यज्ञकर्म उपहारगृह

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in जनातलं, मनातलं
15 Aug 2009 - 11:57 am

नमस्कार.

पुण्यात सध्या स्वाईन फ्लू ने भयंकर उच्छाद मांडला आहे हे आपण सर्व जाणताच. प्रसारमाध्यमे उलट सुलट बातम्या पसरवून लोकांमध्ये घबराट पसरवत आहेत. टिव्ही वरील बातम्यांमधून स्वाईन फ्लूचे जे उग्र स्वरूप समोर येत आहे त्याने धास्तावून आम जनतेने बाहेर फिरणे, सार्वजनिक ठिकाणांना भेटी देणे बंद केले आहे. ह्याचा सर्वच व्यवसायांवर अनिष्ट परिणाम दिसू लागला आहे. ह्याचाच परिपाक म्हणून बहुतेक उपहारगृहे ओस पडलेली दिसत आहेत. यज्ञकर्म उपहारगृहही त्याला अपवाद नाही. यज्ञकर्म उपहारगृहात काम करणारा कर्मचारी वर्ग पुण्याबाहेरून आलेला आहे. त्यांच्या घरच्यांनाही, पुण्यात नोकरी करणार्‍या, आपल्या मुलांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागे गावाकडे परतण्याचा धोषा लावला आणि यज्ञकर्मच्या कर्मचार्‍यांनी तशी इच्छा व्यक्त केली.
गिर्‍हाइकांची रोडावलेली संख्या, कर्मचार्‍यांच्या नातलगांना वाटणारी स्वाभाविक काळजी आणि कर्मचार्‍यांची इच्छा लक्षात घेऊन यज्ञकर्म उपहारगृह काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे....

आजपासून १५ दिवस यज्ञकर्म उपहारगृह सेवेसी उपलब्ध राहणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

धन्यवाद.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

सुनील's picture

15 Aug 2009 - 1:40 pm | सुनील

लवकरच आपण सगळे या भयगंडातून बाहेर येऊ ही इच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2009 - 1:09 pm | प्रभाकर पेठकर

पुण्यातील साथ आता आवाक्यात आहे, असे आत्ताच एका चित्रवाहिनीच्या बातमी पत्रात पाहिले.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

विसोबा खेचर's picture

15 Aug 2009 - 2:21 pm | विसोबा खेचर

आजपासून १५ दिवस यज्ञकर्म उपहारगृह सेवेसी उपलब्ध राहणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

अहो १५ दिस म्हणजे बरेच झाले की!

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2009 - 1:06 pm | प्रभाकर पेठकर

तात्या,

गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. स्वाईनफ्ल्यूच्या निमित्ताने गावी गेलेला कर्मचारी वर्ग गणेशोत्सव उरकूनच परतणार. त्यामुळे १५ दिवस बंद ठेवले आहे. जर कर्मचारी वर्ग लवकर परतला तर लवकर सुरू करू. तसे ह्या धाग्यावरच सर्वांना कळविनच.

धन्यवाद.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

एकलव्य's picture

15 Aug 2009 - 2:46 pm | एकलव्य

पंत,

कालच आपल्या उपहारगृहाविषयी बोलणे झाले... आणि आस्वाद घेता यावा म्हणून हे नेमके कोठे आहे याची चौकशी करत होतो. पुण्यात मास्क लावून गेले एकदोन दिवस फिरलो आणि हळूहळू व्यवहार चालू होतील असे वाटले.

यज्ञकर्मामध्ये आपल्या पाहुणचाराचा आस्वाद घेण्याचा योग आम्हाला पुन्हा कधीतरी मिळेल ... असो, आपण काळजी घ्या.

- एकलव्य

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2009 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर

अरेरे! दुर्दैव. दूसरे काय्? पण लवकरच उपहारगृह सुरू होऊन आपल्या भेटीचा योग येईल ह्या आशेवर आहे.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

अरुण वडुलेकर's picture

16 Aug 2009 - 2:00 pm | अरुण वडुलेकर

मी नाशिककर असलो तरी प्रत्यही पुण्यांत येणे होतेच. यज्ञकर्म पुण्यांत असेल तर कृपया पत्ता कळवावा.
एक खवय्या.
खाणार्‍याने खात रहावे
देणार्‍याने देत रहावे
खाणार्‍याने फक्त खातच रहावे

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2009 - 10:16 pm | प्रभाकर पेठकर

http://www.misalpav.com/node/4521#comment-65209

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

प्रसन्न केसकर's picture

16 Aug 2009 - 3:03 pm | प्रसन्न केसकर

पंधरा दिवस उपहारगृह बंद.....

पण यज्ञकर्म उपहारगृहाचा पत्ता जरुर कळवा गणपतीनंतर भेट देता येईल.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2009 - 8:25 am | प्रभाकर पेठकर

श्री. अरुण वडूलेकर ह्यांना दिलेल्या प्रतिक्रियेत यज्ञकर्मच्या पत्याची 'लिंक' दिली आहे. जरूर भेट द्यावी ही विनंती.

संदीप चित्रे's picture

17 Aug 2009 - 7:35 am | संदीप चित्रे

यज्ञकर्म पुन्हा एकदा जोरात सुरू व्हावे ह्या शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2009 - 8:28 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद संदीप,

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा यज्ञकर्मच्या प्रकृती स्वास्थासाठी अत्यंत मोलाच्या आहेत.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.