मार्केट?

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
26 May 2009 - 5:43 pm
गाभा: 

मंडळी,
मी मार्च मध्ये काहि शेअर्स काढले व आलेले पैशे वार्षिक गुंतवणुकिसाठी म्युच्युअल फंडाकडे वळवले.(करसवलत घेण्याकरिता)
त्यावेळी बाजाराचा निर्देशांक जवळपास ८००० ते ८५०० च्या आसपास होता. अर्थातच एनअव्ही त्यावेळि दहाच्याहि खाली होता.
महिन्याभरातच मार्केट हे काहिहि सकारात्मक कारण नसताना १२००० ते १२५०० च्या आसपास चढले. अन नवीन सरकार आल्यावर
तर एकाच दिवसात जवळपास २००० अंकांनी वाढले. सध्या ते १४००० च्या आसपास घुटमळते आहे.
मुळात महिन्याभरात जेंव्हा भारतात निवडणुकीची धावपळ होती,पुन्हा स्थिर सरकार येइल कि नाहि ह्याबाबत सर्वत्र साशंकता होती,
जागतिक बाजारात मंदीचे ढग अधिक गडद होत होते वा आहेत,अशा वेळी भारतातले शेअर मार्कॅट हे जवळपास ४५०० अंकानी वर कसे काय चढले?
आताच रेडिफ.कॉम वर एका लेखात काहि अर्थ तज्ञांनी "सेंन्सेक्स ह्या वर्षाअखेर पर्यंत १९५०० ह्या पातळीवर जाईल" असे विधान केले आहे.
मागचा अनुभव लक्षात घेता हि सुध्दा एक व्हर्च्युअल तेजी आहे काय?
तसेच सध्याच्या परिस्थितीत बाजाराची एवरेज पातळि काय राहिल?
व मुख्य म्हणजे मी घेतलेला निर्णय (इक्विटि टु म्युच्युअल फंड) हा योग्य होता का?

प्रतिक्रिया

ही दिखाऊ तेजी आहे... भुलू नका
सेन्सेक्स येत्या १-२ महिन्यांत पुन्हा मूळपदावर येईन असे माझे मत आहे.

१०,००० च्या खाली .... त्यातही माझा सपोर्ट ७५००-८००० लेव्हल ला राहीन.
८५००-९००० च्या रेंजमधे ही पातळी आली तर दीर्घ मुदतीसाठी अवश्य गुंतवणुक करा...

बाकी तात्या , नाना , राजे हे जास्त अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांचा परामर्श इथे आवश्यक आहे
(माल लेके बैठा हुआ ) सागर :)

वजीर's picture

27 May 2009 - 12:51 am | वजीर

>>बाकी तात्या , नाना , राजे हे जास्त अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांचा परामर्श इथे आवश्यक आहे

सहमत आहे. उगाच संपादकांनी काय करावे आणि काय करु नये ह्यावर फालतू लेख लिहिण्यापेक्षा नानानी इथे मार्गदर्शन करायला काय हरकत होती?

अवलिया's picture

27 May 2009 - 9:09 am | अवलिया

सध्या मार्केट मधे स्थिर सरकारमुळे (निदान भारतात) उत्साह आहे. पण छोटीशी खराब बातमी परत १० च्या रेंजमधे नेवुन ठेवु शकते. सध्या प्रेडिक्शन खुपच कठीण आहे. :)

--अवलिया

दशानन's picture

27 May 2009 - 11:18 am | दशानन

जस्ट वेट & वॉच !

मार्केट मध्ये जे काही चालू आहे हे सर्व स्थिर सरकार मिळाल्यामुळे चालू आहे असे नाही आहे ;) सध्या मार्केट काही चांगल्या बातम्या आहेत पण त्या बातम्या दिर्घकाल मार्केटला वर थोपवू शकत नाहीत ह्या मागे कारण जागतिक मार्केटमधे चाललेल्या घडामोडी. जो वेग काही दिवसामध्ये भारतीय बाझारने घेतला आहे हे पहाता मार्केट काही आठवड्यात एक मोठा गोता घेण्याची शक्यता आहे ज्या पध्दतीने वर गेले आहे त्याच पध्दतीने खाली देखील येऊ शकेल असा माझा अंदाज आहे.

ह्याला काही कारणे आहेत.

१. सरकार अजून मंत्रीमंडळ विस्तारामध्ये गुंतले आहे जेव्हा ह्यातून बाहेर पडून वित्तमंत्री नवीन घोषणा करतील तेव्हा मार्केट आपली दिशा ठरवेल. ( डाऊन ट्रेड जास्त )

२. काल परवा जर न्युज व्यवस्थीत पाहीली असेल तर एक बातमी तुम्हाला ही कळली असेल की गल्फ कंट्रीज् नी क्रुड ऑईल हे पुन्हा १५० च्या आसपास जाईल असा अंदाज वर्तवला आहे ह्यामागे कारण आहे कमी उत्पादन.

