भारतीय राजकारणाची सत्यता

जानु's picture
जानु in काथ्याकूट
3 Apr 2021 - 3:22 pm
गाभा: 

सध्या काँग्रेसचे माजी आणि आभासी अध्यक्ष राहुल गांधी विदेशातील अनेक प्राध्यापक आणि विद्वान व्यक्तींसोबत भारताच्या विविध प्रश्नांवर आपले मत मांडतांना दिसतात. त्यातील काही भाग मी पाहिले आहेत. मुळात मला त्यात रागां भारताची कोणतीही सबळ बाजु मांडतांना दिसत नाही. बहुतांश वेळ भाजपा ला दोष देण्यात जातो. पण काल परवाच्या या भाषणात रागां म्हणतात
To fight elections, I need institutional structures, I need a judicial system that protects me, I need a media that is reasonably free, I need financial parity, I need a whole set of structures that actually allow me to operate a political party. I don't have them: Rahul Gandhi
रागां म्हणतात हे माझ्याजवळ नाही. म्हणजे यावर रागां चा विश्वास असेल तर
१. याशिवाय भारतीय निवडणुक जिंकणे शक्य नाही अशी त्यांची कबुली आहे.
२. हे सर्व असेल तर निवडणुक जिंकणे सोपे आहे.
३. या गरजा कधी निर्माण झाल्या?
४. या कोणी निर्माण केल्या आणि का?
५. ही पुर्वपरीक्षित पध्दत असेल तर काँग्रेस ने यावर किती निवडणुका जिंकल्या?
जरी मी रागां ला खुप महत्व देत नाही, तरी मला वैयक्तिक हे फार महत्वाचे वाटते. यामध्ये भारतीय राजकारणाचा खेळ सांगितला आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर एक दोन निवडणुका सोडल्या तर भारतीय समाजाला आणि मानसिकतेला कश्या प्रकारे हाताळले जाते, याचे चित्रण कळत नकळत रागां यांनी सागितले आहे. तसं पाहता कोणताही देशपातळीवरील नेता इतर देशात आपण आपल्या देशात कसे राजकारण खेळतो ते स्पष्ट करुन सांगत नाही. कारण काही बाबी सतत गोपनीय असतात. जरी जगजाहीर असतील तरी! विषेशतः ईंदिरा गांधी यांचे राजकारण सुरु झाल्यापासुन हा टप्पा सुरु झाल्याचे आपल्याला जाणवेल.
१. संस्थात्मक रचना - भारतीय समाजमनावर बदल घडविणार्‍या संस्था, आपल्या सोईच्या राजकीय पक्षांच्या मनाप्रमाणे चालतील अश्या प्रकारे त्यांची रचना आणि व्यवस्थापन तत्कालीन सरकारांनी केलेले आपणास दिसुन येईल. यात समांतर राजकीय, अराजकीय संस्था उभारणी करणे, त्यात आपल्या मताच्या आणि भविष्यातील राजकीय फायद्याच्या व्यक्तींना पदभार देणे सामील आहे. अगदी संसदेत सुध्दा आपल्या सोईचे कायदे करुन घेतले जातात.
२. न्यायिक पाठबळ - जे माझ्या आणि माझ्या सहाकार्‍यांना त्यांच्या सर्व घटनाबाह्य कार्यात कायदेशीर मार्गाने मदत करतील, आवश्यक असेल तिथे दिरंगाई करतील. आठवा आपल्या नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे खटले.
३. माध्यम - भारतात माध्यम हातात असणे किती महत्वाचे आहे ते वेगळे सांगणे न लगे.
४. आर्थिक बाजु - कोणतिही निवडणुक असो त्यात किती पैसा लागतो ते आपणास माहित आहेच. तो कसा आणावा लागतो त्याच्या अनेक सुरस कथा आपण सर्वांनी ऐकल्या आहेत.
५. एक संपुर्ण रचना जी मला माझा राजकीय पक्ष माझ्या मनाप्रमाणे चालवु देईन - यात तर अमर्यादित स्वातंत्र्य आणि अधिकार आहेत.
खरे तर हे भारतीय राजकारणाचे सत्य आहे. हे पाहिल्यावर मला वाटते की मोदी शहा जोडगोळीने काय हिसकावले आहे? काँग्रेस मुक्त भारत म्हणजे काय हे यातुन स्पष्ट होते. बाकी सोशल संस्थळावर आणि माध्यमांवर जे काही चालते तो म्हणजे सावळा गोंधळ आहे.

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

5 Apr 2021 - 8:27 am | उपयोजक

मुद्देसूद

सध्याचा तोच प्रॉब्लेम आहे..
हे सगळे हातात असून देखील अपारंपरिक मार्ग वापरून विरोधक सत्तेत आले, आणि आता बाकीचे मार्ग पण हातातून गेलेत.

