डेकोरम

साहना's picture
साहना in काथ्याकूट
22 Jan 2021 - 5:27 am
गाभा: 

ट्रम्प तात्या ह्यांचा अमेरिकन विलेक्शन मध्ये दारुण पराभव झाला. अर्थांत दारुण हे विशेषण इथे अनावश्यक होते पण तात्यांच्या हेकेखोर आणि असंतुलित व्यवहाराने तो पराभव दारुण ह्याच श्रेणीत गेला. तात्यांनी इलेक्शन तर घालवलेच पण रुडी सारख्या अतिवृद्ध आणि थकल्या वकिलाच्या नादी लागून सर्वत्र आपली शोभा वारंवार करून घेतली. तात्यांच्या नादात सिनेट सुद्धा रिपब्लिकन लोकांच्या हातून गेली.

तात्यां कडून बरीच अपेक्षा होती. त्यामानाने अनेक ठिकाणी त्यांचे अंदाज खूप बरोबर होते. उत्तर कोरिया बरोबर आणि इराण बरोबर त्यांनी युद्ध तर टाळलेच पण इराण ला जिथे हवा होता तेंव्हा हिसका सुद्धा दाखवला. पाकिस्तान ला त्यांनी अचूक पाने फ्रॉड म्हणून ओळखले आणि भारताची व्यापारी पद्धत सुद्धा मूर्खपणाची आहे हे त्यांनी ताडले. पण त्याच वेळी त्यांचे बोलणे हे बालिश पणाचे आणि असंतुलित वाटत होते. व्यापार, निर्वासित, चीन, इत्यादी अनेक विषयांवर एक तर त्यांच्या पॉलिसी मूर्खपणाच्या ठरल्या नाहीतर त्यांचे सर्व चमचे पूर्णपणे अकार्यक्षम ठरले. भारतीयांच्या इम्मीग्रेशन वर ट्रम्प ह्यांनी आपल्या मिलर ह्या हस्तका करावी खूप निर्बंध अनु पहिले पण त्यातील १००% निर्बंध शेवटी कोर्टाने बाहेर फेकले. शालभ कुमार ह्या संधी साधू तथाकथित हिंदुत्ववादी भारतीयांकडून ट्रम्प ह्यांनी ह्या नादात सुमारे १ मिलियन रुपये सुद्धा उकळले.

पण ट्रम्प ह्याच्या पराभवाचे कारण माझ्या मते वेगळेच आहे. आणि भाषा हा विषय घेऊन मी ते समजावणार आहे.

माझ्या मते ट्रम्प ह्यांच्या सर्व समस्यांचे मूळ हे त्यांच्या "डेकोरम" च्या अभावांत आहे. डेकोरम हा शब्द लॅटिन शब्दातून आला आहे. ग्रीक आणि रोमन तत्त्ववेत्त्यांनी ह्यावर विविध भाष्ये केली आहेत. मराठीत कदाचित ह्याचे भाषांतर तारतम्य असे केले जाऊ शकते. आपण कुठे उभे आहोत, कुणाशी बोलत आहोत हे लक्षांत घेऊन आपली वागणूक ठेवावी असे ग्रीक तत्ववेत्ता सिसेरो ह्याने लिहिले होते. आपण कितीही शक्तिशाली असलो आणि श्रीमंत असलो तरी समाजांत वावरायचे असेल तर डेकोरम अत्यंत महत्वाचा आहे. पण ह्याला काहीही फॉर्मुला नाही. उदाहरणार्थ आपण श्रीमंत असाल आणि कुना गरीबाच्या अंत्यविधीला जात असाल तर उगाच मोठे कपडे वगैरे घालून जाऊ नये, अत्यंत साधे कपडे घालून इतर लोकांप्रमाणेच जावे. पण आपण विद्वान असाल आणि मुर्खांच्या सोबतीत असाल तर मात्र आपण मूर्खां प्रमाणे वागू नये, इथे आपण आपली विद्वता सांभाळून राहणे आवश्यक आहे.

