बालसाहित्य

अनिल सोनुने's picture
अनिल सोनुने in काथ्याकूट
19 May 2009 - 1:13 am
गाभा: 

सर्व मिपाकरांना नमस्कार,
काही दिवसापूर्वी मी मराठी मुलांसाठी तयार केलेल्या संकेतस्थळाला आपण भरभरुन प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद.
आपल्या सर्वांच्या प्रेरणेनेच मी आता नव्या स्वरुपात संकेतस्थळ तयार केले आहे. आपल्याला ते आवडेल, उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
कृपया बालजगत.कॉम ला भेट द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याकडे मुलांसाठी उपयोगी पडेल असे लेख, गोष्टी, गाणी इ. असतील तर अवश्य पाठवा. आपल्या नावासहित ती प्रसिद्ध केली जातील.
तसेच संकेतस्थळ चांगले करण्यासाठी आपल्या सूचना, प्रतिक्रिया अवश्य पाठवा. त्याआधारे संकेतस्थळ अधिकाधिक चांगले करण्याचा माझा प्रयत्न राहील.

प्रतिक्रिया

शरदिनी's picture

19 May 2009 - 1:29 am | शरदिनी

अभिनंदन...
मी काही बालकविताही पाठवेन... चालेल का?

नितिन थत्ते's picture

19 May 2009 - 10:31 am | नितिन थत्ते

शुभेच्छा.
अवांतरः आता मुलांना डुर्रर्र बडबडगीते वाचायला मिळणार तर. मुलांची शब्दसंपदा भयंकर वेगाने वाढणार. :)

खराटा
(रंग माझा वेगळा)

अनिल सोनुने's picture

20 May 2009 - 8:45 pm | अनिल सोनुने

धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. कृपया मला मेल करुन कविता पाठवा.

बहुगुणी's picture

19 May 2009 - 1:42 am | बहुगुणी

मी बर्‍याच पालकांना लिंक पाठवली आहे, धन्यवाद!

मीनल's picture

19 May 2009 - 2:58 am | मीनल

बालजगत.कॉम उत्तम आहे. माझा मुलगा लहान असताना असे काही मिळाले असते तर बहार झाली असती.
तेव्हा जे काही नेटवर उपलब्ध होते ते मी उपयोगी आणले.पण वय लहान असल्याने स्क्रीन वरच्या इंग्रजी सूचनाही कळायच्या नाहीत.

हे मराठीत आहे. त्यामुळे मराठी येणा-या मुलांसाठी उत्तम आहेच. पण न येणा-यांसाठी मराठी शिकण्याची /शिकवण्याची आकर्षक पध्दत होईल.
मुलांना पालकांची, शिक्षकांची मदत खूपच लागेल.आणि पालकांना, शिक्षकांना ही याची मदत होईल.
बरेचसे गेम्स, अभ्यास,गाणी गोष्टी लहान वयाच्या मुलांसाठी आहेत.पण मोठ्यांची मदत अपरिहार्य आहे.एकतर कॉप्युटर वापरण्यासाठी आणि मराठी सूचना समजण्यासाठी.

बालजगत.कॉम उत्तम आहे यात वादच नाही.

मीनल.

चित्रा's picture

20 May 2009 - 8:33 am | चित्रा

सहमत! साईट खरोखरच चांगली झाली आहे. मुळाक्ष्ररांच्या सोबत छोट्या ध्वनिफिती (ऑडिओ क्लिप्स) असल्या तर मुलांना अधिक सोपे जाईल.
कालच साईटवरील गोष्टी आम्ही (मुलीने आणि आम्ही) वाचल्या आणि आवडल्या.

अभिनंदन आणि धन्यवाद,

अनिल सोनुने's picture

20 May 2009 - 8:47 pm | अनिल सोनुने

प्रताधिकार हक्कांमुळे ऑडीओ क्लिप्स देऊ शकत नाही. स्वत: ध्वनीमुद्रित केल्यावर अवश्य टाकेन.

प्राजु's picture

19 May 2009 - 7:57 am | प्राजु

पुढील वाटचालीस शुभेच्छा! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

19 May 2009 - 8:03 am | सहज

अनेकोत्तम शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2009 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनेकोत्तम शुभेच्छा!

