नुकतेच काश्मीरमध्ये काही पर्यटक फिरायला गेले असता तिथे टी आर एफ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. ते मुस्लिम सोडून अन्य धर्माचे लोक आहेत हे समजल्यानंतर अगदी जवळून बेछुट गोळीबार केला आणि त्यात २८ जण मृत पावले. त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली. _/\_
याच विषयावर हा धागा आहे. बरेचसे उजव्या बाजूचे विचारवंत हे इस्लाम हे एक जागतिक संकट आहे असे सतत सांगत असतात. जग सोडून द्या पण भारतासाठी तरी आपण त्याचा विचार करायला हवा. म्हणजे खरंच इस्लाम हे भारतासाठी एक संकट आहे का केवळ उजव्या बाजूचे लोक असे म्हणत आहेत म्हणून आपण ते मान्य करायचं का? की त्यात कितपत तथ्य आहे हे तपासून पाहून मगच ठरवायचं? मला इथे दोन्ही बाजूंचे विचार प्रतिसादातून हवे आहेत. केवळ एकाच बाजूचे नव्हे.
ते मुस्लिम अतिरेकी म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज नव्हे असेही काही डावे विचारवंत त्यांच्या फेसबुक पेजवर लिहीत आहेत. याच्या समर्थनार्थ ते यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती देखील मेला असल्याचे सांगत आहेत. ते कितपत खरं आहे मला माहित नाही.
समजा इस्लाम हा भारतासाठी संकट असेल तर तो संकट कसा काय आहे? इस्लाम मुळे हिंदूंचं किंवा हिंदूंसहित अन्य धर्मियांसाठी ते त्रासाचं कसं होऊ शकतं? नक्की कशाप्रकारे इस्लाम हा भारतासाठी त्रासदायक ठरू शकतो? आणि समजा हे उजवे विचारवंत म्हणत आहेत त्याप्रमाणे नसेल ; इस्लाम हा भारतासाठी संकट नसेल तर त्यासाठी काही सबळ पुरावे आहेत का? कोणतीतरी एक बाजू घेण्यापूर्वी दोन्हीही बाजू तपासून घेतल्या पाहिजेत म्हणून हा लेख. माझी वैयक्तिक मते जी काही असतील ती असतील परंतु ती सध्या बाजूला ठेवून मला दोन्ही बाजू तपासून पाहायच्या आहेत. जरूर व्यक्त व्हा.
प्रतिक्रिया
23 Apr 2025 - 4:28 pm | कंजूस
खिलजी आणि त्यांच्यानंतर येणारे लोक इथे लिमलेटच्या गोळ्या वाटायला आले होते असं म्हणायचं आहे काय?
23 Apr 2025 - 4:35 pm | उपयोजक
तो इतिहास झाला. आजबद्दल बोला. सगळे मुस्लिम सारखेच असं म्हणू शकतो का?
23 Apr 2025 - 4:38 pm | वामन देशमुख
कालचे अतिरेकी आणि त्याचे स्थानिक मदतकर्ते हे तिथे लिमलेटच्या गोळ्या वाटायला आले होते असं म्हणायचं आहे काय? तुमच्या म्हणण्याने सत्य बदलते काय?
23 Apr 2025 - 5:56 pm | उपयोजक
पण सगळे मुस्लिम सारखेच हा निष्कर्ष यावरुन काढावा का?
23 Apr 2025 - 4:35 pm | वामन देशमुख
अतिरेक्यांनी उपस्थित पर्यटकांची ओळखपत्रे पाहून, लिंगनिदान करून, व्यवस्थित ओळख पटवून केवळ काफिर लोकांना निवडून, त्यांना कुराणाच्या आयती म्हणायला लावून ठार मारले आहे.
---
अनेकांना वाटते, लढाई ही हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यांत आहे. खरी लढाई तर इस्लाम-काफिर यांच्यांत आहे!
23 Apr 2025 - 5:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मृतांच्या यादीत सय्यद हुसैन शाह हे एक नाव आहे. पहलगाम मध्ये पर्यटकांना घोड्यावर फिरवण्याचं काम करणारा युवक दहशतवादी हल्ल्यात ठार झाला. पर्यटक आपले पाहुणे आहेत. या 'मासुम' पर्यटकांना मारू नका असे म्हणत होता म्हणे.
-दिलीप बिरुटे
23 Apr 2025 - 5:06 pm | कंजूस
आता पोटावर पाय आला ना.
23 Apr 2025 - 5:08 pm | अमरेंद्र बाहुबली
इस्लामविरोधाच घोड पुढे दामटल म्हणजे सरकारला विचारले जाणारे प्रश्न आपोआप आमगे पडतात.
23 Apr 2025 - 5:32 pm | वामन देशमुख
मारण्यासाठी तेवढे कारण पुरेसे आहे की!
23 Apr 2025 - 5:48 pm | श्रीगुरुजी
मृतात एक मुस्लिम आहे, म्हणजेच हा हिंदूंंवर हल्ला नाही. ही गोळीबाराची घटना म्हणजे लष्कराने केलेल्या अमानुष अत्याचाराला केलेला प्रतिकार आहे.
23 Apr 2025 - 4:48 pm | अमरेंद्र बाहुबली
जरूर व्यक्त व्हा.
सत्यं यः भाषते नित्यं, तं द्वेष्यं मन्यते जनः।
दुर्जनानां नयनेष्वेव, शल्यवत् स खलः स्थितः॥
अर्थात सत्य बोलणारा दुर्जनांच्या डोळ्यात काट्यासारखा टोचतो. त्यामुळे मी व्यक्त होऊ शकत नाही. सॉरी!
23 Apr 2025 - 6:09 pm | प्रसाद गोडबोले
मला हे असले लेखन धागे प्रचंड आवडतात कारण लोकांची वृत्ती , गट दिसून येतात !
आणि असा काही वेळप्रसंग आपल्यावर इथे महाराष्ट्रात आला तर आपले कोण अन् परके कोण हे कसे ठरवायचे ह्याचे गणित करणे सोप्पे जाते .
जी निष्पाप लोकं ह्या हल्ल्यात मेली आहेत त्यांचा काय दोष होता ? काश्मीरला जाणे हाच दोष होता. आपण काश्मीर, पश्चिम बांगलादेश आणि केरळ हे प्रांत गमावून बसलो आहोत. कितीही कडूझार वाटत असले तरी हे सत्य आहे. ज्यांना पटत नाही त्यांनी आवर्जून ह्या राज्यात पर्यटनास जावे अन् अशी पहलगाम सारखी उत्तम आदर्श उदाहरणे देशासाठी तयार करत रहावीत.
