आमची प्रेरणा आमचे परम मैतर चंद्रशेखर महामुनी ह्यांची तु नसताना.... !
हा लेंगा घालु न वाटतो.. लुज भासतो..नाडी.. तु नसताना....
विमनस्क घरभर हिंड्तो... खुळा हासतो.. नाडी.. तु नसताना...
हरपला पोटाचा सूर.. धडधडे उर.. उदरी काहुर....
डोळ्यात दाटला पूर.. रंग बेनूर... कायमचुर्णा.. तु नसताना.... [१]
हा गंधीत वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा...
शोधितो स्प्रे बावरा... होई कचरा.. डिओ.. तु नसताना... [२]
नाकात कोंडला श्वास.. दीर्घ निश्वास.. स्तब्ध अवकाश...
चालला धुर अस्तास... ओठी आभास... सिगारेटी.. तु नसताना... [३]
सशक्त ओल्या अंगानी.. बघ ओलेती शुक्र चांदणी ....
व्याकुळ तन मीलनी... कशी विरहिणी ... साबु.. तु नसताना... [४]
का भांड्यास लावि तुसे... सखे तु असे... होई ग हसे...
जन सर्वच तुजला हसे.. तुच तु दिसे...पितांबरी.. तु नसताना.... [५]
प्रतिक्रिया
25 Mar 2009 - 2:43 pm | दशानन
हरपला पोटाचा सूर.. धडधडे उर.. उदरी काहुर....
डोळ्यात दाटला पूर.. रंग बेनूर... कायमचुर्णा.. तु नसताना.... [१]
हा गंधीत वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा...
शोधितो स्प्रे बावरा... होई कचरा.. डिओ.. तु नसताना... [२]
=))
ज ब रा
25 Mar 2009 - 2:52 pm | अवलिया
जबरा !
=))
--अवलिया
25 Mar 2009 - 2:48 pm | विशाल कुलकर्णी
परतफेड झाली बर्का !!
हहपुवा झाली राव !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
25 Mar 2009 - 3:00 pm | शिप्रा
खतरनाक ...
_/\_ =))
25 Mar 2009 - 3:14 pm | सँडी
मस्तच!
25 Mar 2009 - 4:09 pm | चंद्रशेखर महामुनी
अरे ! माझ्या कविते मुळे साहित्य विश्वाला एवढे सुंदर विडंबन मिळ्णार असेल तर अशाने मि अमर होइन.... साहित्यात....
25 Mar 2009 - 4:24 pm | दिपक
हा लेंगा घालु न वाटतो.. लुज भासतो..नाडी.. तु नसताना....
विमनस्क घरभर हिंड्तो... खुळा हासतो.. नाडी.. तु नसताना...
=))
25 Mar 2009 - 4:57 pm | श्रीमंत दामोदर पंत
हा लेंगा घालु न वाटतो.. लुज भासतो..नाडी.. तु नसताना....
विमनस्क घरभर हिंड्तो... खुळा हासतो.. नाडी.. तु नसताना...
=)) =)) =)) =))
25 Mar 2009 - 5:06 pm | आनंदयात्री
अगायायाया .... एवढा भारी विडंबक आमच्या नजरेतुन सुटला कसा म्हणतो मी !!
लै लै तुफ्फान्न !!
सशक्त ओल्या अंगानी.. बघ ओलेती शुक्र चांदणी ....
व्याकुळ तन मीलनी... कशी विरहिणी ... साबु.. तु नसताना...
__/\__
भयंकर टुकार !!
=))
ह ह पु वा !!
25 Mar 2009 - 5:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रत्यक्ष केशवटुकार टुकार म्हणाल्यावर मी काय बोलणार?
=)) =)) =)) एवढंच!
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
25 Mar 2009 - 5:54 pm | क्रान्ति
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
25 Mar 2009 - 6:26 pm | निखिल देशपांडे
का भांड्यास लावि तुसे... सखे तु असे... होई ग हसे...
जन सर्वच तुजला हसे.. तुच तु दिसे...पितांबरी.. तु नसताना
वा काय विडंबन आहे.... झक्कासच रे परा......
अवांतरः- पितांबरी.. तु नसताना निलांबरी कडुन काम करुन घेतले तर चालेल का??
25 Mar 2009 - 8:14 pm | शितल
=))
25 Mar 2009 - 9:13 pm | बाकरवडी
:)
25 Mar 2009 - 11:46 pm | चंद्रशेखर महामुनी
अरे ! मित्रा ! पाहिलेस का? पब्लिक कसे पेटलेय ते...
फारच भारी जमलीये भट्टी !
चालु दे असेच्...
26 Mar 2009 - 8:13 am | प्राजु
पितांबरी... सह्ही!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 11:25 am | परिकथेतील राजकुमार
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आणी न देणार्या सर्वांचेही धन्यवाद ;)
महामुनी ह्यांनी त्यांच्या कवितेचे विडंबन अतिशय खेळकरपणे घेतले त्याबद्दल त्यांचे विशेष महा-आभार.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
26 Mar 2009 - 12:53 pm | अनिल हटेला
का भांड्यास लावि तुसे... सखे तु असे... होई ग हसे...
जन सर्वच तुजला हसे.. तुच तु दिसे...पितांबरी.. तु नसताना....
जबरा !!! ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
26 Mar 2009 - 2:20 pm | सुमीत भातखंडे
आपण महान आहात.
__/\__
जबराच.
26 Mar 2009 - 3:47 pm | ब्रिटिश टिंग्या
हा हा हा!
26 Mar 2009 - 6:40 pm | सुधीर कांदळकर
मजा आली.
सुधीर कांदळकर.
30 Aug 2012 - 2:51 am | जेनी...
भारी .
30 Aug 2012 - 9:08 am | मूकवाचक
_/\_
30 Aug 2012 - 10:04 am | परंपरा
__/\__
महान आहात कविवर!!!!
3 Oct 2012 - 1:41 am | जेनी...
हिहिहि ..आज परत वाचली ..
लई मज्जा आली ;)
3 Oct 2012 - 9:44 am | ज्ञानराम
:) चान चान...
4 Oct 2012 - 11:21 am | मालोजीराव
जबर्हाट !!!