भयकथांचे रमाकांत आचरेकर : लवक्राफ्ट

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
9 Apr 2020 - 2:55 am

"तुम्हाला कसिनोत जाऊन जर रुले ( म्हणजे ते फिरणारे चक्र) खेळायचे असेल तर तुम्हाला सुतारकाम शिकून फायदा नाही, तुम्हाला गणित शिकावे लागेल" - गणित तज्ञ् तालेब

एकदा क्रिकेट मधील जाणकारांच्या पार्टीत रमाकांत आचरेकर ह्यांच्या नावाचा उल्लेख आला. तिथे सलील अंकोला होता. त्याने सहज म्हटले कि ज्या माणसाने आयुषांत कधीही एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही त्या व्यक्तीने अनेक महान खेळाडू घडवले ह्यावरून कोचिंग आणि प्रत्यक्ष खेळ हि एक दोन वेगळी क्षेत्रे आहेत असे लक्षांत येते. मला क्रिकेट विशेष आवडत नसले तरी अंकोलाचे शब्द मनात घर करून गेले.

श्यामच्या आईने कदाचित लेखणी पकडून पुस्तक लिहिले नसले तर श्यामच्या द्वारे तिचे संस्कार लक्षावधी मराठी मुलांच्या मानत घर करून आहेत. अशी असंख्य उदाहरणे मी तुम्हाला देऊ शकते.

पण आज मी लिहिणार आहे "होवार्ड लोव्हक्राफ्ट" बद्दल.

भयकथांचा उल्लेख येतो तेंव्हा इंग्रजी साहित्यांत मेरी शेली ( फ्रँक्सटाईन ) आणि ब्राम स्टोकर (ड्रॅक्युला) ह्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ख्रिस्ती धर्माचा प्रभाव पाश्चात्य देशांत वाढला होता आणि मानवी मनाला कशाचे भय वाटले पाहिजे ह्या विषयांवर चर्च ने अतिशय मोठा प्रभाव टाकला होता. प्रामुख्याने ईश्वराच्या मनाच्या विरुद्ध काहीही करणे हे महापाप असून मानवाने त्याचे भय मनात ठेवले पाहिजे हि चर्च ची शिकावण होती. ख्रिस्ती देव आमच्या हिंदू देवतां प्रमाणे नाही. त्यामुळे देव, अँजेल्स सोडल्यास इतर सर्व पारलौकिक शक्ती त्यांच्या दृष्टिकोनातून "evil" होत्या. हिंदू समजुतीत भुते सुद्धा भगवान शिवाच्या आज्ञेत असतात आणि कितीही वाईट असली तरी शेवटी भुते, दानव इत्यादी सर्व आमच्याच दुनियेचा एक अविभाज्य भाग आहेत असे हिंदू मानतात.

ख्रिस्ती धर्माच्या प्रभावाने विदेशी भय कथा सुद्धा भुते, आत्मा, दैवी आज्ञेचा भंग इत्यादी विषयांवर जास्त भर देत होत्या. ड्रॅक्युला ह्या कादंबरीत हे जास्त स्पष्ट पणे दिसते.

पण मागील १०० वर्षांत पाश्चात्य देशांनी भयकथांत अनेक वेगळ्या प्रकारची भर घातली. हॉरर ह्या रसांत आणखीन दुय्यम रस निर्माण झाले ते काही खालील प्रकारे आहेत.

१. बिस्ट हॉरर (किंग कोन्ग, जपानी गोजिरा , जुरासिक पार्क, भारतीय नागिना इत्यादी पशु केंद्रित भयकथा)
२. स्पेस हॉरर (अलिएन, ग्रॅव्हिटी इत्यादी अवकाश, परग्रह इत्यादी विषयावरील भयकथा. भारतीयांनी १९६० मध्ये रॉकेट टारझन म्हणून ह्या विषयाला हात घातला होता)
३. रोगराई हॉरर (इ आम लिजंड इत्यादी)
४. विज्ञान भय कथा (जुरासिक पार्क, २०१२, बटरफ्लाय इफेक्त्त इत्यादी)
५. सायको हॉरर : मानसिक विकृती दाखविणार्या भयकथा. (उदा रमण राघव)
६. गोर : भडक हिंसा दाखविणाऱ्या भयकथा उदा कानिबल होलोकास्ट, saw इत्यादी
८. लैगिक हॉरर : उदा बॅड बयॉलॉजि

