चर्चाप्रस्ताव- वाहतुक प्रणाली.

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
25 Apr 2009 - 5:13 pm
गाभा: 

आपल्यापैकी बरेचजण कामानिमित्त वा शिक्षणानिमित्त परदेशात गेले असतील वा तिथे रहात असतील.
भारतातून प्रथमच परदेशात गेल्यानंतर असंख्य वेगळ्या गोष्टी दिसतात.वेगळे प्रकार अनुभवायास येतात.
सर्वात मोठा बदल दृष्टीस पडतो तो म्हणजे "वाहतुक प्रणाली"
बहुसंख्य देशांमधे वाहतुक हि रस्त्याच्या उजव्या बाजुने चालत असते.ह्यात स्टिअरिंग व्हील हे गाडीत
डाव्या बाजुला असते.
तर भारतात व काहि तुरळक देशांमधे वाहतुक ही रस्त्याच्या डाव्या बाजुने चालत असते व आपल्याकडे स्टिअरिंग व्हील हे गाडिच्या उजव्या
बाजुला असते.

भारतातून परदेशात प्रथमच जाणा-याला वाहतुकीमधला हा बदल पुर्णपणे डोक्यात साठवायला किमान ३ आठवडे तरी जातात.

जगातील वाहतुक प्रणाली ह्या विषयावर विकिवर ह्यावर पाहिले असता जगातील एकंदरीत ७२% देशात "Drive on Right Side of the Road" ह्या तत्वावर वाहतुक चालत आहे.
तर फ़क्त २८% देशांमधे आपल्यासारखी "Drive on Left Side of the Road" वाहतुक चालते.

विसाव्या शतकात ब-याच राष्ट्रांनी आपली वाहतुक प्रणाली हि रस्त्याच्या डाव्या बाजुकडून उजव्या बाजुकडे बदलली.
प्रामुख्याने ब्रिटिश कॊमनवेल्थ मधील देश त्यात भारत,पाकिस्तान ओस्ट्रेलिया वगैरे देश अजुनहि रस्त्याच्या डाव्या बाजुनेच
वाहतुक चालवताना दिसतात.

पुर्वीच्या काळी घोड्यांवरून प्रवास होत असे.लोकहि जवळ तलवार सारखी शस्त्रे बाळगत.
घोड्यावरून जाताना डाव्या हाताने लगाम पकडणे व उजव्या हाताने शस्त्र चालवणे हे सोपे होते.
त्यामुळे आपोआपच वाहतुक हि "KEEP LEFT" ह्या पध्दतीने रुळली.
पुढे पुढे अमेरिकेत घोड्यांच्या बग्ग्या आल्या.एकाच गाडीला बरेचसे घोडे खेचत असत.
परंतु ह्या गाड्यांमध्ये ड्रायव्हर सीट नसल्याने चालक हा सर्वात डावीकडच्या घोडयावर बसून हि गाडी चालवत असे.
पुढुन येणारे वाहन दिसत नसल्यामूळे तो रस्त्याच्या उजव्या बाजुने गाडि हाकु लागला.
व ह्यातच कुठेतरी "Drive on Right Side of The Road" ह्या पध्दतीचा उगम झाला.

एखाद्या देशात वाहतुक कशी चालावी ह्यामागे बरीच कारणे आहेत.
१.मुख्य कारण म्हणजे "वसाहतवाद". जगातील ब-याच देशात युरोपातील अनेक देशांनी वसाहती केल्या.
उदा ब्रिटन,फ़्रान्स,स्पेन,पोर्तुगाल वगैरे.
हि मंडळी जिथे जिथे गेली तिथे तिथे त्यांनी आपल्या पध्दतीची वाहतुक प्रणाली अमलात आणली.
साम्राज्यवादाच्या अंतानंतर ह्यातील ब-याच देशांनी पुर्वापार चालत आलेली वाहतुक प्रणाली कायम ठेवली.
तर ब-याचश्या देशांनी आपली पध्दत बदलून "Drive on Right Side of The Road" हि प्रणालि अवलंबली.
२.काहि राष्ट्रांनी शेजारिल देशांशि होणारी मालवाहतुक व प्रवासी सुरळीत व्हावी म्हणून आपल्या वाहतुक प्रणालीत
मुलभुत बदल केले. उदा कॆनडा.इथे आधी ब्रिटिश कॊंलनी असल्यामुळॆ आपल्या सारखी सिस्टिम होती.
परंतु अमेरिकेशी होणारी मालवाहतुक व प्रवासी सुरळीत व्हावी म्हणून त्यांनी अमेरिकन वाहतुक प्रणाली स्वीकारली.