रोमन व्हर्चू

रोमन तत्त्ववेत्त्यांनी काळाच्या ओघांत नेते मंडळींसाठी काही नियम लिहिले होते. अर्थांत ह्या प्रकारचे नियम "धर्म" ह्या स्वरूपांत भारतात सुद्धा होते. राजधर्म वगैरे. रोमन नियम हे फक्त राजकारणी किंवा धार्मिक नेत्यांसाठी नसून अगदी चोरांचे सरदार किंवा माफिया मंडळी साठी सुद्धा आहेत. हे नियम पळाले गेले नाहीत तर त्या नेत्याचा ह्रास होतो असे म्हटले जाते.

एकूण १२ रोमन वर्चू आहेत. त्यातील एक म्हणजे "ग्रॅव्हिट्स" ( गांभीर्य ). काही विषयांवर गांभीर्याने विचार करणे तसेच आपण गंभीर आहोत हे जनतेला दाखवून देणे आवश्यक आहे. आपण माफिया दोन सुद्धा असाल तर काही विषयांना आपण किती गांभीर्याने घेतो हे आपल्या कृतीतून आपल्या चमच्या लोकांना समजले पाहिजे.

ट्रम्प ह्यांच्या स्वभावांत गांभीर्य अजिबात नव्हते. कॉवीड विषयाला त्यांनी स्वतः गांभीर्याने घेतले नाही वर उडवा उडवीची उत्तरे दिली. एक राजकारणी म्हणून हे अत्यंत मूर्खपणाचे काम होते. ट्रम्प ह्यांचे स्वतःचे विचार काहीही असले तरी त्यांनी कोविड चा तात्काळ बाऊ करून चीन ला दोषी ठेवून युद्धा प्रमाणे तयारी करायला पाहिजे होती. हे होऊन सुद्धा जर लोक मेले असते तर "मी प्रयत्न करून अनेक जीव वाचवले" अशी ओरड ते करू शकले असते आणि समाज कोविड प्रकरण फुस्सस ठरले असते तर "मी तयारी केली म्हणून काहीही घडले नाही' म्हणून श्रेय आपल्या पदरांत पडून घेऊ शकले असते.

ह्या उलट मोदी ह्यांचा स्वभाव आहे. कोविड चे भारतांत काहीही झाले तर मोदी ह्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे हे दाखवून दिले.

व्हेरिटास : सत्यवादी पणा

अर्थांत राजकारणी मंडळी सतत खोटे बोलत असली तरी सत्यवादी पणाचा आव आणणे हे खूप महत्वाचे आहे. किमान हा मनुष्य १००% काहीही बोलूस शकतो असे आपल्या समर्थकांना तरी वाटू नये ह्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

ट्रम्प ह्यांची भाषणे पूर्णपणे असंतुलित प्रकारची होती. अनेक विषयावर त्यांनी धांदात पणे खोटारडे पणा केलाच पण तो खोटारडेपणा वारंवार लोकांच्या समोर सिद्ध सुद्धा झाला. ट्रम्प ह्यांनी आपले आर्थिक व्यवहार सार्वजनिक करण्याचे वचन दिले होते ते त्यांनी शेवट पर्यंत केले नाही. त्यांच्या कट्टर समर्थकांना सुद्धा त्यांचा हा खोटारडे पणा सहज दिसून येत होता.

क्लेमेंशिया : मृदुपणा

योग्य त्या वेळी नेत्याच्या स्वभावांतून मवाळपणा लोकांना जाणवला पाहिजे. हा दयाभाव आणि मृदूलता वाजपेयी ह्यांच्या स्वभावांतून वारंवार जाणवायची आणि मोदी ह्यांच्या स्वभावांतून सुद्धा जाणवते. बाळ ठाकरे ह्यांनी सुद्धा सुनील दत्तना मदत करून असाच दयाभाव दाखविला होता. कट्टर विरोधक असलेले विविध नेते अनेकदा एकमेकांची मदत करताना दिसून येतात.

ट्रम्प ह्यांच्या स्वभावांत हा गुण अजिबात नव्हता. आपल्या पत्नीबरोबर सुद्धा त्यांचा व्यवहार तुसडे पानाचा होता. आपल्या लठ्ठ मुलीबरोबर ती लठ्ठ आहे म्हणून सार्वजनिक ठिकाणी दिसून येणे ते टाळत होते. त्यांचा बरोबर जे सहकारी होते त्यांना सुद्धा त्यांनी वारंवार नावे ठेवली. त्याशिवाय मेक्सिकन निर्वासितांची मुलें आईवडिलांपासून त्यांनी हिरावून तर घेतलीच पण वरून अश्या गोष्टींचे उघड पणे समर्थन सुद्धा केले.