पण भयकथाना हि नवीन दिशा देण्याचे जे काम आहे त्याचे श्रेय जाते लोवक्राफ्ट ह्या तरुण लेखकाला ज्याने १९३०स च्या दशकांत विपुल लेखन केले. लोवक्राफ्ट चे आयुष्य सुखद नव्हते. वेडा बाप आणि अर्धवट माता अश्या कात्रीत सापडलेला लोवक्राफ्ट दुनियेपासून थोडा अलिप्त होता. त्याला भयानक स्वप्ने पडायची आणि ती स्वप्ने तो लिहून काढून "विक्षिप्त कथा" (विएर्ड टेल्स) ह्या स्वस्त मासिकाला पाठवायचा. त्यातून त्याला खूप थोडे पैसे मिळायचे. त्याची जीवनी तुम्ही इथे वाचू शकता [१] .

शेवटी आईचा मृत्यू झाला आणि लोवक्राफ्ट घरातून बाहेर पडू लागला. त्याला सुद्धा एक बायको भेटली आणि इतकेच नव्हे तर ती पैसे कमावून त्याला पोसू सुद्धा लागली. लोवक्राफ्ट ने लेखनावर लक्ष केंद्रित केले. पण लेखन सोडल्यास इतर सर्व विषयांत त्याचे ज्ञान शून्य होतेच पण तो महाभयंकर आळशी सुद्धा होता. शेवटी बायको वैतागून सोडून गेली आणि तो एकटा पडला. त्याची आर्थिक स्तिथी पाहून विक्षिप्त कथा मासिकाने त्याला शिकागो शहरांत चांगली संपादकाची नोकरी देऊ केली. पण लोवक्राफ्ट ने ती असे म्हणून धुडकावली कि "उतार वयांत शहर बदलणे मला जाड जाईल' ह्या वेळी लोवकराफ्ट ३४ वर्षांचे होते.

शेवटी खायला प्यायला सुद्धा नाही अश्या दुःखद पद्धतीने त्यांच्या मृत्यू झाला.

ते जेंव्हा जिवंत होते तेंव्हा त्यांची पुस्तके विशेष खपली नाहीत. विक्षिप्त कथा मासिक सुद्धा सुद्धा विशेष खपत नव्हते आणि अत्यंत स्वस्त असल्याने त्यांचा वाचकवर्ग म्हणजे उनाडक्या करणारी मुले, शारीरिक मजदूरी करणारे लोक अश्या प्रकारचा होता. काहीही प्रसिद्धी किंवा पैसे नसताना लोवक्राफ्ट ह्यांनी राम म्हटला.

मग हे भयकथांचे आचरेकर कसे ठरतात ?

लोवक्राफ्टचे लिखाण कल्पना रम्य होते. त्यांनी कॉस्मिक हॉरर ह्या नवीन प्रकारच्या भयकथांची निर्मिती केली. त्यांच्या कथांतील भय हे सामान्य भय नव्हते. त्यांचे खलनायक भुते किंवा अ-ख्रिस्ती देव नव्हते. तर त्यांचे खलनायक हे वैश्विक पातळीवरील महा शक्तिशाली देव किंवा "entity" होते. कुंथुलू हा त्यांचा खलनायक कुख्यात आहे. इतका कुख्यात कि तो खरंच अस्तित्वांत आहे असे अनेकांची समजूत आहे.

कुंथुलू हा एक वैश्विक ईश्वर सदृश्य अस्तित्व आहे. १०० फूट उंच सिंह, माणूस, ड्रॅगन, अष्टपाद ह्यांचे अवयव असलेला हा देव पृथ्वीच्या उदरांत झोपलेला आहे. हा कधी तरी अवकाशांतून आला आणि पृथीवर कधीपासून झोपलेला आहे. मानवी मन हे त्याच्या सुप्त मनाशी जोडलेले आहे. कुंथुलू उठला तर निव्वळ एका विचाराने संपूर्ण मानवजातीचा संहार करू शकतो. मानवी मनाचे सर्व भ्रम हे त्यांच्या मनाने मानवी मनाशी केलेला खेळ आहे. आपल्या झोपेंत सुद्धा कुंथुलूचे मन थोडेफार कधी कधी अस्वस्थ होते आणि त्यामुळे पृथ्वीवर महायुद्धे वगैरे घडतात. लोवकराफ्ट ने कुंथुलू ह्या खानायकाला घेऊन प्रचंड मोठे विश्व रचले.