परंतु ह्या सर्वांमागे कुठलेहि "रिजनिंग" सापडत नाहि.
एखादिच वाहतुक प्रणाली योग्य का? असा प्रश्न निर्माण होतो.
मी ब्रिटिश व अमेरिकन वाहतुक तज्ञ अश्या दोघांशीहि ह्या विषयावर चर्चा केली होती.
परंतु मला ह्या पैकी एकहि जण ह्याचे योग्य/समर्पक उत्तर देउ शकला नाही.

ब्रिटिश वाहतुक तज्ञाने मला फ़क्त एवढेच सुचवले होते कि "Drive on Left Side of the Road" वापरणा-या देशातील लोक
जेंव्हा "Drive on Right Side of the Road" प्रणाली वापरणा-या देशात जातात तेंव्हा त्यांना तिथे जुळवून घ्यायला बराच वेळ लागतो.
परंतु ह्या उलट तिथली मंडळी इथे जेंव्हा येतात तेंव्हा त्यांना इथल्या वाहतुक प्रणालीत एडजस्ट व्हायला फ़ारसा वेळ लागत नाहि."
अर्थात ह्यालाहि प्रतिउत्तर असु शकेल.

आपल्यापैकि अनेक मंडळींनी भारतात व परदेशात हि मोटार चालवलेली असेल.
नेमकी कुठली प्रणाली आपल्याला जास्त योग्य वाटते? अपघाताचे प्रमाण कुठल्या प्रणालीत कमी असते?
आपला अनुभव काय सांगतो.
ह्यात प्रश्न असाहि आहे कि बहुसंख्य लोक हे उजवे असतात (Right Handed).त्या अनुषंगाने कुठली प्रणाली
हि जास्त सयुक्तिक वाटते?

अभिज्ञ.

प्रतिक्रिया

अनंता's picture

25 Apr 2009 - 5:22 pm | अनंता

माझ्या मते, मध्यममार्ग उत्तम. ड्रायव्हर सीट मधोमध असल्यास बरे होईलसे वाटते.
त्याच अनुशंगाने रस्तेही एक दिशा मार्ग असल्यास उत्तम. नो डावा, नो उजवा.

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2009 - 5:53 pm | बिपिन कार्यकर्ते

कोणती प्रणाली जास्त चांगली अथवा सयुक्तिक आहे हे सांगणे जमणार नाही. किंबहुना दोन्हीत काही फरकच नाही. मी नियमितपणे दोन्ही प्रणालीनुसार गाडी चालवली आहे. मला एका प्रणालीतून दुसर्‍या प्रणालीत जायला अजिबात वेळ लागत नाही. लगेच जमते. गियर टाकणे वगैरे मधे काही अडचण येत नाही.

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

25 Apr 2009 - 7:44 pm | नितिन थत्ते

कोणती प्रणाली जास्त चांगली अथवा सयुक्तिक आहे हे सांगणे जमणार नाही. किंबहुना दोन्हीत काही फरकच नाही.
सहमत
अवांतरः आमच्या देशात वायुरूप इंधनाला गॅस म्हणतात. (हे तरी खरे काय?- एल पी जी चे काय?)
आणि आमच्या देशात गॅस आणि पेट्रोल ही दोन्ही इंधने मिळतात.
खराटा
(रंग माझा वेगळा)

रामदास's picture

25 Apr 2009 - 5:58 pm | रामदास

मला एका प्रणालीतून दुसर्‍या प्रणालीत जायला अजिबात वेळ लागत नाही. लगेच जमते. गियर टाकणे वगैरे मधे काही अडचण येत नाही.

कौतुकास्पद आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2009 - 6:12 pm | बिपिन कार्यकर्ते

गुरूजींच्या चरणी बालकाचा साष्टांग नमस्कार. वरील प्रतिसाद फक्त धाग्यात लिहिलेल्या मजकूराच्या संदर्भातच घ्यावा ही विनंति. ;)

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

26 Apr 2009 - 1:30 am | टारझन

आहो असं काय करता .. ते कौतूक प्रभू बाबाने नाही रामदासांनी केलंय .. उगाच नसते स्पष्टिकरनं देऊन आमच्या सारख्यांच्या डोक्याला वात आणू नका !!!

