म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - ३)

Primary tabs

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
17 Apr 2021 - 9:23 pm

मागच्या भागात आपण इक्विटी फंडांचे काही प्रकार पहिले ... या भागात इक्विटी फंडाचे अजून काही प्रकार आणि डेट व इतर फंडाबद्दल बोलूया
______________________________________________________________________________________________________________________________

१. सेक्टर फंडस् : नावाप्रमाणेच हे फंड्स एकाच सेक्टर मधल्या कंपन्यांच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात . जसे pharma, banks , natural resources, manufacturing इत्यादी . जर एखादा सेक्टर भविष्यात जास्त प्रगती करेल असे वाटत असेल तर असे फंड फायद्याचे असतात. पण दीर्घ मुदतीत एकच सेक्टर सातत्याने प्रगती करेल हे अवघड वाटते. पण दोन - तीन वर्षासाठी असे फंड्स चांगला परतावा देऊ शकतात. अर्थात रिस्क - रिवॉर्ड यांचा अन्दाज घेऊन थोड्या प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही

२. फोकस्ड फंड्स (Focused Funds ) : हे फंड्सच्या पोर्टफोलिओ मधल्या स्टॉक ची संख्या मर्यादित असते. सेबी च्या गाईड लाईन्स प्रमाणे जास्तीतजास्त ३० स्टॉक मध्येच गुंतवणूक करू शकतात. असे फंड्स माध्यम काळात उत्तम परतावा देतात.

३. ELSS (Equity linked saving scheme) : ह्या फंडात गुंतवलेल्या रकमेवर 80 C च्या अंतर्गत (दीड लाखापर्यंत) प्राप्तिकरातून सवलत मिळते. अर्थात ह्या गुंतवणुकीला लॉक इन पिरियड (३ वर्षे) असतो. हे फंड्स मल्टि कॅप ह्या प्रकारात असतात.

______________________________________________________________________________________________________________________________

आता आपण डेट फंडांचा विचार करू या
डेट फंड (Debt Fund ) हे सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात. सिक्युरिटीज ची उदाहरणे म्हणजे Bonds & Treasury bills. त्यामुळे ह्या फंडातील गुंतवणूक ही कमी जोखीमीची असते. अर्थात यांचा परतावा इक्विटी फंडांपेक्षा कमी असतो.

१. Fixed Maturity Plans (FMP) : हा क्लोज एंडेड डेट फंड आहे. क्लोज एंड म्हणजे यात गुंतवणूक ठराविक काळापुरतीच करता येते. काही आठवडे फक्त. त्यांनतर यात नवीन गुंतवणूक करता येत नाही. या फंडाचे कालावधी ठरलेला असतो (१ महिना ते ५ वर्षे). कालावधी पूर्ण झाला कि पूर्ण रक्कम (गुंतवणूक + परतावा) हा गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होतो
हे थोडेसे मुदत ठेवीसारखेच (Fixed Deposit) आहे. फरक एव्हढाच कि सध्या मुदत ठेवीचा परतावा ६% च्या आसपास आहे. या उलट FMP चा परतावा साधारणतः ८ ते ९% च्या आसपास असतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या FMP च्या परताव्यावर indexing चा फायदा मिळतो. त्यामुळे आयकर कमी भरावा लागतो. FMP हे प्रामुख्याने certificate of deposits (CDs), commercial papers (CPs), corporate bonds, non-convertible debentures (NCDs) यामध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे ही गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. तसेच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा यावर परिणाम होत नाही. त्यामुळे मुदत ठेवी पेक्षा यांचा विचार जरूर करावा.

FMP मधली गुंतवणूक ही एकाच वेळी (Lump sum ) करायची असते. यात सिप नसतात. जेंव्हा पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चरिंग करताना याचा फार उपयोग होतो.

२. शॉर्ट टर्म / अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड : ह्या फंडात थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरते. थोड्या काळासाठी रक्कम ठेवायला (पार्क) करायला उपयुक्त.
यांचा महत्वाचा उपयोग म्हणजे STP (Systematic Transfer Plan ). जर थोडी रक्कम असेल आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर ती शॉर्ट टर्म फंडात ठेवावी आणि दरमहा STP च्या माध्यमातून इक्विटी फंडात टाकावी

३. Monthly Income Plan : हे डेट ओरिएंटेड हायब्रीड प्लॅन्स असतात. डिव्हिडंड च्या माध्यमातून नियमित (त्रिमाही वगैरे) परताव्याची सोय करता येते. अर्थात हे फंड एकदम (lump sump ) पैसे गुंतवायला योग्य असतात. त्यामुळे सिप च्या माध्यमातून पुरेसा निधी जमला कि रिस्ट्रक्चरिंग च्या वेळी याचा विचार करायला हरकत नाही

ह्याशिवाय क्रेडिट रिस्क फंड्स, लिक्विड फंड्स, इनकम फंड्स, डायनॅमिक फंडस् असे डेट फंडाचे इतरही प्रकार आहेत. पण त्यांचा आपल्याला फार उपयोग नसल्याने विस्तारभयास्तव आत्ता त्याबद्दल बोलत नाही

_______________________________________________________________________________________________________________________________