स्वगत :मराठवाड्यातील माणसं तशी हुशार, पण त्याची नोंद आणि पाहिजे तसे कौतुक होत नाही.

अनिल सोनुने's picture

20 May 2009 - 8:48 pm | अनिल सोनुने

धन्यवाद बिरुटे सर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2009 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या संकेतस्थळाची आणि आपल्या कामाची नोंद घेतल्या गेलीच असे म्हणावे लागेल.
आपल्या उपक्रमासाठी पुन्हा भरभरुन शुभेच्छा !!!

आपले कौतुक लोकसत्तेत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास's picture

19 May 2009 - 8:11 am | विकास

खुपच छान संकेतस्थळ आहे. आमच्या मुलीला देखील ते आवडले.

दिपक's picture

19 May 2009 - 9:07 am | दिपक

उत्तम संकेतस्थळ. फॉंट जरा वाढवता येतो का बघा.

उपक्रमास शुभेच्छा! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2009 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

संकेतस्थळ आवडले. दिपक यांची सूचना मलाही करावीशी वाटते, लहान मुलांसाठी मुद्दामच मोठा फॉण्ट असेल तर उत्तम.

अरविंद गुप्ता आयुका(इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉफिजिक्स)शी संबंधि आहेत (नुकतंच सेंटर फॉर ... नव्हे)

सागर's picture

19 May 2009 - 12:16 pm | सागर

सुंदर संकेतस्थळ
बाल गोपालांना नक्कीच आवडेल...
१०वी च्या अभ्यासा सारखे (सर्वच इयत्तांसाठी) एखादे सदर सुरु केलेत तर संकेतस्थळ अधिक प्रसारित होईन

वाटचालीस शुभेच्छा....
सागर

क्रान्ति's picture

19 May 2009 - 8:53 pm | क्रान्ति

संकेतस्थळ आवडले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. =D>
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

चतुरंग's picture

19 May 2009 - 10:36 pm | चतुरंग

लहान मुलांसाठीचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.
खेळ आणि गणिताच्या चौकटी आवडल्या. अभिनंदन! :)

चतुरंग

धनंजय's picture

19 May 2009 - 11:01 pm | धनंजय

संकेतस्थळ आवडले. अनेक उत्तम शुभेच्छा!

ऋषिकेश's picture

20 May 2009 - 9:11 am | ऋषिकेश

वा! अभिनंदन..
अतिशय सुंदर स्थळ आहे. त्यातील चित्रे,लेख,गोष्टी कल्पक आणि मुलांना आवडतील अशीच आहेत.
अश्या स्थळाची गरज होतीच. हे स्थळ वन टाईम ऍक्टीवीटी न रहाता सतत बदलते राहिल आणि मुलांना नवननीन रोचक माहिती देत राहिल अश्या शुभेच्छा

मी मुलांसाठी काहि लेख देऊ शकेन. कळवावे.

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

अनिल सोनुने's picture

20 May 2009 - 8:50 pm | अनिल सोनुने

सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद !
आपल्या सर्वांमुळेच ही साईट तयार झाली आहे.
आपले सहकार्य असेच राहू द्या.

श्रीयुत संतोष जोशी's picture

21 May 2009 - 8:53 am | श्रीयुत संतोष जोशी

मस्तंच साईट आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

prachi's picture

25 May 2009 - 1:03 am | prachi

हे मराठि सन्केतस्थळ खुपच उपयोगी आहे ..मि नक्किच माझ्या मुलाला मराठी शिकवायला ह्याचा वापर करेन...छान छोट्या मुलान्च्या गोष्टि ,चित्रासहित आहेत..त्यामुळे मराठि वाचनाची आवड निर्माण होण्यास हि मदत होइल :)
...धन्यवाद..

common sense is not common

शिशिर's picture

25 May 2009 - 12:44 pm | शिशिर

शुभेच्छा...... छान स्थळ आहे.......

जागु's picture

25 May 2009 - 1:29 pm | जागु

खुप छान. मी ही काही बाल कविता केलेल्या आहेत. पाठवू का ?

पक्या's picture

14 Jun 2009 - 1:29 pm | पक्या

बाल जगत आज पाहिले. छान आहे साईट. मुलांची गाणी आवडली.
बालजगतास अनेकोत्त्म शुभेच्छा.