तुम्हाला लिहिता येते ?

रेझर रेमॉन's picture
रेझर रेमॉन in काथ्याकूट
1 Feb 2009 - 1:18 am
गाभा: 

भरतकुमार राऊत (राज्यसभेवर जाण्या आधी) यशवंतच्या व्ही.आय.पी. मध्ये भेटले. निमित्त "इको फोक्स" ची स्पर्धा. विषय पर्यावरण... बोलताना विषय आधुनिक मराठी वर आला... मुलांना मराठी नीट बोलता-लिहिता येत नाही असा सूर होता. राऊतांचा विरोध... मुलं मराठीच आहेत आणि ती बोलतात ती भाषा ही मराठीच आहे... लिहितात तो प्रकार मराठीत प्रचलित झाला नसेल तर होईल. आणि नाहीच होऊ शकला तर तिसरा नवा प्रकार येईल.
भाषाशुद्धी ही समकालिन संकल्पना आहे आणि तिच्यावर प्रतिगामी विचारांची बळजबरी, संस्कृति या अवजड शब्दा मागून उतरवलेली आहे. मुळात भाषाशुद्धी नावाचा प्रकारच "माझी बोली" या अहं शी निगडित आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा बोलली जाते हे खोटे आहे. अनेक बोली आहेत आणि त्यांना स्वतःची नावे ही आहेत. त्यांना "लिहिते" केले तर तीच बोली तशीच उतरवली जाईल. तिची शुद्धता आणि अशुद्धता ठरवणारे आपण कोण?
मिपा वर विचारवेध सोडून शुद्ध (?) लेखनावर बोट ठेवणारे बरेंच प्रतिसाद दिसतात. खरा प्रतिसाद असतो, 'बघा, तुम्हाला मराठी टंकता येत नाही. काढली का नाही मी चूक?' हे अगदी आवडीने केले जाते. (विचारवेधा ऐवजी मर्मवेध) काळ बदलला, मंद मुलं डॉक्टर, इंजिनिअर्स ऐवजी आय.टी., एम.बी.ए. होऊ लागली तरी प्रकृति बदल होताना दिसत नाही. दॅट केन डॉल लाइक एटिट्युड'ज् नो टेकिंग यू एनिव्हेर... चिको!
- रेझर रेमॉन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

1 Feb 2009 - 2:34 am | लिखाळ

>> मिपा वर विचारवेध सोडून शुद्ध (?) लेखनावर बोट ठेवणारे बरेंच प्रतिसाद दिसतात. <<
मिपावर शुद्धलेखनाबदल कुणी कुणाला फारसे सांगत नाही. त्याबद्दलचा तगादा लावणे तर दूरच. अनेकदा टंकलेखन नीट साधले नसतानासुद्धा लोक लिखाणाची घाई करतात त्याबद्दल थोडा नाराजीचा सूर उमटतो. हल्ली मिपावर काही ठिकाणी शब्दात जेथे जोर येतो तेथे अनुस्वार देतात हे लक्षात न घेणारे लिखाण होते. ते असो.

'विचारवेध आणि शुद्धलेखनावर बोट ठेवणारे' असे सोडूनही बरेंच प्रतिसाद असतात आणि अश्या प्रतिसादात सुद्धा अवांतर असे लिहून काही भाग असतो :) हा मजेचा विस्तारीत भाग.

निराळ्या बोलीला मिपावर चांगले स्थान मिळते. आगरी बोलीच्या लेखांवर प्रतिसादांचा पूर असतो. लेखन सकस असले की लोकांना ते आवडतेच.
-- लिखाळ.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2009 - 4:42 am | llपुण्याचे पेशवेll

जी बोलतात ती मराठीच असे म्हटले तर त्या मुलानी मराठी ऐवजी हिंदी भाषा बोलली तर त्यालाही तुम्ही मराठीच म्हणणार का? मुळात स्वभाषेत जे चांगले शब्द आहेत ते टाकून दुसर्‍या भाषेतले शब्द मुद्दाम आपल्या भाषेत घुसडणे. आणि वर बोलीभाषा म्हणून समर्थन करणे पूर्ण चूकीचे आहे. प्रदेशानुसार मराठीत असलेले भाषावैविध्य याला बोलीभाषा म्हणता येईल. उगाच २-३ वाक्ये मराठीत ३-४ हिंदीत आणि त्यातही ४-५ शब्द इंग्लीश वापरणे आणि त्याचे आधुनिक बोली म्हणून समर्थन करणे याला काही अर्थ नाही. आणि तुम्ही ज्या शुद्धलेखनाबद्दल बोलताय त्याची कधी कोणी मिपा वर सक्ति करत नाही. पण अगदीच 'तुम्हि मझ्यशि मैत्रि करल क?' वगैरे असे काही लिहीले तर मात्र नक्की कोणतरी त्याची खिल्ली उडवेल किंवा इतराना कळेल असे लिहा असे सांगेल.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मऊमाऊ's picture

1 Feb 2009 - 8:52 am | मऊमाऊ

...मिपा वर विचारवेध सोडून शुद्ध (?) लेखनावर बोट ठेवणारे बरेंच प्रतिसाद दिसतात. खरा प्रतिसाद असतो, 'बघा, तुम्हाला मराठी टंकता येत नाही. काढली का नाही मी चूक?' हे अगदी आवडीने केले जाते...<<
असे मला तरी कधी वाटले नाही.

