मी शब्द ओठि रोखले...

छत्रपति's picture
छत्रपति in जे न देखे रवी...
15 Jan 2008 - 4:34 pm

रोखले नयनात आसु,
मी शब्द ओठी रोखले...
पाहिले नाही तिला मी,
नजरेस माझ्या रोखले...
सांगुच का संयमाला....,
मी असा का सोसला?
होती मला जाणीव....
मजला इन्कार नसता सोसला...

कविता माझी नहिये...
कुठेतरी सापडलिये.....
पण आवडलिये........

चारोळ्याअनुभव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Jan 2008 - 8:43 pm | विसोबा खेचर

कविता माझी नहिये...
कुठेतरी सापडलिये.....
पण आवडलिये........

हे चांगले केलेत. इतर कुणाचे साहित्य असल्यास प्रत्येक वेळेस त्या व्यक्तिचे नांव अवश्य प्रसिद्ध करावे. नांव माहीत नसल्यास तसा उल्लेख अवश्य करावा...

तात्या.

सुनील's picture

16 Jan 2008 - 12:25 am | सुनील

कविता माझी नहिये...
कुठेतरी सापडलिये.....
पण आवडलिये........

ह्या डिसक्लेमरचा फाँट तुम्ही कवितेसारखाच ठेवल्यामुळे, तो ही कवितेचाच भाग वाटतोय!!!

(गोंधळलेला) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केशवसुमार's picture

16 Jan 2008 - 12:31 am | केशवसुमार

भाऊसाहेब पाटणकर ह्यांच्या 'दोस्त हो' ह्य काव्य संग्रहातले हे शेर आहेत..
(भाऊसाहेब पाटणकर पंखा)केशवसुमार.

ऋषिकेश's picture

16 Jan 2008 - 1:40 am | ऋषिकेश

रोखले आणि सोसला! यांच्या विरुद्धार्थाचा इतका प्रभावशाली वापर कशीच पहाण्यात नव्हता.. फार आवडली.
केशवसुमार,
भाऊसाहेब पाटणकर यांच्या आणखी कविता जालावर मिळतील काय?

(होऊ पहाणारा पंखा) ऋषिकेश