३. ज्या वेगाने खरेदी होत आहे त्याच वेगाने विक्री देखील होईल कारण प्रॉफिट बुकिंग.

अजून ही काही कारणे आहेत पण ज्या पध्दतीने मार्केट वर आले आहे हे पहाता मार्केट खाली एकदातरी जाणारच (१५००-२५०० पॉइंन्ट)

थोडेसं नवीन !

अभिज्ञ's picture

27 May 2009 - 10:59 am | अभिज्ञ

दिखाउ तेजी कशावरून?

१.अमेरिकेत ओबामा प्रशासन हे आउटसोर्सिंगच्या विरोधात धोरणे आणत आहे वा राबवत आहे. त्याचा मोठा फटका भारतीय बीपीओ व आय टी कंपन्यांना बसु शकतो.
२.अमेरिकेतील बॅकिंग व इतर आर्थिक संस्था ह्या प्रचंड घाट्यात गेलेल्या आहेत. त्यामुळे अर्थविषयक सेवा पुरवणा-या भारतीय आय टी कंपन्यांचे भवितव्य अधांतरी झालेय.
३.ऑटोमोबाईल क्षेत्रात युरोप व अमेरिकेत प्रचंड मंदी आहे.
४.एकंदरीत जागतिक बाजारपेठेत गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास कमी झालाय.
५.भारतातील सत्यमची पडझड हि देखील ताजी आहे.
६.क्रुड ऑइलचे भाव कमी झाल्याने आखातातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे.
७.मार्च ते एप्रिल च्या काळात सरकारने कुठलेहि नवीन धोरणात्मक निर्णय घेतलेले दिसत नाहित.

हे सर्व घडत असताना कुठल्याहि सकारात्मक घडामोडिंशिवाय बाजारात ४००० ते ४५०० च्या आसपास उसळी येते हे सहज पटत नाही.
निवडणुकिच्या निकालानंतर बाजाराच्या पहिल्या दिवशीच अप्पर सर्किट लागले होते.
स्थिर सरकार आल्याच्या आनंदात हि तेजी आल्याचे सांगण्यात आले होते.
मुळात आधीचे सरकार अस्थिर होते का?
अणु करारावरून डाव्यांनी काढलेला पाठिंबा व ती उणीव सपाच्या माध्यमातून भरून काढून जुने सरकार हे मित्रपक्षांच्या विशेष कुरबुरीशिवाय
व्यवस्थित चालले होते.ह्याच सरकारच्या काळात बाजार २१००० च्या आसपास पोहोचला होता व ह्याच सरकारच्या काळात तोच बाजार एका वर्षात १३००० अंशानी खाली पडला होता.
मग हेच सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर बाजारात इतकी तेजी कशी काय?
ओबामा निवडून आल्यावर देखील अमेरिकेत इतकी तेजी दिसून आली नाहि.

ह्या सर्व गोष्टि बारकाइने पाहिल्यावर मला तरी हि तेजी "दिखावु" वाटते.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

प्रमोद देव's picture

27 May 2009 - 11:29 am | प्रमोद देव

पण माझ्या म्हणण्याप्रमाणे बाजार कधीच चालत नाही. :(
तो नेहमीच उलट चालत असतो.
तेव्हा जर काही फायदा झाला असल्यास तो खिशात घालणे योग्य. कागदावरचा फायदा तोट्यात केव्हा रुपांतरीत होईल ते साक्षात ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही.
बाजार एकदा उतरायला लागला की तोही असाच वेगात उतरेल.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

दशानन's picture

27 May 2009 - 11:30 am | दशानन

हेच म्हणतो.

थोडेसं नवीन !

अवलिया's picture

28 May 2009 - 6:31 am | अवलिया

हेच म्हणतो.

--अवलिया

वाढलेल्या कंपन्यांची नावे पहा म्हणजे लक्षात येईल की बाजार एकदम उसळी घेण्यापाठीमागे कारण काय आहे.
ज्यावेळी आपले समभाग आपल्याला नफा देत असतील त्यावेळी नफा घेवुन बाजारा बाहेर पडणे कधीही योग्य आहे. अनिल अंबानी ह्याची कंपनी निकालापुर्वी ५०० च्या दरम्यान होती ती एकदम १६/५ नंतर ९५०च्या वर गेली.एका दिवसात असा काय झेंडा लावला की तिचे मुल्य दुप्पट झाले?म्हणुन बाजारात सावधान रहा इतकेच सांगणे आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