांमधून 'मला पंतप्रधान करा' या आधारावर मते फिरवायची ताकद त्यांच्यामध्ये आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. अर्थात कोणी म्हणू शकेल की २०१४ मध्ये मोदींविषयीही असेच बोलले जात होते. पण त्यापूर्वीची १० वर्षे युपीएची अत्यंत निराशाजनक कामगिरी असलेले सरकार आणि प्रचंड प्रमाणावर प्रस्थापितविरोधी लाट त्यावेळी होती आणि भाजप कार्यकर्ते-संघ स्वयंसेवक यांची फौज त्यांच्या दिमतीला होती. मोदींचा कारभार अगदी युपीए सरकार इतकाच किंवा त्यापेक्षा जास्त भोंगळ आहे हा विरोधकांचा मुद्दा मान्य केला तरी ममता इतर राज्यांमध्ये मते फिरवू शकतील का हा प्रश्न हा एक कळीचा मुद्दा आहे.

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 6:29 pm | श्रीगुरुजी

काँग्रेसच्या या निराशाजनक कामगिरीचा पक्षावर आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर नक्की काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

पक्षावर व राष्ट्रीय राजकारणावर अत्यल्प परीणाम होईल कारण कॉंग्रेसमध्ये आता गांधी वगळता कोणताही नेता शिल्लक नाही. त्यामुळे गांधीऐवजी दुसरे आडनाव असलेला नेता पक्षाध्यक्ष होणे अशक्य आहे. नाराज असलेल्या २३ नेत्यांपैकी कोणत्याही नेत्यात पक्षाध्यक्ष होण्याची कुवत नाही, बहुसंख्य वयस्कर आहेत आणि बहुतेकांना जनाधार नाही. यातील काही जण पुन्हा एकदा पत्र वगैरे लिहून नाराजीचा सूर लावतील, परंतु यातील कोणीही पक्ष सोडणार नाही.

फार तर राहुलऐवजी प्रियंका इतकाच बदल होऊ शकतो. परंतु उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल अशा राज्यात प्रियंकाने जोरदार प्रचार करूनही तेथे कॉंग्रेसची पाटी जवळपास कोरी राहिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची जराजर्जर अवस्था कायम राहील.

कॉंग्रेस सत्तेत असलेल्या पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री वयस्कर आहेत. त्यातल्या त्यात पंजाबच्या अमरिंदर सिंह यांचीच कामगिरी बरी आहे. जर कॉंग्रेस सत्तेत असलेल्या एखाद्या राज्यात कॉंग्रेसने तुलनेने तरूण मुख्यमंत्री निवडला व त्याने राज्यात खूप चांगले काम केले तर भविष्यात त्याला राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पुढे आणता येईल (जसे भाजपने २०१३ मध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह वगैरे जुने नेते बाजूला करून मोदींना पुढे आणले).

या प्रस्तावित आघाडीत जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, अखिलेश यादव, केजरीवाल, हेमंत सोरेन, कदाचित नवीन पटनायक हे नेते जाऊ शकतील.

हे सर्व नेते, तसेच पवार, ममता, नितीश कुमार इ. ना स्वतःच्या राज्याबाहेर स्थान नाही. मुळात हे सर्व एकत्र येऊन आपल्यातील कोणीतरी एखादा/दी कर्णधार म्हणून मान्य करणे अशक्य आहे. अशा कडबोळ्यावर जनता फारसा विश्वास ठेवत नाही व असे कडबोळे फारच थोडा कळ एकसंध राहते हे १९७७ पासून अनेकदा दिसले आहे.

अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे.

+ १

भाजपने काही अत्यंत गंभीर घोडचुका केल्या तरच २०२४ किंवा त्यानंतर भाजपची घसरण होऊ शकते.

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 7:49 pm | श्रीगुरुजी

कॉंग्रेसने तृणमूल कॉंग्रेस आपल्यात विलीन करून ममताला पक्षाध्यक्ष केले, तर कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर एक विजयी चेहरा व मोदींना पर्याय देता येईल. जगनमोहन रेड्डींंना सुद्धा पुन्हा पक्षात आणले पाहिजे.

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 6:12 am | चौकस२१२

अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे.
हे जरी खरे असले तरी गुरुजी मनात एक धास्ती आहे
ती म्हणजे भारतीय समाज कधी कोणाला डोकयावर घेईल आणि कधी कोणाला पायाखाली हे सांगता येत नाही !

आणीबाणी संपली .. परत इंदिराजींना राक्षसी मतदान
इंदिराजी गेलया लगेच राजीव ना राक्षसी बहुमत
मोदी म्हून माझे मत पक्षाला.. पक्षाची धोरणे काय ? काही बघायचे नाही ! उद्या मोदी नसले तर पक्षाला खाली आपटणार !
हि कसली परिपकव लोकशाही .. भावनात्मक मतदान नुसतं आणि त्यात मग बाकीचे रंग तर आहेतच

एकीकडे म्हण्याचे "जगातील सर्वात मोठ्ठी लोकशाही " आणि साधे २ तुल्यबळ राष्ट्रीय पक्ष पण होऊ द्यायचे नाहीत
मी प्राथर्ना करतो कि हि स्थानिक बुजगावणी बंद पडून काँग्रेस परत सबळ होऊ दे

आनन्दा's picture

4 May 2021 - 9:13 am | आनन्दा

सम्पुर्णपणे सहमत.

पिनाक's picture

4 May 2021 - 9:16 am | पिनाक

+1

काँग्रेस पार्टी (वजा गांधी घराणे) हा पर्याय पेपर वर तरी इतका वाईट नाही. ममता, उद्धव आणि तत्सम entities यांना संपूर्ण भारताचा विचार करण्याचा पोच पण नाही आणि तेवढी कुवत ही नाही. पण दुर्दैवाने जेव्हा काँग्रेस चे सध्याचे नेते तोंड उघडतात, तेव्हा त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक संपदे बाबतीत प्रश्न निर्माण होतो (उदाहरणार्थ, नाना पटोले कालच म्हणाले की केंद्र सरकारने पुनावाला यांना Y security त्यांची रेकी करण्यासाठी दिली आहे).

श्रीगुरुजी's picture

4 May 2021 - 9:46 am | श्रीगुरुजी

मुळात जनता पक्ष हीच ५ पक्षांची खिचडी होती व ते स्वकर्तुत्वाने सत्तेत न येता इंदिरा गांधींवरील जनतेच्या रागामुळे सत्तेत आले होते. जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच मोरारजी, चरणसिंग व जगजीवन राम या वरीष्ठ नेत्यांमध्ये पंतप्रधान पदावरून धुसफूस सुरू होती. आपल्या अडीच वर्षांच्या काळात महागाई नियंत्रण हे एकमेव चांगले काम त्या सरकारने केले होते. त्यांनी इतर सर्व वेळ इंदिरा गांधीना तुरूंगात डांबणे, सूड उगविणे यात वाया घालविला. आपण या सरकारचे बळी आहोत ही प्रतिमा इंदिरा गांधींनी कौशल्याने उभी करून सहानुभूती मिळविली होती. साधारणपणे अशीच प्रतिमा मोदींनी २००४-२००१४ या काळात व या निवडणुकीत ममतांनी उभी करून फायदा मिळविला होता. जनतेची सहानुभूती, आपापसातील भांडणे व शेवटी पक्षविभाजन यामुळे इंदिरा गांधी १९८० मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत परतल्या होत्या.

एखाद्या अनुभवी कामगारावर राग म्हणून त्याला काढून त्याचे काम अननुभवी कामगाराला द्यावे व ते त्याला न जमल्याने अनुभवी कामगाराला पगारवाढ देऊन परत बोलवावे असे या बाबतीत झाले होते.

राजीव गांधींना फक्त सहानुभूतीचाच प्रचंड फायदा झाला होता.

त्या काळात समाजमाध्यमे, आंतरजाल वगैरे नव्हते हे अजून एक महत्त्वाचे कारण.

भाजप फक्त एका व्यक्तीवर अवलंबून नाही व पक्षात तशी भांडणे नाहीत. तसेच समाजमाध्यमे, आंतरजाल यामुळे मिळालेल्या माहितीतून जनता योग्य पर्याय निवडू शकते. त्यामुळे मोदींनंतर जनता लगेच कॉंग्रेसला परत आणेल असे नाही व भाजपलाही सत्तेत कायम ठेवेल असेही नाही.

खेडूत's picture

2 May 2021 - 6:38 pm | खेडूत

छान विश्लेषण! धन्यवाद!

आता मार्च २०२२ ला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर, तसेच नंतर गुजरात, हिमाचल आणि २०२३ ला कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कांही लहान राज्ये- इतक्या निवडणुका पुढच्या लोकसभेआधी आहेत.
आपण म्हणल्याप्रमाणे या विधानसभा निवडणुकांत कसेही लागले तरी राष्ट्रीय पातळीवर सक्षम विरोधक सध्या तरी दिसत नाही.

