कशाला हवा कसबला वकील

राहुल सरकार's picture
राहुल सरकार in काथ्याकूट
3 Apr 2009 - 1:19 pm
गाभा: 

मुंबईवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा जीवंत आरोपी अजमल कसाब याचे वकीलपत्र घेण्यावरून सध्या वाद सुरू आहे. अंजली वाघमारेंनी त्याचे वकीलपत्र घेतल्यानंतर शिवसेना तसेच अन्य मंडळींनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. मात्र हे वकीलपत्र घेण्यावर अंजली वाघणारे ठाम आहेत. कोणताही खटला न्यायालयात उभा राहण्यासाठी आरोपीला वकील असणे आवश्यक आहे. कसाबला वकील दिला नाही तर हा खटलाच उभा राहणार नाही व खटलाच उभा राहिला नाही तर कसाबला शिक्षा कशी होणार असे आपली घटना सांगते म्हणे, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. आणि त्यामुलेच कसाबचे वकीलपत्र घेतले असे वाघमारेबाइन्चे म्हणणे आहे.
सगले मान्य आहे पण तरी काही प्रश्न निर्माण होतात.
की खरच आशा अतिरेक्यावर खटला चालवावा लागेल?.
आपल्याला माहिती आहे की असे किती खटले बरीच वरचे चालतात.
आणि जो गुन्हा करताना सापडला त्याचे विर्रुध खटला चालवायची काय गरज?
मला अजुन एक प्रश्न आहे जे सीमेवर युधात अटक होतात त्यांचावर पण खटला चालतो काय?
अरे आशा लोकाकडून जी काहि माहिती हावी आहे टी काढून खटला n चालवता शिक्षा द्यायला हावी आहे. खटलामधे काय सिद्ध करणार आहेत वाघ्मारेबाई की तो त्यात सामिल नवता?
संसदेवर काही वर्षापूर्वी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू याच्यावर आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षाही सुनावली मात्र तरीही आजपर्यंत आपण त्याला फाशी दिलेले नाही. उद्या कसाबच्याही बाबतीत असे कशावरून होणार नाही ? सध्या त्याची सुरक्षा आणि अन्य बाबींवर नाहीतरी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च होत आहेतच. ते तरी वाचतील.

अरे हा खर्च जर आमच्या दुश्काली भागात पानी देण्यासाथी केलात तर देशाचे भले होएल.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

3 Apr 2009 - 1:51 pm | चिरोटा

मि.पा.वर चर्चिला जात आहे दुसर्‍या धाग्यावर्.तरीपण...

की खरच आशा अतिरेक्यावर खटला चालवावा लागेल?.

पोलिस कधीकधी गुन्हेगाराला 'संशयास्पद म्रुत्यु' देतात. नाहीतर खोट्या चकमकीत मारतात्.इकडे ह्या केसकडे जगाचे लक्ष आहे.तेव्हा घटनात्मक चौकटीत राहून काम केलेले जास्त बरे.(समजा कसाबचा 'संशयास्पद म्रुत्यु' झाला तर भारताची पुरती बेअब्रू होईल.त्याला भर चौकात टान्गा,त्याचे तुकडे तुकडे करा ही वाक्ये बोलायलाच ठीक आहेत).

जो गुन्हा करताना सापडला त्याचे विर्रुध खटला चालवायची काय गरज?

हा झाला कॉमन सेन्स्.खटला चालवताना पुरावे लागतात आणि मुख्य म्हणजे असलेले कायदे हुशारीने वापरुन तो गुन्हेगार आहे हे सिध्ध करावे लागते.

मला अजुन एक प्रश्न आहे जे सीमेवर युधात अटक होतात त्यांचावर पण खटला चालतो काय

मला पूर्ण माहिती नाही पण त्यान्च्यासाठी सेना न्यायालये असतात्.आणि त्यान्ची खटला चालवायची पध्धत वेगळी असते.
भेन्डि.
क्ष्^न + य्^न = झ्^न

