लेख

अनसंग हीरो

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
13 Apr 2013 - 2:34 pm

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली.

समाजजीवनमानप्रकटनविचारलेख

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग एक

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
12 Apr 2013 - 3:33 pm

१४ एप्रिल १९४४ या तारखेचे महत्व मुंबईच्या इतिहासात अनन्य साधारण आहे यात शंकाच नाही. जे महत्व पुण्याच्या इतिहासात १२ जुलै, १९६२ ला आहे ज्या दिवशी पानशेत धरण फुटल्याने जुन्या पुण्याचा चेहरा बदलला पण त्यावेळी शहरात असणा-या लोकांच्या मनात खोलवर आघात करून गेला असाच दिवस मुंबई ने अनुभवला १४ एप्रिल, १९४४ ला. हा दिवस अग्निशमन सुरक्षा दिन म्हणूनही पाळला जातो.
काय होती ही दुर्घटना? पाहुया..

समाजलेख

अंड्याचे फंडे ५ - शर्यत

साळसकर's picture
साळसकर in जनातलं, मनातलं
8 Apr 2013 - 12:12 pm

मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्‍यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.

मुक्तकसमाजरेखाटनप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवविरंगुळा

पुन्हा एक पी आय ए अपहरण

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
8 Apr 2013 - 11:54 am

पी आय ए- पी के ३२६ अपहरणाचे प्रकरण आपण काही दिवसांपुर्वी वाचले असेलच आज पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच आणखी एका विमान अपहरणाची कथा पाहू. पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच घटनेची चर्चा करण्याचे कारण ही घटना वेगळ्या परीस्थितीत घडते आहे आणि तीला अतिशय वेगळ्या प्रकाराने हाताळले गेले आहे.

समाजलेख

अ‍ॅन्ड्रॉईडः अडखळती पहिली पाऊले

लंबूटांग's picture
लंबूटांग in जनातलं, मनातलं
5 Apr 2013 - 10:30 am

गूगल ने विकत घेतल्यानंतरही अ‍ॅन्ड्रॉईडचे मुख्य ध्येय तेच होते - एक असा प्लॅटफॉर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल. त्यामागे अजून एक उद्देश हाही होता की अशी खुली बाजारपेठ उपलब्ध करून देऊन सेलफोन कंपन्यांची हुकुमशाही मोडीत काढणे. तो पर्यंत अमेरिकेत सेलफोन सेवादाते त्यांना हवे तसे फोन हँड्सेट निर्मात्यांकडून बनवून घेत होते. ह्याला कारण म्हणजे अमेरिकीतील कंत्राट पद्धत. तुम्ही तुमच्या सेवादात्याबरोबर २ वर्षे बांधिलकीच्या कंत्राटावर सही करायची आणि त्या बदल्यात तो सेवादाता तुम्हाला फुकट अथवा नगण्य किमतीत हँड्सेट देणार.

तंत्रआस्वादलेखसंदर्भ

ओज-शंकराची कहाणी

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
3 Apr 2013 - 12:59 pm

श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

संस्कृतीसमाजजीवनमानराहणीशिक्षणप्रकटनलेखमाहिती

अ‍ॅन्ड्रोईड: संस्थापक आणि स्थापना

लंबूटांग's picture
लंबूटांग in जनातलं, मनातलं
3 Apr 2013 - 4:00 am

टीपः माझा विडंबनाशिवाय काहीही लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुधारणा अवश्य सुचवा.

२००३ च्या शेवटी शेवटी असाच एक दिवस. स्टीव्ह पर्लमन -एक हुशार, यशस्वी अभियंता आणि भांडवल पुरवठा/ गुंतवणूकदार - याचा दूरध्वनी खणखणला, पलीकडे होता जुना मित्र आणि सहकारी अ‍ॅन्डी रुबीन जो तिथून जवळच्याच एका भाड्याच्या जागेत आपली कंपनी चालवत होता.

अ‍ॅन्डी: मी कफल्लक झालोय, पैशाची गरज आहे.
स्टीव्ह: कधी पाहिजेत?
अ‍ॅन्डी: आत्ताच्या आत्ता!

वाङ्मयतंत्रविज्ञानलेखमाहिती

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद

साळसकर's picture
साळसकर in जनातलं, मनातलं
31 Mar 2013 - 3:16 pm

जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं..

ऐन दुपारी.. नदी किनारी..
फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी..
तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने..
घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे..

मुक्तकविनोदमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवविरंगुळा

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
30 Mar 2013 - 6:44 pm

अग्ने नय सुपथा राये अस्मान्
विश्वानि देव वयुयानि विद्वान्.
युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो
भूयिष्ठां तेनमउक्तिं विधेम.
[ईशोपानिषद (मंत्र १8)]

धर्मसमीक्षालेखप्रतिभा

कालाय तस्मै नम: !

गोगट्यांचा समीर's picture
गोगट्यांचा समीर in जनातलं, मनातलं
29 Mar 2013 - 4:09 pm

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार . मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी बरयाच सोयी-सुविधा मोफत दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट देण्यात आली . ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता. एकूणच सगळं ऐटीत चालल होतं . शहरातले लोक सुजाण , सुशिक्षित आणि कामसू होते. त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या आपल्या संस्थेत जात.

जीवनमानलेख