रात्र वैर्‍याची... दिवस शैतानाचा ;)

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
4 Mar 2009 - 9:58 am
गाभा: 

जागतिक बझारांमध्ये चालू असलेली पडझड व विकास दर (ग्रोथ रेट) कमी होण्याच्या भितीमुळे मार्केटमध्ये काल प्रचंड विक्री झाली व ह्याच्या मुळे बीएसई चा सेंसेक्स मागच्या आठवड्यापासून चालू असलेला डाऊन ट्रेन्ड ह्या आठवड्यात पण चालूच राहिला काल जेव्हा मार्केट बंद झाले (-१७९.७९) तेव्हा सेंसेक्स ८४२७.२९ वर बंद झाला ह्याच्या आधी १०/११/२००५ मध्ये मार्केट ८३.०८.९३ वर बंद झाला होता म्हणजे आपण सरळ तीन वर्षमागे आलो व निफ्टी २६२२.४० वर बंद झाली. वाल स्ट्रीट वर काल झालेल्या पडझडीमुळे बाकी ग्लोबल मार्केट आज देखील अळ्यात ना मळ्यात ह्या पध्दतीने उघडीली आहेत व भारतीय बझार पण त्याच दिशेने वाटचाल करत आहे आज त्याची ओपनिंग सुध्दा निगेटिव्ह मध्ये होईल अशंका आहेच.

देशाच्य निर्यातीमध्ये जानेवारी मध्ये १५.९ % ची गिरावट व चालू फायनांशियल वर्षात २००८-२००९ मध्ये विकास दर खाली आली व सरकार विकास दर ७.१ च्या वर ठेऊ शकली नाही ह्याचा सरळ सरळ प्रभाव मार्केटवर पडत आहे, जर व्यवस्थीत पाहीले तर विकास दर सध्या ५.३ च्या आसपास आहे व चालू तिमाही मध्ये पण वर जाण्याची अपेक्षा नाही आहे व देशात व बाहेरील जगात मार्केट विषयी सर्वसामान्यांच्या मनात बसलेली भिती जाण्याची काहीच लक्षणे दिसत नाही आहे.. ह्या मुळेच बिकवाली वाढली आहे व अजून वाढेल ह्याला सर्कल ऑफ मार्केट समजत आहे मी म्हणजे १० जण विकत आहेत म्हनून त्यांच्या मागे विकणारे २ जणं ! व डॉलर च्या समोर रुपया कमजोर पडा असल्यामुळे विदेशी फंड पण मार्केट मधून बाहेर जात आहे, हाच हाल अजून सहा एक महिने राहील ही भिती. ह्या बिकवाली मुळे काल बीएसई काल एकेवेळी ८३९०.२१ पर्यंत खाली गेला व निफ्टी २६११.५५ पर्यंत.. विक्रीचा रेटाच जबरदस्त होता की कुठलेच सेक्टर ह्यातून वाचले नाही, मिडकैप व स्मॉलकैप मध्ये पण १.६२ व १.३ % गिरावट आली.

सेंसेक्स च्या ३० शेयर मध्ये फक्त काय ३ शेयर प्लस मध्ये होते ह्यावर समजत आहेच की कशी बिकवाली चालू झाली आहे.. भयानक हाल आहे... संभाळा.. पुढे परत आज संध्याकाळी !

प्रतिक्रिया

सुक्या's picture

4 Mar 2009 - 10:12 am | सुक्या

सगळी़कडे नुसती पड्झड चालु आहे. माझे तोट्यात गेलेले शेयर पुन्हा नफ्यात यायची शक्यता जवळपास नाहीच.
धन्यवाद राजे. हाल तर वाईट आहे .. परंतु हीच वेळ पकडुन काही खरेदी करता येइल का? की मार्केट अजुन खाली जाईल?

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

दशानन's picture

4 Mar 2009 - 10:17 am | दशानन

निवडणुका होऊ पर्यंत तर मी म्हणेन मार्केट पासून दुरच रहा.. व मार्च एन्ड जवळ आलाच आहे कंपन्यांचे रिपोर्ट कार्ड पण तयार होत असतील.. कोण पास कोण नापास हे बघू या.. मग खरेदी करायची की गप्प बसायचे हे पाहू :)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