बाकी सरकारला जाब विचारला च पाहिजे. का तुम्ही आम्हा टॅक्स पेअर लोकांचे पैसे ह्या राज्यांवर वाया घालवत आहात ? हा विषय संपलेला आहे. तुम्ही कितीही विकासकामे केलीत तरी ह्या राज्यातून काहीही चांगले निर्माण होणार नाहीये.
बाकी असोच.
मनपूर्वक धन्यवाद.
23 Apr 2025 - 11:24 pm | युयुत्सु
इस्लाम जागतिक संकट आहे हे मला तत्वतः मान्य आहे. तसेच या आपत्तीत सरकारने घेतलेल्या निर्णयांना पण माझा पाठिंबा आहे.
पण मला एक मूलभूत प्रश्न नेहमी पडतो. तो असा की सन्मानाने जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे का?
24 Apr 2025 - 8:35 am | कानडाऊ योगेशु
कल्पनेतील जगात नसावी.
हाच प्रश्न मी "सन्मानाने जगण्यासाठी राष्ट्राची/राज्याची आश्यकता आहे का?" असा पण पुढे वाढवु शकतो.
बॉर्डर सिनेमात एक संवाद आहे. मुलगा आपल्या सैनिक बापाला विचारतो कि "समोरचा सैनिक दिसतो तुमच्यासारखाच.त्याचे खाणे पिणे ही आपल्यासारखेच आहे तर तुम्ही त्याला का मारता?" त्यावर बाप उत्तर देतो कि " बेटा जर मी त्याला मारले नाही तर तो मला मारेल".
हिंदु धर्माच्याबाबतीत हा धर्म बर्यापैकि सहिष्णु आहे तसे नसते तर इतके आक्रमणकारी भारतात येऊच शकले नसते त्यामुळे माझा हिंदु धर्म हा माझ्यासाठी तरी स्वसंरक्षणार्थ केलेली सोय आहे. म्हणजे माझ्याकडे बंदुक आहे पण ती मला नाईलाजाने बाळगावी लागतेय.
अजुन दुसरे उदाहरण म्हणजे झाकिर नाईक चा एक विडिओ पाहिला होता. प्रश्नोत्तरे प्रकारचा विडिओ होता.अर्थात बर्याच वेळेला हे विडिओ स्क्रिप्टेड असतात.त्यात झाकीर नाईक ला एकाने सांगितले कि मी पूर्ण पणे निधर्मी आणि नास्तिक आहे. त्यावर झाकिर नाईकचे उत्तर होते मुस्लीम प्रार्थनेनुसार मी कोणीही देवाला मानत नाही त्या एका परमपवित्र तत्सम देवाशिवाय. त्यानुसार तुम्ही कोणाही देवाला मानत नाही म्हणजे तुम्ही अर्धे मुसलमान तर अगोदरच झालेला आहात थोडा प्रयत्न केला तर बाकीचा अर्धाभाग ही अनुसरु शकाल व मुस्लीम बनु शकाल वगैरे. असे वैचारिक गोळ्या झाडणारे धार्मिक दहशतवादी आपल्या आजुबाजुला वावरत असताना धर्म बाळगणे ही नाईलाजाने केलेली सोय असावे असे म्हणावे लागेल.
24 Apr 2025 - 8:12 am | उपयोजक
बहुतेक सर्व देवता आणि त्यांची पूजा यांचा सृजनाशी संबंध आहे. चांगलं पीक यावं म्हणून, आपली प्रजा वाढावी म्हणून ज्या देवतांची पूजा करायची त्या सुरुवातीच्या काळात तरी स्त्रीरूपात आणि स्त्रियांकडून पुजल्या जात. पुढे जेव्हा प्रजनन एकटी स्त्री करू शकत नाही तर पुरुषाचाही प्रजननक्रियेत सहभाग असावा लागतो, हे जसजसं स्पष्ट होत गेलं तसं देवतांचं स्वरूप पालटत गेलं आणि देव जन्माला आले.
हे सगळं ठीक आहे; पण तरीही देव-देवतांची आवश्यकता मानवाला पूर्वीच्या अस्थिर काळात वाटत होती ती पुढे तो स्थिरावल्यावर नष्ट का झाली नाही, हा प्रश्न उरतोच. विशेषतः विज्ञान-तंत्रज्ञानाच्या एवढ्या प्रगतीनंतर तरी देव ही संकल्पना नष्ट व्हायला हवी होती. प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. हे का ते बघण्यासाठी आपल्याला परत उत्क्रांतिवादाचा आधार घ्यावा लागतो.
कुठल्याही प्राण्याच्या टोळीत एक प्रमुख नर असतो. याला अभ्यासक 'अल्फा नर' असं म्हणतात. त्याच्या हाताखाली एक-दोन बगलबच्चे असतात. ते अल्फा नराची मर्जी सांभाळत टोळीवर हुकुमत गाजवू शकतात. यानंतर इतर सदस्य असतात ते नेत्यांचे अनुयायी असतात. त्यांना टोळीच्या व्यवस्थापनात स्थान नसतं. हुकूम ऐकणं आणि नेत्यांची मर्जी राखणं, यापलीकडे त्यांना काही करण्याची हिम्मत नसते. त्याचप्रमाणे टोळीत काही बंडखोर असतात, ते संधीची वाट पाहत असतात. काही वेळा ते थेट अल्फा नराशी झुंजतात. कधी ते संधी मिळताच काही सदस्यांना घेऊन फुटून निघतात आणि वेगळी टोळी प्रस्थापित करतात.