आजानुकर्ण's picture

2 May 2021 - 7:31 pm | आजानुकर्ण

अगदी दोनच दिवसांपूर्वी तुमचं विश्लेषण वेगळं होतं. भाजपाच्या विजयाची खात्री असल्याने इलेक्शन कमिशनबाबत इतर पक्ष थयथयाट करत आहेत असं तुमचं मत दिसलं. यातही भाजपाचं काय चुकलं याच्या आत्मपरिक्षणापेक्षा मरणासन्न कॉँग्रेस कसा आडवा झालाय वगैरे आपटाआपटी चालू आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2021 - 5:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मतदारांनी विद्यमान आदरणीय पंतप्रधान, आदरणीय गृहमंत्री, केंद्रीय मंत्रीमंडळ, समस्त भाजपा आमदार, खासदार, समस्त कलाकार, प्रशासनातील सर्व व्यवस्था, निवडणूक आयोग यांची काही तरी इज्जत म्हणून, एवढ्याशा जागांसाठी ज्यांनी संपूर्ण देश आणि शिष्टीम करोना काळात वेठीस धरलेली होती, म्हणून आपण बंगालवासियांनी ज्या शीटंस निवडून दिल्या. जवळपास तीनाच्या सत्तावीस पटीने अधिक संख्या आहे, त्याचं समाधान आहे. आभार.

तुर्तास इतकेच. बाकी चालु द्या.

-दिलीप बिरुटे

आजानुकर्ण's picture

2 May 2021 - 7:33 pm | आजानुकर्ण

माझे मत भाजपा निवडून यावा असे होते. किमान त्यानंतर तरी रंगा-बिल्ला आपले निवडणुकीचे राजकारण बाजूला ठेवून करोनाचा मुकाबला करण्याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा होती. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2021 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे मत भाजपा निवडून यावा असे होते.

काय करणार, हे बंगाली लोक जादुगार निघाले. बंगाली जादू तशी प्रसिद्धच आहे. बंगालसाठी सेठ लोकांनी काय नै केलं. अच्छे दिनाचे निमंत्रण दिलं, बंगाल सोडून सर्व देश कसा सुजलाम सुफलाम आहे ते सांगितलं. बंगालसाठी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर बनले, बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य रणसंग्रामात सत्याग्रह केल्याची आठवण जनतेला करुन दिली. बांग्लादेशाला लशी पुरवल्या. चोवीस बाय सात, देशाची अहोरात्र सेवा चालू असतांना ते सोडून करोना काळात आंतरराष्ट्रीय बदनामी झाली तरी त्याला फाट्यावर मारुन प्रचार केला. टीव्हीवर येऊन दोनशेपेक्षा जास्त शीट्स निवडून येऊन आम्ही सरकार स्थापन करु अशा गप्पा मारल्या. एवढं खोटं बोलायची ताकद येते कोठून येते तेच कळत नाही. टाइम्स नाऊच्या मुलाखतीत तर आदरणीय गृहमंत्र्यांचा आव तर असा होता की २९२ पैकी ३०० जागा निवडून येतील, असे ते अविर्भाव होते. कसं जमतं इतकं बाता मारायला देव जाणे. पण योग्यवेळी जनतेने नीट धडा दिला.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 5:34 am | चौकस२१२

सकाळ मधील ब्रिटिश नंदी... तो निदान विनोदी तरी लिहितो यांना सगळंच काळ बेर दिसंत
एक प्राध्यापक आणि विचारवंत नागरिक म्हणून हे तरी कबुल करा कि ज्या पक्षाची निशाणी सुद्धा नवहती त्या पक्षाने ३ चे ७७ केले ! आणि ते सुद्धा बंगाल मध्ये .. एकवेळ पंजाब मध्ये शिखानची मने जिकून भाजप न सत्ता मिळवली तर आशचर्य वाटणार नाही पण बंगाल , गोवा आणि केरळ मध्ये पुढे कदाचित हे भाजपने करून दाखवले तर त्यांची दखल (कुठले हि रडगाणे न गाता ) दाखवण्याचा तरी मनाचा मोठेपणं दाखवा !
तो दिन कधी येईल असे वाटत नाही ( म्हणजे प्राध्यापकांनी भाजपने काही तरी "बरे केले" हे म्हणण्याचा दिवस!) एक विनंती
बाकी सकारात्मक टीका चालू असदुद्दे .. आणीबाणी नाहीये त्यामुळे बोलण्यास मुभा आहे

तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि विखारी वाटते.
बाकी चालू द्या.

प्रचेतस's picture

4 May 2021 - 9:45 am | प्रचेतस

नंदीवरील नाही तर प्राध्यापकांवरील टिकेबाबत म्हणतोय.
असो.

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 11:19 am | चौकस२१२

हो कळलं .. मी त्यांच्या लिखाणाला आणि लिखाणातील कोडगेपणा ला ब्रिटिश नंदीचीच उपमा देतोय पण निदान ब्रिटिश नंदी चे लिखाण मनोरंजक तरी असते एकांगी असले तरी .. येथे तर फक्त थाळी कुचेष्टा आणि सगळी कडे एकाच एक द्वेष

तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि विखारी वाटते.
मी तुमच्या अत्यंत सहमत आहे. त्यपेक्शा चौकसजींनी हाच निशाणा मोदींवर साधायला पाहिजे होता म्हणजे त्याला माझ्या नजरेत तरी विचारधन समजले गेले असते.

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 1:48 pm | चौकस२१२

मी मोदींचा समर्थक आहे हे गृहीत धरताय कि काय !
निशाणा मोदींवर साधायला पाहिजे होता .. घ्या

-मोदींचा चमको पनाचा कंटाळा येतोच कि,,,
- त्यांना हिंदू कंपू मधील काही अति टोकाची विधाने करणाऱ्या व्यक्तींना काबूत ठेवले पाहिजे
- भाजपात आयाराम गायराम फार होत आहेत
- "राष्ट्रीयत्व " या मुद्य्याचा दर वेळी वापर करणे हे त्यांचे आणि पक्षाचे चुकत आहे असे वाटतेय
- कुंभ मेला तो सुद्धा या प्रमाणात होऊ दिला हे चुकलेच ..

एक पक्ष म्हणून आणि एक निर्णय घेणारा त्या पक्षाचा नेता म्हणून आपलं पाठिंबा आहे पण तो नक्कीच आंधळा नाही
आणि मोदीच कशाला तो पक्ष दुसरे हि लोक पुढे आणील... हाय काय आणि नै काय !
"काका हलवाई ची बाकरवडी खाणाऱ्याला चितळेची बाकरवडी" वर्ज असू नये .. दोन्ही ठिकाणची खा जेव्हा जिथे जी चांगली असेल तेव्हा
एकाची आवडते म्हणून दांभिक पानाने दुसऱ्याला फक्त नावे ठेऊ नका येवढेच .. पण जेव्हा लोक अशी चापलुसी करतात तेव्हा आपण रोख ठोक प्रशन विचारतो त्याला "विखारी" वगैरे म्हणणार असाल तर म्हणा...

चौकस राव, मराठी कच्चं की हो तुमचं. माझ्या मते focus word was विचारधन ;) तुम्हाला नव्हता, शालजोडितला होता तो. निदान मी तरी तसचं वाचलं.

गॉडजिला's picture

4 May 2021 - 4:53 pm | गॉडजिला

.

टीपीके
मराठी कच्चं की हो तुमचं
हो क्षमस्व मला वाटले कि आपला रोख माझ्यावर होता

श्रीगुरुजी's picture

4 May 2021 - 9:54 am | श्रीगुरुजी

आपण पहिला येणार म्हणून नाचणारा मुलगा पहिला आला नाही, परंतु बऱ्यापैकी पण अपेक्षेपेक्षा बरेच कमी गुण मिळवून उत्तीर्ण झालाय.

पण तो पहिला न आल्याने शून्य गुण मिळवून अनुत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी भान विसरून नाचत बसलेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या समर्थकांची अवस्था IPL मधल्या चिअरगर्ल्स सारखी झालीय. चौकार षटकार कोणीही मारले तरी त्या उठून नाचत बसतात, तसंच यांचं झालंय.

चौकटराजा's picture

4 May 2021 - 11:47 am | चौकटराजा

मागे एकदा मोदीच म्हणाले होते की " माणूस तापात जसा बडबडत असतो तसा नेता निवडणुकीच्या रिंगणात आला की असेच वर्तन करतो ." भारतीय नागरिक आज देखील एखाद्या मुद्यावर अडून मतदान करताना दिसतात .अगदी कांद्याच्या भावाचा फटका देखील निवडणुकीत बसल्याचे उदाहरण इथले अभ्यासक सांगतीलच ! " पेशवाई " हा शब्द वापरला की निवडणुकीत एका विशिष्ट जातीची मते भरकन इकडून तिकडे जातात अशीही थियरी वापरली जाते ! अर्थकारण , नियोजन ,विकास याचा परिपूर्ण अभ्यास आपला मतदार करतो का ? दुसरे ते की जो फ्लोटिंग मतदार असतो त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी एक " विजयाचे " वातावरण उभे करावे लागते भारत देशात . त्यामुळे मोठ्या विजयाचे दावे करावेच लागतात कारण माणसाला हरणाऱ्या ला पाठिंबा द्यायला आवडत नाही ! प्रादेशिक अस्मिता आपल्या घटनेला अपेक्षित आहे का ... ? या शब्दाचा घटनेत उल्लेख आहे ? आपले संघराज्य आहे याचा अर्थ घटनेला वेगळा अभिप्रेत आहे ! तो मोडून तोडून आज राजकरणात वापरला जातो .

