गांधी आणि नेहरू घराणे

तात्यालबाड's picture
तात्यालबाड in काथ्याकूट
28 Jan 2009 - 11:34 am
गाभा: 

२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या आणि इतर दिवशी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे इतके कोडकौतुक होते की त्याला काही मर्यादाच नाहीत. जणू काही भारताला स्वातंत्र्य ह्याच दोघांनी मिळवून दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, इतरप्रांतीय अनेक अज्ञात स्वातंत्र्यसैनिक यांचे काहीच योगदान नाही ? ते काय तुरुंगात गोट्या खेळत होते ? ज्या शिक्षा ह्या स्वातंत्र्यसैनिकांनी भोगल्या आहेत त्या प्रकारच्या शिक्षा गांधी,नेहरू यांनी भोगल्या आहेत काय ? निदान मला तरी माहीत नाही. असल्यास माझा गैरसमज दूर करावा. या दोघांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या ज्या मोठ्या प्रमाणावर साजर्‍या केल्या जातात, तेच भाग्य इतर हुतात्म्यांना का नाही मिळत ? २ ऑक्टोबर ला असणारी गांधीजयंती रजा देऊन साजरी होते. पण याच दिवशी लाल बहादूर शास्त्रीं यांची ही जयंती असते. नुकतीच २३ जानेवारीला सुभाषचंद्र बोसांचीही जयंती होती.
इतर प्रातांचे राहू दे पण निदान महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यसैनिकांची तरी त्यांच्या त्यांच्या तिथ्यांना आठवण ठेवायला कोणत्याही पक्षाच्या सरकारची हरकत नसावी.पण कॉंग्रेस ला गांधी आणि नेहरू यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी दिसत नाहीत आणि बाकीचे पक्ष इतर कोणत्याही मुद्यांवरून राजीनामा मागीतील पण या मुद्याला हात सुद्धा घालणार नाहीत. आपण मराठी माणसं जर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या तिथ्यांबद्दल अशी उदासिनता बाळगत असू तर; सरकार काय शेवटी राजकारणापुरतंच आहे.

प्रतिक्रिया

दशानन's picture

28 Jan 2009 - 11:41 am | दशानन

सहमत आहे.

असल्या मुद्द्याने वोट मिळत नसतात त्यामुळेच तर राजकारणी ह्याचे भांडवल करत नाहीत जेव्हा त्यांना असे दिसेल की जनता जागरुक आहे तेव्हा ते देखील करु लागतील.

* सणांना सुट्टी का दिली जाते माहीती असेलच तुम्हाला... कारण मताचे राजकारण !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

निखिल देशपांडे's picture

28 Jan 2009 - 12:04 pm | निखिल देशपांडे

पण कॉंग्रेस ला गांधी आणि नेहरू यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी दिसत नाहीत हि भारतातलि सर्वात मोठि शोकांतिका आहे.......

दशानन's picture

28 Jan 2009 - 12:05 pm | दशानन

पण ह्याला जबाबदार पण आपणच आहोत ना :?

* आपण म्हणजे समाज !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 1:25 pm | नितिन थत्ते

ज्या शिक्षा ह्या स्वातंत्र्यसैनिकांनी भोगल्या आहेत त्या प्रकारच्या शिक्षा गांधी,नेहरू यांनी भोगल्या आहेत काय ?
शिक्षांचे स्वरूप हे गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. खलिस्तान चळवळीतील लोंगोवाल किंवा बादल यांना मिळणारी शिक्षा ही भिंद्रन्वाल्याला मिळणार्‍या शिक्षेपेक्षा वेगळीच असते. (टिळक आणि गांधी यांना सारक्याच स्वरूपाच्या शिक्षा दिल्या होत्या) आणि हे जगभर असेच असते. नेल्सन मंडेलाना ही फक्त तुरुंगवासाचीच शिक्षा झाली होती.

