भेळ..... तर फक्त निमित्त आहे....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
21 Mar 2021 - 2:11 pm

हा धागा, अस्मितेसाठीच काढला आहे...धागा अराजकीय आहे... मराठी भाषा, हवी तशी वळवता येत असल्याने आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असल्याने, खूप गहनविचार न करणेच उत्तम...

खूप दिवसांनी, ठाण्याला, बहिणीकडे भाऊबीजेसाठी, सगळी भावंडे जमलो होतो. मामलतदाराची मिसळ, सकाळीच खाल्ली होती.

तशी मला ही मिसळ अजिबात आवडत नाही. म्हणजे, आधी आवडत होती पण, सध्या घरीच, खिमामिसळ बनवत असल्याने, आता ही शाकाहारी मिसळ खावीशी वाटत नाही. एकदा प्रयोग म्हणून, कोळंबीमिसळ पण बनवून बघीतली, पण, खिमामिसळ ती खिमामिसळच...

आता संध्याकाळी काय खायचे? ह्यावर दुपारी 4 नंतर चर्चासत्र सुरू झाले..चर्चा करता करता, गाडी आधी उपमा, पोहे, शिरा, थालीपिठे, बटाटेवडे, भजी, इडली, डोसे, (आजकाल, इडलीडोसे, यांचे तयार पीठ मिळते..पण, आमच्या घराण्यात ते कुणालाच पसंत पडत नाही, त्यात कानडी चव नसते) असे करता करता, भेळ, हा मेन्यू फिक्स ठरला आणि भेळ खायला, तळापळीला जायचे नक्की ठरले...

वैयक्तिक सांगायचे तर, भेळ हा पदार्थ बाहेर रेडीमेड खायच्या लायकीचा नाही.भेळेची सामग्री ही घरीच बनवायची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्यात हातभार लावून मग, बागेत जाऊन खायची गोष्ट आहे. (कोजागिरीच्या रात्री मात्र, गच्चीतच खुलते...तो अपवाद असतो)

तळापळीला, एक चक्कर मारून, एके ठिकाणी भेळ खायला बसलो.मला विकतची भेळ आवडत नाही, हे आमच्या सौ.ला माहिती असल्याने, तिने सांगीतले की, तिला जास्त भूक नसल्याने ती माझ्या बरोबर भेळ खाईल.(बायकांची(च) जात जास्त चतुर असते.)

बोलता बोलता, कुठली भेळ चांगली? ह्यावर गाडी आली आणि जो तो आपल्याच गावातील भेळ कशी चांगली? हे पटवून द्यायला लागला...

भावंडे पण भरपूर असल्याने ते सगळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पसरले आहेत...

एकजण म्हणाला, भेळ खावी ती आमच्या कोल्हापुरचीच...

दुसरा म्हणाला की, आमच्या सारसबागेत भेळ चांगली मिळते

तिसरा म्हणाला, शिवाजीनगर स्टेशनला भेळ चांगली मिळते

चौथा म्हणाला, आमच्या सोलापूरला भेळ चांगली मिळते

पाचवा म्हणाला की, भेळ खावी ती नागपूरलाच

कुणी यवतमाळ, कुणी अकोला, कुणी वर्धा...

जो तो आपापले गाव घेऊन बसलेला ...

शेवटी मी इतकेच म्हणालो की, तुम्ही सगळे भेळ खायला जात होतात की हिरवळ बघायला? कारण जिथे हिरवळ जास्त तिथे भेळ किंवा इतर तत्सम पदार्थ चांगलेच लागतात....

समाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

21 Mar 2021 - 9:48 pm | अनन्त्_यात्री

असणारे नाणे कसे दिसत असेल यावर मराठीत गहन विचार करत तलावपाळीच्या हिरवळीकडे बघत भेळ खावी असे वाटू लागले आहे :)

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 8:40 am | मुक्त विहारि

किंवा, तुमच्या गावातील, भेळ खायला एखादा कट्टा ठरवलात तरी चालेल...

चौकटराजा's picture

22 Mar 2021 - 8:52 am | चौकटराजा

हिरवळीच्या जवळ चांगली भेळ नसते काही ! चांगली हिरवळ भेळ व पाणीपुरीच्या आसपास असते ! पहिजे तर भेळ वाल्यालाच विचारा !!

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 9:22 am | मुक्त विहारि

पाणीपुरीचा धंदा सगळ्यात मस्त ....

खरं तर, मी पाणीपुरीचीच गाडी टाकणार होतो.पुर्या उरल्या तरी, ओमप्रकाशची आयडिया वापरून, घरी खाता येतात. पण बायको नाही म्हणाली .... (बायकांचीच जात जास्त चतुर असते.)

Rajesh188's picture

22 Mar 2021 - 12:50 pm | Rajesh188

पण बायकांचा सिक्स सेन्स खूप जागृत असतो.
त्यांना भविष्य कळत.
त्या मुळे सावधान

खिमामिसळीची पाकक्रुति पोस्ट करा

तुषार काळभोर's picture

22 Mar 2021 - 12:40 pm | तुषार काळभोर

खिमा मिसळची पाकृ किमान एक फोटो तरी पायजेल!

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 1:49 pm | मुक्त विहारि

चांगला परतलेला खिमा, अधिक तांबडा रस्सा, अधिक फरसाण,

आणि वरील मिश्रणावर, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर...

खिमा-मिसळ तयार

तुषार काळभोर's picture

22 Mar 2021 - 5:30 pm | तुषार काळभोर

असं मी खातो कधी कधी घरी. विदाउट खीमा. फक्त घरच्या मटणाचा रस्सा, त्यात फरसाण / भेळ = जन्नत!

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 7:39 pm | मुक्त विहारि

आता पुढच्या वेळी, खिमा घालून बघा...

नंतर शाकाहारी मिसळ खावीशी वाटत नाही...

विजुभाऊ's picture

22 Mar 2021 - 11:57 am | विजुभाऊ

डोंबोलीच्या गोखले रोडवर चांगली भेळ मिळते

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2021 - 11:58 am | चौथा कोनाडा

भेळ तर एव्हरग्रीन मेन्यू ! माझा खुप आवडता !
धाग्यातले शेवटचे निष्कर्षात्मक विधान भारी आहे!

रंगीला रतन's picture

22 Mar 2021 - 12:10 pm | रंगीला रतन

तुमचे लेख व भारंभार प्रतिसाद वाचून माझ्या भेजाचा खिमा झालाय. त्याची मिसळ बनवता येईल काय?
कृ. ह. घ्या. :)

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2021 - 12:38 pm | चौथा कोनाडा

रंगीला रतन,
😀