हे सर्व घडण्यासाठी जननिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. आनुवंशिकतेमुळे नेतृत्वगुण जसे पुढच्या पिढीत जातात, तसेच अनुयायित्वाचे गुणही पुढच्या पिढीत जातात. उत्क्रांतीच्या नियमानुसार जो गुण त्या सजीवाच्या दृष्टीने मारक असतो तो नष्ट होतो. नेतृत्वगुण जर सर्वत्र असतील तर त्या प्राणिजातीचं नुकसान होत असतं. एखाद्या आदिमानवी टोळीवर संकट कोसळलं, तर त्या वेळी नेते फक्त वाद घालत बसले तर ती टोळी नष्ट होईल. त्याऐवजी एखाद्याने झटकन निर्णय घेतला आणि अनुयायांनी तो मान्य केला तर या संकटातून वाचण्याची शक्यता वाढते. यामुळेच सर्वच प्राणिसमूहांत १० ते १५ टक्के हुकुमत गाजवणारे, ७० ते ८० टक्के मेंढरांसारखे अनुयायी आणि उरलेले बंडखोर असतात. या मधल्या लोकांची त्यांच्या नेतृत्वावर श्रद्धा असते. अशा लोकांनी कुणाचं नेतृत्व मानायचं हा त्यांचा त्यांचा खासगी प्रश्न असतो. ज्या माणसांचं अनुयायित्व यांनी स्विकारलेलं असतं त्यांच्याकडून या समस्या सुटत नाही, हे या मंडळींच्या लक्षात येतं तेव्हा ते अतिमानवी शक्तीकडे वळतात. त्या कथित शक्तीला ते देव मानतात.
ही जी मधली ७० टक्के ते ८० टक्के मंडळी असतात, त्यांचा मेंदू त्यांच्या श्रद्धेला कारणीभूत असतो. या व्यक्तींना दैनंदिन जीवनात सतत कुणाचा ना कुणाचा किंवा कशाचाही आधार पुरेसा असतो. ते घाबरट असतात. अर्थात हा घाबरटपणा व्यवहारात प्रकट होईल असं नाही. त्यांच्या नैतिकतेच्या ज्या कल्पना असतात त्यानुसार जर ते वागले असतील तर आता आपल्याला घाबरायचं कारण नाही, अशी समजूत ते करून घेतात. त्यामुळेच कृष्णकृत्यं करणारे अनेकजण व्रतवैकल्यं करताना, सत्यनारायण करताना आढळतात. आपण रोज देवाला जातो, बाबांच्या फोटोला नमस्कार करतो, तेव्हा आपण कसंही वागलं तरी चालेल असं ते मानतात. हे पूर्वापार चालत आलेलं आहे. ख्रिश्चन धर्मात जी 'कन्फेशन'ची सोय आहे ती तिचंच एक वेगळं स्वरूप आहे असं आपण म्हणू शकतो.
थोडक्यात, मानवी जडणघडणीत 'देव'या संकल्पनेचं मूळ आहे, असं म्हणता येईल. या संकल्पनेवर माणसाचा असलेला विश्वास या विषयावर अनेक अभ्यासक संशोधन करत आहेत. अलिकडे ऑक्सफर्ड विद्यापीठात या संदर्भात एक संशोधन झालं. देवावर विश्वास ठेवणं, ही मनुष्याची एक नैसर्गिक सहजप्रवृत्ती आहे, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. हा संशोधन प्रकल्प ३ वर्षे चालू होता, त्यात ५० शास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. ह्या प्रकल्पामध्ये २० वेगवेगळ्या देशातील ४० संशोधन अभ्यासांची माहिती एकत्रित करण्यात आली होती. त्यामुळं वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या धर्माच्या अनुयायांच्या मानसिक आणि सांस्कृतिक विचारांची ह्या अभ्यासात दखल घेतली गेली असं म्हणता येईल.
जस्टीन बडेंट आणि एमिली रीड बर्डेट यांच्या या संशोधनाचं फलित 'द सायन्स ऑफ चाईल्डहुड रिलिजन' या ग्रंथात प्रसिद्ध झालं आहे. या अभ्यासात पाच वर्षांखालील वयाच्या मुलांना मानसशास्त्रज्ञांनी एक प्रश्न विचारला होता. 'एखाद्या बंद डब्यात काय आहे, हे डबा न उघडता, आई बरोबर ओळखू शकेल का?' हा तो प्रश्न होता. तीन वर्षं वयाच्या जवळ जवळ सर्व मुलांनी याचं उत्तर 'आई आणि देव त्या डब्यात काय आहे ते सांगू शकतील', असं दिलं. मात्र या मुलांमध्ये चार वर्ष वयाच्या निम्म्याहून अधिक मुलांनी 'आईला तसं सांगता येणार नाही', असं उत्तर दिलं. म्हणजे एका वर्षात त्यांच्यात आईच्या जाणीवांना मर्यादा आहेत, हे कळण्याइतपत प्रगल्भता आलेली होती. याचा अर्थ, वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांना मानवी जाणीवांच्या मर्यादांची जाण येते व अतिमानवी शक्तींच्या अस्तित्वावर ती विश्वास ठेवू लागतात. देव या अतिमानवी शक्तीवर ती विश्वास ठेवू लागतात.
संभव असंभव मधून साभार
27 Apr 2025 - 1:20 pm | सनईचौघडा
अरे वा कमाल आहे नाही, ३ वर्षांच्या मुलांना देव म्हणजे कोण हे समजले. अचाट आहे.
24 Apr 2025 - 8:54 am | माईसाहेब कुरसूंदीकर
सत्ताधार्यांना नेहमी आपली जबाब्दारी झटकायची असते.समर्थक आता त्या कामाला लागलेही आहेत."जात विचारत नव्हते.धर्म विचारत होते" असे डायलॉग मारले जात आहेत.
राज्य/केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा कमी पडतेय असे कोणी म्हंटले की "४० वर्षापुर्वी असाच हल्ला झाला होता, तेव्हा तुम्ही कुठे होतात?" असे विचारले जाणार ह्याची खात्री आहे.
"इस्लाम हा भारतासाठी संकट नसेल तर त्यासाठी काही सबळ पुरावे आहेत का?
सबंध ईस्लाम हे संकट आहे ह्याचे आधी पुरावे आहेत का?कश्मीरचा ईतिहास सर्वांना माहित आहे. हल्ले तामिळनाडुतील्/महाराष्ट्रातील्/मध्यप्रदेशमधील मुस्लिमांकडुन का होत नाहीत हे ही माहित आहे.
दहशतवाद्यांना पाकिस्तानची मदत मिळते ही वस्तुस्थिती आहे.ह्यापुढे २०२९ पर्यंत पाकिस्तानशी कोणताही संबंध ठेवणार नाही अशी कड्क भूमिका केंद्र सरकार घेऊ शकेल का? तसा आग्रह सत्ताधारी पक्षाचे समर्थक धरतील का?
की आणखी महिन्याभरानी आपले/त्यांचे शिष्टमंडळाचा हेग्/पॅरिसमध्ये गळाभेट घेतानाचा फोटो पहायला मिळेल?