जणू काही भारताला स्वातंत्र्य ह्याच दोघांनी मिळवून दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, इतरप्रांतीय अनेक अज्ञात स्वातंत्र्यसैनिक यांचे काहीच योगदान नाही ? ते काय तुरुंगात गोट्या खेळत होते ?
इतर स्वातंत्र्यसैनिकांविषयीची माहिती पूर्णपणे दडपली गेली हे खरे नाही. किंवा त्यांचे योगदान नाकारलेही गेलेले नाही. आम्ही आमच्या इतिहासाच्या (कोंग्रेसप्रणित) पाठ्यपुस्तकांतूनच या सर्वांविषयी वाचले होते. गुप्त पत्रकांमधून माहिती करून घ्यायची गरज पडली नाही.
प्रश्न प्रमाणाचा असू शकतो आणि त्यावर अर्थातच काथ्या कुटला जाऊ शकतो.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

तात्यालबाड's picture

28 Jan 2009 - 4:44 pm | तात्यालबाड

इतर स्वातंत्र्यसैनिकांविषयीची माहिती पूर्णपणे दडपली गेली हे खरे नाही. किंवा त्यांचे योगदान नाकारलेही गेलेले नाही. आम्ही आमच्या इतिहासाच्या (कोंग्रेसप्रणित) पाठ्यपुस्तकांतूनच या सर्वांविषयी वाचले होते. गुप्त पत्रकांमधून माहिती करून घ्यायची गरज पडली नाही

.

मान्य, पण मग गांधी आणि नेहरूंचाच एवढा उदोउदो का ? रूपायाच्या नोटेवर फक्त गांधीचाच फोटो का ? वेगवेगळ्या नोटांवर वेगवेगळ्या स्वातंत्र्यसैनिकांची चित्र छापता येतील की. लहान मुलं आवडतात म्हणून नेहरुंचाच वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. इतर स्वातंत्र्य सैनिकांना लहान मुलं आवडत नसल्याचे काही पुरावे आहेत का ?

शिक्षांचे स्वरूप हे गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. खलिस्तान चळवळीतील लोंगोवाल किंवा बादल यांना मिळणारी शिक्षा ही भिंद्रन्वाल्याला मिळणार्‍या शिक्षेपेक्षा वेगळीच असते. (टिळक आणि गांधी यांना सारक्याच स्वरूपाच्या शिक्षा दिल्या होत्या) आणि हे जगभर असेच असते. नेल्सन मंडेलाना ही फक्त तुरुंगवासाचीच शिक्षा झाली होती

कायम बोटचेपी भूमिका घेणार्‍या कॉग्रेसकडून शिक्षा मिळेल असा गुन्हा तरी काय केला जाऊ शकतो. आज २६/११ ला दोन महिने होऊन गेले तरी पाकिस्तानला मुहतोड जबाब न देऊ शकणारे सरकार कॉंग्रेसचेच आहे. अफजल गुरू अजूनही तुरुंगात कॉग्रेसच्या आश्रयाखाली आहे. इतकंच काय नारायणराव राणे सुद्धा कॉंग्रेस मध्ये जाऊन सत्ता मिळेल या आशेपायी आपला कणा मोडून बसले आहेत.

अवलिया's picture

28 Jan 2009 - 2:07 pm | अवलिया

ह्या लेखावर कमीत कमी ५० ते १०० प्रतिसाद यावेत आणि महिनाभर हा धागा बोर्डावर राहिल असा अंदाज आहे.
यावर ज्यांना बेटींग करायचे असेल त्यांनी व्यनी करावा.

बेईमानीचा धंदा आम्ही इमानदारीत करतो. त्यामुळे कोणतीही फसवणूक होणार नाही.
पंटर लोकांना डीलरशीप देणे आहे.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

घाटावरचे भट's picture

29 Jan 2009 - 11:01 am | घाटावरचे भट

नाना, बेटिंगचे ऑड्स काय आहेत ते कसं कळेल? व्यनि की खरड? का इथेच वेळोवेळी अपडेट कराल?