भाजपा हा पक्ष हळू हळू सर्व भारत देशात आपले पाय येन केन प्रकारेण पसरत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही का दोनच आमदार केरळ मध्ये निवडून आले ? मग तिथे शरद पवारांना मतदारांनी धडा दिला असे म्हणायचे का ... ? लोकशाहीत घटनेच्या चौकटीत सर्व पक्षांना आपला आवाज बुलंद करायचा अधिकार आहे म्हणून तर एका मतासाठी बाजपेयी यांचे सरकार पाडण्यात आले ना ..... ?

शाम भागवत's picture

4 May 2021 - 1:45 pm | शाम भागवत

माझ्या मते भारतीय लोकशाही व मतदार प्रगल्भ होत आहेत. आपले आयुष्य छोटे असल्याने ही प्रगल्भता आपल्याला जाणवत नाही. मात्र देशाच्या दृष्टिने मात्र निश्चीतच घडत आहे. जर एखाद्या मतदारसंघातील २०-२५ वर्षांचा मतदान टक्केवारीचा अभ्यास केल्यास हे जाणवू शकते. आत्ताच्या पंढरपूर विधानसभा निवडणूकींचाही असा अभ्यास केल्यास त्यातून एखादी सुसुत्रता लक्षात येऊ शकते. मात्र अगदी तटस्थपणे अभ्यास करता आला पाहिजे.
असो.

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 1:50 pm | चौकस२१२

प्रगल्भ?
मला तरी वाटत नाही कारण मुरलेल्या इतर लोकशाही मध्ये एवढा एकदा इकडे एकदा तिकडे असे कमी दिसते ( काही अपवाद सोडता )

भारतातली लोकशाहीचे वय अवघे ७५ आहे.
मुरलेल्या लोकशाहीची वये काय आहेत? हेही पहावयास हवे ना.

मुरलेल्या लोकशाहीची वये काय आहेत?
हो हे हि खरे म्हणा...

चौकटराजा's picture

2 May 2021 - 5:41 pm | चौकटराजा

३ खासदारावरून भाजपा ची ३०० चे वर लोकसभेच्या जागा मिळविण्याची गोष्ट आता सर्वाना ठाउक आहे ! केरळ व बंगाल हे भा ज प ची राज्यच नव्हेत तरीही तिथे प्रवेश झाला आहे ! अर्थात भा ज पा च्या यशाला कारण इतर प्रभावहीन भाजपेतर नेते आहेत . महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय वादी आहे त्यामुले केरळ व बंगाल सारखे इथे क्रान्तीकारी मतदान काही होणार नाही की भा ज पा २०२४ मधे सत्तेवर यावा ! केरळ तामीळनाड व आंध्र ई भागातील आपल्या मर्यादा भा ज पा ला माहीत आहेत त्यामुळे बिहार ,बंगाल व पूर्वानचलातील राज्ये इथे जम बसवायचा याची भा ज पा ची धडपड चालू आहे ती यशस्वी होताना दिसते आहे. बन्गालमधे भाजपाचा सुपडा साफ वगैरे मथळा उद्याच्या सामन्यात आला तरी त्याची फार दखल घेण्याचे कारण मला दिसत नाही ! कारण बंगाल मधे भा ज पा चा पायाच मजबूत नाही जसा पन्जाब मधेही नाही !

रात्रीचे चांदणे's picture

2 May 2021 - 5:49 pm | रात्रीचे चांदणे

महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय वादी आहे
गेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असताना सुद्धा 105 आमदार निवडून आले, आज 106 झाले. तरी पण महाराष्ट्राचा मतदार जातीवादी? भाजपला जर स्वबळावर महाराष्ट्र जिंकता येत नसेल तर हा भाजपाचा दोष आहे राज्याचा नाही.

चौकटराजा's picture

2 May 2021 - 6:27 pm | चौकटराजा

२०२४ ला १०५ आले तर अँटी इंकम्बांसीने येतील एरवी मराठा मुख्यमंत्री जाहीर केला तरी १०५ मिळणार नाहीत ! शिवसेनेचे पण हाल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ! फक्त आताच्या सरकारवर राग असेल तरच भाजपा आता महाराष्ट्रात सत्तेवर येईल !

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 7:44 pm | श्रीगुरुजी

पूर्ण सहमत

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 5:56 pm | श्रीगुरुजी

पवार, उद्धव, राज अशा अनेकांनी ममतावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. आपण परीक्षेत पहिला येऊ असे तावतावाने सांगणारा विद्यार्थी पहिला न येता दुसरा आल्याने शून्य गुण मिळविलेले सर्वजण आनंदाने बेभान होऊन नाचताहेत.

पुढची निवडणूक, महाराष्ट्र राज्यात, भाजपला कठीण आहे...

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, MIM राज्य करणार....

"Bengal Elections 2021 Sanjay Raut is like begani shadi me abdulla diwana says BJP leader | Bengal Elections 2021 : “संजय राऊत म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना” | Loksatta" https://www.loksatta.com/elections-news/bengal-elections-2021-sanjay-rau...

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 7:40 pm | श्रीगुरुजी

पहिल्या वाक्याशी पूर्ण सहमत. पुढील निवडणुक भाजप विरूद्ध शिवसेना विरूद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती अशी होईल व त्यात भाजप व शिवसेना या दोघांची धूळधाण उडून कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती सत्तेत येईल व राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल. हे टाळण्यासाठी भाजप व सेना पुन्हा एकत्र यायचा प्रयत्न करतील. सेनेशी पुन्हा एकदा युती करण्याची गंभीर घोडचूक भाजपने पुन्हा केली तर, महाराष्ट्रात पुढील अनेक वर्षे भाजपचे अस्तित्व राहणार नाही. त्याऐवजी भाजपने एकट्याने लढून २०२९ च्या निवडणुकीची तयारी करावी.

एम आय एम ला महाराष्ट्रात अत्यल्प स्थान आहे व पुढेही ते अत्यल्पच राहील. आता महाराष्ट्रात त्यांचा १ खासदार व २ आमदार आहेत. त्यातील १ आमदार व १ आमदार भाजपच्या कारस्थानांमुळे निवडून आले आहेत.

यांच्या बरोबरच जावे लागेल ... अशीच गत मनसेची झाली होती ....

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, आपापल्या जागा शिवसेनेला देणार नाहीत...

उरलेल्या जागांसाठी, भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत लावतील आणि ऐनवेळी शिवसेनेला धोबीपछाड देतील, कारण 50 पेक्षा शिवसेनेचे जास्त आमदार निवडून न आणणे, हीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांची रणनीति असेल...

भाजप विरोधी पक्षांतच राहणार

मुख्यमंत्री आणि इतर महत्वाची पदे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, वाटून घेणार... ह्यापुढे शिवसेना ही शेकाप आणि मनसे, यांच्या पावलावर पाऊल ठेवणार....

ह्याचा फायदा, MIM घेत आहेच आणि हळूहळू आपले आमदार, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या पक्षांत घुसवणार....

नवाब मलिक, अब्दुल सत्तार, ही यादी वाढतच जाणार ....

जुमलासुरमर्दीनी,बंगाल ची दुर्गा,वाघीण..............

मानल बुवा दीदींना.

ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून पराभूत..

गड आला पण सिंह गेला!

नंदीग्राम मध्ये EVM चा विजय .

उपयोजक's picture

2 May 2021 - 8:32 pm | उपयोजक

दीदी आणि तिचे हिंसक कम्युनिस्टांची कॉपी असलेले बगलबच्चे निवडून आले यात आश्चर्य काय? उलट दीदींना घाम फोडणार्‍या भाजपचं कौतुक करायला हवं.

दीदी जिंकल्यानंतर तिच्या हिंसक बगलबच्चे यांनी अपेक्षेप्रमाणे "खेला " सुरू केला आहे.. बंगालात बऱ्याच ठिकाणी भाजपा कार्यालयवर हल्ले व जाळपोळ सुरू केली आहे.. आणि रस्त्यावर मोठ्या संख्येनं उतरून जल्लोष ही केला आहे
पण छे दीदी चे समर्थक आणि कोरोना.. काहीही काय?

चंद्रसूर्यकुमार's picture

2 May 2021 - 6:19 pm | चंद्रसूर्यकुमार

बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगला अंगडी २९०१ मतांनी विजयी झाल्या आहेत.

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 6:34 pm | श्रीगुरुजी

अत्यंत धक्कादायक निकाल.

शेवटच्या क्षणी ममता १,९५७ मतांनी पराभूत

गड आला पण सिंंहीण गेली!

कॉमी's picture

2 May 2021 - 6:49 pm | कॉमी

गंमत !
मजा आ गया.

केक वरची चेरी ऐन वेळेस गायब.

नावातकायआहे's picture

2 May 2021 - 6:57 pm | नावातकायआहे

केक सलामत तो चेरी पचास! :-)

चौकटराजा's picture

2 May 2021 - 6:53 pm | चौकटराजा

दोन जागी निवडणूक लढविली का काय त्यांनी ... ?

मराठी कथालेखक's picture

2 May 2021 - 7:25 pm | मराठी कथालेखक

अजून निकाल लागलेला नाही.
19:16 IST - ममता 820 मतांनी आघाडीवर

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 7:43 pm | श्रीगुरुजी

याला आधी स्वच्छ स्नान करायला सांगा.

