मधुबाला

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in काथ्याकूट
26 May 2009 - 10:38 am
गाभा: 

एकता कपुर "मधुबाला" च्या जीवनावर एक चित्रपट काढत आहे. कळस म्हणजे या चित्रपटात "मधुबाला"ची भुमिका कंगना राणावत करणार आहे. या चित्रपटात मधुबालावर एकतर्फी प्रेम करणार्‍या हाजी मस्तानचेही पात्र आहे म्हणे, ती भुमिका अजय देवगण करण्याची शक्यता आहे. पण मधुबालाच्या भुमिकेत कंगना..... ? हे काँबिनेशन पटत नाही, नपेक्षा पचत नाहीये. आपलं मत काय......?

http://www.thaindian.com/newsportal/entertainment/playing-madhubala-bigg...

विशाल.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2009 - 10:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण मधुबालाच्या भुमिकेत कंगना..... ? हे काँबिनेशन पटत नाही, नपेक्षा पचत नाहीये. आपलं मत काय......?

मलाही पटत नाही. तिथेपण मराठी नटीच हवी. आपल्या स्वयंवरवाल्या राखीताई सावंत कशा वाटतील. (ह.च घ्या)

कंगना राणावत दिसायला फारशी आवडत नाही, पण तिला बुद्धी आहे आणि अभिनय करता येतो हे माझं व्यक्तीगत मत आहे. पण पैसे, वेळ खर्च करणार ती एकता कपूर, पैसे आणि नाव कमावणार ती कंगना राणावत, मी कशाला माझा वेळ आणि बुद्धी खर्च करून हे ठीक आहे का नाही याचा विचार करू?

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 10:52 am | विशाल कुलकर्णी

श्री श्री श्री अदितीताई,
आपले मत राखीताईंपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण या भुमिकेत सर्वांग झाकणारे कपडे घालणे अपेक्षित असल्याने राखीताईंनी सविनय नकार दिला आहे. धन्यवाद. =))
सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

हर्षद आनंदी's picture

26 May 2009 - 11:36 am | हर्षद आनंदी

पण पैसे, वेळ खर्च करणार ती एकता कपूर, पैसे आणि नाव कमावणार ती कंगना राणावत, मी कशाला माझा वेळ आणि बुद्धी खर्च करून हे ठीक आहे का नाही याचा विचार करू?

अमंळ विचार करावासा वाटतो....

जो काही उद्योग होऊ घातलाय, तो शेवटी मायबाप प्रेक्षकांवर म्हणजेच आपणा सर्वांवर लादला जाणार आहे. सर्व खर्च आपणावर लादुन आपल्य खिशातुन तो काढण्याचा प्रयत्न होणार आहे.

प्रत्यक्ष (पदद्यावर) मधुबालेला पाहणारे, तिच्य सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकलेले भाग्यवानच... पण आमच्य माथी हे काय मारले जातय याचा विचार केला पाहीजे,,,,, कंगणा व मधुबाला म्हणजे दगड व हीरा, भंगी व मालक अशी तुलना होत आहेम, असे वाटते..
(ह. घेणे हे सांगणे न लगे)

मधुबालेचा निस्सिम चाहता

भडकमकर मास्तर's picture

27 May 2009 - 12:08 am | भडकमकर मास्तर

जो काही उद्योग होऊ घातलाय, तो शेवटी मायबाप प्रेक्षकांवर म्हणजेच आपणा सर्वांवर लादला जाणार आहे. सर्व खर्च आपणावर लादुन आपल्य खिशातुन तो काढण्याचा प्रयत्न होणार आहे.
हे खूप छान समजावून सांगितल्याबद्दल टाळ्या...
त्यामुळे अशा फोरममध्ये आवाज उठवला तर जनतेची संपत्ती जी वाया जाणार आहे , त्याला काही आळा घालता येईल....
तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे...
हे मला खरंच कधीच सुचले नसते...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 11:54 am | विशाल कुलकर्णी

कंगना राणावत दिसायला फारशी आवडत नाही, पण तिला बुद्धी आहे आणि अभिनय करता येतो हे माझं व्यक्तीगत मत आहे.>>

तिला अभिनय येतो हे तर तिने सिद्ध केलेले आहेच. पण मधुबाला म्हणुन तिला पाहणं हा खरोखर डोळ्यांवर आणि मधुबालावर देखील अन्यायच आहे. संगदिल, इम्तिहान, बेकसुर, ज्वाला, परदेस, लाल दुपट्टा, बगदाद का चोर, शहिदे मुहब्बत सारखे मधुचे चित्रपट ज्यांनी पाहीलेत त्यांना तिच्या रुपात कंगनाला पाहणे हा अन्यायच वाटेल.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

चिरोटा's picture

26 May 2009 - 10:48 am | चिरोटा

मधुबालाच्या तुलनेत राणावत दिसायला जरा पुचाट वाटते. तिचा कुठलाच चित्रपट मी पाहिला नसल्यामुळे अभिनयाच्या बाबतीत काहीच सांगता येणार नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

दीपक साळुंके's picture

26 May 2009 - 11:34 am | दीपक साळुंके

याच विषयावर नुकताच कणेकरांचा खास कणेकरी शैलीतला लेख वाचण्यात आला.

