1

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...
घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

मानसी - बॉलपेन स्केच

Primary tabs

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in मिपा कलादालन
30 May 2020 - 2:28 pm

Manasi Sketch copy

बर्‍याच दिवसांनी आज स्केच करायला घेतले. मागच्या आठवड्यात दुपारी घरी सगळ्यांसोबतच्या करायच्या मनोरंजनात माझ्या लहान मुलीला साडी नेसवून फोटो काढले होते. त्यातलाच हा एक फोटो मी स्केचसाठी घेतला. साडीवरची कलाकुसर माझ्या भाचीची आहे.

पेन्सिलचं मला वावडं नाही पण ऐनवेळी बॉलपेनच येतो हातात. शिवाय, माझ्याकडे सगळा कार्यक्रम उत्स्फूर्त असतो. ठरवून असं काही होतच नाही. त्यामुळे बॉलपेन तर बॉलपेन. सांगा कसं झालंय. सर्वांच्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागतच आहे.

प्रतिक्रिया

गणेशा's picture

30 May 2020 - 2:37 pm | गणेशा

निव्वळ अप्रतिम ...
तुमच्यासाठी आयुष्यभर जपुन ठेवावे असे चित्र.. असे क्षण..

मस्त एकदम

चांदणे संदीप's picture

30 May 2020 - 2:39 pm | चांदणे संदीप

तुमच्यासाठी आयुष्यभर जपुन ठेवावे असे चित्र

अगदी!

सं - दी - प

बबन ताम्बे's picture

30 May 2020 - 2:49 pm | बबन ताम्बे

मस्त आणि उस्फुर्त !!

मराठी कथालेखक's picture

30 May 2020 - 3:32 pm | मराठी कथालेखक

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2020 - 3:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त...!

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

30 May 2020 - 5:21 pm | अभ्या..

मस्तच जमलेय रे सॅन्डीबाबा.
आवडले

चांदणे संदीप's picture

30 May 2020 - 5:46 pm | चांदणे संदीप

दादा! ___/\___
कुठं आहे पत्ता?

चौकटराजा's picture

2 Jun 2020 - 3:43 pm | चौकटराजा

हे अभ्या आहेत ना ,त्यान्चे लग्न झाले आहे ! त्याना आता असे विचारणे झाले ना की "पोहे कसे झाले आहेत ?" चहा कसा झाला आहे. कान्द्याची भजी कशी झाली आहे की ते आपसूक म्हणतात " एकच लम्बर " !!! )))))

सौंदाळा's picture

30 May 2020 - 6:43 pm | सौंदाळा

सुंदर
केसांमधल्या छटा निव्वळ अप्रतिम

अनन्त्_यात्री's picture

30 May 2020 - 6:45 pm | अनन्त्_यात्री

आवडलं.

सतिश गावडे's picture

30 May 2020 - 6:46 pm | सतिश गावडे

वाह... भारी जमलंय.

प्रचेतस's picture

30 May 2020 - 6:51 pm | प्रचेतस

खूपच सुंदर.
साडीवरील कलाकुसर पण थक्क करणारी. मस्त एकदम.

Prajakta२१'s picture

30 May 2020 - 6:55 pm | Prajakta२१

छान

चांदणे संदीप's picture

30 May 2020 - 6:58 pm | चांदणे संदीप

कधीतरी काहीतरी आडवे उभे करतो कागदावर. त्याला आवडल्याची पावती दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आमचे सोलापूरकर भाऊ बरेच दिवसांनी आल्याबद्दल मला विशेष आनंद झालाय.

बबन ताम्बेजी स्वतः उत्तम चित्रे काढतात ते पाहिले आहे.

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

30 May 2020 - 9:42 pm | जव्हेरगंज

बेस्ट!!
अजून येऊंद्या!!

मन्या ऽ's picture

31 May 2020 - 9:20 am | मन्या ऽ

मस्तच!
मी काढायचे स्केचेस.. आता खूप वर्ष झाली पेन्सिल हातात धरुन.. आता परत जमेल कि नाही माहिती नाही..

