हरामखोर निर्लज्ज लालू

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
11 Jun 2009 - 5:56 am
गाभा: 

http://www.loksatta.com/daily/20090610/mum02.htm

वरील बातमी वाचा. लालूप्रसादने रेल्वे मंत्रीपद सोडताना लबाडी करून समस्त माजी रेल्वेमंत्र्याना, त्याच्या वा तिच्या कुटुंबियांना आणि एका नोकराला जन्मभर वातानुकूलित डब्यातून फुकटचा प्रवास मंजूर करून घेतला. वा रे समाजवादी! माजवादी साले.
ही हरामखोरी आहे. रेल्वेमंत्र्याला जन्मभर फुकट पोसायला ही लालूच्या बापाची जहागीर आहे का?

बघू आता ममतादेवी ही सवलत ठेवतायत का रद्द करतायत ते.

प्रतिक्रिया

चंबा मुतनाळ's picture

11 Jun 2009 - 6:47 am | चंबा मुतनाळ

माझ्या पणजीच्या मामाचे आडणाव यादव होते!
अब्बी हाम भी फरीमें जात्रा करुंगा टरेनसें|

- चंबा जाधव

मराठी_माणूस's picture

11 Jun 2009 - 1:27 pm | मराठी_माणूस

अशा माणसाचे पण काही जण फॅन असतात

चिरोटा's picture

11 Jun 2009 - 9:55 am | चिरोटा

एका नोकराला जन्मभर वातानुकूलित डब्यातून फुकटचा प्रवास मंजूर करून घेतला

राजकारणी कितीही मोठ्या पदावर असला तरी नोकरशहांच्या संमत्तीशिवाय भ्रष्टाचार करुच शकत नाही.पंतप्रधानांच्या निर्णयाला पण केंद्रिय सचिवांची संमत्ती आवश्यक असते.कुठलेही भ्रष्टाचाराचे प्रकरण घ्या,सरकारी अधिकार्‍यांचा त्यात सहभाग असतोच.
राजकारणी मंत्रीपदावर आला की पैसे खायचे वेगवेगळे मार्ग हेच सरकारी अधिकारी मंत्र्याला सांगतात्.कुठ्ल्या नियमांमध्ये त्रुटी आहेत्,कुठ्च्या नियमांचा कचाट्यात न अडकता गैरफायदा घेता येइल,कुठला अधिकारी पैसे खातो,कोण कडक आहे असली सर्व माहिती मंत्र्याला दिली जाते.वरील प्रकरणात ज्या अधिकार्‍यानी हा प्रवास मंजूर केला त्याना आधी झोडले पाहिजे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते's picture

11 Jun 2009 - 11:16 am | नितिन थत्ते

दिलेल्या दुव्यातील राम नाईक यांची टीका वाचून गंमत वाटली.
राम नाईक काही काळ रेलवेमंत्री होते. त्यांनी रेलवेमंत्री होताच आपल्या मुलीला स्वतःची सहाय्यक म्हणून नेमले (रेलवेच्या पेरोलवर) आणि आपले एक संपर्क कार्यालय गोरेगाव स्थानकाच्या आवारात उभारले. ते रेल्वे मंत्री नसताना सुद्धा ते कार्यालय गोरेगाव स्थानकाच्या आवारातच चालू होते.
(हे कार्यालय मी अनेक वर्षे पहात आलोय. रेलवेची जागा बळकावण्याचाच हा एक प्रकार आहे. नंतर पेट्रोलिअम मंत्री झाल्यावरचे पेट्रोलपंपवाटप तर प्रसिद्धच आहे.)
खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

11 Jun 2009 - 4:49 pm | विकास

एक चूक आहे म्हणून दुसरे आपोआप बरोबर होत नाही...

नितिन थत्ते's picture

11 Jun 2009 - 5:02 pm | नितिन थत्ते

सहमत.
(पण ठराविक लोकांना वेगवेगळे धागे काढून एकसारखे झोडायचे हे ही योग्य नाही.) :(

खराटा
(रंग माझा वेगळा)

ऋषिकेश's picture

11 Jun 2009 - 1:27 pm | ऋषिकेश

अरे बापरे! इतक्या जाहिर शिव्या देण्यासारखं काय झालंय ते कळलं नाहि. लालुंनी जे केले आहे ते चुक का बरोबर हा चर्चेचा वेगळा मुद्दा असला तरी त्यांनी जगावेगळं कहिहि केलेलं नाहि.. असा एकतरी पक्ष दाखवा ज्याचे मंत्री स्वच्छ निर्णयच घेतात

(शांत)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

तिमा's picture

11 Jun 2009 - 6:03 pm | तिमा

आपण शीर्षकात लालू यादव याचे एकच नांव तीनदा लिहून काय साधले? द्विरुक्ती सारखी त्रिरुक्ती ?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

Nile's picture

12 Jun 2009 - 2:31 am | Nile

हा हा! आवड्या.

आम्ही फक्त पहील्या शब्दाचा पुनः उच्चर करतो! ;)

मस्त कलंदर's picture

11 Jun 2009 - 11:42 pm | मस्त कलंदर

गेल्या वर्षी बहुतेक मटामध्ये एक बातमी आली होती.. पुण्याच्या एका गृहस्थाने माहिती अधिकाराच्या अंतर्गत राज्यपाल कृष्णा यांच्या देशांतर्गत दौर्‍यांवर किती रूपये खर्च झाले याची माहिती मागवली होती..

उत्तर: एकूण २५ लाख.
त्यांपैकी फक्त एकच दौरा कार्यालयीन होता..
बाकी सगळे दौरे दक्षिण भारतातील पत्नीच्या माहेरी झाले होते.. नि सगळ्या दौर्‍यांमध्ये त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या..
याचाच अर्थ.. कृष्णा यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मनमानीपणे सासुरवाडीला जायला खर्च केला..

पण ही माहिती मिळूनही त्या प्रकाराची ना चौकशी झाली.. ना कुठल्या न्यूज चॅनेलने तो प्रश्न ऐरणीवर घेतला.. आताही लालूंची ही सवलत रद्द होईल.. की थोड्याच दिवसांत लोक ही बातमी विसरून जातील.. हे पहायचे..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!