"मधुबालाच्या जीवनावर चित्रपट काढण्याचं घाटतंय. तिच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय ते कतरिना कैफ यांचा विचार होऊन अखेरीस कंगना राणावत हिची निवड झालीय. हे म्हणजे सॅमसनच्या भूमिकेसाठी केश्तो मुखर्जीची निवड करण्यासारखं आहे." (इति- श्री. कणेकर)

पुर्ण लेख इथे वाचु शकता.

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 12:19 pm | विशाल कुलकर्णी

पुढे कणेकर असेही म्हणतात..

सचिन तेंडुलकरच्या भूमिकेसाठी काय तुम्ही बॉब क्रेस्टोला घ्याल की दीपक शिर्केला? मधुबाला म्हणून तुम्हाला कंगना राणावत चालत असेल तर नेहा धुपिया, जुही बब्बर व तुलीप जोशी का नको? मी तर म्हणेन की नील मुकेश, हरी बावेजा व अभय देवल काय वाईट आहेत? शूटिंगपूर्वी त्यांना गुळगुळीत दाढी करावी लागेल एवढंच! शिरिषजी कणेकर झिंदाबाद !!

=)) >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

उदय सप्रे's picture

26 May 2009 - 11:56 am | उदय सप्रे

विशाल जी,
मागे (म्हणजे जवळ जवळ २५ वर्षांपूर्वी) लोकसत्ता मधे "शिरीषासन" कि असेच काही एक सदर होते.....त्यातील एक मजकूर आठवतोय :
त्या लेखाचे नांव : प्रिय दिक्षितांच्या माधुरीस.....
लोक असे म्हणतात की तू मधुबाला सारखी दिसतेस आणि तुझी तुलना मधुबालाशी करतात.मला वाटते लोकांनी मधुबालाला पाहिलेच नसावे किंवा तुला नीट पाहिले नसावे.मुंगुसासारखे तोंड असणार्‍या अनिल कपूरसमोर तुझे सौंदर्य खुलून दिसत असेल कदाचित् पण म्हणून तू काही मधुबाला नव्हेस !"

आता मूळ मुद्दा : मधुबाला :
मधुबाला वर मी एक स्केच काढून बाजूला ३ चारोळ्या लिहिल्या होत्या त्या आधी सांगतो :
तुझी आठवण म्हणजे
सुखाने दु:खाची पाठवण आहे ,
मरगळल्या आयुष्याच्या वहीत
जणू मोरपिसाची साठवण आहे !

कोण म्हणतो ही कविता आहे?
ही तर तुझीच सृष्टी आहे !
माझ्याकडे ती फक्त "आपली"
म्हणून पहाण्याची दृष्टी आहे !

घडवल्यावर जिला त्या*ला वाटले *परमेश्वराला
आपली बाकी सर्व निर्मिती नगण्य !
अशी ही एकच.....मधुबाला ,
म्हणजेच , अर्थात्
दिरेशिवाय
धुंदावणारे
बावनकशी
लावण्य !

आता कंगना रानाऊत वर :

तू कुठली मधुबाला गे म्हशी?
तुला तर झाकताही येई अंग ना !
सौंदर्य आणि तुझा काय संबंध?
बीभत्स राना ऊत येई कंगना !
सडल्या लोहाचे कधी न होई सोने
काय करु जाणे परीसाचा संग ना?
रूप सुमार चेहेरा जसा बीमार
तिच्याओठांचा ही तुझ्याकडे रंग ना !
तू आपली घरीच बसावे खूष व्हावे
घरचे पण होत पाहुनी तुज दंग ना !

आता शिरीष कणेकरांना हा विषय पोचवलात तर एक भन्नट लेख वाचायला (सॉरी , चावायला )मिळेल !

