लंबी रेस का घोडा

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in काथ्याकूट
22 Sep 2019 - 2:42 pm
गाभा: 

कोणातरी टीव्ही अॅंकरने आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेनेचा राहुल गांधी’ असा केला. ती तसे बोलली तेव्हा समोरचा मायक्रोफोन सुरू असल्याचे तिच्या लक्षात आले नसावे. त्यामुळे त्या वक्तव्याचा व्हिडिओ विनाविलंब व्हायरल झाला. तिच्या या वक्तव्याबद्दल व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये नापसंती वा संताप दिसतो. पण त्याचे कारण अनाकलनीय वाटते. ‘ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा... लिखके रख लीजिये’ असे या अॅंकरचे ‘आॅफ दि माईक’ वाक्य स्पष्ट एेकू येते. तिच्या या वाक्यामुळे काहीजण अस्वस्थदेखील झाले असून त्या वाहिनीने ताबडतोब खुलासा करावा, असे काहींनी म्हटले आहे. ‘या अॅंकरला घरचा रस्ता दाखवावा’ असेही काहींना वाटते.
माझा मुद्दा वेगळाच आहे.
आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे भावी राहुल गांधी आहेत ही त्या अॅंकरची ‘भविष्यवाणी’ ऐकून संताप येणे हा राहुल गांधींचा घोर अपमान आहे. या महिलेने आदित्य ठाकरेंविषयी आदर दाखविला असून राहुल गांधींनी ज्या कणखरपणाने एकहाती पक्षाची कमान सांभाळली, तो कणखर बाणा आदित्य ठाकरेंच्या अंगी तिला दिसला असावा, असे मानण्यास वाव आहे. ‘राहुल गांघी’ हे नाव बदनाम आहे असा ज्यांचा समज आहे, त्यांनाच या अॅंकरच्या वाक्यामुळे राग आला यात शंका नाही. राहुल गांधी हे काॅंग्रेसचे भविष्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच काॅंग्रेस पुन्हा उभारी घेईल असा दृढ विश्वास असलेला मोठा वर्ग राजकारणात आहे, आणि त्यापैकी अनेकांची राजकीय कारकिर्द राहुलजींच्या वयाएवढी प्रदीर्घ राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही बिगरकाॅंग्रेसी नेत्यांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली होती. ‘एकदा त्यांना संधी देऊन पहायला काय हरकत आहे?’ असे तर एकदा खुद्द राज ठाकरेही म्हणाले होते. राहुलजींच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या वक्तृत्वाची, हजरजबाबीपणाची छाप पडल्याने भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ त्या काळात किती व्हायरल झाले होते ते आठवा. त्याच काळात राहुलजींनी देश विदेशात संवाद साधून भावी भारताचे आपले स्वप्न जगासमोर मांडले होते, तेही आठवा.
आज काॅंग्रेस हा एक पराभूत पक्ष आहे,आणि कदाचित त्यामुळेच राहुल गांधी हे नाव बदनाम झाले आहे. म्हणूनच, आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेनेचा राहुल गांधी’ असा केला गेलेला अनेकांना रुचलेला दिसत नाही. ज्यांनी त्याबद्दल जाहीरपणे नापसंती, संताप व्यक्त केला आहे, त्यांनी राहुल गांधींचा अपमान केला आहे असे मला वाटते.
आदित्य ठाकरेंचा ‘भावी राहुल गांधी’ म्हणून आदित्य ठाकरेंचा सन्मान करण्याचाही त्या महिलेचा उद्देश असू शकतो. कारण, आदित्य आणि राहुल हे दोघेही, राजकारणातील ‘लंबी रेस का घोडा’ आहेत.
‘आपली भविष्यवाणी लिहून ठेवा’ असेही ती अॅंकर महिला म्हणाली आहे. ते खरे होते का ते भावी काळ ठरवेलच, पण या वाक्यतून तिने आदित्य ठाकरेंचा अपमान केला असा समज करून घेणे योग्य नाही.

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

22 Sep 2019 - 3:49 pm | आनन्दा

हा हा.. पण मला आदित्य ठाकरे आवडतो. म्हणजे किमान त्याला कुठे काय बोलावे इतकी समज तरी आहे.