24 Apr 2025 - 11:34 am | मुक्त विहारि
हल्ले तामिळनाडुतील्/महाराष्ट्रातील्/मध्यप्रदेशमधील मुस्लिमांकडुन का होत नाहीत हे ही माहित आहे.
हे नक्की का?
----
खाली महाराष्ट्रातील घटना आहेत.. छापील बातमी आहे..
डोंबिवली RSS शाखा पत्थरबाजी: मनोज मुंतशिर ने जताया आक्रोश, कहा-ये सनातन धर्म की आखिरी उम्मीद, सरकार का एक्शन
https://panchjanya.com/2025/03/13/395228/bharat/maharashtra/dombivli-pat...
----
मध्य प्रदेश मधली बातमी आहे..
Mahu Violence: 7 FIR, 40 नामजद और 13 गिरफ्तार… महू हिंसा के बाद अब तक क्या-क्या हुआ?
https://www.jansatta.com/rajya/mahu-volence-riot-madhya-pradesh-india-wi...
---
‘मांसाहार और नमाज की जिद से भड़का हिंदू समाज’ : पवित्र पर्वत पर इस्लामिक कब्जे के विरुद्ध हिंदुओं का बड़ा आंदोलन
तमिलनाडु के तिरुपरनकुंद्रम मंदिर पर इस्लामिक ढांचे को लेकर विवाद गहराया। इस्लामी समूहों के अतिक्रमण प्रयासों के खिलाफ हिंदू मुन्नानी ने बड़ा आंदोलन किया। प्रशासन ने धारा 144 लगाई, लेकिन हाईकोर्ट ने हिंदुओं को प्रदर्शन की अनुमति दी। पढ़ें पूरी खबर..
https://panchjanya.com/2025/02/06/388020/bharat/tamil-nadu/tiruparankund...
---
अजून बऱ्याच छापील बातम्या आहेत, विशेषत: राजस्थान आणि पश्चिम बंगाल मधल्या...
24 Apr 2025 - 11:51 am | चंद्रसूर्यकुमार
आणि समजा सरकारने अशी कडक भूमिका केंद्र सरकारने घेतली तर डापु गँगमधील विचारवंत लोक- अरे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट बंद का केला, ज्या लोकांचे सीमेपलीकडे नातेवाईक आहेत त्यांचे काय असली लेक्चरबाजी करू लागतील आणि इथलेच यशस्वी कलाकार- माई, त्यांचे हे आणि इतर त्यांचीच तळी उचलून धरतील त्याचे काय? तुमच्यासारख्यांची डबल ढोलकी असते आणि तुम्ही दोन्ही बाजूंनी बोलतात हे काय इतरांना कळत नाहीये का?
24 Apr 2025 - 12:11 pm | मुक्त विहारि
एकदम चपखल..
24 Apr 2025 - 12:44 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्यापुढे २०२९ पर्यंत पाकिस्तानशी कोणताही संबंध ठेवणार नाही अशी कड्क भूमिका केंद्र सरकार घेऊ शकेल का?
माई, अशी देशप्रेमी भूमिका घ्यायला एक स्ट्राँग नेतृत्व लागत, सध्या असे काही होणे नाही. पाकिस्तानही सुस्तच आहे. काहीही होणार नाही, ट्विटर अकाउंट बंद करणे वाघा बॉर्डर बंद करणे (१ मी पर्यंतच, त्या नंतर चालू होणारच आहे) सिंधू जलबंद करणे हे जास्तीत जास्त १ महिना त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल.
शेवटी पाकिस्तानला दणका द्यायला भाजप म्हणजे काँग्रेस नव्हे, नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नव्हे!
24 Apr 2025 - 6:36 pm | मुक्त विहारि
असो...
आनंद आहे....
24 Apr 2025 - 11:14 am | युयुत्सु
सौ० माईसाहेब कुरसूंदीकर
धार्मिक अतिरेक हा कोणताही धर्म धोकादायक बनल्याचा सज्जड पुरावा आहे. इस्लाम या वर्णपटात "मोक्याचे स्थान" पटकावून आहे.
धार्मिक अतिरेक आर्थिक विषमतेला खतपाणी घालतो आणि नागरिक निरर्थक आणि अनुत्पादक गोष्टीवर वेळ, पैसा आणि उर्जा खर्च करतात. यावर भरपूर संशोधन आणि शिक्कामोर्तब झालेले आहे.
श्री० कानडाऊ योगेशु
<असे वैचारिक गोळ्या झाडणारे धार्मिक दहशतवादी आपल्या आजुबाजुला वावरत असताना धर्म बाळगणे ही नाईलाजाने केलेली सोय असावे असे म्हणावे लागेल.>
"धर्मोऽ रक्षति रक्षित:" या स्मृतीवचनाला बांगलादेशात छानपैकी चुना लावला गेला.
श्री० उपयोगयोजक
धर्माच्या उत्पत्तीच्या अंथ्रॉपॉलिजिकल विवेचनाबद्दल आभार! पण माझे याबाबत वाचन झालेले आहे आणि सतत चालू असते. धर्मपालन माणसाला जी सामाजिक प्रतिष्ठा देते ती कायद्याच्यापालनाने मिळाली तर सर्व जण धर्माऐवजी कायद्याची पूजा करायला सुरुवात करतील.
सुमारे चाळीस वर्षापुर्वी किशोर पाठक नावाच्या कवीची मटामध्ये एक कविता प्रसिद्ध झाली होती-
ब्रह्म्याच्या मेंदूला जखम जाहली भळभळा वाहीली लोकशाही
उभी भांबावून फिरे दारोदार स्थिर सरकार शोधावया
पायात आमुच्या धर्माची वहाण ग्रंथाना तहान पेटण्याची. इ०
सर्व कविता आता आठवत नाही. शेवटची ओळ अशी काही तरी होती-
आम्ही षंढशूर शिखंडीचे बाप मुक्याने अमाप राज्य करू!
24 Apr 2025 - 11:23 am | आग्या१९९०
त्याच काळात मंगेश पाडगावकरांची " सलाम " माझ्या पार्श्वभागावर वळ उमटवून गेली.
24 Apr 2025 - 12:26 pm | मुक्त विहारि
फार पूर्वीची घटना नाही आहे..
---
https://www.lokmat.com/national/pahalgam-terror-attack-this-is-not-the-f...
----
24 Apr 2025 - 2:36 pm | वामन देशमुख
पहलगाम हल्ला हे या आदेशाचे पाठ्यपुस्तक उदाहरण आहे.