महेंद्र's picture

28 Jan 2009 - 4:44 pm | महेंद्र

अहो आपली स्म्रुती फार तोकडी असते.
कम्युनिस्टांनी चायना ला केलेला सपोर्ट ( चायना ने जेंव्हा आक्रमण केले तेंव्हा १९६२ मधे) विसरुन ह्याच पक्षाला आपण सत्तेमधे सहभागी झालेले पाहिले आहे.
दुसरी गोष्ट, ह्यास पक्शाने आज दक्षीणॅत सत्ता काबिज केलेली आहे.
असॉ...

शशिधर केळकर's picture

28 Jan 2009 - 6:41 pm | शशिधर केळकर

लेखात उल्लेखलेल्या या दोघांचे काम मोठे खरेच.
काँग्रेस ने अतिशय चतुराईने, धूर्तपणे आणि पद्धतशीरपणे सर्वत्र सदा सर्वकाळ त्यांचा वापरही छान करून घेतला.
प्रचाराचे एकही माध्यम त्यातून सुटले नाही. खेडोपाडी, सर्वदूर ग्रामीण भागातही लोकांच्या दैनिक गरजांच्या वस्तू - माध्यमातून गांधी नेहरूंचा प्रचार झाला.
आणि जितके काम कदाचित त्यांनी त्यांच्या हयातीत केले नसेल तितके काम काँग्रेस ने गेल्या ६० वर्षांत त्याच्या पश्चात त्यांचे नाव वापरून करून घेतले. तसे पाहिले, तर जितके ते काँग्रेसचे तितकेच इतर कोणत्याही पक्षाचे ही आहेतच की. आज काँग्रेस सोडून इतर कोणता पक्ष त्यांचे नाव प्रचारार्थ वापरेल? सरदार पटेल, सावरकर आणि सगळे कांतिकारक, देशभक्त यांची नावे (गांधी नेहरू सोडून) कोणा राजकीय पक्षाने वापरल्याचे ऐकिवात आहे का? सावरकरांचे 'हिंदुह्र्दयसम्राट' हे बिरूद बाळ ठाकरे यांनी उचलले (क्षमस्व - पण सत्य!). त्यांचे नाव फार थोड्या लोकांनी अत्यल्प काळ वापरले. जनसंघाने आपली प्रतिमा कायम वेगळी ठेवली. हिंदू महासभेने सावरकरांचे नाव वापरून काही प्रभाव निर्माण केला नाही. आणि खरेतर काँग्रेसशी त्यांची तुलनाही करणे अयोग्यच आहे. इतर कांतिकारकांचे काय वेगळे? शाळांच्या पाठ्यपुस्तकांमधे नावे कोणाची? चाचा नेहरूना मुले आवडत. गांधीजी लहान मुलांना संस्कारांसाठी उपयुक्त पडले. अहिंसेचा मार्ग विनात्रास स्वातंत्र्य देणारा! नेहरू त्यांचे थोर अनुयायी!
मी वीर सावरकर चित्रपट पाहायला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. चित्रपटगृहात कोणा शाळेची मुले आली होती. गांधीजी दिसल्याबरोबर घोषणा सुरू! महात्मा गांधींचा विजय असो. सावरकर कोणाला माहीतच नाहीत!
हे सगळे बदलणे शक्यच नाही. आजच्या महाराष्ट्रात इतके नाव असणारे दुसरे मला तरी एकच कुटुंब दिसते - ते मंगेशकरांचे! त्यानी सक्रिय राजकारणात भाग घेतला, आणि व्यक्तिप्रधान राजकारण पद्धतशीर रीत्या केले तर तेही नेहरू गांधींप्रमाणे अढळपद मिळवतील!
(अहिंसाविरोधी ) शशिधर केळकर

गांधींचे चित्र नोटेवर १९९६ मध्ये आले. तेव्हापासून २००४ पर्यंत केंद्रात काँग्रेसचे सरकार नव्हते. त्या ८ वर्षांतील ६ वर्षे 'देशभक्तांचे' राज्य केंद्रात होते. त्या काळी इतर नेत्यांची चित्रे असलेल्या नोटा सुरू करता आल्या असत्या.
(अवांतर: देशभक्तांच्या सरकारने महिलांसाठी काही कल्याणकारी योजना सुरू केली होती. तिला 'कस्तुरबा योजना' असे नाव दिले गेले.)