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 12:12 pm | विशाल कुलकर्णी

जरुर, कणेकरांना मिपाची ही लिंकच पाठवतो.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2009 - 2:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कंगना राणावतवर उगाचच अतिजहरी टीका होत आहे असं वाटत आहे. मधुबाला दिसायला भले कंगनापेक्षा उजवी असेल पण म्हणून लगेच कंगनाला, लगे हाथ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांच्यावर टीका करण्याची गरज काय?
उलट विचार करायचा झाला तर कंगनाने सुमार पिक्चर 'शाकालाका बुम बुम' , चांगल्यापैकी पिक्चर 'फॅशन', 'लाईफ इन मेट्रो' आणि इतर काही पिक्चर्समधे ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत तेवढ्या मधुबालाने केल्या का? तसले प्रयोग केले का? तुलना करायला ना नाही, पण ही टीका पातळीहीन वाटली म्हणून प्रतिसादप्रपंच.

बरं त्यातून कणेकरांच्या शब्दांवर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्याने ठरवावं.

सडल्या लोहाचे कधी न होई सोने
काय करु जाणे परीसाचा संग ना?
.....
तू आपली घरीच बसावे खूष व्हावे
घरचे पण होत पाहुनी तुज दंग ना !

या ओळीतर फारच खटकल्या. (इथे मला काही व्यक्तीगत टीका करण्याचा अतीव मोह होत आहे, पण पब्लिक फोरमवर काय बोलावं याबद्दल माझ्याकडे असलेलं तारतम्य मला हे करू देत नाही आहे.)

एकूण इथल्या मधुबाला प्रेमींचे विचार पहाता असं वाटत आहे की मधुबालाच्या आणि कंगनाच्या रुपाची काही तुलना नाही, मधुबाला रूपात कंगनापेक्षा उजवी होती. पण एकूण कंगनाच्या अभिनयक्षमता आणि प्रयोगशील स्वभावाबद्दलही तिच्यासाठी दोन चांगले शब्द लिहीण्याचीही कुणाची फारशी इच्छा नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2009 - 5:52 pm | बिपिन कार्यकर्ते

जाऊ दे गं... आजकाल एकाची स्तुती म्हणजे दुसर्‍यांची निंदा असंच समीकरण झालंय. असो.

माझ्या मतेही कंगना आणि मधुबाला यांची तुलना होऊ शकत नाही. पण कंगना तिच्याजागी चांगलीच आहे. परत.... असो.

(मबा आणि मादि चाहता) बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

26 May 2009 - 7:29 pm | चतुरंग

हातच्या 'कंगना'ला आरसा कशाला? ;)

चतुरंग

घाटावरचे भट's picture

26 May 2009 - 10:37 pm | घाटावरचे भट

कंगना राणावतचा अभिनय माफ क्याट्यागिरीतील आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. संवादफेक किंवा ज्याला मराठीत ड्वायलॉक डिलिव्हरी म्हणतात ते तर तर अत्यंत गचाळ आहे... आणि आवाज राणी मुखर्जीपेक्षा किंचित बरा आहे. वैयक्तिक मताची अजून एक पिंक टाकायची झाली तर मी असं म्हणेन की अमीशा पटेल, कंगना राणावत वगैरे बायका एक तर चित्रात किंवा प्रत्यक्षात समोर असतील तर जोपर्यंत बोलायला तोंड उघडत नाहीत तोपर्यंतच, बर्‍या वाटतात...

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2009 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

च्यायला हे म्हणजे दादासाहेब फाळके पारीतोषीकाने रामसे बंधुंना सन्मानीत करण्यासारखे आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मराठमोळा's picture

26 May 2009 - 12:15 pm | मराठमोळा

हे म्हणजे जुना "डॉन", "देवदास" आणी तेच नवे चित्रपट पाहण्यात जो फरक आहे तोच जाणवेल.
असो, तरी काही लोकांना हे नवे चित्रपट आवडले आणी कलाकारांचा अभिनयही आवडला. तसेच काहीचे चित्र दिसेल असे वाटते.

खरं तर मधुबाला ची थोडीशी झलक माधुरी दिक्षित (मिपाकर नव्हे) मधे लोकांना पहायला मिळाली होती. कंगनाकडे तसे फीचर्स नाही असे माझे वैयक्तीक मत. (प्लास्टीक/कॉस्मेटीक सर्जरी करुन भरपुर सौंदर्य खुलवता येते, कंगना ने अशी सर्जरी केली होती असे वाचनात आले होते).

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

हेरंब's picture

26 May 2009 - 2:18 pm | हेरंब

मुळात एकता कपूरसंबंधी आपण चर्चा का करायची ? उलट अयोग्य पात्ररचनेमुळे तो सिनेमा पडला तर बरेच होईल, त्या अहंमन्य, बिनडोक मुलीला एवढेही महत्व देऊ नका.