emty one हा त्याचा दुसरा एक खलनायक. त्याचा संबंध सुद्धा कुंथुलू शी आहे. empty one आपल्या नवा प्रमाणेच आहे म्हणजे तो अस्तित्वांत नाही पण त्याच्या अस्तित्व विषयी विपुल लेखन मानवी इतिहासांत आहे. विविध राजांनी किंवा आधुनिक सरकारनी empty one ला अस्तित्वांत आणण्याचा प्रयत्न केला आहे. empty one कसा अस्तित्वांत येतो ? तर त्यासाठी दोन शेकडो खून केलेले भिन्न लिंगांचे सीरिअल किल्लर्स पाहिजेत. त्यांनी विशेष मुहूर्तावर संभोग केला पाहिजे. त्या संभोगांतून त्यांना दोन जुळी मुले झाली पाहिजेत. हि सुद्धा भिन्न लिंगी असावी लागतात. नंतर हि मुले मोठी झाली कि त्यांच्या दोघांत संभोग घडवून आणला पाहिजे ज्या दरम्यान स्त्री पुरुषाचा जीव घेते. अश्या स्त्रीला गर्भ धरून जेंव्हा मूल बाहेर येते तो empty one. असेल, हे मूल बाहेर येतानाच मातेचा गर्भ फोडून तिचा जीव घेऊन येते. ( अर्थांत हि सर्व प्रोसेस अतिशय "लक' आधारित असल्याने हिटलर,अमेरिका इत्यादी राष्ट्रे जेनेटिक एक्सपेरिमेंट करून empty one निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ह्या विषयावर गेम्स वगैरे आल्या आहेत )

१९३० मध्ये लोवक्राफ्ट जेंव्हा हे सर्व लिहीत होते ते सामान्य कष्टकरी वर्ग विकत घेऊन घरी न्यायचा. वाचून हि पुस्तके घरांत पडायची जी लहान मुले वाचायची. मुलांची कल्पनाशक्ती अफाट असते आणि लोवक्राफ्टचे ची कल्पनाशक्ती वाचून त्या मुलांच्या मनावर फार चांगला प्रभाव पडला. शेवटी हि मासिके विविध वाचनालयांत वगैरे उपलब्ध असायची ज्यावर पुस्तकी किडे तुटून पडायचे.

ह्या लहान मुलांत जॉर्ज र र मार्टिन, स्टीफन किंग, रामस्ये केम्पबेल, थॉमस लिगोटी इत्यादी अनेक लोक होते जे पुढे भविष्यांत महान भयकथा लेखक झाले. आपल्या अनेक लेखनात त्यांनी आपल्यावर लोवक्राफ्ट ह्यांचा किती प्रभाव होता हे नमूद केले. अनेक लोक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक झाले ज्यांनी लोवक्राफ्ट पासून प्रेरित होऊन इव्हील डेड किंवा केबिन इन थ वूड्स सारखे चित्रपट बनवले. आमचे रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप ह्यांच्या सुद्धा अनेक कथा लोवक्राफ्ट ह्यांच्या पासून प्रेरणा घेतात.

थोडक्यांत काय तर स्वतः लोकप्रिय नसलेल्या त्या विक्षिप्त आणि एकलकोंड्या लेखकाने भयकथांचा चेहेराच पालटला आणि आपल्या योगदानाची माहिती न समजता तो मृत्यू सुद्धा पावला.

सुनंद त्र्यंबक जोशी[३] हे आमचे मराठी माणूस lovecraft लेखनाचे विशारद आहेत आणि लोवकराफ्ट आणि त्यांच्या लेखनावर त्यांनी खूप अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यांचे जवळ जवळ संपूर्ण आयुष्य भयकथांचा अभ्यास आणि विशेषतः लोवक्राफ्ट ह्यांच्या लेखांचे संपादन करण्यात गेले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाने लवक्राफ्ट ह्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या आणि जीवनाचे पैलू काळाच्या विस्मृतीत न जाता आम्हाला उपलब्ध झाल्या आहेत. सिएटल मध्ये राहणारे जोशी हे अमेरिकेतील भयकथा प्रेमींसाठी नक्कीच खूप आदराचे व्यक्तिमत्व आहेत.

