आय पी एल - २०२१

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
9 Apr 2021 - 3:13 pm
गाभा: 

आजपासून आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होतेय. नेहमीचेच ८ संघ आहेत. यावेळी दिल्ली, चेन्नई, पंजाब व राजस्थान या संघाचे कर्णधार नियमित यष्टीरक्षक आहेत. संजू सॅमसन बहुधा प्रथमच नेतृत्व करतोय.

नेहमीप्रमाणे मुंबईच संभाव्य विजेता आहे. कोहली कितीही यशस्वी फलंदाज असला तरी या स्पर्धेत त्याच्या संघाला आजतागायत विजेतेपद मिळविता आले नाही. सर्वात पहिल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर राजस्थानला एकदा सुद्धा वरील ४ संघात स्थान मिळविता आले नाही. बहुसंख्य वयस्कर खेळाडूंमुळे चेन्नई संघ हा भाऊसाहेबांचा संघ म्हणून ओळखला जातो. आता त्यांनी कसोटीकुशल पुजाराला संघात घेतलंय. धोनीची ही बहुधा शेवटची स्पर्धा असावी.

प्रतिक्रिया

माझा पाठींबा नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स ला, दुसऱ्या नंबरवर दिल्ली. CSK मला अजिबात आवडत नाही, CSK चे social मीडिया वरचे समर्थक खूप इगनोरंट आणि arrogant वाटतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2021 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझाही पाठींबा नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सला.
काल हरले, नो प्रॉब्लम. अंतिम सामना जिंकणार मुंबईच.

-दिलीप बिरुटे
(मुंबईकर)

धनावडे's picture

10 Apr 2021 - 3:34 pm | धनावडे

मुंबईचे पण तसेच असतात

अमर विश्वास's picture

9 Apr 2021 - 3:27 pm | अमर विश्वास

मुंबई दिल्ली बंगलोर आणि हैदराबाद हे टॉप ४ मध्ये यावेत हे अपेक्षा ....

विथ मुंबई इंडियन्स :)
KKR ची टीम कशी आहे?

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 4:25 pm | मुक्त विहारि

कभी खुषी, कभी गम...

सपोर्ट अर्थातच मुंबई इंडियन्स ला! मुंबई कडून ईशान किशन आणि हार्दिक पंड्याची कामगिरी बघण्यास उत्सुक. रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणे मुळे दिल्ली कॅपिटल्स पण hot favorite!

गणेशा's picture

9 Apr 2021 - 6:23 pm | गणेशा

या वेळेस मी support करेल हैद्राबाद संघाला..

Delhi आणि पंजाब हे संघ सुद्धा कमाल करतील..
मुंबई बद्दल काय बोलावे ती भारीच team आहे..

अय्यर टीम मध्ये नसल्याने delhi ला फटका बसला आहे,, रिषभ मला अजिबात कॅप्टन म्हणुन आवडला नाही..
स्टीव्ह स्मिथ सारखा उत्कृष्ट अनुभवी player असताना अय्यर नंतर त्याच्याकडे नेतृत्व हवे होते..

तरीही यावेळेस मी SRH च्या बाजूने
टीम म्हणुन मला सर्वात उत्तम टीम तीच वाटत आहे..

--

यावेळेस आमच्या युरोप सेक्टर मध्ये high level ला competition होते आहे.. मी त्यात भाग घेतलाय..

गणेशा's picture

9 Apr 2021 - 6:29 pm | गणेशा

Prediction
MI VS RCB = RCB

माझी team आज RCB आहे.

मुंबई जरी उत्तम असली तरी पहिल्याच match ला मी मला जे वाटतेय त्यावरच मत देतोय.. चुकले तर चुकले..(चुकायची शक्यता जास्त आहे)
चहल आणि सुंदर आज कमाल करतील अशी अपेक्षा..

DREAM ११ टीम मज्जा म्हणुन share karel..
त्यात काही जास्त जिंकत नाहीच मी

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2021 - 6:51 pm | श्रीगुरुजी

मुंबई उशिरा भरात येणारा संघ आहे. सुरूवातीला बरेच सामने मुंबई हरतात, पण नंतर भरात येतात. त्यामुळे आज बंगळूर जिंकल्यास आश्चर्य नाही.