प्रशु's picture

26 May 2009 - 2:20 pm | प्रशु

माधुरीला उगाच यात खेचु नका..

तीने स्वतःला अभिनयाद्वारे आणि नुत्याद्वारे सिदध केले आहे. त्या कणेकराना ती आवडत नाहि म्हणुन ते नेहमी तीच्या बद्द्ल झोंब्रच लिहितात. कारण कणेकराना ती जुही आवडते. (मराठी माणुस हाच कर्तुत्ववान मराठी माणुसाचा शत्रु आहे.)

टीप.
(कर्तुत्ववान = माधुरी , नाहितर कणेकर अस समजाल.....)

विसोबा खेचर's picture

26 May 2009 - 5:00 pm | विसोबा खेचर

कंगनाच काय, मधुबालेला या पृथ्वीतलावावर अन्य पर्याय नाही. मधुबाला म्हणजे सौंदर्याची व्याख्या!

वर कुणीसं म्हटल्याप्रमाणे उगाच आमच्या कंगनाला नावे ठेवण्यात काय प्वाईंट नाही. एकटी तीच बापडी काय, सौंदर्याच्या खाणी म्हणवणार्‍या इतर अनेक मधुबालेच्या आसपासही नाहीत!

आपला,
(कडवा मधुबालाभक्त) तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2009 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार

प्रचंड सहमत ! +१३१२३४२३४५३४६५३६४५७

च्यायला कुठे ते स्वर्गीय सौंदर्य आणी कुठे आजकालच्या ह्या ४/४ किलो मेकअप थापणार्‍या तथाकथीत सुंदर्‍या.

अभिनयात सुद्धा मधुबाला अप्रतिमच होती. खरेतर तिच्या रुपामुळे तिच्या अभिनयाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

mamuvinod's picture

26 May 2009 - 5:07 pm | mamuvinod

सौंदर्याच्या खाणी म्हणवणार्‍या इतर अनेक मधुबालेच्या आसपासही नाहीत!

१०१% सहमत

श्रीयुत संतोष जोशी's picture

26 May 2009 - 6:27 pm | श्रीयुत संतोष जोशी

त्यातल्या त्यात फक्त माधुरी दिक्षीत चा विचार करण्यास हरकत नाही ते सुद्धा ती थोडी " मधुबाला " सारखी वाटते म्हणून.
बाकी

सौंदर्याच्या खाणी म्हणवणार्‍या इतर अनेक मधुबालेच्या आसपासही नाहीत!

हेच खरे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

प्राजु's picture

26 May 2009 - 9:03 pm | प्राजु

कंगना रानाऊत मधुबाला म्हणून नाही शोभणार हे जरी खरं असलं तरी.. .. तीला अभिनय बर्‍यापैकी जमतो असं मला वाटतं.
त्यामुळे तुलना नकोच. मधुबाला म्हणजे सौदर्यांची शेवटची व्याख्या.. आणि अभिनयाचं परमोच्च स्थान आहे . कंगना अभिनेत्री म्हणून ठीक आहे. ती मधुबालेला कितपत न्याय देऊ शकती हे कळेलच आपल्याला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

26 May 2009 - 10:25 pm | भाग्यश्री

केट विन्स्लेट कशी वाटते ?? :)

www.bhagyashree.co.cc

विसोबा खेचर's picture

28 May 2009 - 7:46 am | विसोबा खेचर

केट विन्स्लेट कशी वाटते ??

माझा जीव आहे तिच्यावर! तिच्याबद्दल कुणी काही वेडंवाकडं बोलाल तर याद राखा!

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

27 May 2009 - 12:42 am | भडकमकर मास्तर

"अकडम तिकडम खाँ भोपालवाले हे इतके उत्तम गाऊन गेले असताना नवीन लोक गातातच का ? " हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे...

आता त्यांच्या जीवनावर सिनेमा काढायचा म्हणालात तर त्यांची गाणी जो गाईल , तो कोणीही असला तरी ही अकदमसाहेब आणि गांजावाला हे कॉम्बिनेशन मला अजिबात पचनी पडणार नाहीये...नव्हे पटतच नाहीये...
कुठे आमचे अकडम तिकडम खा आणि कुठे आजचे गान्जावाला, चुम्मावाला,पप्पी ,भप्पी असे गायक?? त्यांना गायक तरी का म्हणावे? की उगाच स्वरयंत्र आहे आणि त्यातून आवाज येतो म्हणून?
तू कुठला अकडम रेड्या
तू तर भक्कम भप्पी

आमच्या अकडमतिकडमसारखा एकही गायक या भूतलावर हो ऊ शकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे... त्यात या भप्पी, चुप्पीची काहीही चूक नाही...