ओबामा ह्यांनी सुद्धा अश्याच प्रकारे निर्वासित मुलांना छळले होते पण त्यांनी आपल्या स्वभावातून कधीही ते जाणवू दिले नाही त्यामुळे त्यांचा स्वभाव लोकांना मृदू पणाचा वाटत होता.

Humanitas : माणूसपण

म्हणजे संस्कृती. आपल्या नेत्याला चांगली आवड आहे. काव्य शास्त्र विनोद आणि अध्यात्मात ते रुची दाखवतात हे जनतेला दाखवणे आवश्यक आहे. म्हणूनच स्मग्लर किंवा माफिया लोक चांगला पांढरा सूट वगैरे घालून सिगार ओढतात. आपल्या नेत्याला संगीत, चित्रपट, वाचन इत्यादीत रुची आहे हे लोक पाहतात तेंव्हा त्यांना त्या माणसावर विश्वास ठेवावा स वाटतो.

मोदी हे योग करताना, ध्यान करताना किंवा गंगा आरती करताना जे फोटो दाखवले जातात त्यातून हेच जनतेच्या मनावर बिंबवले जाते. किंवा मोदी हे जेंव्हा अतिशय छानपणे पोशाख करून फोटो काढून घेतात तेंव्हा सुद्धा त्यांची माणुसकी त्यातून दिसते.

ट्रम्प ह्या दृष्टीने अत्यंत भिकार दर्जाचे माणूस होते ह्यांत शंकाच नाही. गोल्फ (आणि परस्त्री) सोडून त्यांना इतर काहीही आवड होती असे दिसून आले नाही. ते भिकार दर्जाचे फास्टफूड खाताना दिसून यायचे. त्यांची प्रॉपर्टी वर अत्यंत निकृष्ट दर्जाचे आर्ट असायचे आणि मागील १०० वर्षातील ते पहिले असे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांच्याकडे कुत्रा नव्हता.

--

रोमन लोकांनी तसेच भारतीयांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट ओळखली होती. ती म्हणजे चिन्हे. राजदंड, मुकुट, कमंडलु, मंगळसूत्र, काळे कपडे इत्यादी गोष्टी काही महत्वाच्या गोष्टीचे द्योतक आहेत. राजाला फक्त राजा असून चालत नाही तर डोक्यावर मुकुट घालून कारभार पाहावा लागतो. आपण शंकराचार्य असून चालत नाही सोवळे आणि दंड हातांत असला पाहिजे. सौभयवतीने मंगळसूत्र धारण केले पाहिजे तर जे लोक शोक व्यक्त करीत आहेत त्यांनी पांढरे किसून काळे कपडे घालणे आवश्यक आहे. ब्राम्हणाने यज्ञोपवीत तर शीख माणसाला पगडी हि पाहिजेच. ह्या सर्व गोष्टी एक प्रतीक आहेत पण त्या प्रतीकांच्या मागील अर्थ सुद्धा त्या प्रतीकांचा मालकांना समजून घेणे आवश्यक आहे. इंग्लंड मध्ये आजही जज मंडळी विग घालतात, पोप आजही ती विचित्र टोपी घालतात आणि सरदार लोक आजही कृपाण बाळगतात, अनेक मठांचे स्वामी एकभुक्त आहेत आणि अनेक भारतीय राजनेते खादीचे जॅकेट घालतात.

हि प्रतीके नसेल आणि माणूस लायक असेल सुद्धा तरी जास्त काळ त्या पदांत टिकून राहू शकणार नाही असे रोमन लोकांचे म्हणजे होते आणि माझ्या मते भारतीयांचे अनुभव सुद्धा असेच असतील ( पहा : राम रहीम, ४ किलो सोने घालणारे नेते, राखी सावंत इत्यादी).

ह्या उलट आपण शिवाजी महाराजांचे उदाहरण घ्या माझ्या मते रोमन वर्चू च्या १२ पैकी १२ गुणात महाराज सहज पणे प्रवीण होते असे किमान कथांवरून तरी वाटते. इतर नेते जसे संभाजी महाराज असो व बाजीराव पेशवे किंवा महाराणा प्रताप, ते सुद्धा १२ पैकी किमान ६-७ गुण आत्मसात करणारे आहेत असे वाटते.