सौंदाळा's picture

9 Apr 2021 - 6:34 pm | सौंदाळा

खरं तर आयपीएल अजिबात आवडत नाही.
पहिले वर्ष सोडले तर नंतर कधीच बघितली नाही. चॅनल बदलताना एखाद-दोन मिनिट थांबुन बघितले असेल तेवढेच काय ते.
पण कोरोनामुळे सगळे मिळमिळीत झाल्यामुळे मागील वर्षी भरपुर सामने पाहिले. यावर्षी पण बघणार आहे.
धाग्यावर अधुन मधुन हजेरी लावेनच.
हैदराबाद अणि मुंबईला माझा पाठींबा.

मुक्त विहारि's picture

10 Apr 2021 - 10:29 am | मुक्त विहारि

द ग्रेट सर्कस

हायलाईट बघतो, पुर्ण मॅच बघायची गरज वाटत नाही...

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2021 - 10:41 pm | श्रीगुरुजी

बंगळूरला विजयासाठी ६ षटकांत ५७ हव्या. मुंबई बहुतेक हरणार.

गणेशा's picture

10 Apr 2021 - 10:07 am | गणेशा

Csk vs dd

दिल्ली जिंकेल आज असे वाटते

(W१/L०)

गणेशा's picture

10 Apr 2021 - 10:26 am | गणेशा

Just read rabada and nortje are not available..

त्यांनी गेल्या ipl ला दिल्ली ला final ला घेऊन जाण्यात महत्वाचा वाटा उचलला होता..
अवघड आहे, still आज दिल्लीच माझ्याकडून..

पृथ्वी शॉ, हा खरेतर खुप चांगले दिमाखदार shot खेळणारा खेळाडू.. पण त्याचे वर्तन, आणि एकंदरीत careless पणा मुळे अवघड वाटते त्याचे..
Still तो यावेळेस तरी positive गोष्टी घेऊन मैदानात येईल अशी आशा करतो..

मोगरा's picture

10 Apr 2021 - 3:33 pm | मोगरा

काल आमची मुंबई हारली.,

आणि आज माही जिंकला पाहिजे.

नाही तर पहिला धक्का माहेरची टीम हारली
नंतर दूसरा धक्का माझा हिरो पण हारला असा नको..

(मी क्रिकेट जास्त बघत नाही., फक्त मध्ये मध्ये मुलीला आणि नवऱ्याला बिस्कीट - चहा पुरवते :-)
)

मुक्त विहारि's picture

10 Apr 2021 - 7:33 pm | मुक्त विहारि

फक्त मध्ये मध्ये मुलीला आणि नवऱ्याला बिस्कीट - चहा पुरवते...

क्रिकेटची मॅच बघतांना, चहा आणि बिस्किट, खाणारा नवरा असेल तर, खरोखरच नशीबवान आहात...(बियर, तेंडूलकर आणि चिकन तंगडी कबाब आणि नंतर कोळंबीचा रस्सा आणि भाकरी, हे सर्वोत्तम काॅम्बिनेशन... आता तेंडूलकर खेळत नसल्याने, उरल्या फक्त आठवणी..)

आणि

नवर्याला, क्रिकेटची मॅच बघायला देणारी बायको, हे परमभाग्य...(आमच्या बायकोचे आणि क्रिकेटचे वाकडे आहे...)

तुमचा संसार, असाच सुखाचा असू दे...

गणेशा's picture

10 Apr 2021 - 11:40 pm | गणेशा

आणि delhi जिंकली, आणि पृथ्वी शॉ चे shots म्हंटल्या प्रमाणे भारी होते..

(W2/L0)

And dream ११ la पण भारी team होती,, ५०० rs won.
रैना लगेच खेळेल वाटलं नव्हतं..

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Apr 2021 - 2:26 pm | अमरेंद्र बाहुबली

क्रिकेट सारख्या फालतू खेळाला ईतकं महत्व मिळतं ह्यांचं नेहमीच आश्चर्य वाटत आलंय.

