तंत्रजगत
विंडोजमधील क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर
बऱ्याचदा आपण क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर बद्दल ऐकतो, पण ते नक्की काय असतं असा प्रश्न पडतो. तर आज आपण विंडोजमधील क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर यांची माहिती घेउ.
मातृत्त्व लांबवणे
बाकी काही म्हणा आज एका बातमीने लक्ष वेधून घेतलं...
त्याचा नेमका अर्थ मात्र कळला नाही.
तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }
तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
वाहनविश्व : भाग २ इतिहास
आधीचा भाग :
वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना
___________________________________________________________
वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना
आजच्या धावपळीच्या युगामधे वेळेत अपेक्षित ठिकाणी पोचण्यासाठी आपण वाहनाच्या कुठल्याना कुठल्या प्रकारावर सतत अवलंबुन असतो. नोकरीला ३०-४० कि.मी. जायचं असु दे किंवा शेजारच्या चौकातुन कोंथिंबिरीची गड्डी आणायची असु दे. ऐन पावसाळ्यात महत्त्वाच्या पिलिअन रायडर (मि.पा. वरच्या नाही) बरोबरची सहल असु देत. गाडीवर (मोदकरावांसारखे उत्साही लोकं आजही सायकलवर :) ) टांग टाकली की निघालं असा प्रकार असतो.
स्मार्ट्फोन
मंडळी,
स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते
samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे.
ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल.
(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…
टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली.
WiFi राउटर विकत घेणे आहे - सल्ला हवा
मला WiFi राउटर विकत घ्यायचा आहे. मुख्य वापर फक्त मोबाईल फोन साठीच करायचा आहे .
माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो ,
त्यातला महिन्याला,निम्मा सुधा खपत नाही.
VoIP - म्हणजे काय रे भाऊ?
डॉट कॉम बूमच्या काळात, साधारण 1999-2000 च्या सुमाराला, डायलपॅड.कॉम ह्या संकेतस्थळाची ओळख झाली होती. अमेरिकेतल्या कोणत्याही नंबरवर चकटफू फोन करण्याची सोय त्या संकेतस्थळाने करून दिली होती. बर्याच मित्रांना तेव्हा फुकटात फोन करून बघितले होते. पण त्यावेळी मला त्या फुकट सोयीपेक्षा त्या तंत्रज्ञानाने भुरळ पाडली होती.
सामान्य माणसासाठी साधा फोन
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील .
आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अॅन्ड्रॉईड अॅप
नमस्कार मंडळी.
सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अॅन्ड्रॉईड अॅप तय्यार केले आहे. Google Play वर आपण हे अॅप या लिंक वर डाउनलोड करू शकता http://bit.ly/1hOrUnZ
ब्राउजर एक्स्टेंशन्स
नमस्कार मंडळी,सुझेच्या अॅन्ड्रॉइड धाग्यात अॅप्स देताना,विचार केला की इथे क्रोम आणि फायरफॉक्स वापरणारी बरीच मंडळी आहेत्.तेव्हा मला माहित असलेले आणि इथल्या अन्य टेक-सॅव्ही मंडळींना माहित असलेले ब्राउजर एक्स्टेंशन शेअर करण्यास काय हरकत आहे.
तर आता मी वापरत असलेले वरील दोन्ही ब्राउजर्सचे एक्स्टेंशन्स इथे देत आहे.
***************************************************
- ‹ previous
- 14 of 14