हाच मोठा प्रॉब्लेम आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे काँग्रेस कडे आर्थिक पाठबळ आता नाही. कारण बिझनसेस आता हरणाऱ्या घोड्यावर डाव लावायला तयार नाहीत. रागा चा मुख्य प्रश्न हे सगळं वाईट आहे वगैरे नाहीये, तर हे त्याला कुणी देत नाही हा आहे. हे म्हणजे एखाद्या हरणाऱ्या बिझनेसमन ने मला कुणी कर्जच देत नाही असा कांगावा करणे असं आहे.

मुक्त विहारि's picture

5 Apr 2021 - 10:01 am | मुक्त विहारि

+1

उपयोजक's picture

6 Apr 2021 - 7:45 am | उपयोजक

रागा चा मुख्य प्रश्न हे सगळं वाईट आहे वगैरे नाहीये, तर हे त्याला कुणी देत नाही हा आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Apr 2021 - 12:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

रागा तोच राग पुन्हा पुन्हा आळवताना दिसतात असे ह्यांचे मत. पिनाक्याने म्हंटल्याप्रमाणे काँग्रेसकडे पुर्विसारखे आर्थिक पाठबळ नाही. दुसरे म्हणजे काँग्रेसची मानसिकता ही "जैसे थे" आहे. २० वर्षापुर्वी मोदी-शहा-गडकरी वगैरे मंडळी राज्यस्तरावर होती.मग हे लोक केंद्रात गेले. २० वर्षपुर्वी काँग्रेसमध्ये जे वरिष्ठ पातळीवर जे नेते होते, जवळपास तेच लोक आज आहेत. सोनिया/दिग्विजय्/कपिल सिब्बल वगैरे. प़क्षात संघटनात्मक बदल होत नाहीत तोवर हे असेच चालू राहील. किंवा सत्ताधारी पक्ष चुका करण्याची वाट बघत बसणे हा एक पर्याय.

साहना's picture

6 Apr 2021 - 12:36 am | साहना

"To fight elections, I need institutional structures, I need a judicial system that protects me, I need a media that is reasonably free, I need financial parity, I need a whole set of structures that actually allow me to operate a political party. I don't have them: Rahul Gandhi"

भारतांत मी काम करत होते तेंव्हा काही वेळा लोकांची मुलाखत घेण्याची वेळ यायची. काही मंडळी येऊन मग "बिग डेटा", "ओब्जेक्त ओरिएंटेड" अश्या संज्ञा फेकत राहायचे. ह्यांना ओ का ठो ठाऊक नव्हते. पण शब्द फेकायचे.

राहुल गांधी हिंदी भाषेंत सांगायचे तर **या आहेत. आणि हे अतिशय विनम्र पणे मी सांगते. राहुल गांधी ह्यांच्यासाठी नेहरू, मोहनदास, इंदिरा, राजीव ह्यांच्या आत्म्यानी सुद्धा जरी प्रकट होऊन प्रचार केला, कुबेराने जरी आपली धनसंपत्ती ह्याच्या पायाशी ओतली तरी हा माणूस विलेक्शन सपाटून हरेल.

रेल्वेच्या संडास मध्ये जे हायजिन चे लेव्हल असते तितकीच नेतृत्व क्षमता राहुल ह्यांच्यांत आहे. शेतांत उभ्या केलेल्या बुजगावण्याने स्वतःला शेताचा मालक समजावे किंवा गणपतीच्या मूर्तीने समोर ठेवलेला नेवेद्य आपल्यासाठीच आणला आहे अशी अपेक्षा ठेवावी असे राहुल गांधी ह्यांचे झाले आहे. काँग्रेस हि देशाला लागलेली कीड आणि सिब्बल, चिदंबरम, आणि अन्य सर्व नेते हे त्या किडीच्या मदतीने देशावरील परजीवी आहेत. राहुल गांधी हि त्यांची उत्सवमूर्ती जिला पुढे काढून ते नाचतात.