--

ट्रम्प हे नक्की राष्ट्राध्यक्ष म्हणून कसे होते हे काळाच्या ओघांत जास्त स्पष्ट होईल. पण माणूस म्हणून ते आदरास प्राप्त होतील असे मला तरी वाटत नाही. मी स्वतः लिबरटेरिअन असल्याने ट्रम्प किँवा बायडन ह्यांचा भांडणात माझा काहीही कुत्रा नाही.

महत्वाच्या स्थानात असण्यासाठी डेकोरम हा अत्यावश्यक आहे आणि अनेक वेळा हा डेकोरम कर्मठपणा, रीतिरिवाज, कर्मकांडे ह्यातून येतो. ह्यांच्याशिवाय माणूस जास्त काळ लोकांच्या प्रेमाला आणि समर्थनाला प्राप्त होत नाही. ट्रम्प ह्यांचा दारुण पराभवातून हेच स्पष्ट झाले आहे असे मला वाटते.

टीप : वर्चू जनतेला दाखवणे आणि प्रत्यक्षात असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, माझ्या लेखांत मी वर्चू चा दिखावा असणे जास्त महत्वाचे आहे असे म्हणत आहे.

[१] http://www2.hawaii.edu/~lanning/maximus.html

roman trump

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

22 Jan 2021 - 7:56 am | श्रीरंग_जोशी

डेकोरमची संकल्पना उत्तमपणे सोदाहरण समजावून सांगितली आहे. लेख आवडला हेवेसांनल.

सौंदाळा's picture

22 Jan 2021 - 12:56 pm | सौंदाळा

लेख आवडला.
माणूस म्हणून ट्रंप हे मला तरी स्वार्थी आणि दीर्घद्वेषी वाटतात.

बाकी इथे भारतातून आम्हाला अनुभव येत नाही पण नेट बातम्यांतूूननन ओळख होते.
२५०+ जागांविरुद्ध २१६ जागा मिळणे म्हणजे दारूण पराभव नाही.

ट्रम्प इतक्याच मतांनी जिंकले होते तेंव्हा त्यांनी आपल्या यशाला "घवघवीत यश" असे संबोधित केले होते त्याच नियमाने लोक त्यांच्या पराभवाला दारुण पराभव म्हणत आहेत. पण "दारुण" हा शब्द मी निव्वळ मतांच्या फरकासाठी नाही वापरला तर त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्यासाठी वापरला आहे. ट्रम्प आणि त्यांचे वकील रुडी ह्यांनी एकूण ३० खटले विविध न्यायालयांत दाखल केले. ह्या ३० पैकी जवळ जवळ २८ खटले इतके निकृष्ट पद्धतीने मांडले गेले होते कि साक्षांत ट्रम्प च्या नियुक्त न्यायाधीशांनी सुद्धा ते दाखल सुद्धा करून घेतले नाहीत. सध्या टिकटॉक आणि इतर ठिकाणी ट्रम्प सपोर्टर अक्षरशः गळा काढून रडत आहेत.

माझ्या मते दारुण पराभव हे विशेषण ह्या साठीच लागू होत आहे.

Bhakti's picture

22 Jan 2021 - 1:42 pm | Bhakti

खुपच मस्त लिहिलंय.ओबामा आवडायचे नंतर डायरेक्ट ट्रम्प.. म्हणजे आयस्क्रीमनंतर बडीशेप खाल्यासारख वाटलं :)ते नवीन जे कोण आहेत ते सगळ्यात मुरलेले आहेत म्हणे!

त्या पेक्षा भारतीय लोकांना अमेरिका,ट्रम्प,ओबामा, बाईडन ह्यांच्या मध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
आणि कोणीच भारतीय लोकांची मत मागितली नाहीत तरी जबरदस्ती नी देत आहेत.
कमला मॅडम ला भारतीय म्हणणे हा त्या मधीलच एक प्रकार आहे.