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

आचरट कार्टा's picture

28 Jan 2009 - 7:29 pm | आचरट कार्टा

आणखी एक मजेदार गोष्ट... (च्यायला, मजा कसली? आपण निर्लज्ज होत चाललोय!)

आत्ताच्या (द ग्रेट) गांधी घराण्याचा मोहनदासजींच्या गुजराथी घराण्याचा काडीमात्र संबंध नाही!!!
इंदिराजींच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या "दारूवाला" या आडनावाच्या त्यांच्या होणार्‍या नवर्‍यासमोर नेहरूंनी इतकीच अट ठेवली, की आडनाव बदलून "गांधी" करून घेतलंस, तर लग्न करू देईन!

जवाहरलाल हा माणूस जितका हुशार होता, तितका क्वचितच कोणी असेल. मोहनदासजींच्या नात्यात कुणी जावई शोधण्यापेक्षा मिळेल त्या जावयाला गांधी बनवणं सोपं... त्यांना गांधी या नावाची जादू कळली. ती त्यांनी अचूकपणे कॅश केली. परिणाम समोर आहेत, त्यांचा प्रयोग अपेक्षेपलीकडे यशस्वी झालाय! एव्हाना नवीन राजकुमाराच्याही पादुका पूजेसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

आणि राहता राहिली गोष्ट सावरकर वगैरे वेड्यांची...
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या पहिल्या ध्वजारोहणाचा जो समारंभ झाला, (हो, तोच. "सर्व जग निद्राधीन असताना..." वगैरे वाला) त्याही कार्यक्रमाला स्वातंत्यवीर सावरकरांना बोलावलं गेलं नव्हतं. त्यामुळे त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या हिंसक सहकार्‍यांना वगळायचा प्रयत्न होतोय, त्यात काही आश्चर्यकारक वगैरे नाही.

स्पष्ट बोलायचं, तर गांधी, आणि त्याहीपेक्षा अधिक नेहरू घराण्याला स्वातंत्र्याअगोदरच पुढे येणार्‍या सत्तेची स्वप्नं पडत होती असं म्हणायला बरीच जागा आहे.

पण हे असलं बोलायचं नाही...

दे दी हमे आजादी बिना खडग, बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल...

खडग-ढाल घेऊन तुटून पडले ते चूत्ये... स्वातंत्र मिळण्यामधे त्यांच्या या उद्योगाचा काही वाटा नाही!

खरं तर हे सगळे रेफरन्सेस एकमेकांत बसवले, तर उद्वेग येतो... पण सध्या पाठ्यपुस्तकांमधे येतो, तेव्हढाच इतिहास पाहतो आम्ही. मग पाकिस्तानला "खोट्या इतिहासाची पाठ्यपुस्तकं वापरून ब्रेनवॉशिंग करणारे" म्हणून शिव्या घालण्यात काय अर्थ आहे?

----------------------------------------------------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

विसोबा खेचर's picture

28 Jan 2009 - 11:34 pm | विसोबा खेचर

स्वातंत्र्यसैनिक यांचे काहीच योगदान नाही ? ते काय तुरुंगात गोट्या खेळत होते ? ज्या शिक्षा ह्या स्वातंत्र्यसैनिकांनी भोगल्या आहेत त्या प्रकारच्या शिक्षा गांधी,नेहरू यांनी भोगल्या आहेत काय ?

सहमत आहे!

२ ऑक्टोबर ला असणारी गांधीजयंती रजा देऊन साजरी होते.

