संकल्प

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
22 Jan 2021 - 1:51 pm

समेटून सारे थागे
सुर्य अस्ताला निघाला
पुन्हा येण्याचा त्याने
संकल्प सोडला

झाली निवृत्ती
वेळ निवांत मीळाला
काय भोगल सोडल
याचा हिशेब कळाला
उरल सुरलं पुर्ण करावं म्हणतो
जायच्या आधी काही लिहावं म्हणतो

काय अन कीती लिहावं
याला काही अंत नाही
आवडेल कुणाला, कुणाला रुचेल
कुणी वाचेल कुणाला पटेल
याचा खेद किंवा खंत नाही

इथल सगळं इथेच सोडून
पुढल्या मुक्कामी निघावं
पाऊलखुणा मीटण्या आधी
म्हटलं जरा थोडंस लिहाव

मागे वळून पहाता
पाश जणू कोळ्याचे जाळे
कुठुन करू गोळा सुचेनासे झालेhi
न तोडता धागे आवराव वाटलं
जायच्या आधी लिहून ठे़वाव वाटलं

आले पीक दाण्यावर खळ्यात आडवे पडले
ज्याच्ये त्याला देवून पुढे जायाचे ठरले
काय भोगलं ,काय पाहीलं
जरा जाण्या आधी लिहाव वाटले

येऊ म्हणता येत नाही
जाऊ म्हणता जात नाही
तरी लिहावं म्हणतो
संकल्प सोडावा म्हणतो

२९-१०-२०२०

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Jan 2021 - 8:53 pm | प्रचेतस

लिहीत राहा.

चांदणे संदीप's picture

22 Jan 2021 - 9:14 pm | चांदणे संदीप

लिहिण्यात जरा गडबलीये. पण आवडली.

सं - दी - प

Yogesh Sawant's picture

27 Jan 2021 - 11:58 am | Yogesh Sawant

"मोकलाया दाही दिशा" ची आठवण झाली. ती लिंक मुद्दाम दिली नाहीये. कारण दोन्हीत तुलना झाली असती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jan 2021 - 9:02 am | ज्ञानोबाचे पैजार

"मोकलाया" ची बरोबरी कोणीच करु शकणार नाही. तो मिपाच्या इतिहासातला धृवतारा आहे.

ही कविता ठीक आहे, लिहीताना थोडी गडबड केली आहे पण त्यातल्या भावना पोचल्या

पैजारबुवा,

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jan 2021 - 12:40 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अवांतरः माझी मुलगी लहान होती तेव्हा तिला मनाचे श्लोक शिकवायचो, तेव्हा ती नेहमी असं म्हणत असे:
मना सत्य संपल्क ध्यानी धरावा
त्याची आठवण झाली :)

कर्नलतपस्वी's picture

2 Feb 2021 - 12:19 pm | कर्नलतपस्वी

सर्वानां धन्यवाद, एक वाट बदलण्याचा प्रयत्न.