कदाचित युवा नेता म्हणून आज पर्यंत रागा ला बघायची सवय झाल्यामुळे असेल, आमच्या अपेक्षा फारच खालच्या पातळीवर आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे एकदम matured वाटतो. किमान तो घसा खरवडून ओरडत तरी नाही.

असो, जे मला एके काळी राज ठाकरेबद्दल वाटले होते, नंतर मफलरलाल बद्दल वाटले होते, तेच आता या युवा नेत्याबद्दल वाटत आहे. त्याने निराश करू नये अशी अपेक्षा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2019 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुशतकी प्रतिसाद मिळविण्याच्या उद्येशाने छोट्याश्या लेखात अनेक काड्या पेरल्या आहेत. त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत अश्या रितीने मोठ्या खुबीने मजकुरात लपवलेल्या आहेत, असा लेखकाचा समज असल्यास... धन्य आहे ! मिपाकर इतके पण 'हे' नाहीत. ;)
=)) =)) =))

पाषाणभेद's picture

24 Sep 2019 - 2:07 pm | पाषाणभेद

तुम्ही या प्रतिसादातच भरपूर सरपण रचलेय त्याचे काय?

:-)

दिनेश५७'s picture

22 Sep 2019 - 8:40 pm | दिनेश५७

गेली १३ वर्षं मी मिपावर आहे. एवढं तर माहीत असणारच की राव!

नाखु's picture

22 Sep 2019 - 11:16 pm | नाखु

म्हणजेच रागांचे अवमूल्यन आहे का आठांचे प्रतिमाभंजन.
असो मुद्दा एका पन्नाशी गाठली असलेल्या नेत्याची पंचवीशीतील युवा नेत्यांबरोबर केलेली सामायीक साखरपेरणी भारीच रोचक आहे.
काहीवेळा बातम्या पेरतात इथे लेखात गुणगान पेरले आहे इतकाच काय तो फरक!!

वाचाल तर नक्कीच वाचाल या वाचक संघाच्या दोन ओळी आणि ओळींमधले सुद्धा वाचावे या अनियतकालिकाच्या ताज्या अंकातून साभार.
संकलक नाखु

उपेक्षित's picture

23 Sep 2019 - 1:10 pm | उपेक्षित

लयीच काडीबाज लेख हाये. छोटा प्याक बडा धमाका :)

बाकी लोकसभेवेळी भाडीपाने आदित्य ठाकरेची घेतलेली मुलाखत पाहिली होती वयामुळे थोडी बालिश वाटली पण आदित्य थोडा प्रगल्भ पण वाटला.
अर्थात वयाप्रमाणे अजून सुधारणा झाली तर चांगलेच आहे.

चित्रगुप्त's picture

23 Sep 2019 - 2:04 pm | चित्रगुप्त

ही घ्या घोड्याची लंबी रेसः
http://www.misalpav.com/node/44478

आणि हेही वाचा:
http://jagatapahara.blogspot.com/2019/09/blog-post_22.html

.

रमेश आठवले's picture

24 Sep 2019 - 1:25 am | रमेश आठवले

घोडा आहे की आणखी कोणी सजातीय प्राणी हे काळच ठरवेल.

धर्मराजमुटके's picture

24 Sep 2019 - 2:17 pm | धर्मराजमुटके

लंबी रेस का घोडा असेल की नाही ते माहित नाही पण यात खालील शक्यता असू शकतात.

१ ) अंजना ओम कश्यप ला नॉस्ट्त्रेडॅम्स प्रमाणे प्रख्यात व्हायची घाई झालेली असावी पण अतीघाईने तिचा पोपट झाला असावा.
२) शिवसेनेच्या थिंक टँक मधून कोणीतरी असे निगेटीव्ह बोलण्यासाठी सुपारी दिलेली असावी जेणेकरुन शिवसैनिक चवताळून उठतील आणि आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करतील.

जुनी शिवसेना असती तर कदाचित आता पर्यंत "आजतक" हे "बिते हुए कलतक" च शिल्लक राहिले असते पण ते एक असो.
"आपला पगार किती आपण बोलतो किती" ह्या म्हणीची जन्मदात्री ही बाईच असावी अशी मला दाट शंका आहे.