काथ्याकुट

चालू घडामोडी - घटलेले सरासरी आयुर्मान आणि प्रदूषण

Pratham's picture
Pratham in काथ्याकूट
3 Sep 2021 - 10:24 am

२ दिवसांपूर्वी संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवलानुसार उत्तर भारतातील(दिल्ली, ऊ.प्र.,बिहार,हरयाणा इ) राज्यांतील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हवा प्रदूषणा मुळे ९ वर्षांनी कमी होत आहे व विविध श्वसनाविषयी आजार होत आहेत.
तर महाराष्ट्र, म. प्र. या राज्यात ते प्रमाण २.५ ते ३ वर्षे इतके आहे.
रस्ते अपघात,कर्करोग,आत्महत्या यांच्यामुळे होणाऱ्या मृत्यू पेक्षा प्रदूषणामुळे होणारे अकाली मृत्यू चे प्रमाण जास्त आहे.
पण आपल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांना त्याची काही तमा नाही.
आणि आपण नागरिक म्हणून योग्य मागण्या करत नाही असे मला वाटते.

रोजची आंघोळ करणे

आंबट चिंच's picture
आंबट चिंच in काथ्याकूट
7 Dec 2020 - 6:33 pm

खुप दिवसांनी काथ्याकुटा करावासा वाटातोय म्हणुन म्हंटलं धागाच काढावा.

मला सांगा तुम्हा सर्वांना रोजची आंघोळ नाही झाली तर काहीतरी चुकल्याचुकल्यासरखं किंवा कसंतरीच वाटंतं का?

मला रोजंच पुजाअर्चा करायचीच असतेच असं नाही म्हणजे मी कधी कधी एकदम देवभक्त बनतो आणि चांगलं शुचिर्भुत झाल्यावर मन लावुन पुजा करतो. प्रसन्न वाटतं. तर कधी कधी आठवडाभर करतही नाही. मन का राजा.

पण आंघोळ ही रोज केलीच पाहिजे असा माझा अट्टाहास असतो. रोज आपली आन्हिकं वेळच्या वेळी झाली पाहिजे म्हणजे आटोपलं की झालं.

ट्रम्प , ट्विटर , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , पॉलिटिकल बायस आणि मिसळपाव

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
28 May 2020 - 1:47 pm

संदर्भः

ट्रम्प -
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या काही ट्वीट्स वर फॅक्ट चेक मार्क लावला , अर्थात डोनाल्ड् ट्रम्प खोटे बोलत आहेत असे अपरोक्ष पणे सुचवण्याचा प्रयत्न केला.

t

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
2 Feb 2019 - 6:45 am

अर्थसंकल्प

.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.

अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:

गलिच्छ नायतर काय?

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
7 Jan 2019 - 10:23 am

रडण्याच्या प्रसंगात डोळ्यात येणारी आंसवं आणि नाकातून येणारं पाणी मोकळ्या
हाताच्या तळव्याने पुसणं किंवा स्त्रीयांनी नेसलेल्या साडीच्या मोकळ्या पदराच्या
टोकानं नाक आणि डोळे पुसणं किंवा नाकाजवळून जाणार्‍या पदराने नाकातलं पाणी
पुसणं अशा प्रकारचे सीन्स टिव्हीवर पहाणं अंमळ गलिच्छ वाटतात.

त्या ऐवजी,रुमालाने किंवा टिश्यू पेपरने पुसण्याची क्रिया करणं हे संबंधीत शूट
करणार्‍यांना कळत कसं नाही?
कां स्वच्छ-अस्वच्छतेची नाहीतरी आमची बोंबाबोंबच!

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)

आधार कार्ड - अपडेट आणि नेमकी माहिती...

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
11 Dec 2017 - 1:40 pm

नमस्कार मिपाकर्स..

आधार कार्ड काढणे / न काढणे व वेगवेगळ्या ठिकाणी लिंक करणे याची भवती न भवती बरेच दिवस सुरू आहे.

३१ डिसेंबरला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आणि ३१ मार्च पर्यंत मोबाईल सर्विस प्रोव्हायडरला देणे आवश्यक ही बातमी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऐकली होती. यानंतर हळूहळू ओला आणि अ‍ॅमेझॉनचेही आधार कार्ड लिंक करा असे मेसेज येऊ लागले. बँक आणि मोबाईलच्या मेसेजला कधीच फाट्यावर मारले आहे. त्यामुळे ओला अ‍ॅमेझॉनचा प्रश्नच नाही.

याबाबत शोधाशोध करून फारसे हाती लागले नाही त्यामुळे इथे काथ्याकुटात धागा काढत आहे.

वाहन खरेदी करतांना

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
31 Jul 2017 - 12:36 pm

वाहन खरेदी करतांना जनरली

१ एक्स शोरूम किंमत
२ रजिस्ट्रेशन
३ डेपो चार्जेस
४ इन्शुरन्स

ह्या सदरांखाली पैसे घेतात

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
21 Jul 2017 - 5:47 pm

https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU

हि एक लिंक पाहिली.

ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत

मानवाचेच मुळ अफ्रिकेत का? भाग- २

दीपक११७७'s picture
दीपक११७७ in काथ्याकूट
18 Apr 2017 - 4:45 pm

संदर्भ: -१ “साधारण 60 लाख वर्षांपूर्वी, कुठेतरी एका मर्कट वंशीय मादीला 2 पिल्लं झाली, त्यातली एक पुढे चिंपाजी झाली आणि दुसरी, आपली खापरपणजी होती.’’ http://www.misalpav.com/node/39178
||कोहम्|| भाग 1

संदर्भ: - २ थोडक्यात म्हणजे "माकडापासून मानव उत्क्रांत झाला नाही" तर “आदिमानव, मानव आणि महामाकडे या प्रजाती एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाल्या आहेत." http://www.misalpav.com/node/25105
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१ : प्रस्तावना

हे राजा आम्ही असे चुकत तर नाहीयोत नं

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
10 Jan 2017 - 3:37 pm

हे राजन

अत्यंत गांजलेले आम्ही मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे बघतोय ...सतत आणि नेहेमीच
तुझ्या प्रत्येक कृती कडे मोठ्या कौतुकाने बघतोय त्याचा काहीतरी सकारात्मक अर्थ लावतोय ....प्रामाणिकपणे ..
तुझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतोय ...डोळे झाकून
तू सज्जनांच रक्षण करशील त्याचं दु:ख नाहीसे नाही तरी निदान कमी करशील अशी आशा लावलीये आम्ही ...ती वेडी आशा तर नाहीयेना राजन ?
वेगवेगळ्या सुख, सुविधा सवलतीनचा त्याग म्हणजे काहीतरी उदात्त अशी स्वातंत्र्य पूर्व काळातील मानसिकता आम्ही पण मोठ्या उत्साहाने अंगिकारली ...सगळ्यांनी नाही पण बऱ्याच जणांनी