विनामूल्य कोर्स : हाव वर्ल्ड वर्क्स

साहना's picture
साहना in काथ्याकूट
14 Jan 2021 - 3:13 am
गाभा: 

डॉक्टर अतनू डे (phd Econ UC Berkley) ह्यांचा हा संपूर्ण ऑनलाईन कोर्स असून विनामूल्य आहे आणि भारतीयांसाठी सोयीच्या वेळी ठेवला आहे.

अतनू डे ह्यांच्याशी थेट ओळख नसली तरी मागील १० वर्षांपासून त्यांचा ब्लॉग मी वाचत आहे. त्यांच्या लेखनापासून प्रेरणा घेऊन मी हायेक, फ्रीडमन इत्यादींचे वाचन केले आणि अर्थशास्त्र आणि राजकारण ह्या विषयांत मला रुची उत्पन्न झाली. अतिशय स्वतंत्र मनोवृत्तीचे विचारवंत असल्याने त्यांचे लेखन मला आधीपासून आवडत होते. माझ्या मते अर्थशास्त्राचे बेसिक्स समजण्यासाठी हा कोर्स खूप उपयुक्त ठरेल.

कोर्स ची जास्त माहिती : https://deeshaa.org/2021/01/10/course-update-how-the-world-works/

प्रतिक्रिया

कंजूस's picture

14 Jan 2021 - 5:28 am | कंजूस

जे अर्थशास्त्र शिकत आहेत त्यांना अधिकचे वाचन म्हणून होऊ शकेल.
-------------
उत्पन्न, खर्च आणि गरज यांचे मोजमाप आणि अभ्यास हे अर्थशास्त्राचे मूळ आहे. कुटुंब, तालुका, राज्य, देश अशा वेगवेगळ्या चौकटी आहेत.
गरजा भागवण्यासाठी उत्पन्न असावे लागते. पण ते निर्माण करण्याची साधने नसली तर ती चौकट मागे पडते किंवा लहान होत जाते. त्यास गरीबी म्हणतात.
साधने निर्माण करण्यासाठीही पैसे लागतात. ते अगोदरच्या उत्पन्नातून साठवलेले किंवा इतरांकडून काही काळासाठी घेतलेले असतात.
साधने तयार झाल्यावर त्यातून उत्पन्न मिळेलच याची शाश्वती नसते कारण तिथे स्पर्धा असते.
साधने निर्मिती आणि त्यातून अर्थ उत्पन्न करण्यातून रोखण्यासाठी राजकारण काम करत असते.

यांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. मार्गदर्शन म्हणजे परमार्थ.

------------

लेखासाठी धन्यवाद. तुमचे इतर लेखही चांगले माहितीपर आणि वैचारिक असतात.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2021 - 8:18 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

राजाभाउ's picture

14 Jan 2021 - 11:58 am | राजाभाउ

खुपच छान. मला या विषयात रुची आहे, पण सध्या येव्हडा वेळ देउ शकेन कि नाही या बद्दल साशंक आहे, त्यामुळे कोर्स घेईन कि नाही माहीत नाही पण, रेकॉर्डेड सेशन्स नक्की ऐकीन आणि बाकीचे मटेरीयल पण वाचीन
मनापासुन धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

14 Jan 2021 - 1:20 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण धागा.
धन्यवाद साहना _/\_