नवविधवेचे नवर्यास पत्र
तू गेलास... बरं झालं. आणि लवकर गेलास ते आणखीन बरं झालं.
नाही तरी रात्री पिऊन पडायचास.....काय उपयोग होता तुझा? लग्नानंतर तुझं पिणं कमी होईल या आशेनं आई-वडीलांनी मला घरात आणलं. पण आधी बाहेर पिणारा तू , घरीच बाटली घेऊन बसायला लागलास, का तर म्हणे चखण्याचा खर्च कमी होतो.
मुलं तुला घाबरायची पण एकदाच मी, तुझी पोलीसात तक्रार करुन, इन्स्पेक्टर बोक्यांना घरी बोलावलं. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले ‘फोकलीच्या, पोराबाळांवर आणि बायकोवर हात टाकशिल तर गोमूत्र पाजीन !’ तेंव्हापासनं तू फक्त शून्यात नजर लावून प्यायला लागलास.