मराठी_माणूस's picture

22 Jan 2021 - 3:22 pm | मराठी_माणूस

सहमत

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2021 - 5:48 pm | चौथा कोनाडा

हे नेहमीचं आहे, कुणाला तरी कश्यातरी निमित्ताने देव्हार्‍यात बसवायचे आणि हारफुले, कुंकूप्रसाद विकून आपल्या तुंबड्या भरायच्या (आजकालची सोशलमिडीया पत्रकारीता)

Rajesh188's picture

22 Jan 2021 - 3:37 pm | Rajesh188

मोदी हे corona विषयी गंभीर होते असा समज फक्त bjp कार्यकर्त्यांना आहे .
बाकी लोकांना नाही.
योग्य वेळी योग्य उपाय न योजल्या मुळे भारत corona च बळी ठरला हे सत्य आहे.
गुजरात दंगलीत जी रक्ताची होळी खेळली गेली आणि आणि गुजरात सरकार त्या वेळी राजधर्म पाळला नाही ,वाजपेयी ना मोदी ना राजधर्म ची आठवण करून द्यावी लागली होती हे लोकांच्या मनातून गेले नाही त्यांनी किती ही गंगा आरती केल्या तरी त्यांची प्रतिमा कधीच सुधारणार नाही.
जिथे जिथे मोदी चे उदाहरण दिले गेले आहे ते साफ चुकीचे आहे.

बाप्पू's picture

23 Jan 2021 - 12:44 am | बाप्पू

झाली सुरवात... मोदी नावाची कावीळ असणारी लोकं या धाग्यावर देखील आली..

पण डोळ्यावर (आणि बुध्दीवरही) एकदा का झापडे लावली की गल्ली चुकणारच...

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2021 - 5:45 pm | चौथा कोनाडा

अगदी खरे ! तारतम्याचा अभाव हेच तात्याच्या पराभवाचे कारण आहे.
सुरुवातीचा मोठा फॅन बेस त्यांच्या डोक्यात गेला आन कसे राजकारणात कसे "वाव"रायचे याचे तारतम्य विसरले गेले.
(इथे कै. अटलबिहारी वाजपेयींची हटकून आठवण येते. समाजात "वाव"रायचा त्यांचा सेन्स लोकांच्या मनात आदर मिळवून गेला)

रोमन वर्चू बद्दलचे लेखन तर सुंदरच. उदाहरणे देखील समर्पक. छान उजळणी झाली.

Rajesh188's picture

22 Jan 2021 - 6:25 pm | Rajesh188

सामाजिक जीवनात वावरताना तारतम्य असावे हे पटले.
सामाजिक जीवनात वावरताना एक मुखवटा धारण करावा लागतो.
तो मुखवटा एका समजस,सभ्य,संवेदनशील माणसाचा असावा म्हणजे लोकांमध्ये भ्रम निर्माण होवून ते तुम्हाला सभ्य व्यक्ती समजू लागतात.
पण मुखवटा आणि प्रत्यक्षात वागणे ह्या मध्ये जे अंतर निर्माण होईल ते किती दिवस लपून राहील.
देशाचा अध्यक्ष जे निर्णय घेतो त्या वरून त्याच्या एकंदरीत विचार श्रेणी ची जाणिव होते आणि ती जाणीव सामाजिक जीवनात किती ही तारतम्य वागण्यात,बोलण्यात त्यांनी ठेवले तरी मुळ चेहरा लपवता येत नाही.
Trump हरले त्याची कारणं अमेरिकन लोकच व्यवस्थित सांगू शकतील.
अमेरिकेचे हित कशात आहे ते तिथे राहणारे NRI
सांगू शकणार नाहीत.

गामा पैलवान's picture

22 Jan 2021 - 11:32 pm | गामा पैलवान

साहना,

रोमकालीन सद्गुणांची ओळख करवून दिल्याबद्दल आभार! :-)

ट्रंपूतात्यांबद्दल पुतीन व बशर अल असद यांची मतं पार वेगळी आहेत. ते तात्यांना पारदर्शक म्हणतात. इथे एक अवांतर इंग्रजी लेख आहे : https://www.rt.com/op-ed/513105-us-europe-china-biden-trump/

या लेखानुसार अमेरिका व युरोपचे संबंध बिघडायला ट्रंपूतात्या कारणीभूत नसून ते बऱ्याच आधीपासून बिघडले होते. या पार्श्वभूमीवर तात्यांच्या वर्तनाची संगती लेखकाने लावली आहे.

