नाव + आडनाव

त्रास's picture
त्रास in काथ्याकूट
15 Feb 2009 - 7:13 am
गाभा: 

असे असल्यास मजा येते-

भावना प्रधान
शहा निशा

आणखी काही उदाहरणे माहित असल्यास कळवावी.

प्रतिक्रिया

टारझन's picture

15 Feb 2009 - 8:29 am | टारझन

आत्ता जरा चांगल्या मुड मधे बाहेर चाल्लो आहे ... आलो की सगळी णावं आडणावं काढतो तुमची थांबा ..
तोवर त्रास सहण करा ..

प्राची's picture

15 Feb 2009 - 8:31 am | प्राची

त्रास दाते
=))

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 8:33 am | पिवळा डांबिस

"पिवळा डांबिस!!!!"
का?
असं बघा, नुसत्या,
पिवळा ***
या नांवाला काही अर्थ नाही.....
आणि नुसत्या,
*** डांबिस या नांवात तो खमंगपणा नाही (इथे मिपावर सगळे, अगदी सगळेच, डांबिस!!!!)
तुमचं काय म्हणणं?
:))

(खुद के साथ बाता: आम्हाला हे "पिवळा डांबिस" हे सदस्य नांव सुचवणार्‍या आमची प्रियतमा #२ शिवास रीगल हिचे आम्ही अनंत आभारी आहोत!!!!!)
:)

तिमा's picture

15 Feb 2009 - 8:53 am | तिमा

तिरशिंगराव माणूसघाणे
आणि
सोनुबाई पितळे
अलका कुबेर
आनंद रडके
वात्स्यायन कामेरकर

योगी९००'s picture

15 Feb 2009 - 11:50 am | योगी९००

माझ्या ऐकिवातले एक असेच नाव..
अक्षर शहा
त्याला कदाचित अक्षरशः म्हणत असावेत..

खादाडमाऊ

भडकमकर मास्तर's picture

16 Feb 2009 - 7:36 am | भडकमकर मास्तर

खाली दिलेली इतर सगळी नावे गंमतशीर आहेतच पण नाव आडनाव एकत्र मिळून त्या शब्दाचा एक अर्थ व्हायला हवा हे महत्त्वाचं अपेक्षित असावं...
अक्षरशः त्यात छान बसतं.......

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

रेवती's picture

15 Feb 2009 - 5:58 pm | रेवती

विद्यासागर दिवटे हे आमच्या मित्रमंडळींपैकी एक.
गीतकार स्वानंद किरकिरे.
माझ्या वर्गात गीतांजली काटे नावाची मुलगी होती.

रेवती

महेंद्र's picture

15 Feb 2009 - 6:10 pm | महेंद्र

आनंद शोचे.. ( देॠब्रा आडनाव आहे हे.. मुळचे हैद्राबाद साइडचे लोक )

महेंद्र

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2009 - 6:12 pm | प्रकाश घाटपांडे

शौचे आसनं ते?
प्रसन्न शौचे आमचा मित्र हाय
प्रकाश घाटपांडे

महेंद्र's picture

15 Feb 2009 - 6:16 pm | महेंद्र

तेच हो, ,मला लिहिता आलं नाही. मला ओउ लिहिता येत नाही इथे.. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2009 - 6:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

औ = ए + यु = a + u

(दोन नावांमुळे त्रस्त) अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

विनायक प्रभू's picture

15 Feb 2009 - 6:12 pm | विनायक प्रभू

विनायकप्रभु

रेवती's picture

15 Feb 2009 - 6:25 pm | रेवती

श्वेता काळे.
आनंद उदास.
सुनेत्रा डोळे.
रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2009 - 6:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताई, आडनाव नाही आलं शेवटच्या नावात! ;-)

रंगांची नावं आडनावं म्हणून, उदा. निळे, हिरवे, काळे, गोरे, पाहून मला अंमळ गंमतच वाटते.
मेघना निळे (माझी एक मैत्रीण)

अदिती जोशी
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

रेवती's picture

15 Feb 2009 - 7:56 pm | रेवती

समजलं ग अदिती.;)
रेवती

ब्रिटिश टिंग्या's picture

15 Feb 2009 - 8:27 pm | ब्रिटिश टिंग्या

बरं!

- (अंमळ गमतीशीर) टिंग्या काळे

घाटावरचे भट's picture

16 Feb 2009 - 4:48 am | घाटावरचे भट

>>मेघना निळे (माझी एक मैत्रीण)

तुम्ही तिला 'घननीळा' म्हणून हाक मारता काय मग?

नाही, घननिळी असं पाहिजे होतं.