सँडी's picture

3 Apr 2009 - 2:12 pm | सँडी

की खरच आशा अतिरेक्यावर खटला चालवावा लागेल?.
हो. तो लोकशाही पध्द्तीचा एक भाग आहे. आणि आपल्या देशात ती आहे, याची पदोपदी जाणीव होते.
जो गुन्हा करताना सापडला त्याचे विर्रुध खटला चालवायची काय गरज?
न्यायदेवता आंधळी असते म्हणुनच गरज आहे. तुम्ही जुगार खेळताना पोलिसांना सापडलात म्हणजे लगेच तुम्ही जुगारसंबधीत कलमाखाली शिक्षा भोगायला सुरुवात करु शकत नाही. तुम्हालाही तुमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते, तसेच तुम्ही फक्त जुगारच खेळत होतात की अजुन काही उपद्व्याप करत होतात, की तिथे तुम्ही पत्ता(address बरं का!) विचारायला गेलात आणि पोलिसांनी नेमकी तेव्हाच धाड टाकली अशा गोष्टींची शहानिशा करुन कोर्ट निर्णय घेते.
मला अजुन एक प्रश्न आहे जे सीमेवर युधात अटक होतात त्यांचावर पण खटला चालतो काय?
हो! युध्द कैद्यांवरही खटला चालतो.
खटलामधे काय सिद्ध करणार आहेत वाघ्मारेबाई की तो त्यात सामिल नवता?
यावर तज्ञ व्यक्ती आपणास उत्तर देतील. इतकेच सांगु इच्छितो की, कसाबविरुध्द चा खटला हा ठोस पुराव्यांमुळे आधीपासुनच सोपा झालेला आहे. आणि उज्वल निकम तो नेहमीप्रमाणे लवकरच अपेक्षित निकालावर आणुन ठेवतील याची पक्की खात्री आहे.
तसेच हा खटला चालवणे आपल्या देशाची लोकशाही आणि आंतरराष्ट्रीय धोरण यानुसारच आहे.

अवांतरः जुगार खेळणे हा संदर्भ केवळ उदाहरणादाखल दिलेला आहे. कसाबने केलेला गुन्हा वगैरे या गोष्टीचा त्याच्याशी अजिबात संबंध नाही.

विशाल कुलकर्णी's picture

3 Apr 2009 - 2:23 pm | विशाल कुलकर्णी

वरील दोन्ही प्रतिक्रियांना अनुमोदन.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Apr 2009 - 2:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

याच प्रकारची चर्चा दोनच दिवसांपूर्वी इथे झाली होती.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

सँडी's picture

3 Apr 2009 - 3:20 pm | सँडी

मला वाटते, लेखकाने लेख स्वत: थेट प्रकाशित करण्यापेक्षा आधी तो संपादकांनी पारखुन मगच प्रकाशित करावा.
चर्चा झालेले लेख पुन्हा प्रकाशित होऊ नये याची संपादकांनीच जबाबदारी घेतल्यास सदस्यांचा वाचनाचा आणि प्रतिक्रिया देण्याचा वेळ वाचेल आणि आपलाही.

आता आपण हा लेख काढुन टाकला तर आमचे प्रतिसाद आणि त्यासाठीचा वेळही वाया जाणार.
मिपावर असे प्रकार वारंवार घडत आहेत, म्हणुन ही प्रतिक्रिया.

- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

चिरोटा's picture

3 Apr 2009 - 4:18 pm | चिरोटा

वेबसाईट्स वर सम्पादक १/२ दिवस प्रतिसाद बघून 'ह्या प्रकरची चर्चा झाली आहे' असे लिहितात.एकदा झालेली चर्चा परत वेगळ्या प्रकारेही होवू शकते.नविन सदस्याची मते वेगळी असू शकतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

शेन्डेफळ's picture

3 Apr 2009 - 2:57 pm | शेन्डेफळ

कशाला शिळ्या कढीला उत ...

उमेश__'s picture

3 Apr 2009 - 3:42 pm | उमेश__

कशाला हवा कसबला वकील?

कारण कसाब निर्दोष मुक्त होवून परत भारतात हल्ले करण्यासाठी...................!

सँडी's picture

3 Apr 2009 - 5:00 pm | सँडी

असा कसा मुक्त होईल?

उमेश__'s picture

3 Apr 2009 - 8:06 pm | उमेश__

मग त्याला वकील कशासाठी पाहिजे ??????????

सँडी's picture

4 Apr 2009 - 4:41 pm | सँडी

वकिल मिळालाच नाही तर त्याला शिक्षा होईल असा समज? आहे का आपला?

- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Apr 2009 - 11:23 am | अविनाशकुलकर्णी

वकिलांचि पोटे कशि भरणार?