असा फिरे

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
21 May 2009 - 5:58 pm

असा फिरे रानभर वारा हा पिसाटलेला
जसा माझ्या रोमरोमी तुझा छंद दाटलेला

मेघांच्या रुपेरी कडा एकाएकी काजळल्या
तुझ्या मीलनाच्या आशा मनामध्ये उजळल्या
खळाळून वाहे पुन्हा झरा जसा आटलेला

इंद्रधनू झूल्यावर मन उंच झोके घेई
कधी तुझ्या वाटेवर चातक होऊन जाई
(जसा पाऊस होऊन तूच त्याला भेटलेला!)

लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे
तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे
मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला

अशा सुखाच्या धारांनी चिंब चिंब भिजताना
ओल्या मातीच्या कुशीत नवा प्राण रुजताना
साद घालतो प्राजक्त फुलांनी लपेटलेला

प्रेमकाव्यकविताप्रकटन

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

21 May 2009 - 6:15 pm | पाषाणभेद

"असा फिरे रानभर वारा हा पिसाटलेला...."
डोळ्यासमोर सारे द्रुष्य उभे राहते.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

अवलिया's picture

21 May 2009 - 6:26 pm | अवलिया

आवडली. अजून येऊ दे

--अवलिया

प्राजु's picture

21 May 2009 - 7:32 pm | प्राजु

फारच सुंदर!!!
खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

21 May 2009 - 8:49 pm | मदनबाण

अशा सुखाच्या धारांनी चिंब चिंब भिजताना
ओल्या मातीच्या कुशीत नवा प्राण रुजताना
साद घालतो प्राजक्त फुलांनी लपेटलेला
सुंदरच... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 11:47 pm | विसोबा खेचर

लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे
तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे
मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला

या ओळी जबरदस्त!

जियो....!

आपला,
(फ्यॅन) तात्या.

चन्द्रशेखर गोखले's picture

22 May 2009 - 7:13 am | चन्द्रशेखर गोखले

शब्दांची रंगीबेरंगी चित्तवेधक रांगोळी आवडली !!

मराठमोळा's picture

22 May 2009 - 10:25 am | मराठमोळा

जीवाची तगमग सांगणारे प्रेमकाव्य आवडले :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

जयवी's picture

22 May 2009 - 3:01 pm | जयवी

अहा..... मस्त गं !!
लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे
तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे
मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला........ हे तर खासच :)

जागु's picture

22 May 2009 - 3:04 pm | जागु

खुपच सुंदर कविता.