फोर्डच्या मेक्लरेन ह्या गाडीचं स्टेरिंग मधोमध आहे .. गियर्स हातातच स्टेरिंग खाली आहेत. जीटी श्रेणी मधली गाडी असून ह्यात पुढे ड्रायव्हर आणि मागे दोन जण बसू शकतात ... मस्त गाडी आहे .. थोडी प्राईझ कमी झाली की घेणारे ..

घाटावरचे भट's picture

26 Apr 2009 - 4:58 am | घाटावरचे भट

>>फोर्डच्या मेक्लरेन ह्या गाडीचं स्टेरिंग मधोमध आहे ..

तुला मॅक्लॅरन एफ १ म्हणायचंय का? मॅक्लॅरन ऑटोमोटिव्ह या कंपनीशी फोर्डचा काहीही संबंध नाही.

>>थोडी प्राईझ कमी झाली की घेणारे ..

मॅक्लॅरन एफ १ चं उत्पादन १९९८साली बंद झालं. वापरलेल्या गाड्या लैच महाग आहेत. कारण त्या मॉडेलच्या फक्त १०० गाड्या बनवल्या गेल्या.

विनायक प्रभू's picture

26 Apr 2009 - 10:17 am | विनायक प्रभू

महत्वाचे नाही.
गाडी आहे आणि चालवायला मिळते आहे ते महत्वाचे.
बिकाशी एकदम सहमत

टारझन's picture

26 Apr 2009 - 10:34 am | टारझन

डावे उजवे ठिक आहे !! पण गाडी कोणती ही कशी चालवाल ?
प्रेस्टिजियस स्विफ्ट चालवाल की कॉलसेंटरची इंडिका चालवाल का प्रभू बाबा ?

असो .. भटा .. मला मेक्लरेन एफ-१ च म्हणायचंय रे .. आणि त्यांच आणि फोर्डचं कोलॅबोरेशन होतं .. जिटी कार्स रेसिंग मधे .. असं डिस्कव्हरीचा "हॉट व्हिल्स" हा प्रोग्रॅम सांगतो ... ती गाडी पाहिलीयेस ना पण ? एकदम राप्चिक आहे की नै ? आणि आर्रे सुपरकार्सचं "प्रॉडक्शन" नाही रे होत.. कार कंपनी ठरवते किती आणि कोणासाठी गाडी बणवायची ते !@!

विनायक प्रभू's picture

26 Apr 2009 - 10:52 am | विनायक प्रभू

स्थानी नेणारी कुठलीही रे टार्‍या.
पण सेफ्ट बेल्ट आजकाल सर्व गाड्याना कंपलसरी आहे ना?

विंजिनेर's picture

25 Apr 2009 - 6:15 pm | विंजिनेर

अमेरिकन लोकांचे सगळेच उलटे असते.
गाड्यांमधे ते "गॅस" भरतात. आणि गस्त घालताना "पेट्रोल करतात".
आईस वॉटर मागितले की थंड पाणी मिळते. कॉफीत दुध/क्रिम घालायचे ते विसरून जातात. एक ना अनेक.
अमेरिकेचा प्रभाव असणार्‍या देशांमधे मग अशा सवयी सापड्ल्या तर नवल काय?

बाकी गाडी हाकताना, सर्वात जास्त मजा (आणि नंतर अंगावर काटा) येते ते सिग्नल वर थांबल्यावर चुकीच्या बाजूला वळणे (डावे वळण हे फ्री टर्न असतो (की नसतो?))
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

ओंकार देशमुख's picture

25 Apr 2009 - 7:04 pm | ओंकार देशमुख

ओंकारचा ब्लोग-सारथी
खूप छान माहितीपूर्ण लेख लिहिला आहे त्यासाठी आभ्यास पण भरपूर केला आहे.
त्याबद्दल धन्यवाद..
बाकी मी आताच गाडी चालवायला शिकलो असल्या मुळे left hand की write hand ते सांगू शकत नाही.
पण त्यामुळे भारतातल्या श्रीमंत लोकांना त्यांना बाहेर आवडलेली गाडी ते तशीच भारतात वापरू शकत नाहीत इतकं नक्की.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2009 - 7:23 pm | बिपिन कार्यकर्ते

भारतातल्या श्रीमंत लोकांना ज्या गाड्या आवडू शकतात त्या सगळ्या डाव्या उजव्या दोन्ही मधे उपलब्ध असतात!!!