24 Apr 2025 - 5:29 pm | मारवा
इंदिरा गांधीच्या काळाची तुलना आजच्या अत्यंत व्यामिश्र अशा आर्थिक,राजकीय, आंतरराष्ट्रीय, परिस्थतीशी करुन त्यावरून आजच्या नेतृत्वाची कसोटी लावणे यात काही तथ्य नाही.
साधी पाकिस्तान शरण आला तेव्हाची त्याची अण्वस्त्र क्षमता आणि आजची हा एकही साधा निकष लावून पाहिला तरी जे इंदिरा गांधीच्या साठी डाव्या हाताचा मळ होता ते आज किती कठीण आव्हान आहे याची कल्पना येईल.
1971 मध्ये पाकिस्तान कडे शून्य न्युक्लिअर क्षमता होती. त्यांचा anu कार्यक्रम हा मुळात 1974 च्या भारतीय अणू चाचणी नंतर पहिल्यांदा सुरू झाला. जेव्हा इंदिरा ने पराभव का तेव्हा पाकिस्तान हा अण्वस्त्रशून्य देश होता.
https://armscontrolcenter.org/countries/india-and-pakistan/
आजच्या पाकिस्तानकडे अण्वस्त्र क्षमता जगात अंदाजे 7 व्या क्रमांकावर आहे. https://www.icanw.org/nuclear_arsenals
भारत आसपासच आहे. आता असा एक वेडा शत्रू समोर आहे की ज्याच्याकडे गमावण्यासाठी फारसे काहीही नाही. आर्थिक दृष्टीने अगोदरच कंगाल. आणि ज्याने अगदी किमान जरी अण्वस्त्र वापरली तर काय नुकसान भारताचे होऊ शकते याची जपानी अनुभवावरून पूर्ण कल्पना येऊ शकते. ते तरी 1945 चे जुनाट तंत्रद्न्यान होते. आज जर त्यांनी किमान जरी प्रतिकार केला तर किती भयानक विध्वंस भारत सारख्या देशात होऊ शकतो याच कल्पना न केलेली बरी. आणि असा देश की ज्याकडे अजून बरेच potential आहे
हा केवळ एक निकष झाला बाकी वापरले तर 1971 ते 2925.मध्ये 55 वर्षे किती बदललेली आहेत सहज कळेल. जो बांगलादेश तोडला तोच आज एक शत्रू बनलेला आहे हे तर वेगळेच.
तर आजचे निर्णयकर्ते ज्या समस्येशी तोंड देत आहेत त्याचा आवाका कल्पनेपलीकडील कठीण आणि व्यामिश्र आहे. त्याची तुलना 55 वर्ष पूर्वीच्या परिस्थितीशी करणे म्हणजे अपरिपक्वते शिवाय काही नाही. ज्यात बदलत्या परिस्थितीचे भानच नाही.
बाकी सर्व मनोरंजक आहेच जसे प्र गो म्हणाले असे धागे मनोरंजक असतातच यात शंका नाही.
बाकी असो अशा धाग्या मध्ये विदा वगैरे फारसा नकोसाच असतो
म्हणून एरवी असे धागे काठावरून बघणं हाच खरा आनंद आहे.
24 Apr 2025 - 5:42 pm | अमरेंद्र बाहुबली
हेच म्हणतो, तेव्हाच्या परिस्थितीची आज तुलना होऊ शकत नाही, तेव्हाच्या नेत्यातही धमक होती. बाकी तेव्हा अणुबॉम्ब आपल्याकडेही नव्हता. असो, आपल्या नेत्यांची क्षमता लपवण्यासाठी परिस्थिती नी ब्ला ब्ला चे रटाळ सूर ऐकायची सवय झाली आहे. जाय भारत, जय इंदिरा!
24 Apr 2025 - 6:04 pm | मारवा
1. भारत no first use policy ला. वचनबद्ध आहे.
2. पाकिस्तान असे धोरण बाळगत नाही तो प्रथम प्रहार अण्वस्त्रचा करु शकतो.
3- आज पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत ती सुद्धा या वरील धोरणासहित. पाकिस्तानची अण्वस्त्र क्षमता जगात पहिल्या 10 देशांमध्ये आहे.
या वरील 3 specific facts पैकी एक सुद्धा fact 1971 च्या युद्ध दरम्यान न्हवती.
आज जो कोणी निर्णयकर्ता आहे मोदी असो व कोणी ही त्याची तुलना 1971 च्या निर्णयकर्त्याशी होऊ शकत नाही.
कारण वरील 3 specific facts
आणि हा केवळ एकच निकष बाकी fscts वर तर अजून आपण बोललोच नाहीये.
यावर काही अभावनिक प्रतिवाद असेल.तर जणू. घ्यायला आणि नवीन शिकायला मनापासून आवडेल.
बाकी एकूण असो
24 Apr 2025 - 6:43 pm | मुक्त विहारि
प्रतिसाद आवडला...
26 Apr 2025 - 7:42 am | उपयोजक
१९४५ नंतर अण्वस्त्रधारी असणार्या किती देशांनी ती अण्वस्त्रे युद्धामध्ये वापरली आहेत?
26 Apr 2025 - 10:47 am | मारवा
वरील प्रतिसाद हा कोणत्या मुद्द्याला होता ते अगोदर बघा.
1971 आणि आज 2025 या 55 वर्षांनंतर बदललेल्या पाकिस्तानशी युद्ध करण्यात आजच्या निर्णयकर्त्या सरकारला ज्या अनेक नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे त्याची तुलना 1971 च्या निर्णयकर्त्या शी करणे अप्रस्तुत अव्यवहार्य व अवास्तवादी आहे हा होता.
Black Swan event चे वैशिष्ट हेच असते की यापूर्वी ती कधीही झालेली नसते. उदा. कोरोना ही आपत्ती किंवा जपानवर झालेला अणू हल्ला.
सर्व black swan events संदर्भात सर्वात मोठी चूक ही एकमात्र असते की असे काही होऊच शकत नाही हा भ्रम किंवा अंधविश्वास.
आता तुम्ही ज्या अण्वस्त्र संदर्भात बिकट आहात ही तर bkack swan event तर सोडा प्रत्यक्ष संभावना आहे. आणि याच्या धमकीचा प्रत्यक्ष वापर होत आहे आणि ती अण्वस्त्रे काल्पनिक नसून प्रत्यक्षात आहेत.
आता जे भारतीय निर्णयकर्ते आहेत किंवा कुठलेही असो. त्यांना दोन पर्याय आहेत
1. संपूर्ण रणनीती ची आखणी असे होणारच नाही या भाबड्या गृहितकावर करणे.