उपयोजक's picture

2 May 2021 - 8:52 pm | उपयोजक

nawab

चौकटराजा's picture

2 May 2021 - 7:52 pm | चौकटराजा

एक निवडणुकीपुरता देखील पूजापाठ न करणारा " तो" साहेबाना मुख्यमन्त्रीपदी नको होता .कारण नम्बर नव्हते .आता निवडणुकीतील एक चाल म्हणून गोत्र सांगणारी , पूजापाठ करणारी ती" साहेबाना पन्तप्रधान झाली तरी मान्य आहे !! याला म्हणतात कुटील राजकारणी !!

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 5:12 am | चौकस२१२

भारतिचे डाव्याची हीच "गोची " आहे
पाहिजे तेवहा हे जानवी धा री आणि पाहिजे तेव्हा बाकीचे मनुवादी !
या "शतीर आणि चापलुसी " लोकांना साधं योगाची सरकारने जाहिरात केलेली खपत नाही ( का तर योग्य म्हणजे हिंदुत्वाचे प्रतीक !)

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 8:11 pm | श्रीगुरुजी

या निवडणुकीत कोणी काय कमावले/गमावले?

भाजप

आसाममध्ये दुसऱ्यांंदा विजय, स्थानिक पक्षाचा हात धरून पुदुच्चेरी जिंकले, बंगालमध्ये ३ वरून ७५ वर झेप घेताना कॉंग्रेस व डाव्यांना संपवून एकट्याने विरोधी पक्षाची जागा व्यापली . . . या जमेच्या बाजू.

अर्थात इतर पक्षांच्या तोट्याच्या बाजू या सुद्धा भाजपसाठी जमेच्या बाजू समजता येतील.

केरळ व तामिळनाडूत अजूनही जवळपास शून्य अस्तित्व; बंगालमध्ये मोठे यश मिळविण्याचा खूप गाजावाजा करूनही, प्रचंड प्रचार करूनही अपेक्षेपेक्षा खूप कमी यश . . . या तोट्याच्या बाजू.

एकंदरीत प्याला अर्धाच भरल्याने अर्धा भरल्याचा आनंद घ्यावा की अर्धा रिकामा राहिल्याचे दु:ख करावे हे ठरविता येणे अवघड.

कॉंग्रेस

तामिळनाडूत सहकारी द्रमुकला जवळपास दोन तृतीयांश बहुमत, काही पोटनिवडणुकीत यश . . . या जमेच्या बाजू.

अर्थात भाजपच्या तोट्याच्या बाजू या सुद्धा कॉंग्रेससाठी जमेच्या बाजू समजता येतील.

केरळात सलग दुसरा पराभव, आसामात सलग दुसरा पराभव, पुदुच्चेरी गमावले, बंगालात पूर्ण अस्तित्व संपले . . . या तोट्याच्या बाजू.

डावे

केरळात सलग दुसरा विजय ही एकमेव जमेची बाजू.

बंगालात पूर्ण अस्तित्व संपले ही तोट्याची बाजू.

तृणमूल

सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने बंगाल जिंकले, राष्ट्रीय पातळीवर मोदींना पर्याय म्हणून ममता सर्वात पुढे . . . या जमेच्या बाजू.

ममताचा पराभव, बंगालात एका तगड्या राष्ट्रीय पक्षाचा विरोधी पक्ष म्हणून उदय . . . या तोट्याच्या बाजू

राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे पक्ष

दखल घेण्याजोगी चांगली/वाईट कामगिरी नाही.

रात्रीचे चांदणे's picture

2 May 2021 - 8:37 pm | रात्रीचे चांदणे

ह्या निवडणुकीनंतर भाजपा चे राज्यसभेतील संख्याबळ वाढेल.

रात्रीचे चांदणे's picture

2 May 2021 - 8:43 pm | रात्रीचे चांदणे

https://www.loksatta.com/desh-videsh-news/washington-post-criticizes-pm-...
निवडणुकांमधून मोदींचा जनाधार कमी झाल्याचच सूचित झालंय”, वॉशिंग्टन पोस्टमधून पंतप्रधान मोदींवर निशाणा!

फारफार तर अपेक्षित यश मिळाले नाही आसे म्हणू शकतो पण जनाधार घातला हा निष्कर्ष चुकीचा आहे.

कॉमी's picture

2 May 2021 - 8:52 pm | कॉमी

सहमत आहे.

निशाणा वैगेरे ठिक आहे पण आकड्यांचे शब्दात रुपांतर करण्यात बातमीदार चुकलाय की काय अशी शंका येते.
२०१६ मधे ३ जागा आणि एकूण मतसंख्येच्या १०.२% मते.
२०२१ मधे जवळपास ७५ जागा आणी मतसंख्येच्या ३८% मते.
जनाधार कमी झाला ??

आजचे गाणे : निशाणा तुला दिसला ना ?

निवडणुकांमधून ट्रम्प/बिदेनचा जनाधार कमी झाल्याचच सूचित झालंय”, लोकसत्तामधून अध्यक्ष ट्रम्प/बिदेनवर निशाणा! अशी वॉशिंग्टन पोस्टने लोकसत्ताच्या बातमीची दखल घेतल्याची चर्चा का नाही करत आपण?

US वृत्तसंस्था भारतीय वृत्तसंस्थांचा प्रभाव स्विकारतील?

आपण का स्विकारतो ? स्वतःच्या देशाची किंमत परकीय तराजूने केव्हा पर्यंत ?

उपयोजक's picture

2 May 2021 - 11:13 pm | उपयोजक

तमिळनाडूच्या काही मतदारसंघात आश्चर्यकारक निकला लागले आहेत.
ब्राह्मणबहूल आणि ADMK ची मक्तेदारी असणार्‍या अशा श्रीरंगम आणि मयिलापूरमधून DMK जिंकलंय आणि ख्रिश्चनबहूल अशा नागरकोईल आणि तिरुनेलवेलीमधून भाजपचे उमेदवार जिंकलेत.

कोईंबतूरमधेही भाजपने खाते उघडले आहे.

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 12:16 am | श्रीगुरुजी

तामिळनाडूत कमल हासन पराभूत.
बंगालमध्ये क्रिकेट खेळाडू मनोज तिवारी विजयी.
बंगालमध्ये क्रिकेट खेळाडू अशोक डिंडा मागे पडला होता.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ncp-chief-sharad-pa...

गोष्ट खरी असण्याची शक्यता जास्त आहे ....

सगळ्यात महत्त्वाचं. बंगाल मध्ये भाजप साठी आता पुढे कोणती रणनीती असेल? तिथे अजून भरपूर काम करावं लागणार हे नक्की. अर्थात फक्त 3 आमदारांपासून 200 ही उडी खूपच मोठी होती. पण भाजपच्या थिंक टॅंक मध्ये आता बंगाल साठी नवीन रणनीती आखली जाणार. त्यात कोणत्या गोष्टी ठरवल्या जाऊ शकतात?

वामन देशमुख's picture

3 May 2021 - 8:42 am | वामन देशमुख

निष्ठावंतांवर अन्याय करून आयारामांना नको तितके महत्व देणे हा प्रकार, महाराष्ट्राप्रमाणेच बंगालातही भाजपाला महाग पडला आहे असे वाटते. १८ खासदारांच्या तुलनेत १२०+ आमदार अपेक्षित होते.

अर्थात लोकसभा आणि विधानसभा मतदानाची वेगवेगळे निकष लक्षात घेऊन, तीन (१०%+) ते ८० (~४०%) हा प्रवास महत्वपूर्ण आहे हे acknowledged आहे.

निष्ठावंतांनी इतकी वर्षे फारसे काही केले नाही. रूपा गांगुलीचं नाव किती वर्षे ऐकतोय. बाकी 3 सीट्स असताना तेवढेच निष्ठावंत. हरणारा निष्ठावंत असला तरी काय उपयोग. 3 ते 87 ही खरं तर अवघड लढाई होती. कुठलाच बेस नसताना सगळी लढाई दिल्लीवरून रसद पुरवून लढली गेली. आता तिथे तळ निर्माण केला गेलाय.
1. आता या सगळ्यांना परफॉर्मन्स बेस्ड टार्गेटस द्यायला हवीत. पुढची पाच वर्षे संघटना तळागाळात नेणे आणि ममता सरकारचे अपयश पुढे आणणे या द्विसूत्रीय गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला हवं. आता प्रमुख विरोधी पक्ष भाजप असल्याने ममता ला पूर्वी जसं केंद्राला धुडकावून लावण्याची सवय होती ती बदलावी लागेल कारण भाजप प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवेल.
2. ममता चा भाच्चा हा कच्चा दुवा आहे. त्याची चौकशी वेगात पुढे न्यायला हवी.
3. ममता चे पुढचे लक्ष केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणे हे असणार आहे. तिचे सध्याचे प्रतिस्पर्धी पवार आणि राहुल असणार आहेत. बाकीचेही असतील. भाजप या गोष्टीचा chaos निर्मितीसाठी वापर करेल. ममता ला केंद्राच्या गोष्टीत गुंतवून तिचे राज्यावरचे लक्ष कमी होईल. अर्थात राज्य हे तिची ताकत असल्याने ती ते कुणा दुसऱ्याच्या हाती सोपवणे अशक्य. या गोंधळाचा फायदा उचलला जाईल.