सतिश गावडे's picture

10 Apr 2021 - 3:20 pm | सतिश गावडे

काय हे अमरेंद्र बाहुबली साहेब? तुमच्या आय पी एलविषयक युक्तिवादात क्रिकेटला आणण्याची काही गरज नाही. तुम्ही सुशिक्षित, सभ्य, शहाणे असाल तर क्रिकेटचे अवमान करणारे हे विधान मागे घेऊन क्रिकेट वेड्यांची क्षमा मागाल अशी नम्र अपेक्षा आहे.

संपादक मंडळ, अमरेंद्र बाहुबलींचा हा वरील प्रतिसाद संपादित करून त्यातील आक्षेपार्ह भाग काढून टाकावा ही नम्र विनंती.

टवाळ कार्टा's picture

10 Apr 2021 - 3:33 pm | टवाळ कार्टा

=))

तुषार काळभोर's picture

10 Apr 2021 - 7:28 pm | तुषार काळभोर

सही पकडे हैं..

तुषार काळभोर's picture

10 Apr 2021 - 7:32 pm | तुषार काळभोर

रहाणे ऐवजी पंत कर्णधार का केला असेल?
नुकतंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली च्या अनुपस्थिती मध्ये त्याने चांगलं अन यशस्वी नेतृत्व केलं होतं.

की T 20मध्ये पंत हा रहाणे पेक्षा उजवा आहे म्हणून?

मला तरीही रहाणे कडून जास्त अपेक्षा आहेत.

बाकीी पृथ्वी शॉ चार वर्षांपूर्वी " नेक्स्ट तेंडुलकर" वाटला होता. वाया गेेलं पोरगं.

Vichar Manus's picture

10 Apr 2021 - 10:56 pm | Vichar Manus

रहाणे चे playing इलेव्हन मध्ये स्थान निश्चित नाही, त्याला कसे कर्णधार करणार

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2021 - 10:04 pm | श्रीगुरुजी

चेन्नई १८८/६ (२०)

दिल्ली ७०/० (७)

गणेशा's picture

11 Apr 2021 - 10:08 am | गणेशा

आज srh vs kkr

नक्कीच हैद्राबाद जिंकावी असेच वाटते आणि आज माझी team हैद्राबाद आहे..

Srh vs kkr = srh.

---
शाकिब हसन ला narine च्या ऐवजी खेळवले पाहिजे असे मला मनापासुन वाटते..
Gill हा एकच भरोसा असलेला batsman वाटतोय kkr कडे.
Morgan आहे, पण बऱ्याचदा hitting साठी dk आणि रस्सेल साठी त्याचा बळी दिला जातोच..

हेंद्राबाद
वॉर्नर, बेस्ट्रो, रॉय, केन, होल्डर , रशीद, नबी या पैकी कुठलेही चार जण घेऊन खेळू शकतो सगळे भारीच..

तरीही मला आज नटराजन ची bowling पाहण्यात मज्जा आहे..
हरभजन किंवा वरून चक्रवर्ती यापैकी एक आणि कृष्णा हे सुद्धा चांगली bowling करतील अशी आशा.

तरीही शाकिब आणि नटराजन या दोघांना सामान्यात पहायला चांगले वाटेल..

बघू या..

गणेशा's picture

11 Apr 2021 - 11:41 pm | गणेशा

हरलो आज

W२/L१

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 8:20 am | मुक्त विहारि

कभी खुषी कभी गम...

गणेशा's picture

12 Apr 2021 - 7:36 pm | गणेशा

आज पंजाब

गणेशा's picture

13 Apr 2021 - 12:16 am | गणेशा

पंजाब जींकला पण,
Samson ने एक run काढायला हवा होता ५th बॉल वर.

Dream ११
५०० rs won :-)

https://drive.google.com/file/d/1VuGXw7j7tkJC0OA7UO1EtrHnAFjvH61t/view?u...

----
W३/L१

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2021 - 1:14 pm | श्रीगुरुजी

पाचव्या चेंडूवर १ धाव नक्की मिळत होती. दुसरी धाव मिळणे खूप अवघड होते. दुसरी धाव घेताना संजू धावबाद झाला असता तर शेवटच्या चेंडूसाठी नवीन फलंदाज आला असता. समजा एकच धाव झाली असती तर मॉरीसने शेवटचा चेंडू खेळला असता व तो आधी ४ चेंडूत फक्त २ धावा काढून चाचपडत होता. संजू पूर्ण सेट असल्याने आपणच शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर राहण्याचा त्याचा निर्णय योग्य होता. त्याचा षटकार फक्त ५-६ यार्डांंने हुकला.