मुंबईतील एक नामवंत खासदार आमच्या कॉलेज एका समारंभांत आले होते डिनर वेळी तेंव्हा कुणी तरी राहुल हा विषय काढला. त्यांनी सांगितले कि राहुल हे प्रत्यक्षांत विद्वान आहेत. त्यांचा व्यासंग दांडगा आणि विविध गोष्टींची समज चांगली आहे पण नेतृत्व क्षमता नाही, वक्तृत्व क्षमता नाही आणि पुस्तकी ज्ञानावर जास्त भर देऊन आहेत. प्रियांका गांधी ह्यांच्यात तर काहीही गुण नाहीत. काही चाणाक्ष काँग्रेसी मंडळींनी हे हेरून राहुल ह्यांना त्यांच्याच एका विश्वांत गुरफटवून ठेवले आहे त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

Rajesh188's picture

6 Apr 2021 - 12:53 am | Rajesh188

BJP नी किती तरी वर्ष दहाचा आकडा पण गाठला नव्हता.
काँग्रेस मुळे bjp सत्तेवर नाही तर फक्त आणि फक्त बाबरी मुळे सत्तेवर आहे
अडवाणी नी साहेबांची कृपा आहे. .
त्यांच्या पुढे रोज नतमस्तक bjp नेत्यांनी झाले पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2021 - 8:12 am | श्रीगुरुजी

BJP नी किती तरी वर्ष दहाचा आकडा पण गाठला नव्हता.

आपल्या पराकोटीच्या अज्ञानाचे प्रत्येक प्रतिसादात लाजिरवाणे प्रदर्शन करण्याची तुमच्यावर कोणी सक्ती केली आहे का?

जर निधर्मांधांनी लांगूलचालन करून परमावधी केली नसती तर हिंदूंना धर्मांधांची भीती वाटलेच नसती, आणि मग ते गेलेच नसते भाजपच्या कळपात..

त्यामुळे हे राहुलच्या पूर्वजांचे पापच आहे.

सत्तेविना राजकारण करण्यात काही विशेष अर्थ उरत नाही. याचं कारण काहीही असो. हे सर्व राजकीय पक्षांसाठी लागू आहे.
अर्थात् सत्ता ही केवळ देशप्रमुख आणि मंत्रीमंडळ यांच्याच कडे असते काय? मला वाटतं जिथे-जिथे मॅनेजमेंट असेल तिथे-तिथे सत्तेचा शिरकाव असतो.

सर्व रचनात्मक संस्था, आर्थिक स्त्रोत आणि प्रसारमाध्यमे ही सत्तेची गुलाम असतात/बनतात. चांगल्या उद्देशांनी सुरू झालेल्या अनेक संस्था, पैसा आणि सत्तेची ताकद आल्यावर भरकटतात कारण, तो पैसा आणि ती ताकद स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्याची प्रबळ ईच्छा. ओरबाडून फायदा लाटण्याची ही वृत्ती समाजाची अधोगती दर्शवते. चांगले-वाईट / योग्य-अयोग्य ही जीवनमूल्य झालीत. त्याचा विचार करणंच सद्यकाळात प्रतिगामी ठरवल्या जातं.
पण ती म्हण "जशी प्रजा, तसा राजा" अशी नाहीये ना? सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना लालसी बनवणं हे वरूनच सुरु होतं.

आता हे सर्व बदलण्यासाठीसुद्धा तोच मार्ग नाही काय? सत्ता मिळवून वरून सर्व बदल करण्याची सुरुवात केली तर कदाचित पुढच्या ३ पिढ्यांनंतर हे चित्र जरा बदलेल. आंब्याचं रोप लावल्यानंतर त्याचे आंबे पुढच्या पिढीला मिळतात, तसं हे आहे. अर्थात् बदल घडवायची ईच्छा असणारा आणि तसे प्रयत्न करणारा, सहजपणे हे करू शकेल असे मुळीच नाही. जी बांडगुळं आत्ताच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत ती अस्तित्त्वासाठी विरोध करणारच. किती वेगवेगळ्या पातळींवर असे बदलाचे प्रयत्न करावे लागतील आणि स्वतःची सत्ताही वाचवून ठेवावी लागेल? कायद्याचा बडगा आणि तारेवरची कसरत.

पण कायद्याचा बडगा हा बंधनं घालू शकतो, गुन्हा रोखू शकतो. माणसांची वृत्ती घडवण्याचं काम खरंतर शिक्षक आणि समाजसुधारक करत लोकशिक्षणाच्या माध्यमातून करत असतात. धीरोदात्त व्यक्तींच्या प्रभावातून, अनुकरणातून लोकं आपली वागणूक हळूहळू बदलतात. लोकांच्या बखोटीला धरून नीट मार्गाला लावणारी उदात्त व्यक्तीमत्व समाजपरिवर्तनासाठी खूप गरजेची असतात. परिवर्तनाचं कार्य हे सत्ता, समाजसुधारक आणि शिक्षक यांच्या एकत्रित आणि एक-समवेत केलेल्या प्रयत्नांतून शक्य होईल.

वैयक्तीक रित्या आपण आपली वृत्ती सांभाळून कर्तव्य करणं जास्त श्रेयस्कर. जगात आधी अनेक अडचणी आहेत. कमीत कमी आपल्याकडून तरी त्यात आणिक काही भर नको हेही नसे थोडके.