2. वास्तव लक्षात घेऊनच आणि संभाव्य धोक्याची पुर्ण जाणीव ठेऊन आक्रमण अधिक बचावाची रणनीती बनवणे.
आता आजच्या निर्णयकर्त्या समोर ही कठीण आव्हाने आहेत.
26 Apr 2025 - 11:06 am | मारवा
पाकिस्तान हा कमी क्षमतेची अण्वस्त्रे वापरण्याची सुद्धा वास्तव वादी शक्ती आहेच. जिचा विचार करणे भारतीय निर्णयकर्त्या ना भाग आहे.
अमेरिके सारख्या बलाढ्य अण्वस्त्रधारी देशांना सुद्धा जिथे सतत small scale nuclear attack ची भीती सातत्याने सतावत आहे. ज्या मध्ये ते अमेरिकेवर हिरोशमत वापरलेल्या बाँब च्या दोन तृतीयांश कमी आकाराचा 10 किलोटन चा अणुबॉम्ब वापरून अमेरिकेवर हल्ला होऊ शकतो याची नुसती भीती व्यक्त करीत नाहीत तर तयार प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक उपाययोजना सुद्धा करतात त्यावा काम करतात. या मार्गाने मोठा अणू हल्ला न करता एखादे मोठे शहर target केले जाऊ शकते असे मानले जाते.
आता अमेरिका सारखा इतका बलाढ्य देश जर या ने चिंतीत आहे व उपाय योजना करत आहे
तर भारता समोर किती कठीण प्रश्न आहे याचा विचार केलेले बारा.
संदर्भ इथे आहे अजूनही देतो
https://en.m.wikipedia.org/wiki/National_Response_Scenario_Number_One
थोडक्यात ही सर्व खरीखुरी संभाव्यता आहे.
26 Apr 2025 - 10:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पाकिस्तानी चॅनेल्सवर चालु असलेल्या चर्चा बघत आहे. त्यांचा मुद्दा हाच आहे-"आम्ही भारतापेक्षा अनेक बाबतीत लहान आहोत. पण अण्वस्त्रांची भीती दाखवली तर सगळे मोठे देश मध्ये पडतील आणि भारत-पाकिस्तान दोघांनाही थांबवतील.
26 Apr 2025 - 11:18 pm | अमरेंद्र बाहुबली
माई ह्या सगळ्यात काही होणार नाहीये, जास्तीत जास्त महिनाभर, नंतर सगळे शांत होतील किंवा जनतेला चर्चेला नवीन मुद्दा दिला जाईल, सिंधू पाणी बंद केल तर रक्ताचे पाट वाहतील वगैरे धमक्या पाकी नेत्यांनी दिल्या आहेत, महिनाभराने ते नेते पाकिस्तानी जनतेला सांगतील की पहा पहा भारत आमच्या धमक्यांना घाबरला, स्वतची इमेज ते मोठी करून घेतील, मृतांना न्याय मिळणार नाहीच! तकलादू नेतृत्वाचे परिणाम देश भोगतोय.
26 Apr 2025 - 11:33 pm | आग्या१९९०
भारताने पाकिस्तानला न कळवता झेलम नदीत पाणी सोडल्याने PoK मधील नदीचे पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने तेथे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे असे पाकिस्तानातील मीडियामध्ये दाखवण्यात येत आहे. ही बातमी खरी आहे का?
24 Apr 2025 - 6:15 pm | श्रीगुरुजी
पाकिस्तानने १९७२ मधील सिमला करार रद्द केल्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. आता no first use वगैरे धोरण पाळण्याची आवश्यकता नाही.
24 Apr 2025 - 6:57 pm | मुक्त विहारि
असे असेल तर फारच उत्तम.....
24 Apr 2025 - 8:10 pm | चंद्रसूर्यकुमार
पाकिस्तानने कधी सिमला कराराचे पालन केले आहे? खरं तर पाकिस्तानने कधी कोणत्याही कराराचे प्रामाणिकपणे पालन केले आहे? त्यामुळे पाकड्यांनी सिमला करार मोडला तरी घंटा काहीही फरक पडणार नाही.
दुसरे म्हणजे वाजपेयींनी नो फर्स्ट युज हे धोरण जाहीर करून चूक केली. जर आपले बॉम्ब आपण वापरणार नसू तर ते गुळाचे गणपती करायचे काय? जर पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करेल याची शक्यता वाटली तर त्यापूर्वीच आपण 'pre-emptive strike' करायला लागेल. असो.
24 Apr 2025 - 8:43 pm | मुक्त विहारि
बहलोल खान आणि नजीब खान... (मल्हार राव होळकर यांनी, त्याची हमी घेतली होती.)
एकाने प्रताप राव यांना मारले तर एकाने तीन मराठी पिढ्या...
पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिम, यांच्यावर मी तरी विश्वास ठेवणार नाही...
29 Apr 2025 - 6:48 pm | सुबोध खरे
आम्ही "अणुबॉम्ब प्रथम वापरणार नाही" असे जाहीर केले आणि तरीही आपण तो वापरला तर कोण आपलं काय वाकडं करू शकणार आहे?
24 Apr 2025 - 8:44 pm | आग्या१९९०
दुसरे म्हणजे वाजपेयींनी नो फर्स्ट युज हे धोरण जाहीर करून चूक केली. जर आपले बॉम्ब आपण वापरणार नसू तर ते गुळाचे गणपती करायचे काय?
भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता कारण तो भारतासाठी अन्यायकारक होता. उलट भारताचा जोर आण्विक निःशस्त्रीकरणावर होता, ज्याला अण्वस्त्र सुसज्ज देश तयार नव्हते, त्यामुळे भारताने " no first use " हे धोरण अवलंबिले आणि आपला अण्वस्त्र विकास कार्यक्रम चालू ठेवला. ह्यात आपला काहीच तोटा झाला नाही.
24 Apr 2025 - 10:22 pm | मुक्त विहारि
पहलगाम जैसा हमला पुण्य; ऐसा कहने वाला शख्स कौन, जिसका वीडियो हो रहा वायरल
https://www.livehindustan.com/viral-news/pahalgam-attack-disputed-commen...