पारदर्शीपणा हा सद्गुण वा दुर्गुण ट्रंपूतात्यांच्या भाळी कधी लिहिला जाईल याची मला आजीबात कल्पना नव्हती. सत्य हे कल्पिताहून अद्भुत असतं हेच खरं.

बाकी आब ( = डेकोरम ) म्हणाल तर एक मोदी व दुसरे पुतीन मला जाम उजवे वाटतात. तर पद्च्युतांत दलाई लामा.

आ.न.,
-गा.पै.

पदच्युतांत बरेच लोक आहेत. ब्रिटन चे पंतप्रधान, कॅनडा, तुर्की, मलेशिया चे अध्यक्ष, पाकिस्तान आणि नेपाळ चे पंतप्रधान, राहुल गांधी.

पदच्युतांत बरेच लोक आहेत. ब्रिटन चे पंतप्रधान, कॅनडा, तुर्की, मलेशिया चे अध्यक्ष, पाकिस्तान आणि नेपाळ चे पंतप्रधान, राहुल गांधी.

हे विषय थोडे क्लिष्ट आहेत त्यामुळे इथे जास्त लिहीत नाही पण सत्य काहीही असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प ना युरोप संदर्भांत जे तारतम्य दाखवायला हवे होते ते, ते अजिबात दाखवू शकले नाहीत. ट्रम्प ह्यांची विविध मते (युरोप संदर्भांत) बरोबर होती पण त्यांनी ती बालिश पणे आणि असंबद्ध पणे मांडली त्यामुळे त्यावर काहीही ऍक्शन दाखवायला संपूर्ण अमेरिकन ऍडमिन मागे पडले.

उदाहरण द्यायचे झाले तर WW२ पासून जर्मनीत खूप अमेरिकन सैन्य आहे. जर्मनी अत्यंत शांतीप्रिय असून तिथे खरेतर अमेरिकन सैन्याला तळ ठोकून बसणे ह्याची गरज नाही. ह्यावर अब्जावधी पैसे खर्च होतात ते वाचले तर असतेच पण त्याचवेळी हे पैसे इतर सुरक्षा व्यवस्थेंत जाऊन युरोप जास्त सुरक्षित बनला असता. अनेक थिंक टँक्स नि ह्यावर विपुल लेखन आणि अभ्यास करून लिहिले आहे.

ट्रम्प साहेबानी हे ताडले पण त्यांनी मत मांडताना जर्मनीला फुकटे म्हटले, आणि जर्मनीने अमेरिकेला पैसे द्यायला पाहिजेत असे मत व्यक्त केले. त्याशिवाय अँजेला मर्कल ह्यांच्या संदर्भांत खाजगी बातचीत मध्ये विनाकारण हीन प्रकारची टिप्पणी केली. इथे ट्रम्प तात्यांचा अविर्भाव एखाद्या डॉन प्रमाणे होता जो एखाद्या बिल्डर ला फोन करून आधी शिवीगाळ करतो आणि नंतर प्रोटेक्शन मनी मागतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला साजेसे असे हे वर्तन नव्हते त्याशिवाय इतक्या बालिश पणे त्यांनी हा एकूण व्यवहार केला कि ह्या विषयावर ट्रम्प काही प्रमाणात बरोबर असले तरी त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. माझ्या मते इथे गांभीर्याचा अभाव होता. युरोप मध्ये अनेक ठिकाणी ट्रम्प विरोधांत निदर्शने झाली, विनोद व्यक्त केले गेले. खरेतर अमेरिकन राजकारणाच्या दृष्टीने ट्रम्प ह्यांना युरोप मध्ये शत्रू निर्माण करण्याची काहीही गरज नव्हती.

शांतपणे आपले मत मांडून आणि योग्य व्यक्तींची निवड करून ट्रम्प जर्मनीतील सैन्य मागे घेऊ शकले असते. पण शेवटी सैन्य मागे आले नाही, पैसे वाचले नाहीत पण आपली शोभा मात्र त्यांनी करून घेतली.