माझ्या मते 2016 पेक्षा ममता पुढे सध्या आव्हान जास्त आहे.

सहमत आहे ....

सुवेंदू अधिकारी, हा चेहरा तयार करू शकतात आणि जोडीला, मिथून चक्रवर्ती .... मिथूनला आता सक्रिय राजकारणांत आणणे ही दोघांनाही WIN-WIN परिस्थिति आहे ....

उपयोजक's picture

3 May 2021 - 12:00 pm | उपयोजक

हे प.बंगालमधे आहेत. यापेक्षा ममतेचे अजून काही अपयश हवे आहे का?

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 5:32 pm | श्रीगुरुजी

3. ममता चे पुढचे लक्ष केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणे हे असणार आहे. तिचे सध्याचे प्रतिस्पर्धी पवार आणि राहुल असणार आहेत. बाकीचेही असतील.

- १

पवार व राहुल हे केंद्रातील प्रतिस्पर्धी कधीच नव्हते आणि नसतील.

पवारांना एक हाती जास्तीत जास्त ९ खासदार व ५८ आमदार निवडून आणता आले आहेत व कधीही स्वपक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. त्यांचे वय सुद्धा ८०+ आहे. He is at the fag end of his political career.

राहुल मागील ७ वर्षात अगणित निवडणुका हरलेत. स्वतःची निवडणुक सुद्धा हरलेत. नेतृत्व करण्याची त्यांची कुवत नाही हे अगणित वेळा सिद्ध झाले आहे.

याउलट ममताने सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुक प्रचंड बहुमताने जिंकली आहे. २०१४ मध्ये स्वपक्षाचे ३४ खासदार व २०१९ मध्ये २२ खासदार निवडून आणलेत.

ममताच्या तुलनेत पवार व राहुल जवळपास सुद्धा येत नाहीत.

पिनाक's picture

3 May 2021 - 5:50 pm | पिनाक

ये तुमको पता है
ये हमको पता है
लेकीन वो दोनो हेलिकॉप्टर को थोडे ही पता है

https://youtu.be/lWxUrOffLVw

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 8:36 am | श्रीगुरुजी

१९९६ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत बंगालात सत्ताधारी डावे व विरोधात कॉंग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. भाजपला त्या राज्यात अत्यल्प स्थान होते. शामाप्रसाद मुखर्जींंच्या काळात बंगालमधील सर्वात पहिल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जनसंघाचे १३ आमदार निवडून आले होते. परंतु त्यानंतर २०१६ पर्यंत बंगाल विधानसभेत भाजपचे जास्तीत जास्त ३ आमदार होते.

१९९८ पासून २०१६ पर्यंत बंगालात डावे, कॉंग्रेस व तृणमूल कॉंग्रेस हे तीनच प्रमुख पक्ष होते. २०१६ मध्ये तृणमूलने २०४, कॉंग्रेसने ४४ व डाव्यांनी ४२ जागा जिंकल्या होत्या. ३ जागा जिंकणारा भाजप हा बंगालातील नगण्य पक्ष होता.

२०२१ मध्ये भाजपला बंगालात अपेक्षेपेक्षा बरेच कमी यश मिळाले असले तरी भाजपने कॉंग्रेस व डावे या दोघांनाही पूर्णपणे संपवून विरोधी पक्षांची संपूर्ण जागा एकट्याने व्यापली आहे. भविष्यात बंगाली जनतेला बदल करावासा वाटला तर त्यांच्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय शिल्लक आहे.

आपले स्थान निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला घालविणे आवश्यक असते. त्या बरोबरीने इतर प्रतिस्पर्ध्यांना संपविणे सुद्धा आवश्यक असते. भाजपला या वेळी निम्मे यश मिळाले आहे हे नक्की.

वामन देशमुख's picture

3 May 2021 - 8:44 am | वामन देशमुख

आपले स्थान निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला घालविणे आवश्यक असते. त्या बरोबरीने इतर प्रतिस्पर्ध्यांना संपविणे सुद्धा आवश्यक असते. भाजपला या वेळी निम्मे यश मिळाले आहे हे नक्की.

+१

यश राज's picture

3 May 2021 - 8:45 am | यश राज

+१

रात्रीचे चांदणे's picture

3 May 2021 - 8:55 am | रात्रीचे चांदणे

भाजपाला बंगाल मध्ये चांगला स्थानिक नेता शोधावा लागणार आहे. ताकतवाण स्थानिक नेत्यांशीवाय राज्य जिंकणं अवघड जातंय.

भाजपला बंगाल मध्ये स्थान निर्माण करायचे असेल तर ....

क्रिकेट आणि अभिनय श्रेत्रातील, उमेदवार द्यावेच लागतील....

सौरव गांगुली आणि मिथुन चक्रवर्ती, यांच्या मागे धावणारे पब्लिक, बंगाल मध्ये भरपूर आहेत ....

भाजपच्या आत्ताच्या यशांत, (हो, यशच म्हणत आहे, काही टक्के मतदार नक्कीच वाढले आहेत...) मिथूनचा मोठा वाटा आहे ....

उपयोजक's picture

3 May 2021 - 12:05 pm | उपयोजक

भाषेचा अभिमान असता तर हिंदी सिनेमांइतक्या बजेटचे बनले असते बंगाली सिनेमे. १०० कोटी किती बंगाली सिनेमे मिळवतात? हिंदी सिनेमेच चालतात.

पिनाक's picture

3 May 2021 - 9:38 am | पिनाक

सुवेन्दू अधिकारी ममता सरकारमध्ये 2 नंबर चे मंत्री होते असे ऐकलंय. त्यांच्या नावाला पुढे ठेवून प्रचार करता आला असता. अर्थात जसा महाराष्ट्रात फडणवीसांनी स्वतः होऊन अधिकार ताब्यात घेतले तसं अधिकारींनी करायला हवं. पक्षात ऐनवेळी नवीन माणूस घेतला की त्याला फारसा प्रभाव दाखवता येत नाही. पक्षाची कार्यरचना समजेपर्यंत च एक दोन वर्षे निघून जातात. फडणवीस पूर्वीपासून पक्षात होते हा फरक आहेच.

धर्मराजमुटके's picture

3 May 2021 - 9:45 am | धर्मराजमुटके

काही शंका
१. ममता बॅनर्जी खरोखरच नंदीग्राम मधून हरल्या असल्या तर त्या मतदान मोजणीला कोर्टात आव्हान देऊ शकतात काय ?
२. जर पराभव मान्य केला तर उद्धव ठाकरेंप्रमाणे परत ६ महिन्याच्या आत निवडणूक लढविल्यानंतर मुख्यमंत्रीपद होऊ शकतात काय ?

चंद्रसूर्यकुमार's picture

3 May 2021 - 10:23 am | चंद्रसूर्यकुमार

१. ममता बॅनर्जी खरोखरच नंदीग्राम मधून हरल्या असल्या तर त्या मतदान मोजणीला कोर्टात आव्हान देऊ शकतात काय ?

कोर्टात कोणत्याही कारणाने आव्हान द्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याप्रमाणे ममता मतमोजणीला आव्हान देऊ शकतात. मतमोजणी करण्यात काही त्रुटी राहिल्या आहेत (काही मशीन्स मोजली गेली नाहीत किंवा आकडे चुकीचे धरले) अशाप्रकारे आक्षेप सिध्द करता आले तर कोर्ट पुन्हा मतमोजणी करायचा आदेश देऊ शकेल.

ममता त्यामानाने खूपच सरळमार्गी ठरल्या. पी.चिदंबरमना एक फोन केला असता तरी ही वेळ आली नसती.

२. जर पराभव मान्य केला तर उद्धव ठाकरेंप्रमाणे परत ६ महिन्याच्या आत निवडणूक लढविल्यानंतर मुख्यमंत्रीपद होऊ शकतात काय ?

आताही ममता मुख्यमंत्री होऊ शकतील. राज्यघटनेत विधानसभा निवडणुक हरलेल्याने मुख्यमंत्री होऊ नये असे म्हटलेले नाही तर मुख्यमंत्री होताना विधानसभेचा सदस्य नसल्यास सहा महिन्यात सदस्य व्हावे असा नियम आहे. तेव्हा नियमाप्रमाणे आताही मुख्यमंत्री व्हायला ममतांना काहीच अडचण नाही. फक्त नोव्हेंबर पर्यंत विधानसभेवर निवडून जाता आले पाहिजे.

आतापर्यंत सत्ताधारी पक्ष हरला पण मुख्यमंत्र्याने स्वतःची जागा जिंकली असे कित्येक ठिकाणी झाले आहे. सत्ताधारी पक्ष हरला आणि मुख्यमंत्रीही हरला असेही आतापर्यंत झाले आहे (२०११ मध्ये बंगालमध्ये बुद्धदेव भट्टाचार्य, १९९६ मध्ये तामिळनाडूत जयललिता यांचा पराभव झाला होता) तसेच विरोधी पक्ष जिंकला पण मुख्यमंत्रीपदाच्या नेत्याने/मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराने निवडणूक गमावली असेही झाले आहे (२०१७ मध्ये हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल, १९९६ मध्ये केरळमध्ये व्ही.एस.अच्युतानंदन). मात्र सत्ताधारी पक्षाने निवडणुक जिंकूनही मुख्यमंत्र्याचा पराभव झाला असे अजून कुठे झाले आहे का याची कल्पना नाही. तसे झाले असल्यास फार वेळा झाले नसावे.