चौथा कोनाडा's picture

31 May 2020 - 10:21 am | चौथा कोनाडा

आज बर्‍याच दिवसांनी कुणीतरी मिपाच्या कलांगणात सुंदर रांगोळी काढलीय !

व्वा, खुप सुंदर चित्र ! रेषा मस्त आहेत, डोळे तर एकदम सुंदर आलेत !
क्यूट, गोडुली आहे मानसी !
सॅन्डीबाबा _/\_

चांदणे संदीप's picture

31 May 2020 - 11:29 am | चांदणे संदीप

___/\___
धन्यवाद, चित्राचे आणि मानसीचे कौतुक केल्याबद्दल.

सं - दी - प

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2020 - 11:56 am | कानडाऊ योगेशु

मस्त. लहान मुलांचे डोळे विशिष्ठ असतात. एकाच वेळी निरागसता,औत्सुक्य आणि खोडकरपणा झ्ळकतो. इथे तुमच्या लेकीच्या डोळ्यात ते हुबेहुब उतरले आहे.

झेन's picture

31 May 2020 - 12:10 pm | झेन

सुंदर
सं - दी - प
ही पण कला तूमच्याकडे आहे नशीबवान आहात.

कंजूस's picture

31 May 2020 - 12:20 pm | कंजूस

मस्त. लहान मुलांचे डोळे
@ कानडाऊ योगेशु याने म्हटल्याप्रमाणेच.
सुंदर.

नावातकायआहे's picture

31 May 2020 - 12:28 pm | नावातकायआहे

मस्त!

चांदणे संदीप's picture

31 May 2020 - 1:59 pm | चांदणे संदीप

चांगलं म्हटलं की मूठभर मांस चढतंच अंगावर. (आधीच बरचंस घेऊन बसलोय. आणि आता थोडी मोदीकाकांची कृपा!) त्यामुळे प्रतिसाद बघून आनंदच होतोय. पण मला विचाराल तर, बरं झालंय असं म्हणण्याइतपतच आहे हे.

फक्त, कानडाऊ योगेशु म्हणतात त्याप्रमाणे डोळ्यांना मला विशेष काळजीपूर्वक काढावे लागले. तिथे मेहनत जास्त लागली. कारण बॉलपेनाला एर्रोर मार्जीन खूप कमी असते. नाही म्हणण्याइतपत.

@झेन, छंद आहे बाकी काही नाही.

मनूला, इतक्या लोकांनी गोड गोड म्हटलंय सांगितल्यावर घरभर नाचेल ती. :)

पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. ___/\___

सं - दी - प

रातराणी's picture

31 May 2020 - 2:38 pm | रातराणी

अप्रतिम!!

नूतन's picture

1 Jun 2020 - 9:41 am | नूतन

सुंदर. आवडलं.
डोळ्यांमुळे चित्र जिवंत झालं आहे

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2020 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार

लै म्हणजे लैच भारी आले आहे चित्र, निवांत वेळ देत मनापासुन काढलेले दिसते आहे. बॉलपेन ने चित्र काढण्याचा एक गैरफायदा म्हणजे एकदा काढलेली रेष पुसता येत नाही आणि या चित्रात बोट दाखवायला एकही जागा सापडत नाही. यातच तुझे यश आहे.

बाकी डोळ्यांमधले भाव, केसांचे चित्रण आणि साडीवरची नक्षी कमाल आहे. तुझ्या बरोबर तुझ्या भाचीचे ही कौतुक. चित्र निट जपून ठेव मानसी साठी तिच्या अयुष्यातली ही एक सर्वोत्तम भेट ठरणार आहे.

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

2 Jun 2020 - 3:50 pm | चांदणे संदीप

तुझ्या बरोबर तुझ्या भाचीचे ही कौतुक.

हे तिला सांगतो आज.