बिपिन कार्यकर्ते

सुनील's picture

25 Apr 2009 - 7:57 pm | सुनील

नेमकी कुठली प्रणाली आपल्याला जास्त योग्य वाटते? अपघाताचे प्रमाण कुठल्या प्रणालीत कमी असते?
आपला अनुभव काय सांगतो.

माझा तरी अनुभव असे सांगतो की, अपघाताचे प्रमाण हे कुठल्याही प्रणालीपेक्षा वाहतुकीचे नियम पाळण्याशी जास्त संबंधित आहे. वर बिकादांने म्हटल्याप्रमाणे एका प्रणालीतून दुसरीत जाताना फारसा त्रास वगैरे होत नाही. आपसूक सर्व सुरळीत होते.

ह्यात प्रश्न असाहि आहे कि बहुसंख्य लोक हे उजवे असतात (Right Handed).त्या अनुषंगाने कुठली प्रणाली हि जास्त सयुक्तिक वाटते?
ह्या संदर्भात कधी फारसा विचार केला नव्हता. माझ्या मते, बहुसंख्य लोक उजवे असल्यामुळे आपली (ब्रिटीशांकडून घेतलेली) प्रणाली अधिक योग्य वाटते (उजव्या हाताने चाक तर डाव्या हाताने गियर). पण त्याउलट चालवणेदेखिल फारसे जिकिरीचे वाटत नाही. त्यातून अमेरिकेसारख्या देशात बहुसंख्य गाड्या स्वयंचलित गियरच्या असल्यामुळे उजवा हात (आणि डावा पाय) तसा रिकामाच राहतो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नितिन थत्ते's picture

25 Apr 2009 - 8:00 pm | नितिन थत्ते

च्यायला म्हंजी उलट्या गाडीतबी कलच डाव्या अंगालाच असतोय व्हय?
खराटा
(रंग माझा वेगळा)

सुनील's picture

25 Apr 2009 - 8:15 pm | सुनील

गाडी कोणत्याही प्रणालीची असो, एक्सिलरेटर[A], ब्रेक[B] आणि क्लच[C] हे नेहेमीच C-B-A ह्या क्रमाने असतात.

स्वयंचलित गियर प्रणालीत तर क्लच नसतोच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नितिन थत्ते's picture

25 Apr 2009 - 8:22 pm | नितिन थत्ते

बरं झालं कळलं. नाहीतर भलताच घोळ झाला असता.
खराटा
(रंग माझा वेगळा)

प्राजु's picture

26 Apr 2009 - 12:21 am | प्राजु

जेंव्हा "Drive on Right Side of the Road" प्रणाली वापरणा-या देशात जातात तेंव्हा त्यांना तिथे जुळवून घ्यायला बराच वेळ लागतो.
परंतु ह्या उलट तिथली मंडळी इथे जेंव्हा येतात तेंव्हा त्यांना इथल्या वाहतुक प्रणालीत एडजस्ट व्हायला फ़ारसा वेळ लागत नाहि."

माझ्या बाबतीत साफ चूक. मी भारतातून इथे आल्यानंतर माझा खूप दिवस गोंधळ होत होता. किमान ३ आठवडे तरी. मी ज्या दिशेने जायचे आहे त्याच्या बरोबर विरूद्ध दिशेच्या बस स्टॉपवर जाऊन उभी रहात असे.
ड्रायव्हिंग इकडे करायला लागले. भारतात गेले की, ३ आठवडे नाही मात्र ३-४ दिवस तरी लागतातच.. सरावायला(जन्मापासूनची सवय अशी कशी जाईल). तसेच तिकडून पुन्हा इकडे आलं की असंच होत मात्र आता सरावायला लागणारा वेळ कमी असतो. ३ आठवड्याच्या जागी १ आठवडा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अजय भागवत's picture