असनोडकर, वल्थाटी यांच्याप्रमाणे तेवातिया फक्त एक स्पर्धा गाजविणारा ठरणार बहुतेक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2021 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर राहण्याचा त्याचा निर्णय योग्य होता.
सहमत. आणि फटका मारल्यावर चेंडू थेट बाहेर जाईल असे क्षणभर वाटून गेले.

नॉनस्ट्राइकवरचा तो वेडा, सिंगल रन घेतल्यावर असे तोंड करीत होता जसे काही हा मॅच जिंकून देणार होता.

मजा आली. चलो, आज मुंबई जितना है.

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

13 Apr 2021 - 2:15 pm | गणेशा

तेवटिया बकवास player वाटतो मला..

Morris हा चांगला striker आहे.. तो काही १० नंबरचा फलंदाज नव्हता.
Six पेक्षा चौकार मारणे easy जाते आणि शेवटी ३ रून निघाले तरी सामना टाय होतो..

त्यामुळे एक run काढली पाहिजे होती..

असो.

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2021 - 11:54 pm | श्रीगुरुजी

आजचा सामना थरारक होता.

गणेशा's picture

13 Apr 2021 - 2:16 pm | गणेशा

आज मी मुंबई बरोबर...

गणेशा's picture

13 Apr 2021 - 11:31 pm | गणेशा

W४/L१

गणेशा's picture

14 Apr 2021 - 7:36 pm | गणेशा

आज srh may win

गणेशा's picture

15 Apr 2021 - 12:07 am | गणेशा

हरले आज srh..

W४/L२

विजय शंकर ला बदला राव आता..

आणि kane willamson सारख्या टॉप batsman ला आणा मैदानात..
Middle order महत्वाची आहे

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2021 - 9:53 am | श्रीगुरुजी

साहाला पण बसवा. बेअरस्टो यष्टीरक्षण करेल.

ते सोडा
सट्टा लावणार का , इथेच खोटा खोटा

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2021 - 11:25 pm | श्रीगुरुजी

कालचीच पुनरावृत्ती आज. ४ षटकांत फक्त ३५ धावा हव्या, बेअरस्टो व सेट झालेला मनीष पांडे फलंदाजी करताहेत आणि फक्त २ फलंदाज बाद, अशा अत्यंत भक्कम स्थितीतून हैद्राबादने विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणला.

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2021 - 8:11 am | श्रीगुरुजी

सनरायझर्स काल सलग तिसरा सामना हरले. या संघात तीनच फलंदाज आहेत (वॉर्नर, बेअरस्टो आणि मनीष पांडे). पांडे पूर्ण अपयशी असल्याने यांचा पहिला फलंदाज बाद झाला की घसरण सुरू होते. बाकावर जेसन रॉय, विल्यमपुत्र काणे, जेसन होल्डर, महंमद नबी असे चांगले फलंदाज/अष्टपैलू आहेत, परंतु ते परदेशी असल्याने यातील फार तर एकच संघात येऊ शकतो (उर्वरीत तिघे - वॉर्नर, बेअरस्टो व रशीद खान) संघात हवेच. एकंदरीत या संघात चांगले भारतीय फलंदाज नसल्याने संघाचे भवितव्य अवघड आहे.

गणेशा's picture

18 Apr 2021 - 8:31 am | गणेशा

हो..
मधली फळी विस्कळीत आहे, kane is must..
Indian bowler चांगले आहेत त्यांच्याकडे. म्हणुन kane घेतल्या शिवाय त्यांना पर्याय नाही..

हि टीम मला पहिल्या चार मध्ये नव्हे २ मध्ये जाईल वाटलेली.. पण अवघड दिसतेय..