प्राची's picture

15 Feb 2009 - 7:36 pm | प्राची

सुकेशी टकले :)

माझी एक मैत्रीण आहे,'Dharamshee' आडनाव आहे तिचं.तिला आम्ही कधीकधी 'धर म्हशी' म्हणून चिडवतो. :P

पुष्कर's picture

16 Feb 2009 - 7:15 am | पुष्कर

आम्ही अरुंधती ला अरुंद हत्ती म्हणूल चिडवतो

मृण्मयी's picture

15 Feb 2009 - 8:22 pm | मृण्मयी

कुठल्याश्या मराठी सिरियलनंतर येणार्‍या श्रेयनामावलीतलं नाव:
'बाळा दुपटे'

रेवती's picture

15 Feb 2009 - 8:27 pm | रेवती

हे भारीच आहे.
खूप हसले.

रेवती

आम्हि's picture

17 Feb 2009 - 10:30 pm | आम्हि

हे हे हे हे ... फन्टाष्टिक... मस्तच आहे हे नाव...

हम्बिरराव हगवणे.

अनामिका's picture

15 Feb 2009 - 8:40 pm | अनामिका

सविता घायकुते(कायम घायकुतीला आलेली)
सुनंदा बोडके ,
प्रसन्न कवळी .
नयन डोळे
"अनामिका"

मुर्तिकला's picture

15 Feb 2009 - 9:51 pm | मुर्तिकला

आरती प्रसाद

समिधा's picture

16 Feb 2009 - 4:43 am | समिधा

सात्विक बडवे.
अबोली बडबडे
:)

पक्या's picture

16 Feb 2009 - 1:40 pm | पक्या

संगीतकार शंकर महादेवन
(शंकराचेच दुसरे नाव महादेव)

इनोबा म्हणे's picture

16 Feb 2009 - 1:47 pm | इनोबा म्हणे
नरेश_'s picture

16 Feb 2009 - 1:53 pm | नरेश_

आमचेकरं पन एक मानूस हाय, यशवंत रावजी पाटील नावाचा
आमचे गावातली सगली पोराटोरा त्याना यरा पाटील म्हनून हाका मारतान.

सुनील's picture

16 Feb 2009 - 1:56 pm | सुनील

माझ्या मते, त्रास यांनी सुरू केलेल्या धाग्याचा मूळ हेतू हा नाव + आडनाव मिळून होणार्‍या एखाद्या अर्थपूर्ण शब्दांबाबत असावा. हे जर खरे असेल तर मूळ लेखात दिलेल्या
भावना प्रधान आणि शहा निशा ह्या मालिकेत फक्त खादाडमाऊ यांनी दिलेले अक्षर शहा हेच नाव बसते.

अन्य सर्व प्रतिसाद हे नाव आणि आडनाव यांच्या अर्थातील विसंगती दर्शविणारे आहेत. तेही तसे मनोरंजकच आहेत परंतु मूळ धाग्याशी अवांतरच!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आम्हि's picture

17 Feb 2009 - 10:38 pm | आम्हि

फारच वीचार करता राव तुम्ही.... माझ्या मते त्रास रावान्नी लोकन्ना त्रास देण्या करता नव्हे तर लोकान्चा त्रास हल्का करण्या साथी हा धागा काधला असावा.. त्यामुळे सर्वच नावे धाग्याला धरुन आहेत.... चालु द्या. ह.घ्या.

टिउ's picture

18 Feb 2009 - 6:38 am | टिउ

सागर गोटे

अवांतरः अजिंक्य मांडलिक नावाची एक व्यक्ती आमच्या परिचयात आहे...

बाप्पा's picture

18 Feb 2009 - 4:09 pm | बाप्पा

मिनाक्शी आंधळे
प्रसन्न उघडे
गजानन माने
सुशांत कोल्हे

अभिष्टा's picture

18 Feb 2009 - 4:33 pm | अभिष्टा

प्रकाश अंधारे
सोनाली पितळे
भिकोबा सावकार
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

केळ्या's picture

21 Feb 2009 - 5:27 pm | केळ्या

उसासा!
ही मुलगी गुजराथी आहे.सा म्हणजेच शा(किंवा षा)

सुनील's picture

21 Feb 2009 - 5:29 pm | सुनील

अच्छा तर ही उषा शाह (गुजराती उच्चार उसासा!!!)

=))

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खादाड_बोका's picture

21 Feb 2009 - 10:03 pm | खादाड_बोका

आ.सु. रडके (आसावरी सुनील रडके)

प्रकाश आंधळे

शाळेत मराठीच्या पुस्तकातील संपादकीय मंडळाची नावं फार विचित्र असायाची. टाले, काटे, बंड, हुजुरबाजार, आणि ही सर्व माणसे एकत्रच संपादक मंडळात असल्याने विचीत्र आडनावे एकाच ठिकाणी वाचायची असल्यास मी ते पान उघडायचो.