चित्र निट जपून ठेव मानसी साठी तिच्या अयुष्यातली ही एक सर्वोत्तम भेट ठरणार आहे.

येस्सार! :)

सं - दी - प

मदनबाण's picture

1 Jun 2020 - 6:02 pm | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kum

चौकटराजा's picture

2 Jun 2020 - 3:38 pm | चौकटराजा

हे आलंय मस्त पण हे म्हणजे एकच स्वादाचे आईस्क्रीम झाले. बॉल पेनात अनेक शाई येतात .त्यामुळे चार पाच रन्गात चार पाच चित्रे असा धागा अधिक भावला असता . पुढ्चा धागा असा टाका सन्दीपभौ !!

चांदणे संदीप's picture

2 Jun 2020 - 3:49 pm | चांदणे संदीप

पुढ्चा धागा असा टाका सन्दीपभौ

नक्की काका! :)

सं - दी - प

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

2 Jun 2020 - 7:29 pm | सौ मृदुला धनंजय...

अप्रतिम !!!

बॉलपेनने असले चित्र काढण अवघड आहे.
आपला प्रयत्न छान आहे.

संजय पाटिल's picture

19 Jun 2020 - 8:42 am | संजय पाटिल

भाऊ भारीच हो.........
बाकी लय दिवसांनी दीसला????

राघव's picture

19 Jun 2020 - 11:36 am | राघव

चांगलंय!
अजून येऊ देत :-)

सविता००१'s picture

21 Jun 2020 - 11:09 am | सविता००१

कसल गोड आलंय स्केच.. भारीच.

गामा पैलवान's picture

21 Jun 2020 - 6:07 pm | गामा पैलवान

संदीप चांदणे,

सुरेख चित्रं आहे. चित्राचा विषय कसला गोंडस ( = क्यूट ) आहे !

डावी भुवई कमालीची नैसर्गिक आलीये. त्यामानाने उजवी जरा विसकटलेली वाटते. मानसीनेच खरवडली असावी बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

चांदणे संदीप's picture

21 Jun 2020 - 8:58 pm | चांदणे संदीप

त्यामानाने उजवी जरा विसकटलेली वाटते. मानसीनेच खरवडली असावी बहुतेक

.
बरोब्बर ओळखलेत तुम्ही. हे चित्र काढत असताना ती सारखी झोंबत होती अंगाला, त्यामुळे उजवी भुवई जराशी आडवीतिडवी झालीच.

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद!

कळावे,
आ. न.
सं - दी - प
(ता .क. : आमच्या इथे मस्तानी मिळणेस सुरूवात झालेली आहे.)

गामा पैलवान's picture

21 Jun 2020 - 10:09 pm | गामा पैलवान

संदीप चांदणे,

मस्तानीबद्दल धन्यवाद! :-)

दोन भुवया वेगळ्या काढल्याने चित्रं नैसर्गिक रीत्या जमलं का काहीसं म्हणतात ते झालं आहे. बॉलपेनाने हे असं काढणं अविश्वसनीय आहे. ____/\____

आ.न.,
-गा.पै.

मस्त झालं आहे स्केच. पुन्हा एकदा स्केचचा फोटो काढून टाकावा अशी शिफारस करतो, कारण या फोटोत चेहर्‍यावर केलेले काम नीट दिसत नाहीये. फोटो मोबाईल ऐवजी कॅमेर्‍याने काढला तर बरे होईल.
तुमची आणखी चित्रकला बघायला आवडेल.

चांदणे संदीप's picture

21 Jun 2020 - 8:53 pm | चांदणे संदीप

चित्रगुप्तकाका अनेक धन्यवाद!
क्यामेरा माझ्याकडे नाहीये त्यामुळे परत हा फोटो टाकायला वेळ लागेल कदाचित. आणि, कधीतरीच खरडतो पेन कागदावर. आवड आहे पण वेळ नाही. परत काही खरडले की नक्की टाकेन.

सं - दी - प