Punjab चांगली वाटतेय आता

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2021 - 9:55 am | श्रीगुरुजी

सनरायझर्सने मुजीब ऐवजी जेसन होल्डर व भुवनेश्वर ऐवजी नटराजन हे बदल करावे. अभिषेक शर्माच्या जागी केदार जाधव, चहाबाज नदीम किंवा प्रियम गर्ग घेता येईल. मधली फळी फारशी चांगली नसल्याने मनीष पांडेला काढतील असे वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2021 - 8:56 am | श्रीगुरुजी

काल कलकत्त्याला राजस्थानने अगदी सहज पराभूत केले. कलकत्त्याचा कर्णधार मॉर्गन आतापर्यंत पूर्ण अपयशी आहे. गोलंदाजी चांगली असूनही फलंदाज अपयशी ठरताहेत. त्यांनी रसेलला चौथ्या क्रमांकावर आणले पाहिजे. स्टोक्स, आर्चर असे महत्त्वाचे खेळाडू संघातून बाहेर गेल्याचा फटका राजस्थानला बसताना दिसतोय. बटलर, व्होरा व जैस्वाल हे सलामीचे फलंदाज बहुतांशी अपयशी झालेत. संजू सॅमसनने ५ पैकी २ सामन्यात चांगली फलंदाजी केली. उर्वरीत सामन्यात त्याने विकेट फेकली. मॉरीस सुद्धा दोनच सामने चांगले खेळला.

मुंबई ५ पैकी ३ सामने हरलेत व या तीनही सामन्यात त्यांनी प्रथम फलंदाजी केली होती. अष्टपैलू पोलार्ड व पंड्या बंधू बहुतांशी अपयशी ठरलेत.

यावर्षी अजूनपर्यंत चेन्नई, बंगळूर व दिल्ली हे तीनच संघ भरात आहेत.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2021 - 9:02 am | श्रीगुरुजी

आतापर्यंत मुंबईत झालेले बहुतांशी सामने मोठ्या धावसंख्येचे झालेत, तर चेन्नईतील बहुतांश सामने कमी धावसंख्येचे झालेत.

IPL२०२१मधून बाहेर पडल्यानंतर बेन स्टोक्सने भारतीय खेळपट्ट्यांना म्हटले ‘कचरा’!

https://www.loksatta.com/krida-news/ben-stokes-calls-indian-pitches-tras...

पैसे मिळेपर्य॔त काही बोलला नाही .... इतके असेल तर, खेळायला येऊ नये...

प्रचेतस's picture

3 May 2021 - 3:36 pm | प्रचेतस

चुकीचं काहीच बोलला नाही, चेन्नईची खेळपट्टी कचराच आहे. स्पोर्टिंग हवी, तशी देखील नाहीच.

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 3:46 pm | मुक्त विहारि

पैसा हजम, बात खतम...

(चुकीचे बोलला नाही, ह्याला सहमती आहे...)

श्रीगुरुजी's picture

1 May 2021 - 11:35 pm | श्रीगुरुजी

चेन्नई २१८/४ (२०)
मुंबई २१९/६ (२०)

पोलार्ड २-०-१२-२ आणि नाबाद ८७ (३४ चेंडू, ६ चौकार, ८ षटकार)

Bhakti's picture

2 May 2021 - 8:39 am | Bhakti

पोलार्ड :):):)

श्रीगुरुजी's picture

4 May 2021 - 2:17 pm | श्रीगुरुजी

आयपीएल स्पर्धा रद्द केल्याची अधिकृत घोषणा झाली आहे.

स्पर्धा रद्द करण्याचा योग्य निर्णय आहे. मुळात नोव्हेंबरमध्येच मागील स्पर्धा संपली असताना ४ महिन्यात पुन्हा स्पर्धा खेळविण्याचा दुराग्रह नडला.

ऑक्टोबरमधील ट-२० विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर खेळविली जाण्याची बरीच शक्यता आहे.

आता सायंकाळी वेळ कसा घालवू?

तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि मी क्रिकेट पहाणे जवळपास सोडुन दिले,आयपीएलची क्रेझ काही काळा पासुन तयार झाली होती पण त्यातही खेळ सोडुन भलत्याच गोष्टी जास्त ! आयपीएल चे वर्णन मी सट्टे बाजांचा महाकुंभ असे करतो. आता बीसीसीआय ला हा इव्हेंट [ खेळ कधीच मेला ] रद्द झाल्याने करोडाचा फटका बसणार आहे म्हणे ! इतर वेळी हजारो कोटी छापतात त्या बद्धल यांनी कधी ब्र देखील काढला नाही, देशात करोना संकट आहे तेव्हा हा बाजार कशाला ? हा प्रश्न कोणाला कधी पडलाच नसावा, शेवटी आपल्या देशात माणसा पेक्षा पैसा महत्वाचा. बीसीसीआय ने करोनासाठी मदत केली केवल ५१ कोटी रुपये, का ? इतके कमी का ? ज्या हिंदूस्थानी नागरिकांचा अमुल्य वेळ स्वतःवर खर्ची करायला लावुन बक्कळ पैसा मिळवला जातो त्यांच्यासाठी यांना मात्र सढळ हस्ते मदत करता आली नाही. बीसीसीआय ही संस्थाच मला पहिल्या पासुन संशयास्पद वाटत आली असुन यात असलेले चेहरे नक्की या संस्थेत का ? किंवा त्यांचा आणि क्रिकेटचा काय संबंध ? असे प्रश्न जे तुम्हालाही कधी तरी पडले असतील तेच मलाही पडलेले आहेत. आत्ता पर्यंत मोदी सरकार ने या संस्थेची पाळेमुळे का खणुन काढली नाही ? हे मला उमगलेले नाही.

जाता जाता :- अरबाझ खान ने २.८० कोटी आयपीएल सट्ट्यात घालवल्याची बातमी तुमच्या लक्षात आहे का ? तो कसा सुटला ? हा देखील असाच एक न सुटलेला प्रश्न !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja

पण,

मला आयपीएलचे मराठी समालोचन जास्त आवडते ...

स्नेहल प्रधान, संदीप पाटील आणि अमोल मुझुमदार, अप्रतिम समालोचन करत होते

पण सगळ्यात भारी म्हणजे, विनोद कांबळी....

विनोद कांबळी म्हणजे ... फक्त मी आणि मी आणि मी... एखाद्याने स्वतःचे किती गुणगान करावे ते विनोद कांबळी कडून शिकावे ...

आपल्या पैकी किती जण मराठी समालोचन ऐकत होते?

श्रीगुरुजी's picture

5 May 2021 - 2:53 pm | श्रीगुरुजी

कोणत्या वाहिनीवर?

मुक्त विहारि's picture

5 May 2021 - 3:21 pm | मुक्त विहारि

मराठीत समालोचन नक्की ऐका ....

ह्या विषयावर धागा काढता येईल, इतपत मटेरियल नक्कीच आहे...

मदनबाण's picture

14 Aug 2021 - 12:51 pm | मदनबाण

आयपीएल चे वर्णन मी सट्टे बाजांचा महाकुंभ असे करतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Na Ja (Official Video) Pav Dharia

श्रीगुरुजी's picture

5 May 2021 - 9:58 am | श्रीगुरुजी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळात मोठ्या संख्येने राजकारणी घुसल्यापासून क्रिकेटला ग्रहण लागले आहे. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेले, क्रिकेटची शून्य माहिती असलेले क्रिकेटविषयी निर्णय घेतात. राजीव शुक्ला हा गुटख्याचा तोबरा भरलेला व क्रिकेटशी कणभरही संबंध नसलेला ठोंब्या इतकी वर्षे क्रिकेट नियामक मंडळात कसा? त्याला कूलिंग पिरीयडचा नियम लागू नाही का?

विजुभाऊ's picture

5 May 2021 - 5:03 pm | विजुभाऊ

सर्कस बंद पडली की

मुक्त विहारि's picture

5 May 2021 - 7:40 pm | मुक्त विहारि

आमची मराठीतली करमणूक गेली ....

गणेशा's picture

6 May 2021 - 8:37 am | गणेशा

न्यूज चॅनेल वर दिवसभर दाखवणारी भीती दायक माहिती.. आरडा ओरडा या पेक्षा ipl थोडीसी करमणूक होती..

असो नाईलाजाने बंद झाली स्पर्धा.. ठीक आहे..