[१] https://bookstruck.app/book/2753
[२] https://en.wikipedia.org/wiki/H._P._Lovecraft
[३] https://en.wikipedia.org/wiki/S._T._Joshi

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

किल्लेदार's picture

9 Apr 2020 - 3:43 am | किल्लेदार

लोवक्राफ्ट यांचा पुसटसा उल्लेख आला होता पण एवढी माहिती आजच मिळाली. नारायण धारपांच्या पुस्तकात "स्वप्नांचा राजा कुंथुलू" अशी एक कथासुद्धा आहे. त्याचा संबंध आज सापडला.

"ड्रॅक्युला" किंवा "फ्रँक्सटाईन" या भुतांना निश्चित असे स्वरूप होते. त्यामुळे त्यांची खूप भीती कधी वाटली नाही. पण "फीअर ऑफ अननोन" नेहमीच जास्त असल्यामुळे भुतांना थेट न दाखवता वाचकाला किंवा प्रेक्षकाला त्याच्यानुसार कल्पू दिले तर जास्त परिणाम साधता येतो. कदाचित लोवक्राफ्ट यांचे यश यामुळेच जास्त असावे.

अजून तरी लोवक्राफ्ट यांचे कुठलेही लिखाण वाचले नाही. आता बघूया.

रच्याकने ... त्यांची सर्वोत्तम म्हणता येतील अशी पुस्तके/कथा कुठल्या ?

मला त्यांच्या कथा विशेष आवडल्या नाहीत, कल्पनाशक्ती सोडली तर इतर मापदंडावर त्यांच्या कथा सुमार ह्या दर्ज्यांत मोडतात. त्यांची Rats In the Walls[१] हि कथा त्यांतल्या त्यांत छान आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या अनेक कथा कल्पना आम्ही आधीच रामसे भाऊ ते गेम ऑफ थ्रोन्स मध्ये पहिल्या आहेत त्यामुळे कथा वाचून आम्ही जास्त प्रभावित होऊ शकत नाहीत पण १९३० मध्ये ह्या किती विलक्षण वाटल्या असतील ह्याची फक्त आम्ही कल्पनाच करू शकतो.

[१] https://bookstruck.app/book/305/24227

तुषार काळभोर's picture

9 Apr 2020 - 7:04 am | तुषार काळभोर

तुम्हाला असे फियर ऑफ अननोन चित्रपट पाहण्यात रस असेल तर पॅरा नॉर्मल अॅक्टिविटी ही मालिका तुम्हाला नक्की आवडेल.
भूत वगैरे काही दिसत नाही. पण या काहीतरी अननोन चं अस्तित्व आपल्याला जाणवत राहतं.

आपल्याला नाही झेपत.

हो पहिली आहे. मी इतके भयपट पहिले आहेत कि भय असे वाटत नाही.

मदनबाण's picture

9 Apr 2020 - 12:34 pm | मदनबाण

हॉरर मुव्ही म्हंटले की सगळ्यात पहिले मला चित्रपट आठवतो तो म्हणजे :- The Evil Dead (1981)
अनेक हॉरर मुव्ही पाहिले आहेत, पण आजही The Evil Dead त्याचा प्रभाव राखुन आहे ! या चित्रपटात अ‍ॅडियो टेप प्ले करण्याचा सीन आहे तो अत्यंत भितीदायक वाटला आहे मला.

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Dil De Diya Hai... :- Cover by Sampreet Dutta [ Masti ]

गोंधळी's picture

9 Apr 2020 - 2:48 pm | गोंधळी

भयपट म्हट्ले की गहीरे पाणि व Woh या मालीकांची आठवण अजुन ही येते. लहान असताना एक ही भाग चुकवले नव्हते कितीही भिती वाटली तरी.

सध्या Netflix ची Locke & Key (Fantasy, Horror )सिरीज बघत आहे.