१९५२ मध्ये मुंबई प्रांताच्या पहिल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोरारजी देसाईंचा बलसाडमधून अवघ्या १८ मतांनी पराभव झाला होता. तरीही त्यानंतर त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केले होते (आणि त्यातून १०५ मराठी लोकांचा मुडदा पडला :( ) . त्यानंतर पराभूत झालेल्याला लगेच मुख्यमंत्री केले असे बहुदा पहिल्यांदाच होत असावे. २००३ मध्ये मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांचा तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी पराभव केला होता. शिवराज मुख्यमंत्रीही झाले पण ते लगेच नाही तर २ वर्षांनंतर.

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 10:42 am | मुक्त विहारि

समजून घ्या : पराभूत झाल्यानंतरही ममता बॅनर्जी मुख्यमंत्री कशा होणार?

https://www.loksatta.com/explained-news/west-bengal-election-2021-mamata...

चंद्रसूर्यकुमार's picture

3 May 2021 - 11:57 am | चंद्रसूर्यकुमार

लोकसत्तासारख्या वर्तमानपत्राने बातम्या देताना त्यातील मजकूर योग्य आहे की नाही याविषयी अधिक काळजी घ्यायला हवी. माझ्यासारखा मिपासारख्या संकेतस्थळावर लिहिणारा जर त्यांच्या मजकूरातील त्रुटी जर शोधून काढू शकत असेल तर ते कसे चालेल?

त्यामुळे आता ममता पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या तरी त्यांना सहा महिन्याच्या आत विधान परिषदेवर निवडून जावं लागणार आहे.

पश्चिम बंगाल राज्याला विधानपरिषद आहे?

२०१७ साली गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यानंतरही भाजपाने राज्यातील इतर स्थानिक पक्षांसोबत युती करुन सरकार स्थापन केलं होतं. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष या दोन्ही पक्षांबरोबर काही अपक्ष आमदारांच्या मदतीने भाजपाने बहुमताचा आकडा गाठला होता. मात्र त्यानंतर सहा महिन्यांमध्ये भाजपाने पार्सेकरांना विधान परिषदेवर न पाठवता केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना गोव्याचं मुख्यमंत्री पद दिलं होतं.

गोव्यात विधानपरिषद आहे?

१९७० ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्रिभूवन नारायन सिंघ यांचा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर त्रिभूवन यांनी राजीनामा दिला होता.

ही घटना जानेवारी १९७१ च्या पहिल्या आठवड्यातील. गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम पोटनिवडणुकीत त्रिभुवन नारायण सिंग यांचा काँग्रेसच्या रामकृष्ण द्विवेदींनी पराभव केला होता. या रामकृष्ण द्विवेदींविषयी दुसर्‍या प्रतिसादात लिहितो. पराभव झाला तरीही त्रिभुवन नारायण सिंग यांनी लगेच राजीनामा दिला नव्हता. ते ऑक्टोबर १९७० मध्ये मुख्यमंत्री झाले होते त्यामुळे एप्रिल १९७१ पर्यंत त्यांच्याकडे वेळ होता. विधानसभेत जाता आले नाही तरी विधानपरिषदेवर निवडून जाता येईल असा अंदाज असावा. ते नक्की तपासून बघायला हवे. पण त्रिभुवन नारायण सिंग यांनी लगेच राजीनामा दिला नव्हता. इतकेच नव्हे तर मार्च १९७१ मध्ये लोकसभा निवडणुक झाल्यानंतर उत्तर प्रदेश विधीमंडळाचे अधिवेशनही झाले होते. ते १९७१ या वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषणही झाले. मात्र या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर विरोधी काँग्रेस (आर) च्या सदस्यांनी दुरूस्ती सुचवली आणि विधानसभेत ती दुरूस्ती मान्य झाल्याने ३० मार्च १९७१ रोजी त्रिभुवन नारायण सिंग यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस (आर) चे कमलापती त्रिपाठी ४ एप्रिलला मुख्यमंत्री झाले.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 May 2021 - 12:02 pm | चंद्रसूर्यकुमार

वरील प्रतिसादात लिहिलेच आहे की जानेवारी १९७१ च्या पहिल्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांचा काँग्रेस (आर) च्या रामकृष्ण द्विवेदींनी मनीराम पोटनिवडणुकीत पराभव केला. हे रामकृष्ण द्विवेदी अगदी हाडाचे काँग्रेसवाले होते. २००४ मध्ये राहुल गांधीने अमेठीतून लोकसभा निवडणुक लढवली तेव्हा 'अमेठीका डंका बेटी प्रियांका' ही घोषणा देणारे हेच रामकृष्ण द्विवेदी होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांनी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांनी नेहरू जयंतीच्या कार्यक्रमात राज्यात पक्ष मजबूत करायला काय करता येईल याविषयी चर्चा केली आणि प्रियांका गांधींच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. वयाच्या ८७ व्या वर्षी पक्षात फार मोठे स्थान कधी न भूषविलेला माणूस पक्षविरोधी कारवाया करू शकेल ही शक्यता फारच थोडी. पण त्यांनी प्रियांकांवर नाराजी व्यक्त केल्याने ते गांधी घराण्याच्या मर्जीतून उतरले आणि त्यांना पक्षातून काढण्यात आले. तेव्हा 'मी नक्की कोणत्या पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत हे तरी सांगा' असे डोळ्यात अश्रू आणत द्विवेदी म्हणाले होते. पक्षातून काढताना कारणे दाखवा नोटिस वगैरे काहीही बजावण्यात आली नव्हती तर तडकाफडकी त्यांना पक्षातून काढले गेले. काही दिवसातच त्यांना दुर्घर आजार (बहुदा कॅन्सर) झाला. तेव्हा द्विवेदींना 'मानवीय' आधारावर पक्षात घेण्यात येत आहे असे काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. म्हणजे त्यांना काढण्यात आपली चूक झाली हे मान्य करणे दूरच राहिले अंथरूणाला खिळलेल्या ८७ वर्षांच्या हाडाच्या काँग्रेस कार्यकर्त्याला उपकार केल्याप्रमाणे पक्षात परत घेतले गेले. त्यानंतर मागच्या वर्षीचा लॉक डाऊन सुरू व्हायच्या ५ दिवस आधी म्हणजे १९ मार्चला त्यांचे निधन झाले.

वामन देशमुख's picture

3 May 2021 - 11:13 am | वामन देशमुख

ममता त्यामानाने खूपच सरळमार्गी ठरल्या. पी. चिदंबरमना एक फोन केला असता तरी ही वेळ आली नसती.

व्वा चंद्रसूर्यकुमार! हे प्रकरण मी विसरलोच होतो.

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 12:01 pm | श्रीगुरुजी

यात मनमोहन सिंहांचाही हात होता. चिद्दू ६०००+ मतांनी पडल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर फेरमतमोजणी साठी पंतप्रधान कार्यालयातून फोन गेले होते. इतका मोठा फरक असूनही दबावामुळे फेरमतमोजणी केली. त्यातही तोच फरक दिसला. शेवटी काही 'अर्थ'पूर्ण व्यवहार होऊन अजून एकदा मतमोजणी केली व त्यात चिद्दू साडेतीन हजार मतांनी जिंकल्याचे जाहीर केले गेले.

रात्रीचे चांदणे's picture

3 May 2021 - 10:02 am | रात्रीचे चांदणे

ममता सलग तिसरी टर्म जिकल्यात तेही पहिल्या पेक्षा जास्त आमदार जिंकूण यायचं अर्थ बंगाली जनतेला ममताच पाहिजेत. आपल्याला तिथली स्थानिक परिस्तिथी माहिती नाही परंतु ममतांनी नक्कीच चांगले काम केले असेल, म्हणूनच जनतेने त्यांना भरभरून मत दिलीत.

अर्थातच नाही. याचा अर्थ एवढाच की सध्या ममता ला पर्याय नाही. तो पर्याय पुढे आला की ममता ना नारळ मिळेल. बाकी ममता ने कोणत्या गोष्टीत चांगलं काम केलं आहे ते ऐकायला आवडेल.

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 10:41 am | मुक्त विहारि

आणि ह्या अजेंडा भोवती फिरणारी इतर कामे ....

मुख्यतः हिंदू द्वेष .....

इतकी वर्षे तिला चंडीपाठ म्हणायची गरज भासली नाही आणि आत्ता मात्र भासली ....

नावातकायआहे's picture

3 May 2021 - 1:04 pm | नावातकायआहे

पर्याय पुढे आला की अनेकांना नारळ मिळेल.

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 11:01 am | श्रीगुरुजी

२०१४ पासून २०२१ पर्यंत वेगवेगळी राज्यात व केंद्रशासित प्रदेशात एकूण ४० निवडणुका झाल्या. यातील ३५ निवडणकात कॉंग्रेसला विजय मिळविता आला नाही किंवा सर्वात माठा पक्ष असूनही सरकार स्थापता आले नाही.