26 Apr 2009 - 1:59 am | अजय भागवत

ह्याबाबतची माहिती इथे आहे.
माझे मत असे आहे-
लेफ्ट हॅंड ड्राइव्हची गाडी अगदी नवशिक्या रायटीला शिकायला अवघड जाईल. नवशिक्या रायटीला जर गाडी राईट हॅंड ड्राइव्हची (भारताप्रमाणे) असेल तर उजव्या हाताने स्टेअरींग धरायला अधिक सोपे जाईल.
एकदा सराईतपणा आल्यावर ह्याचे महत्व आपल्याला वाटत नाही कारण आपण झटकन स्वतःची सवय बदलू शकतो. हे असे म्हणणे सापेक्ष आहे. अमेरिकेत एकुणात शिस्तबद्ध आखलेल्या रस्त्यांवर रुळणे सोपे जात असावे. एखाद्या भारतातील शहरांसारख्या ट्रॅफिक डेन्सिटीच्या बाहेरील शहरात उलट्या पद्धतीचे ड्रायव्हिंग शिकणे अवघड असेल बहुधा!
याच्या उलट डावऱ्या व्यक्तिला राईट हॅंड ड्राइव्हची गाडी शिकायला अवघड जाईल.

पिवळा डांबिस's picture

26 Apr 2009 - 3:46 am | पिवळा डांबिस

इंटरेस्टिंग चर्चा प्रस्ताव आहे. माझा अनुभव असा....
कधीकाळी परदेशात ड्रायव्हिंग करावे लागेल याची भारतात असतांना बापजन्मात कल्पना नव्हती. भारतातील घर भर शहरात असल्याने ड्रायव्हिंग शिकायचा प्रश्नच निर्माण झाला नाही. अहो इतक्या ट्रेन, बस, आणि रिक्षा उपलब्ध असतांना कशाला ड्रायव्हिंग लागतंय? :)
तेंव्हा ड्रायव्हिंग हे सिरियसली परदेशातच शिकलं गेलं ते ही अमेरिकन पद्धतीचं. आधीची काही बॅकग्राउंड नसल्याने ते फारसं कठीण गेलं नाही. मी डावरा आहे तरी त्याचाही काही त्रास झाला नाही. डाव्या हातात स्टियरिंग सहजपणे धरता येतं आणि उजवा हात पूर्वी गियर बदलायला आणि सध्या शेजारणीच्या खोड्या काढायला वापरता येतो...
गेली वर्षानुवर्षे अशीच गाडी चालवत आहे, काही अडचण नाही...
भारताच्या सध्याच्या ट्राफिकमध्ये गाडी चालवायची आपली छाती नाही. जे करतात त्यांना आपला सलाम! आपण तर ड्रायव्हिंग सोडाच पण ड्रायव्हरच्या शेजारी बसणेही टाळतो. उगाच हार्ट-ऍटॅक यायचा. तेंव्हा भारतात असतांना कुणाला तरी गाडी चालवायला लावून आपण मागच्या सीटवर (जीव मुठीत घेऊन) बसणे हाच पर्याय सध्या स्वीकारला आहे....
:)

तिमा's picture

26 Apr 2009 - 10:13 am | तिमा

माज्या अनुभावानुसार पुन्यात लोकं दोनी प्रणाल्या येकाच येळी वापरत असतात. गाडी चालावताना भस्कन् डाव्या अंगानं स्कूटर, मोटसायकलीवाले ओवरटेक करत्यात. चौकामंदी तर बगायलाच नको. फ्री फार ऑल असताय. त्यामुळे पुन्याची मानसं जगात कुटं बी कायबी चालवू शकतात.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

नाशीकात डायवर; डाव्या, उजव्या व मधल्या बाजूने गाडी चालवतात.
रस्त्याला डावी व उजवी बाजू असते, चौकात शिग्नल असतो, वगैरे गोष्टी नाशीकात नसाव्यात.

पिडासाहेबांचा अनुभव पटला.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भाग्यश्री's picture

26 Apr 2009 - 12:59 pm | भाग्यश्री

मी डावरी आहे.. भारतात ड्राईव्ह करत होते.. इथे आल्यावरही रेग्युलर नाही, तरी सुरू केले.. माझा "अतिशय" गोंधळ उडायचा.. डाव्या उजव्याचा.. समोरून डावीकडून येणारी गाडी आपल्याच अंगावर येतेय की काय असे वाटायचे..
एकदा मी घरातून बाहेर पडून शेजारच्या चौकापर्यंत आरामात डावीकडून चालवत होते.. कळले तेव्हा घाम फुटला होता! :)
डावरे असण्याचा काहीतरी संबंध असावा.. माझा इथे सगळीकडेच अजुनही गोंधळ उडतो.. गाडीचं लॉक लावताना, घराचे लॅच, कपाटांची दारं.. सगळीकडे मी वेंधळ्यासारखी बघत बसते उघडत का नाहीये म्हणून! =))

www.bhagyashree.co.cc