नेटफ्लिक्स वर नॉर्वेजियन भाषेंतील (इंग्रजी डब ) एक सिरीज आहे "Bloodriders", प्रत्येक कथा वेगळी आहे आणि काही कथा छान आहेत. Locke and Key मला थोडी स्लो वाटली. स्ट्रेन्जर थिंग्स च्या यशानंतर नेटफ्लिक्स आणेल कॉपी केट कथानके काढत आहे त्यापैकीच locke अँड की एक आहे असे वाटले.

गोंधळी's picture

10 Apr 2020 - 11:57 am | गोंधळी

Mystery,Horror या प्रकारतील 1408 ठीक वाटला होता. Locke and Key चा एन्ड गुंडाळ्ल्या सारखा वाटला.
एक Marathi Short Film – Bell https://www.youtube.com/watch?v=kEZV9XWWv00

कानडाऊ योगेशु's picture

9 Apr 2020 - 8:56 pm | कानडाऊ योगेशु

>>पण १९३० मध्ये ह्या किती विलक्षण वाटल्या असतील ह्याची फक्त आम्ही कल्पनाच करू शकतो
होम्स कथांचा काळ ही हाच आहे ना? दोन्ही प्रकारचे साहित्याची ह्याच काळात सुरवात व्हावी हा एक योगायोग म्हणता येईल का?

होम्स ची क्सटेंडेड कथा १९३० च्या दशकांत प्रकाशित झाली होती पण होल्म्स च्या प्रथम कथा १८८०स च्या दशकांत प्रसिद्ध झाल्या होत्या.

१९३०स च्या दशकांतील सुप्रसिद्ध कादंबरी Gone With The Wind होती. दुसरे माझे अत्यंत आवडते समकालीन पुस्तक देल कार्नेगी ह्यांचे "how to win friends ... "

सुमीत भातखंडे's picture

30 Sep 2021 - 12:22 pm | सुमीत भातखंडे

लवक्राफ्टचं सगळं साहित्य आता पब्लिक डोमेन मधे आहे. किन्ड्ल वर त्यांचा संपूर्ण संग्रह उपलब्ध आहे. मला त्यांच्या विलक्षण आवडलेल्या कथा / लघू कादंबर्‍या म्हणजे:
१. The Colour Out of Space
२. The Dunwich Horror
३. At the Mountains of Madness
४. The Shadow Over Innsmouth
५. The Rats in the Walls
६. The Case of Charles Dexter Ward
७. The Shunned House
७. The Lurking Fear
८. The Strange High House in the Mist
९. The Haunter of the Dark
१०. The Whisperer in Darkness

गॉडजिला's picture

30 Sep 2021 - 1:08 pm | गॉडजिला

वा ओळख आवडून गेली...

खरंय आता हे वाचायच्या फंदात मी पडणार नाही पण त्याकाळी त्यांनी काय परिणाम साधला असेल हे नक्कीचं कल्पू शकतो. रोचक धागा काढल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद

चांदणे संदीप's picture

30 Sep 2021 - 2:32 pm | चांदणे संदीप

हॉरर वगैरे विशेष आवडत नसल्याने वाचन्/बघणे कमी आहे. पण, जॉर्ज आर आर आबांचं नाव वाचून उत्सुकता वाढली.

धन्यवाद ह्या लेखाबद्दल!

सं - दी - प

कॉमी's picture

30 Sep 2021 - 7:48 pm | कॉमी

लवक्राफ्ट भारीच आहे.

लिगोटी अजून वाचला नाहीये. क्लाईव्ह बार्करचा बुक ऑफ ब्लड सुद्धा भयंकर भीतीदायक आहे.

लोवक्राफ्ट पूर्ण वाचलाच नाहीये, पण डोगन, द टुंब, कॉल ऑफ कथुळू फार आवडतात. हे स्लोग्न तर थरकाप उडवते-
That is not dead which can eternal lie,
With strange aeons even death may die

ह्यात कथुळू या ओल्ड गॉड आणि आपल्या दृष्टिकोनातला फरक सुंदर स्पष्ट होतो. जे मृतावस्थेत हजारो वर्षे काढून तारे योग्य झाल्यावर पुन्हा उठते- ते मेले आहे काय ? मृतावस्थेतील ती युगं मृत्यूचाच संहार करतात!