------
24 Apr 2025 - 10:32 pm | मुक्त विहारि
‘प्रोपेगेंडा वॉर चल रहा है’, पहलगाम आतंकी हमले पर भड़के शत्रुघन सिन्हा, कहा- ‘हिंदुओं हिंदुओं क्यों कह रहे हैं?’
https://www.jansatta.com/entertainment/pahalgam-terror-attack-shatrughan...
----
काय बोलावं ते सुचेना...
26 Apr 2025 - 7:48 am | उपयोजक
धाग्याचा मूळ उद्देश 'इस्लाम आणि त्याचं पालन करणारे लोक' हे भारतासाठी संकट आहेत का? हा आहे. आणि ते सबळ पुराव्यांनिशी ठरायला हवे.
26 Apr 2025 - 8:49 am | मुक्त विहारि
आणि तिथे होत असलेल्या अल्प संख्याक धर्मियांचे हाल... ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत....आता तुम्ही जर ह्याला इतिहास म्हणत असाल आणि हे दोन वेगळे देश आहेत असे समजत असाल तर.... ह्याच भारत देशातील एक उदाहरण देतो आणि त्याचे नांव आहे, संभल ....
आणि
तुम्हाला जर अजून विस्तृत माहिती हवी असेल तर खालील व्यक्तीचे व्हिडिओ जरूर बघा...
Salim Wastik ह्या व्यक्तीचे व्हिडिओ जरूर बघा... तुम्हाला भरपूर माहिती मिळेल...
https://youtu.be/l9qcA-VbLE0?si=PDNvuiPJeALI3wdx
26 Apr 2025 - 9:07 am | मुक्त विहारि
पहलगाम आतंकी हमले से दुखी शहाबुद्दीन घर वापसी कर बने श्यामलाल, बोले- 'मुझे गलती का एहसास हुआ'
https://www.jagran.com/madhya-pradesh/indore-muslim-man-in-indore-revert...
------
26 Apr 2025 - 6:42 pm | जयंत कुलकर्णी
हे पूर्वी लिहिलेले एवढ्या लवकर खरं होईल असं वाटलं नव्हतं ...-
..जब्बार अमर हा हमासचा संस्थापक होता. नुकताच इस्राएलने त्याला ठार मारले. तो काय म्हणतो ते तुम्ही ’’X'' वर पाहू शकता.
तो म्हणतो, ‘‘आम्ही ज्यूंशी लढाई ते ज्यू आहेत म्हणून करत नाही. ते हत्यारे आणि अत्याचारी झिऑनिस्ट आहेत म्हणूनही करत नाही. आम्हाला आमच्या प्रेषिताने या पृथ्वीतलावरचा प्रत्येक ज्यू नष्ट करण्याचा आदेश दिला आहे म्हणून आम्ही त्यांना ठार करणार आहोत.’’
भारतात या वाक्यातील ज्यू ‘‘ या शब्दाची जागा ‘‘हिंदू’’ हा शब्द केव्हा घेईल हे सांगता येत नाही. हे सहज शक्य आहे, कारण नाहीतर गज़वा- ए हिंद हे प्रकरण जन्माला आले नसते. त्यांच्या प्रेषिताच्या विरुद्ध वागण्याची हिंमत इस्लाम धर्मिय दाखवणार आहेत का हा खरा प्रश्र्न आहे... पण मला वाटते, की इस्लामचा पाडाव भारतातील मुसलमानच (ex-muslims) करतील आणि जगात ही चळवळ पसरेल. (At least I wish so)
- जयंत कुलकर्णी.
26 Apr 2025 - 11:52 pm | अमरेंद्र बाहुबली
आला आला सत्य घेऊन नी सरकारला प्रश्न विचारणारा ध्रुव राठीचा व्हिडिओ आला. भक्तांनी बर्नोल घेऊन पाहवा.
इनपुट्स असूनही हल्ला रोखला गेला नाहीये.
https://youtu.be/9eorW2IdK8M?si=rtCzBn4yBSH75GaG
27 Apr 2025 - 12:14 am | विअर्ड विक्स
१९७१ चे तुणतुणे आत वाजवून काही उपयोग नाही. तेव्हा भारत युद्ध जिंकला तरी तहात हरला वस्तुस्थिती आहे त्यामुळे उगाच कोणाचाही जयजयकार अंधपणे करू नये
नो फर्स्ट युज पॉलिसि हि आपल्या वैश्विक प्रतिमेस साजेशीच होती, जरी पूर्वी कबुतरे उडवली गेली तरी काश्मीर , गोवा आणि हैदराबाद अशी छोटी युद्धे आपण जिंकले होतो व त्या अति आत्मविश्वासानेच ६२ ला घात झाला. १९७१ ची खरी कहाणी जाणून घ्यायची असेल तर तू नळीवरील ७१ युद्धवीरांचे व्हिडीओ पहा. १९९९ ला आपण LOC पार न केल्याने अनेक सैनिकांचा बळी गेला , गुप्तवार्ता तेव्हासुद्धा वेळेवर मिळून कारवाई झाली नाही.
कोणतीच गोष्ट हि परिपूर्ण नसते त्यामुळे डावे उजवे , हिंदू मुस्लिम आणि हात ,कमल आणि बाण न करता सत्तारूढ सरकारला पाठिंबा देण्याचे भारतीय नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे हि विनंती.
27 Apr 2025 - 12:19 am | अमरेंद्र बाहुबली
१९७१ चे तुणतुणे आत वाजवून काही उपयोग नाही. तेव्हा भारत युद्ध जिंकला तरी तहात हरला वस्तुस्थिती आहे
ते कसे बरे?
१९९९ ला आपण LOC पार न केल्याने अनेक सैनिकांचा बळी गेला
तेव्हाही भाजपती सत्तेत होते नी आताही आहेत, भाजपेयींकडून देशप्रेमाची अपेक्षा करणे म्हणजे अतिरेक्यांकडून शांततेची अपेक्षा करणे होय.सत्तारूढ सरकारला पाठिंबा देण्याचे भारतीय नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे हि विनंती.
कशासाठी पाठिंबा द्यावा? इनपुट्स असूनही हल्ला रोखण्यात आलेल्या अपयशाबद्दल?
28 Apr 2025 - 5:38 pm | विअर्ड विक्स
१. "मुबारक हो लडका हुआ है " असे भुट्टो तहानंतर का म्हणाले होते ? शोधा म्हणजे सापडेल
२/३. "Revenge is a dish best served cold"
भाजप आणि भारत सरकार दोन वेगळ्या गोष्टी मानल्या तर गोष्टी सोप्या होतील. ९/११ नंतर अमेरिका आणि मागच्या वर्षी घडलेल्या हमसच्या हल्ल्यानंतर तेथील विरोधी पक्ष एकजुटीने पाठीशी उभे राहिले व जनताही, हीच अपेक्षा आहे .