अहो शिवाय ड्रायडे असतो तो वेगळाच! साला गांधी जन्माला आला तो दिवस म्हणून पब्लिकने दारू का प्यायची नाही?? गांधीजयंती आणि त्या सप्ताहात दोन दिवस ड्राय डे असतो याचा मी तीव्र निषेध करतो..!

तात्या.

हुप्प्या's picture

29 Jan 2009 - 12:13 am | हुप्प्या

फिरोझ गांधी ह्याचा बाप मुस्लिम होता. आई मूळची पारशी पण तिने धर्म बदलून मुस्लिम स्वीकारला आणि लग्न केले. त्यामुळे इंदिरा गांधीचे सासर पारशी वगैरे थापा आहेत.
दुसरे असे की ह्या घराण्याशी दुरूनही संबंध असलेल्या लोकांचे महात्म्य अफाट असते. मात्र फिरोझ गांधी आणि त्याचे नातेवाईक ह्याला अपवाद. कारण ते मुस्लिम आहेत हे उघडकीस येऊन नेहरूंचा खोटारडेपणा उघडकीस येईल.
कृपया फिरोझ गांधीच्या आई बापांची नावे कुणाला ठाऊक असतील तर ती सांगा.

मदनबाण's picture

29 Jan 2009 - 12:29 am | मदनबाण

ही लिंक पहा :-- http://alchemystical.files.wordpress.com/2006/09/nehru_gandhi_family_tre...

मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

भास्कर केन्डे's picture

29 Jan 2009 - 12:35 am | भास्कर केन्डे

खरे खोटे देवालाच ठाऊक. हे चित्र पहा.

आपला,
(गांधी-नेहरुंबद्दल साशंक) भास्कर

केदार's picture

29 Jan 2009 - 2:49 am | केदार

फक्त एक झोल झाला आहे. मोतीलाल नेहरुच्या वर आणी नंतर बरोबर कौल घराने पण दाखविले असते तर शेख अब्दुल्ला पासून ओमार अब्दुला पर्यंत लोक आले असते. ते ही नेहरुंचे नातेवाईकच आहेत.
पण सर्व गांधी मेल्यावर त्यांना अग्नी दिला गेला. बहुतेक ते एक राजकारण असावे. (किंवा सर्वधर्मसमभाव)

महात्मा गांधींचा एक मुलगा पण नंतर मुस्लीम झाला. गांधीचा एक जवळचा मित्र मुस्लीम होता त्याचा त्यांचावर बा पेक्षा जास्त प्रभाव होता असे स्वतः गांधीनिंच लिहून ठेवले आहे.

नितिन थत्ते's picture

29 Jan 2009 - 9:48 am | नितिन थत्ते

=)) =)) =))

कुणातरी मिपाकराची पंचलाईन वाचल्याचे आठवते.
"ते विज्ञानात नवीन शोध लावतात. आम्ही इतिहासात नवीन शोध लावतो."

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सुनील's picture

29 Jan 2009 - 10:29 am | सुनील

उत्तम करमणूक. चालू द्या!

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 6:31 am | शंकरराव

फिरोझ गांधीच ...

आधि आडनाव बाटलिवाला होत, रजकारणात ह्या नावाला ना वजन ना धार..
नेहरुने ?? चप्लुसी करून गांधी आडनावासाठी
फिरोझ ला म. गांधींचा दत्तक पुत्र करवून घेतला मग त्याचे बाटलिवाला नाव जाउन गाधी नाव आले.
सर्व कसे सोईनुसार केले ईंदिरा साठी. एव्ह्डी दुर द्रुष्टी नेहरुने काष्मीर अन चिन च्या बाबतित नाही वापरली ..

....
....

महेंद्र's picture

29 Jan 2009 - 12:43 pm | महेंद्र

छान सुरु आहे चर्चा...
पण राहुल गांधी कोण? जेनेटिकली पार खिचडी झालिय त्याच्या जिन्स ची..

शंकरराव's picture

30 Jan 2009 - 2:42 pm | शंकरराव

राहुल ने 'शत जन्म शोधितांना'
रोज ऐकावे :-)