> एक मोदी व दुसरे पुतीन मला जाम उजवे वाटतात

मोदी ह्यांचा हात ह्या संदर्भांत कोणीही धरू शकत नाही. मोदी हे अडवाणी ह्यांना एखाद्या किड्या प्रमाणे बाहेत फेकू शकले असते पण त्यांना त्यांनी "मार्गदर्शक मंडळ" असे नाव देऊन बाजूला केले. राजकारणाच्या दृष्टिकोनातून हि खेळीअतिशय रूथलेस असली तरी त्याला झालर रोमन वर्चू चीच होती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jan 2021 - 10:24 am | ज्ञानोबाचे पैजार

आणि पटला देखिल, बरेसे मुद्दे विचार करुन आचरण्यासारखे आहेत.

तात्याचे वागणे बिनधास्त आणि फटकळ होते, पण त्यांचे काही विचार इतर अध्यक्षां पेक्षा वेगळे होते. उदा अमेरीका फर्ष्ट हे त्यांचे धोरण, किंवा करोना व्हायरसचा उघड पणे चायना व्हायरस संबोधणे, किंवा जागतिक आरोग्य संघटनेवर त्यांनी केलेला थेट हल्ला अशा गोष्टीं मूळे ते नेहमीच इतरांपेक्षा वेगळे वाटायचे.

कधी कधी ह्या डेकोरमच्या नावाखाली खोटं खोटं वागणारी लोकं पाहिली की चीड येते.
उदा. विमानतळावर विषेशतः के के ट्रॅव्हल्स च्या गाडीने अंतरराष्ट्रीय प्रवास करायला निघालेले लोक्स, किंवा मुंबई लोकलच्या प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास करणारे लोक्स किंवा तीन चतुर्थांश चड्ड्या घालून आणि हातात मोठ्या नळीचे कॅमेरे घेउन सहलीला निघालेले लोक्स कधी कधी डोक्यात जातात.

आणि मग अशा लोकांच्या पार्श्वभुमीवर तात्यांचे वागणे आवडून जायचे.

डेकोरम च्या बाबतीत अजून एक नाव म्हणजे "अमिताभ बच्चन" ज्या पध्दतीने "कौन बनेगा करोडपती" मधे त्यांचा वावर असतो त्याच्या १% जवळपास जाणे अजूनतरी कोणालाही जमले नाही. केवळ त्या माणसा करता म्हणून मी करोडपती बघतो.

पैजारबुवा,

अमिताभ बच्चन ह्यांचे नाव खरोखरच ह्या संदर्भांत घेतलेच पाहिजे. करोडपती फक्त त्यांच्या रुबाबावर चालते.

- शुद्ध हिंदीत ते बोलतातच पण त्यांना कविता, साहित्य ह्यांत रुची आहे हे स्पष्ट होते.
- ते एक परिवार चालवतात, त्यांचा परिवार बाहेरून तरी सुखी वाटतो.
- मित्रांना ते विशेष महत्व देतात. त्यांच्या कठीण काळी मुलायम सिंग नि त्यांना मदत केली त्यांची आठवण ते आज सुद्धा ठेवून आहेत.

ह्या आणि अनेक इतर गोष्टीतून अफलातून यश त्यांच्या पायाशी लोळण घेत असले तर लोकांचा विश्वास आणि प्रेम ह्या साठी ते पात्र ठरतात.

मराठी_माणूस's picture

24 Jan 2021 - 6:43 pm | मराठी_माणूस

हो "तीन चतुर्थांश चड्ड्या " हे फार म्हणजे फार डोक्यात जाते.

Rajesh188's picture

23 Jan 2021 - 12:30 pm | Rajesh188

Search...

vikas4974
vikas4974
28.02.2019
India Languages
Secondary School
answered
ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा ।काय भूललासी वरलिया रंगा।। अलंकार ओळखा.​

1
SEE ANSWER

ADD ANSWER
+5 PTS

Log in to add comment

vikas4974 is waiting for your help.
Add your answer and earn points.
Answer
4.0/5
17

Pranjalsingh64
Ambitious
59 answers
1.1K people helped
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥

कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥

चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

अर्थ:

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.डोंगा म्हणजे वाकडा तिकडा ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते़.

म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये. फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण.ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण फशी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही.आपले मीलन होणार नाही.

म्हणून संत चोखा मेळा म्हणतात मी जरी वाकडा वाटले तरी माझा भाव भोळा, आहे सरळ आहे.