या लेखाच्या शेवटी काही स्पेशल प्रकारचे फंड्स (स्कीम्स) बघू या

१. हायब्रीड फंडस् : हे फंड्स एका पेक्षा अधिक असेट क्लास मध्ये गुंतवणूक करतात. जसे डेट + इक्विटी तसेच सोने आणि काही वेळा रिअल इस्टेट ही. ह्या मुळे अशा फंडांमध्ये जोखीम कमी असते. एखादा असेट क्लास खाली गेला (जसे इक्विटी मार्केट) तर सोने वर जाते. त्यामुळे अशा फंडात व्होलॅटिलिटी कमी असते

२. गोल्ड फंड्स : सोन्याचे आकर्षण भारतीयांना कायमच आहे. अर्थात सोन्यामध्ये गुंतवणूक दोन प्रकारे करता येते. गोल्ड सेविंग फंड्स आणि gold ETF
गोल्ड सेविंग फंडांसाठी सिप चे सुविधा उपलब्ध आहे. अर्थात सोन्यामध्ये गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ५% च्या आसपासच ठेवावी कारण दीर्घ मुदतीत सोन्यापेक्षा इक्विटी जास्त परतावा देते. सोन्याच्या गुंतवणुकीचा गेल्या दहा वर्षांतला परतावा १२.३% आहे,

३. US opportunity funds : नावाप्रमाणेच हे फंड्स अमेरिकेतील कंपन्यात गुंतवणूक करतात. अर्थात त्यांना विनमय दराचा (exchange rate ) चा फायदा मिळू शकतो. (रुपयाचे अवमूल्यन झाले तर ).
Edelweiss - US Technology Equity Fund of Fund Reg (G) किंवा Franklin - India Feeder Franklin US Opp (G) हे उत्तम परतावा देताना दिसतात

४. Solution Funds : या फंडाची रचना एखाद्या विशिष्ट हेतूने केलेली असते जसे रिटायरमेंट फंडस्. किंवा चिल्ड्रेन्स फंड्स. दीर्घ मुदतीसाठी अशा एखाद्या फंडात गुंतवणूक करायला हरकत नाही

५. कॉन्ट्रा फंडस् : या फंडांची गुंतवणूक व्युहनीती (Strategy) ही इतर फंडांच्या विरुद्ध असते. बाजाराच्या विरुद्ध जाऊन under performing / low cost assets मध्ये हे गुंतवणूक करतात. दीर्घ मुदतीत हे उत्तम परतावा देऊ शकतात

_____________________________________________________________________________________________________________________________

आत्तापर्यंत आपण फंडांच्या विविध प्रकारांचा आढावा घेतला. या माहितीच्या आधारे आपण आपला पोर्टफोलिओ बनवू शकू. पुढच्या (शेवटच्या) भागात पोर्टफोलिओ डिस्ट्रिब्युशन कसे असावे, स्कीम्स कशा सिलेक्ट कराव्यात थोडक्यात आपला पोर्टफोलिओ कसा बांधावा ते पाहू

_____________________________________________________________________________________________________________________________

नेहमीचे डिस्क्लेमर देतो :
वर आलेली फंडस् ची नवे ही उदाहरण म्हणून दिली आहेत. प्रत्यकाने इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या अभ्यासाप्रमाणे फंड्स निवडावेत
Happy Investing

गुंतवणूकविचार

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

17 Apr 2021 - 9:52 pm | राघवेंद्र

खूप उपयोगी माहिती. एखाद्या फंडातुन पैसे केंव्हा काढायचे कसे ठरवायचे ? काही निर्देशांक वापरता का ?

अमर विश्वास's picture

19 Apr 2021 - 12:51 pm | अमर विश्वास

फंडातून पैसे कधी काढावे ?

पैसे काढताना एक्सिट लोड (असल्यास) आणि भरावा लागू शकणारा कर (tax impact ) याचा जरूर विचार करावा.

आपले टार्गेट पूर्ण झाले असेल तर टप्प्या टप्या ने पैसे काढावेत (Systematic Withdrawal Plan )

टार्गेट पूर्ण व्हायच्या आधी काही कारणाने पैसे काढावे लागणार असतील तर साधारणतः ३ महिन्याच्या कालावधीत मार्केट कंडिशन पाहून दोन / तीन हफ्त्यात पैसे काढावेत. साधारणतः इक्विटी स्कीम चा CAGR १२% पेक्षा कमी असेल आणि पैशासाठी काही काळ थांबणे शक्य असेल तर १२% CAGR मिळेस्तोवर थांबणे श्रेयस्कर

थोडक्यात ही गुंतवणूक मिडीयम लिक्विडीटी या प्रकारातली समजावी.

राघवेंद्र's picture

21 Apr 2021 - 10:45 pm | राघवेंद्र

धन्स अमर विश्वास.
आज जरा रिटर्न्स वर अभ्यास करताना कळाले की SIP चे रिटर्न्स बघायचे असतील तर XIRR बघणे उचित ठरेल.
CAGR हा एकदाच केलेल्या गुंतवणुकीतील परतावा सांगतो आणि XIRR दरमहा केलेल्या गुंतवणुकीतील परतावा सांगतो.

खूप चांगली लेख मालिका. ETF चा अभ्यास असेल तर त्याच्या बद्दल पण लिहा.

मुक्त विहारि's picture

17 Apr 2021 - 10:14 pm | मुक्त विहारि

वाखूसा