मिथिला's picture

22 Feb 2009 - 12:08 am | मिथिला

वर्षा कोरडे

पक्या's picture

22 Feb 2009 - 1:54 am | पक्या

स्नेहा मारणे
प्रियंवदा बोबडे
मधुरा कडू
ऑफिसमध्ये एक स्निग्धा नावाची मुलगी होती तिचे लग्न झाल्यावर आडनाव गोळे झाले - स्निग्धा गोळे

अजय भागवत's picture

22 Feb 2009 - 2:19 am | अजय भागवत

प्रसाद कडू

प्राची's picture

22 Feb 2009 - 12:24 pm | प्राची

प्रसाद ओक :D

मराठी_माणूस's picture

22 Feb 2009 - 12:14 pm | मराठी_माणूस

शीला बस्ते

विनायक पाचलग's picture

22 Feb 2009 - 7:02 pm | विनायक पाचलग

अनिकेत बाबुराव केसरक्र
याला आज पण आम्ही अबाच म्हणतो
तेवढेच ते अबा आठवावेत
छानसे वाचलेले

विनायक पाचलग

मस्तानी's picture

8 Jan 2011 - 2:39 am | मस्तानी

सुरज रैना ... सुरज म्हणजे सूर्य आणि रैना म्हणजे रात्र !

दैत्य's picture

8 Jan 2011 - 3:24 am | दैत्य

पी.के. मरे

ramjya's picture

8 Jan 2011 - 10:49 am | ramjya

गो.रा. काळे.

शिल्पा ब's picture

8 Jan 2011 - 11:01 am | शिल्पा ब

यावरुन आठवलं, गो.रा. खैरनार यांचं काय झालं हो?

ramjya's picture

8 Jan 2011 - 11:07 am | ramjya

ट्रकभर पुरावा गोळा करत असतील

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jan 2011 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

आणि प्रविन भप्करचे काय झालं ?

शिल्पा ब's picture

8 Jan 2011 - 11:14 am | शिल्पा ब

चिप्लुन्ला गेले का?

कोणी म्हणे ते "वडिल" झाले :) त्यांच्या अभिंनंदणाचा कोणीतरी धागा काढावा :)

बाकी माझ्या कलिग चं नाव आहे "सारंग संगीत "

इन्द्र्राज पवार's picture

8 Jan 2011 - 11:57 am | इन्द्र्राज पवार

बारावी नंतर शाखेनिहाय कॉलेजमध्ये प्रवेश केल्याने अगोदरचे बरेच मित्र अन्यत्र गेले, पण तसेच नव्यानेही काही ओळखीचे होत गेले (हे सर्वत्रच होत असते...); त्यामुळे नवीन कोण कोण आहेत याचा नोटीस बोर्डवर लावलेल्या वर्गनिहाय याद्यावरून आम्ही आमच्या वर्गातील नावे पाहात असताना एक नाव दिसले "रंजना भास्कर देसाई...". पुढे थोडी ओळख झाल्यावर, व बुजरेपणा संपुष्टात आल्यावर ती वर्गात आल्यावर आमच्यातील एका टग्या तिचे मोठ्याने नाव पुकारत असे..."अरे व्वा, रंभा आली..."...हे नाव त्या मुलीला पुढील तिन्ही वर्षे कायमचे चिकटलेच. अर्थात 'रंभा'नेही ते स्पोर्टिव्हली घेतले होते.

दुसरी एक मुलगी होती "कमल कुलकर्णी" तिचे बारसे वर्गमित्रांनी केले "कक्कू"....तर तिच्यासमवेत तिच्याच गल्लीत राहाणारा "बाळासाहेब सूर्यवंशी" झाला "बस्सू"....त्यामुळे एखादे दिवशी कक्कू आली नाही तर मित्र सूर्यवंशीला विचारायचे, "बस्सू कक्कू किधर गई??"

मजा होती नावांना ट्विस्ट करायची.

इन्द्रा

मुतालीक = चार अक्षरी आडनावात दोन अक्षरे इंग्रजी आणि दोन मराठी

मुरलीधर देवधर = देव धर
फातरफेकर.

विनायक बेलापुरे's picture

8 Jan 2011 - 4:11 pm | विनायक बेलापुरे

दिशा दर्शने
साक्षी खोटे
बुवा कीर्तने
राम राजे
गुलाब काटे
प्रसन्न वैराग
निवास परदेशी
धोंडू दगडे
मोहिनी सदाफुले
बारकू लहानु कोरकु
जीवन लहाने
कमल माळी

आमच्या घराजवळ एका डॉक्टरचा दवाखाना आहे. त्यांचे नाव आहे "डॉ. अमर करे"
मी अजून त्यांच्याकडे गेलो नाही. पण जाण्यास भीती वाटते ;)

kamalakant samant's picture

10 Jan 2011 - 10:20 am | kamalakant samant

काही उदाहरणे
नाव आडनाव
सुबोध वाणी
अक्षय साठे
वसु॑धरा स्वामी
अस्मिता फुले
रेखा चित्रे
छाया चित्रे
आदर्श पुणेकर ?
प्रशा॑त समुद्र
सुदर्शन चक्रपाणि
मदन गोळे !
आडनाव प्रथम न॑तर नाव असे असेल तर-
सूर्यव॑शी राम
स॑त लीला
बाळ गोपाळ
भरपूर सापडतील्,आठवली तेवढी लिहिली.