<< मंद मुलं डॉक्टर, इंजिनिअर्स ऐवजी आय.टी., एम.बी.ए. होऊ लागली तरी प्रकृति बदल होताना दिसत नाही<<..
या वाक्याचा अर्थच कळला नाही.

<<दॅट केन डॉल लाइक एटिट्युड'ज् नो टेकिंग यू एनिव्हेर... चिको!..
हे कोणाला उद्देशून आहे ?

स्वानन्द's picture

1 Feb 2009 - 9:01 am | स्वानन्द

मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भाषेला ( आणि ) ती लिहायला नियम असतात ते ती सर्वांना समजावी म्हणूनच.

उद्या सर्वांनी ठरवलं की रहदारीचे नियम आम्ही आमच्यासारखेच वापरणार तर चालेल का? म्हणजे एखादा म्हणेल की लाल दिवा लागला की मी पुढे जाणार आणि हिरवा लागला की थांबणार, तर गोंधळच निर्माण होईल. प्रत्येक भाषेचे नियम हे याचसाठी असतात. इंग्रजी मध्ये स्पेलींग मिस्टेक नाही ना चालवून घेत आपण? हेही तसंच

आणि मिसळ्पाव वर शुद्धलेखनाबद्दल कोणी 'हिणवलेलं' तरी मी पाहीलं नाही. हो चूक आढळल्यास ती सांगितल्याने उलट त्या व्यक्तीच्या ज्ञानात भरच पडेल. बाकी लिखाळ आणि आमच्या पुण्याच्या पेशव्यांच्या मतांशी सहमत आहे.

--भाषानन्द

सचिन's picture

1 Feb 2009 - 11:10 pm | सचिन

स्वानंद यांच्या प्रतिसादाशी सहमत.
सर्वसाधारण नियम हे पाळले जायला हवेतच. नाहीतर स्वातंत्र्यदिनाला स्वातंत्र्यदीन म्हटले तर कसे चालेल ?
कुठल्याही बोली भाषेला लिहिते केलेत तरी ही चूक कोणालाच क्षम्य नाही.

उगाच २-३ वाक्ये मराठीत ३-४ हिंदीत आणि त्यातही ४-५ शब्द इंग्लीश वापरणे आणि त्याचे आधुनिक बोली म्हणून समर्थन करणे याला काही अर्थ नाही.
--पेशव्यांशी सहमत. आजकाल मराठी बातम्यांमधेही "आमच्या वार्ताहराने घेतलेला लेखजोखा...." असे ऐकायला मिळते. रेडिओ मिरची किंवा तत्सम ठिकाणी बोलली जाते ती कुठली भाषा असते ? मराठी..हिंदी...इंग्रजी ....???

मिपावर शुद्धलेखनाबदल कुणी कुणाला फारसे सांगत नाही. त्याबद्दलचा तगादा लावणे तर दूरच. अनेकदा टंकलेखन नीट साधले नसतानासुद्धा लोक लिखाणाची घाई करतात त्याबद्दल थोडा नाराजीचा सूर उमटतो
--लिखळांशीही सहमत....आणि मी म्हणतो, एखाद्याने दाखवली असेल शुद्धलेखनातली चूक....तर ती मान्य करून मोकळे व्हावे ना ! शेवटी मि पा हा एक कट्टाच नाही का ? सारे खेळीमेळीतच चालले आहे.

आनंद घारे's picture

2 Feb 2009 - 8:55 am | आनंद घारे

हल्ली पाण्याच्या शुद्धीकरणयंत्राची एक जाहिरात दिवसातून शंभर वेळा टीव्हीवर येते. त्यातला लहान मुलगा आपल्या आईला सांगतो , " ...चे आईज येलो येलो झाले आहेत. 'शुद्धीकरणयंत्रा' ऐवजी 'फिल्टर' असे रोज बोलतो त्याप्रमाणे सोप्या शब्दात म्हंटले तर चालेल, त्याने मराठी भाषेत एका नव्या शब्दाची भर पडेल. त्याला 'गाळणे' म्हंटले तर ते विचित्र वाटेल, पण 'पिवळ्या डोळ्यांना ' येलो येलो आईज ' म्हंटलेले खटकते. कदाचित ते तसे खटकण्यामुळे ती जाहिरात लक्षात रहावी असा हेतू त्यामागे असेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

2 Feb 2009 - 9:16 am | प्रभाकर पेठकर

'तुझ्या गाडीत किडा आहे'.

एक अनुस्वार ह्या वाक्याचा अर्थ पार बदलवून टाकतो.