मी आमच्या अकडमसाहेबांचे एकदा चित्र काढून त्याशेजारी चारोळी केली होती ती आता आठवत नाहीये , म्हणून वाचलात पण खबरदार कोणी आमच्या अकडमसाहेबांवरती काही वाईट बोलेल तर...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

स्वाती दिनेश's picture

27 May 2009 - 11:33 am | स्वाती दिनेश

१ जूनला अकडम तिकडम खाँ साहेबांचा परिचय लिवणार काय मास्तर?
स्वाती

धमाल मुलगा's picture

28 May 2009 - 12:34 pm | धमाल मुलगा

मध्यंतरी ग्यासुद्दिनमियाँवरदेखील एक चित्रपट करायचं घाटत होतं म्हणे. नशीब नाही केला. नाहीतर आम्ही आणि आमच्या काकांनी मिळून मोठ्ठं आंदोलनच करायचा विचार केला होता ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

भडकमकर मास्तर's picture

27 May 2009 - 12:48 am | भडकमकर मास्तर

पन्नास वर्षांनी कंगनाच्या जीवनावर सिनेमा काढायचा असल्यास कंगनाचे काम मधुबाला करू शकणार नाही याची खात्री आहे...
त्यात मधुबालाची फारशी चूक आहे असे वाटत नाही...

(कडवा कंगनाभक्त )
भडकमकर मास्तर
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

विशाल कुलकर्णी's picture

27 May 2009 - 11:32 am | विशाल कुलकर्णी

अजुन पन्नास वर्षानंतरही कोणीना कोणी मधुबालावर चित्रपट काढतच राहतील, याची खात्री आहे. पण अजुन पंधरा वीस वर्षांनंतर कंगना लोकांच्या स्मरणात राहीलच याची काय गॅरेंटी?

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

मराठी_माणूस's picture

27 May 2009 - 10:13 am | मराठी_माणूस

नक्कल करणारा मोठा का ज्याची नक्कल केलि जाते तो मोठा ?

क्रान्ति's picture

28 May 2009 - 8:10 am | क्रान्ति

कोणे एके काळी स्व. मीनाकुमारीच्या जीवनावर चित्रपट काढला जाणार होता, आणि त्यात सोनी राझदान [ही कोण हे नका विचारू, तिची फारशी माहिती मी नाही देऊ शकत!] मधुबालाचं काम करणार होती , असं कुठेसं वाचलं होतं! तो चित्रपट झाला की नाही, देव जाणे.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

विशाल कुलकर्णी's picture

28 May 2009 - 11:56 am | विशाल कुलकर्णी

तो चित्रपट आला नाही हे रसिकांवर आणि मीनाकुमारीवर मोठेच उपकार झाले असे म्हणावे लागेल. कारण मी चुकत नसेन तर हा चित्रपट महेश भट काढणार होता. सोनी राझदान त्याची पाचवी बायको. दिसणे आणि अभिनय या दोन्हीमध्ये सुमार म्हणता येइल अशी ही अभिनेत्री. जुन्या दुरदर्शनवरील काही मालिकांमधुन तिने काम केले होते. उदा. बुनियाद, खानदान ई.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री केशवसुमारजी)

तिमा's picture

30 May 2009 - 8:27 pm | तिमा

जर सोनी राजदान मीनाकुमारी झाली असती तर आपल्याला तिच्या गालाच्या खरपुड्या बघाव्या लागल्या असत्या.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2009 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या त्या सोनी राझदान बै !

(हा फोटु बघुन रात्री कोणास भयावह स्वप्न पडल्यास फोटु डकवणारा जबाबदार नाही.)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विशाल कुलकर्णी's picture

28 May 2009 - 12:20 pm | विशाल कुलकर्णी

(हा फोटु बघुन रात्री कोणास भयावह स्वप्न पडल्यास फोटु डकवणारा जबाबदार नाही.)>>>

=)) =)) =)) =)) =))

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

अविनाशकुलकर्णी's picture

28 May 2009 - 12:28 pm | अविनाशकुलकर्णी

मलिका?? चलेल का??? क प्रीति??का रानी

हर्षद आनंदी's picture

28 May 2009 - 1:04 pm | हर्षद आनंदी

प्रीती \ रानी म्हातार्‍या झाल्या आता :T त्यांच वय मेकअप सुध्दा लपवु शकत नाही.

आणि मधुबालेला कपडे शोभुन दिसतात, मलिकाला त्यांची ऍलर्जी आहे !!!