२०१६ मध्ये पुदुच्चेरीत बहुमत मिळवून कॉंग्रेसचे सरकार बनले, परंतु २०२१ ची निवडणुक कॉंग्रेस हरली. २०१७ मध्ये कॉंग्रेसने पंजाब जिंकले. २०१८ मध्ये कॉंग्रेसने छत्तीसगड, मध्य प्रदेश व राजस्थान जिंकले, परंतु २०२० मध्ये पक्षातील फाटाफुटीने मध्य प्रदेश गेले.

आपण हरलो किंवा संपलो तरी चालेल, परंतु भाजप हरला पाहिजे अशी विचित्र भूमिका कॉंग्रेसने घेऊन प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देऊन दुय्यम भूमिका घेतली. त्याचाच परीणाम म्हणून कॉंग्रेस आज बहुतांशी राज्यात संपली आहे.

भाजपने सुद्धा पूर्वी प्रादेशिक पक्षांना अवास्तव महत्त्व देऊन दुय्यम भूमिका घेण्याची चूक गोवा, आसाम, पंजाब, महाराष्ट्र, बिहार, बंगाल अशा अनेक राज्यात घेऊन स्वतःची वाढ खुंटवली होती. सुदैवाने गोवा, बंगाल व आसामात भाजपला प्रादेशिक पक्षांचे जोखड भिरकावता आले. बिहारात अजूनही संजदचे जोखड मानेवर आहे. पंजाबात अकाली दलाचे जोखड मानेवरून उतरले असले तरी तेथे भाजपकडे स्थानिक शीख नेते नसल्याने तेथे भाजपची वाढ होण्यास बराच कालावधी लागेल. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे जोखड मानेवरून उतरवल्याने सत्तेवर येता आले होते. दुर्दैवाने भाजपने हे जोखड पुन्हा मानेवर घेतल्याने सत्ता गमवावी लागली. भविष्यात भाजप पुन्हा एकदा हे जोखड मानेवर घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे केले तर महाराष्ट्रात भाजप कायमचा संपेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 May 2021 - 12:31 pm | चंद्रसूर्यकुमार

आपण हरलो किंवा संपलो तरी चालेल, परंतु भाजप हरला पाहिजे अशी विचित्र भूमिका कॉंग्रेसने घेऊन प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देऊन दुय्यम भूमिका घेतली. त्याचाच परीणाम म्हणून कॉंग्रेस आज बहुतांशी राज्यात संपली आहे.

काँग्रेसचे समर्थकही तसेच आहेत. आताही स्वतःच्या पक्षाचा बंगालमध्ये पूर्ण धुव्वा उडाला याविषयी अजिबात खंत न बाळगता भाजप हरला* याविषयी हे लोक आनंद व्यक्त करत आहेत. अर्थात त्यांचीही काही चूक नाही. जसे नेते तसे त्यांचे समर्थक. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडवून आपचा विजय झाल्यावर पी.चिदंबरमनी आनंद व्यक्त केला होता. तेव्हा भाजपचे किमान ८ आमदार तरी निवडून आले पण स्वतःच्या पक्षाचा लागोपाठ दुसर्‍यांदा एकही आमदार निवडून आला नव्हता तेव्हा आपण आनंद व्यक्त करण्यासारखे काहीही झालेले नाही हे बहुदा चिदंबरमच्या लक्षात आले नव्हते. तेव्हा प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रश्न विचारला होता की आपण इतरांच्या विजयात सुख मानणार असू तर आपण आपले दुकान बंद करायचे का?

सध्याच्या काळात डाव्या आणि पुरोगामी पक्षांची/समर्थकांची पण तिच स्थिती झाली आहे. बंगालमध्ये डाव्या आघाडीने २९४ पैकी २५० च्या आसपास जागा अनेक निवडणुकांमध्ये मिळवल्या होत्या. पण यावेळी त्यांचा एक आमदार तरी निवडून आला आहे का हे पण तपासून बघावे लागेल. असे असताना यांना आनंद कसला? तर मागच्या वेळी ३ आमदार असलेला भाजप १५० आमदार मिळवू शकला नाही तर त्याच्या अर्धेच आमदार मिळवू शकला.

ही सगळी मानसिकताच समजण्यापलीकडची आहे.

*: तांत्रिकदृष्ट्या सत्तेत नसलेला पक्ष (विशेषतः पूर्वीच्या विधानसभेत अवघ्या १% जागा असलेला पक्ष) हरणे कसे शक्य आहे? फारतर जिंकायला अपयश आले असे म्हणू. पण सध्यापुरती ती तांत्रिकता बाजूला ठेऊ.

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 1:36 pm | श्रीगुरुजी

२०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडवून आपचा विजय झाल्यावर पी.चिदंबरमनी आनंद व्यक्त केला होता. तेव्हा भाजपचे किमान ८ आमदार तरी निवडून आले पण स्वतःच्या पक्षाचा लागोपाठ दुसर्‍यांदा एकही आमदार निवडून आला नव्हता तेव्हा आपण आनंद व्यक्त करण्यासारखे काहीही झालेले नाही हे बहुदा चिदंबरमच्या लक्षात आले नव्हते. तेव्हा प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रश्न विचारला होता की आपण इतरांच्या विजयात सुख मानणार असू तर आपण आपले दुकान बंद करायचे का?

२०१३ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २५% मते मिळून ८ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३४% मते व ३२ जागा होत्या.

२०१५ मधील निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू नये यासाठी कॉंग्रेसने आआपला छुपा पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसला फक्त ९% मते व ० जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३२.५% मते व ३ जागा मिळाल्या होत्या.

२०२० मध्ये कॉंग्रेसने पुन्हा तेच केल्याने कॉंग्रेसला फक्त ४% मते व ० जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३८% मते व ८ जागा होत्या.

या दरम्यान २००४ व २००९ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सर्व ७ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ० जागा मिळाल्या.

म्हणजे भाजपचे नाक कापण्यासाठी कॉंग्रेसने दिल्लीतून स्वतःला पूर्णपणे संपविले. भाजपने लोकसभेत सर्व ७ जागा जिंकल्या व विधानसभेही मते टिकविली आहेत.

सुबोध खरे's picture

3 May 2021 - 12:29 pm | सुबोध खरे

पंढरपूर बद्दल काहीच टिप्पणी नाही तज्ञ लोकांची?

काय धमकी वगैर मिळाली काय?

चंद्रसूर्यकुमार's picture

3 May 2021 - 12:35 pm | चंद्रसूर्यकुमार

एकूणच बंगालच्या लोकांचा एकाच नेत्यावर वर्षानुवर्षे विश्वास राहतो असे दिसते. बिधनचंद्र रॉय जवळपास १४ वर्षे, ज्योती बसू २३ वर्षे तर बुद्धदेव भट्टाचार्य साडेदहा वर्षे तर आता ममता बॅनर्जी १५ वर्षे मुख्यमंत्री असणार. तसेच ज्या पक्षाच्या बाजूने कौल दिला जातो तो अगदी दणक्यात असतो. २९४ पैकी १५० जागा जिंकून थोडक्यात शेपटावर निभावले असे कधी होत नाही. जिंकणार्‍या पक्षाला/आघाडीला किमान २०० जागा तरी मिळतातच हा गेल्या अनेक वर्षातील कल आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 May 2021 - 1:14 pm | चंद्रसूर्यकुमार

आसामात सरबानंद सोनोवाल परत जिंकले हे खूप चांगले झाले. गेल्या काही वर्षात भाजपने जे बाहेरचे लोक पक्षात घेतले त्यात पक्षासाठी खरोखरच 'अ‍ॅसेट' असलेले हे सोनोवाल आहेत. नाहीतर बाकी सगळे पद्मसिंग पाटील, मधुकरराव पिचड सारखे गणंग घेतले गेले.

आसामात सी.ए.ए विरोधात बरेच वातावरण तापले होते (की तापवले गेले होते). याचे कारण आसामी हिंदूंचा पण सी.ए.ए ला काही प्रमाणावर विरोध होता. याचे कारण सी.ए.ए अंमलात आल्यास बांगलादेशातून अधिकृतपणे बांगलादेशी हिंदू आसामात येऊ शकतील आणि राज्याचा आसामी चेहरा जाईल. बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने आंदोलन केले होते त्यात भरपूर हिंसाचार झाला. त्यात बंगाली हिंदूंनाही काही प्रमाणावर लक्ष्य केले गेले होते. तेव्हा सी.ए.ए मुळे सोनोवालांना ही निवडणुक जड जाईल अशी भिती मला वाटत होती. पण सुदैवाने तसे झाले नाही.

आसामात फकरूद्दिन अली अहमद आणि इतर काँग्रेस नेत्यांनी बांगलादेशी घुसखोरांना वाटा मोकळ्या करून दिल्या हे उघडे गुपित आहे. अगदी कुलदिप नय्यरसारख्या भाजपविरोधी पत्रकारानेही ते मान्य केले आहे. आसामच्या अनेक भागात त्यामुळे या घुसखोरांमुळे बांगलादेशी मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर तशीही वाढली होती. अशा परिस्थितीत आपण भाषेवरून न भांडता हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे हे मतदारांना समजले असेल तर उत्तम.