दशानन's picture

4 Mar 2009 - 10:37 am | दशानन

शेयर मार्केट मध्ये मंदीचा हाल व रोजची पडझड ह्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी आपला पैसा मार्केट मधून काढणे चालू केले व पुढे ही काढत राहतील ह्या कुशंकेमुळे रुपयाची किंमत डॉलर समोर कमजोर होत आहे, घरगुती मागणी व अशिया देशात निर्यात प्रभावित झाल्यामुळे सुध्दा रुपया पडत आहे.. काल ५२.०५ रुपये प्रति डॉलर चा रेकॉर्ड स्तर पण मार्केट ने पाहीला व ६% पेक्षा जास्त रुपयाचं अवमुल्यन झाले आहे :(

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया's picture

4 Mar 2009 - 10:52 am | अवलिया

भय इथले संपत नाही........... :(

--अवलिया

सहज's picture

4 Mar 2009 - 10:55 am | सहज

चालायचेच. अन्नछत्र कुठे कुठे सुरु आहेत याची आपापल्या जवळच्या ठिकाणची यादी करायला लागू या.

अवलिया's picture

4 Mar 2009 - 10:56 am | अवलिया

माझा तुमच्याकडे एक वार ... द्याल ना?

--अवलिया

सहज's picture

4 Mar 2009 - 10:58 am | सहज

अमेरिकेचा दुस्वास करता आणि प्रिएम्प्टिव स्ट्राईक करता?

दुटप्पी!! निशेद!

अवलिया's picture

4 Mar 2009 - 10:59 am | अवलिया

अमेरिकेचा दुस्वास ऑक्सीमोरान का काय ते आहे ;)

--अवलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजराव, तुम्ही तुमच्याविषयी आणखी थोडी व्यक्तीगत माहिती दिली आहेत. ;-)

एक शंका: शेअर बाजारामुळे प्रत्यक्ष किती लोकं बाधित होत असतील?

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अवलिया's picture

4 Mar 2009 - 11:05 am | अवलिया

एक शंका: शेअर बाजारामुळे प्रत्यक्ष किती लोकं बाधित होत असतील?

संपुर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.. अर्थातच सर्वांवर परिणाम होतो.

--अवलिया

दशानन's picture

4 Mar 2009 - 11:07 am | दशानन

जवळ जवळ प्रत्येक गोष्टीला शेयर मार्केट स्पर्श करतो आपल्या जिवनात.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

दशानन's picture

4 Mar 2009 - 10:59 am | दशानन

मी तर एक आश्रम शोधून ठेवला आहे.. रानीखेत जवळ .. लैभारी हाय.. जेवायला फुकट देत्यात... ;)

* विनोदाचा भाग सोडला तर अनेकजण बरबाद झाले ह्या मार्केट मुळे.. !

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया's picture

4 Mar 2009 - 11:08 am | अवलिया

माजा लंबर लावुन ठिव

--अवलिया

मिंटी's picture

4 Mar 2009 - 12:12 pm | मिंटी

माझा आणि अमितचा बी नंबर लावुन ठिव तिथे..... तुझा नंबर लावला आहे ईथे पुण्यात......

नरेश_'s picture

4 Mar 2009 - 11:02 am | नरेश_

महाभयानक मराठी आहे राजे आपले ;-)
आपण 'सतिश'रावांचे पूर्वज तर नव्हेत ;-) ?

अवांतर : आपले ठेवावे झाकून नि दुसर्‍याचे बघावे वाकून अशी वृत्ती आहे आपली.
माफ करा , जरा सौम्य शब्दातच बोलतोय.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

दशानन's picture

4 Mar 2009 - 11:03 am | दशानन

माझ्या भाषे बद्दल लिहण्यापेक्षा जर तुम्ही मुद्द्यावर बोललात तर आनंद वाटेल बाकी माझ्या भाषेबद्दलच चर्चा करायची असेल तर माझी खरड वही चालू आहे त्यात आपण प्रवेश करावा, तुमचं मराठी बघून आनंद वाटेल मला या !

अवांतर : चर्चा फाटे फोडायचं काम सोडून दुसरं काही जमतं का बघा जरा.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

नरेश_'s picture

4 Mar 2009 - 11:09 am | नरेश_

तुमच्याकडूनच शिकलो राजे.
बरं ते जाऊ द्या , चूक झाली हे मान्य आहे की नाही ?
पर्याय १ - होय.
पर्याय २- नाही.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 11:11 am | विनायक प्रभू

असे बातमीदार घरी पोचल्यामुळे बायकोने दोन दिवस आमटी भाजी जेवणातुन बाद केलेत. वेगवेगळे सार दिसत आहेत ताटात.

दशानन's picture

4 Mar 2009 - 11:12 am | दशानन

बघ यमे ,

मार्केटचा सरळ सरळ किचन मध्ये इफेक्ट =))

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D