माणसं ओळखण्याची कला खूप कमी लोकात असते.
सैतान ला देव समजून त्याची पूजा करणारेच जास्त मिळतील.

वामन देशमुख's picture

23 Jan 2021 - 2:54 pm | वामन देशमुख

ओ Rajesh188 साहेब,
अहो विषय काय चालू आहे तुम्ही काय लावले आहे हे.
एका चांगल्या लेखाचा आणि चांगल्या प्रतिसादांचा आस्वाद घेऊ द्या की आम्हाला थोडा.

अमिताभ विषयी त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचे मत चांगले नाही.
कोणावर च विश्वास न ठेवणारा स्वार्थी माणूस अशी प्रतिमा आहे त्यांची.
Kbc बघून उगाचच चुकीचे मत लोकांचे तयार झाले आहे.
मोदी विषयी लोकांची मत काय आहेत हे जगजाहीर आहे.
बहुमत मिळाले म्हणजे मोदी चांगले आहेत म्हणून नाही हिंदू ना मुस्लिम लोकांची भीती दाखवली म्हणून ते एकवटले आणि BJP निवडून आली.
मोदी विश्वासू आहेत म्हणून BJP la बहुमत मिळालेले नाही.

मिपा च्या भाषेत चोप्य पस्ते आहे हे. :-)
https://brainly.in/question/8462705

चामुंडराय's picture

24 Jan 2021 - 3:48 am | चामुंडराय

.

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2021 - 5:16 pm | चौथा कोनाडा

मग, आता राजेश१८८ यांना चोप्य पस्ते वीर अशी उपाधी द्यायला हरकत नाही !

पिनाक's picture

25 Jan 2021 - 10:38 pm | पिनाक

की "चोपला गेलेला वीर"?

बाकी, डेकोरम च्या यादीमध्ये राष्ट्रपिता का वगळले आहेत?

ते तर आद्य गुरू आहेत सगळ्यांचे या बाबतीत. नाही वाटत?

अवांतर - गांधी जेव्हढा मोदीना समजला आहे तितका कोणालाच नाही!

गांधी हे सद्गुणविकृत होते (सावरकर ह्यांचा शब्द). हो त्यांची ढोंगे माझ्या मते मोदी ह्यांनी योग्य प्रमाणात आत्मसात केली आहेत. गांधी विषयावरील माझे लेखन ह्या आधी मिपावरून उडवण्यात आले आहे त्यामुळे जास्त लिहीत नाही.

टीप: माझे राष्ट्र गांधी च्या पेक्षा खूप खूप जुने असून गांधींना फारतर काँग्रेस चा पिता मी मनू शकते, राष्ट्राचा अजिबात नाही.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 11:01 am | मुक्त विहारि

हे उत्तम व्यक्ति जरूर होते...पण, राष्ट्र चालवायला लायक न्हवते.

ब्रिटनचे पंतप्रधान मऊ होते, म्हणून तर हिटलरचे फावले.

गांधी आणि नेहरू मऊ होते, म्हणून तर त्यांच्या चुकांची फळे, अद्याप आपण भोगत आहोत.

राष्ट्राचे संरक्षण करायला, सरदार पटेलांसारखीच माणसे हवीत.

हे कटू सत्य पचवायची ताकद हवी....

बाप्पू's picture

27 Jan 2021 - 1:28 pm | बाप्पू

साहना यांच्याशी सहमत.
गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले ही सगळ्यात मोठी थाप आहे.
गांधी कधीही महात्मा नव्हते. राष्ट्रपिता वगैरे सगळं भंकस आहे.

गांधी हा प्रचंड हट्टवादी, आपलेच खरे मानणारा, स्वार्थी, प्रचंड बायस्ड आणि हेकेखोर माणूस होता...

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jan 2021 - 9:15 am | ज्ञानोबाचे पैजार

सध्या जसे भारतात मोदी समर्थक आणि मोदी द्वेष्टे असे फक्त दोनच गट आहेत तसेच गट महात्मा गांधीं विषयी पण होते / अजूनही आहेत.

इथे विषय डेकोरम चा आहे आणि तिथे गांधीजींचे उदाहरणही चपखल आहे.

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

27 Jan 2021 - 10:21 am | प्राची अश्विनी

कारणमीमांसा आवडली. असा कधी विचार केला नव्हता.