काँग्रेसने बदरूद्दिन अजमलच्या ए.आय.यु.डी.एफ पक्षाबरोबर युती केली होती. सरबानंद सोनोवालांनी आसाम गण परिषदेत असताना आय.एम.डी.टी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात कायद्याची लढाई केली होती आणि २००५ मध्ये ते जिंकले. त्यानंतर बांगलादेशी घुसखोरांच्या हितरक्षणासाठी या ए.आय.यु.डी.एफ पक्षाची स्थापना झाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. असे असतानाही ज्या आसामी हिंदूंनी काँग्रेसला मते दिली असतील ते स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेत नव्हते का? त्यांच्याविषयी आपण का सहानुभूती ठेवावी?

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 1:55 pm | मुक्त विहारि

आसामी हिंदूंनी काँग्रेसला मते दिली असतील ते स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेत नव्हते का?

तीच गोष्ट महाराष्ट्र राज्यात पण होत आहेच की...CAA आणि NRC ला विरोध, महाराष्ट्र राज्यात, भाजप सोडून इतर सगळेच पक्ष करत आहेत...
----------

त्यांच्याविषयी आपण का सहानुभूती ठेवावी?

कारण, ते आपलेच हिंदू बांधव आहेत...
-------

पिनाक's picture

3 May 2021 - 4:49 pm | पिनाक

खास करून जर सोशल मीडिया वरच्या कमेंट्स वरून म्हणायचे तर महाराष्ट्रातले तरुण (हिंदू च) सुशिक्षित अडाणी आहेत. शिकले सवरले तरी डोकं न वापरता गुढघा वापरायची परंपरा तशीच आहे. फडणवीस ना जातीवरून हिणवणे, गुजराठ्यांना शिव्या घालणे, विदर्भाला वेगळे राज्य देऊन महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही अशा मूर्ख वलग्ना करणे, लायकी नसताना मोदीं वर आगपाखड करणे (अजून बऱ्याच लोकांना ते गुजराथी समाजाचे प्रतिनिधित्व करतात असे वाटते), नॉर्थ इंडियन्स ना हिणवणे अशी कामे आपले तरुण करतात. नोकरी का मिळत नाही ही एक प्रमुख बोंब सतत असते (म्हणजे याना फुकट शिक्षण पाहिजे आणि नोकरी पण द्या). बहुतांशी अंबानी अदानी यांना जिओ चे कार्ड वापरून शिव्या घालतात. आपल्या वेळेचा दुरुपयोग कसा करावा हे मराठी तरुणांकडून शिकावे. आजूबाजूला काय चाललंय हे अजिबात माहित नसतं. काय अपेक्षा करणार अशा हिंदू तरुणांकडून?

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 6:10 pm | मुक्त विहारि

1. आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही.... हे बंद झाले

2. आम्हाला मुस्लिम लोकांनी निवडून दिले आहे, हे माननीय शरद पवार यांचे वक्तव्य.... हिंदू धर्माला, हे काहीच किंमत देत नाहीत ...

इतर जातींचा द्वेष करता करता, हिंदू धर्मच लयाला जायची शक्यता जास्त आहे ....

चौकटराजा's picture

3 May 2021 - 5:33 pm | चौकटराजा

आपल्या अवतीभोवती पहा .. ऑफिसात पहा ....! जो चांगली कामे करतो त्यांची बर्याच लोकांवर छाप पडण्याची शक्यता असते . अशावेळी सोसायटीत चांगले काम करून
दाखवणार्या माणसास कॉर्नर करणे ,ऑफिसात काही चांगला परफॉर्मन्स दाखविणार्या विरुद्ध साहेबांचे कान फुंकणे ई उद्योग चालेले तुम्हास दिसतील . असाच प्रकार एखाद्या सनदी अधिकाऱ्याला गडचरोलीला पाठविणे ,पुराण संशोधन प्रकल्पाच्या प्रमुखाच्या जागी पाठवणे हे बाय डीफॉल्ट उपाय (?) मुख्यमंत्री अवलंबत असतात . काँग्रेस या पक्षाचे असेच आहे .मी बुडालो तरी चालेल पण भाजपा मेला पाहिजे असे त्यांचे धोरण आहे. वास्तविक अर्थकारणात भाजपा त्यांचा भाऊच आहे ! फक्त जातीय जातीय म्हणून बोंबा मारत सुटायचे इतकेच राहुल करीत आहे . नियती त्याचे फळ त्याला देत आहे. भाजप ला पाडायचे तर पर्याय काँग्रेस नको प्रादेशिक पक्ष चालेल मग तो भ्रष्ट का असेना असा मानस मतदाराचा होत चालला आहे !

पश्चिम बंगाल : राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमधील काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त....

https://www.loksatta.com/elections-news/west-bengal-result-2021-congress...

----------
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच ....

चौकस२१२'s picture

3 May 2021 - 7:02 pm | चौकस२१२

सर्वप्रथम... वर्षानू वर्षे कम्युनिष्टांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बंगाल राज्यात एवढया वर्षांचं मेहनतीने भाजपनं आपलं पाय मजबूत पने रोवले त्या बद्द्दल भाजपचे अभिनंदन... अशीच वाटचाल केरळ मध्ये होऊ देत अशी आशा करतो

बंगाली लोकांबद्दल हे कधी कळले नाही, कम्युनिष्ट विचहरसरणीचा गड म्हणजे धर्माला पूर्ण विरोध मग तिथे दुर्गापूजा कशी काय प्रसिद्ध?
दुसरे अभ्यास कारण्यासारकेचे हे कि तृणमूल कशी उदयास आली? अचानक उदयास आलेल्या "आप" सारखी ?

त्यात ३०% मुस्लिम लोकसंख्येचा काय वाटा ? जेवहा कम्युनिस्ट होते तेवहा मुस्लिमांची मते काँग्रेस ला जायची का?

केरळ बद्दल असेच.. जे काही थोदेसुद्धा हिंदू संस्कृतीशी निगडित असेल ( योग, आयुर्वेद ) त्याचा जमेल तास पाणउतारा आणि तिटकारा करणाऱ्या डावयाचा हा अड्डा मग तिथे केरळी आयुर्वेदिक , मंदिरातील मिरवणूक वैगरे प्रसिद्ध कसे?
कम्युनिस्ट विचारसरणी प्रमाणे यावर बंदी असली पाहिजे आणि "नया मुल्ला प्याज हि प्याज खाता है" या म्हणीप्रमाणे भारतातील कम्युनिस्ट म्हणजे चीन आणि जुन्या रशियापेक्षाही हि कडवे ना? केरळात खरे तर मंदिर मशीद आणि चर्च सर्वांवर भयंकर निर्बंध असले पाहिजेत ना?

श्रीगुरुजी's picture

3 May 2021 - 7:32 pm | श्रीगुरुजी

दुसरे अभ्यास कारण्यासारकेचे हे कि तृणमूल कशी उदयास आली? अचानक उदयास आलेल्या "आप" सारखी ?

तृणमूल कॉंग्रेसचा उदय अचानक झालेला नाही.

तृणमूल कॉंग्रेसची स्थापना १९९८ मध्ये झाली. १९९७ मध्ये बंगाल कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तत्कालीन कॉंग्रेसाध्यक्ष सीताराम केसरींनी सोमेन मित्रा या ममता विरोधकाची निवड केल्याने ममता चिडल्या होत्या. ममतांंना राज्य कॉंग्रेसचे अध्यक्षपद हवे होते. राज्य कॉंग्रेस सत्ताधारी डाव्यांना पुरेसा विरोध करीत नाही व त्यांच्याशी जमवून घेत आहे, असाही ममतांचा आरोप होता. त्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन हसै करण्याची विनंती केली होती. परंतु तेव्हा सक्रीय राजकारणात नसलेल्या सोनियांनी यात लक्ष घातले नव्हते.

परीणामी १९९८ मध्ये ममतांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली व १९९८ ची लोकसभा निवडणुक भाजपशी युती करून लढविली होती. त्यात तृणमूलचे ७ व भाजपचा १ खासदार निवडून आला होता.

नंतर १९९९, २००४ व २००९ मधील लोकसभा निवडणुकीत आणि २००१ व २००६ मधील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला फारसे यश मिळाले नव्हते.

परंतु २००७-०८ या काळातील सिंगूर व नंदीग्राम येथील हिंसाचार व सत्ताधारी डाव्या आघाडीच्या घोडचुकांमळे २०११ मध्ये तृणमूलला बहुमत मिळाले व तेव्हापासून बंगालात तृणमूलला प्रभावी विरोधक शिल्लक राहिला नाही.

२०१४ लोकसभा निवडणुकीत तृणमूलचे ३४ खासदार व २०१६ विधानसभा निवडणुकीत २०४ आमदार निवडून आले होते. परंतु २०१९ लोकसभा निवडणुकीत तृणमूलचे फक्त २२ व भाजपचे १८ खासदार निवडून आले. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे २११ तर भाजपचे ७७ आमदार निवडून आल्याने एक प्रभावी विरोधक निर्माण झाला आहे.

परीणामी १९९८ मध्ये ममतांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली
म्हणजे थोडक्यात पवारांनी जसे स्वगृह सोडून केवळ क्यक्तिगत फायद्या साठी राष्ट्रीय नाव जोडून अजून एक काँग्रेस स्थापन केली तसेच ! .... मग ममता नंतर कोणी आहे का? तृणमूल मध्ये ?

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 7:55 pm | मुक्त विहारि

असे वाचनांत आले होते