28 Apr 2025 - 5:51 pm | मुक्त विहारि
अहो, त्यांना खूप जणांनी समजावून सांगितले, पण ते काही व्यक्तीद्वेष करणे सोडत नाहीत...
चालायचेच....
28 Apr 2025 - 6:08 pm | श्रीगुरुजी
कचरापेटीत हात घालून कचरा चिवडला तर हात अस्वच्छ होऊन दुर्गंधीयुक्त होणे एवढेच साध्य होईल.
28 Apr 2025 - 6:15 pm | मुक्त विहारि
त्यांना समजावून सांगण्यात अजून एकाची भर...
28 Apr 2025 - 7:00 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप आणि भारत सरकार दोन वेगळ्या गोष्टी मानल्या तर गोष्टी सोप्या होतील.
सहमत! सरकार जर काही करणार असेल तर आम्ही नागरिक म्हणून पाठीशी उभे राहू, पण काही नेते फक्त वाचालपणा करणार असतील तर त्यांच्या वाचाळपणाला साथ द्यायला मी अंधभक्त बनू शकत नाही.
28 Apr 2025 - 7:14 pm | मुक्त विहारि
इथे अंधभक्त कुणीही नाही...
उलट मी तर म्हणतो की, "गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे..."
बाकी,
तुमचा जर मोदींच्या विषयी द्वेष असेल तर त्या रोगाला उपाय नाही....
व्यक्तीद्वेष, फार घातक आहे. पंचतंत्र वाचले तर नक्कीच समजेल, अशी खोटी आशा...
28 Apr 2025 - 7:16 pm | मुक्त विहारि
भोपाळ येथे जे स्कँडल झाले, त्याबद्दल आपले मत काय आहे?
27 Apr 2025 - 4:55 pm | मुक्त विहारि
पहलगाम हल्ल्यानंतर व्यथित झालेल्या मुस्लिम शिक्षकाकडून इस्लाम धर्माचा त्याग, म्हणाला…
https://www.tv9marathi.com/national/bengal-muslim-teacher-hurt-by-pahalg...
------
27 Apr 2025 - 11:28 pm | अमरेंद्र बाहुबली
हिंदू झाला का?
28 Apr 2025 - 1:50 am | मुक्त विहारि
तू अजून पंचतंत्र वाचलेले दिसत नाही...
असो,
आनंद आहे...
27 Apr 2025 - 11:42 pm | आग्या१९९०
धर्म सोडल्याची सरकार दरबारी नोंद करावी लागते का?
28 Apr 2025 - 12:10 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्प तात्या पंतप्रधानांचे मित्र नसुन व्यापारी आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
"I am very close to India and I'm very close to Pakistan, and they've had that fight for a thousand years in Kashmir. Kashmir has been going on for a thousand years, probably longer than that. That was a bad
म्हणजे अमेरिकेच्या नजरेतून भारत आणि पाकिस्तान सारखेच. शस्त्रे दोन्ही देशांना विकायची असतात हे मान्य पण भारतातही तात्यांचे खूप समर्थक आहेत ह्याची तात्यांनी आठवण करून द्यायला हवी.
https://www.livemint.com/auto-news/donald-trumps-remark-on-india-pakista...
28 Apr 2025 - 12:27 am | आग्या१९९०
ट्रम्प तात्या आणि पंतप्रधानांचा १५०० वर्ष जुना दोस्ताना आहे. एक धूर्त तर दुसरा झोला व्यापारी.
28 Apr 2025 - 8:45 am | माईसाहेब कुरसूंदीकर
बोलताना ट्रम्प अतिशयोक्ती अनेकवेळा करतात. कश्मिरप्रश्नाला ते 'हजार वर्षे जुना प्रश्न' म्हणत खिल्ली उडवतात. ट्रम्प निवडुन आल्याने अनेकांना दु:ख झाले आहे. पण आम्हाला नाही. असे विधान एस. जयशंकर ह्यांनी केले होते.
28 Apr 2025 - 8:51 am | आग्या१९९०
कोणत्या तोंडानी सांगतील?
28 Apr 2025 - 4:03 pm | Bhakti
सध्या सोमिवर इस्लाम धर्मातील बदलांसाठी सर्व आपापल्या परीने चर्चा करत आहे.ही विचारांची घुसळण महाराष्ट्रातच होऊ शकते.अनेक जण म्हणतात आम्हाला ही चर्चा पाहून हसू येतं,त्यांना म्हणावं वाटतं ही ही अभिव्यक्ती हे तुम्ही यावेळी विसरला वाटतं.
असो
आर्थिक बंदी, धर्मस्थळे या गोष्टी फूटच पाडणार.पण विचारसरणीवरच घाव घालत राहिलात तर नक्की फायदा होणार.
अगदी,३ रा उपाय काफीर',काफीरांना मारा हे डोक्यातून काढण्यासाठी धार्मिक शिक्षणात बदल करणं गरजेचे आहे.निदान भारतीय मुसलमान संतांचा अभ्यास यांनी करावा यासाठी चळवळ हवी.माझ्यासारखे सहिष्णू लोक अजूनही पसायदानच मागणार..
मी सध्या 'गर्जा महाराष्ट्र 'हे खुपच सुंदर, अभ्यासपूर्ण पुस्तक वाचत आहे.त्यात भागवत(वेदोक्त प्रकरणातील)यांनी हा धर्मांध फुटीविषयी एक उपाय सांगितला त्यास भागवत सकलवाद म्हणतात.
*****
ही दिशा दुसरी-तिसरी कोणती नसून अर्थातच जिच्यामुळे हिंदू-मुसलमानांमधील फूट आणि एकंदरीत हिंदूंच्या आणि मराठी हिंदूंच्या पोटभेदामधील फुटी कमी होऊन महाराष्ट्र देशातील ऐक्य वाढणे हीच होय. हाच भागवतांचा सकलवाद.
ही फूट कमी करून ऐक्य वाढवण्याचा भागवती मार्ग म्हणजे शिक्षण. भागवतांच्या शिक्षणात धर्मशिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. भागवतांचे धर्मशिक्षण हे वेदांचे नाही, संस्कृतातूनही नाही. ते आहे मराठीतून आणि संतांच्या 'भक्तिपर सरस्वतीचे.' या संतांमध्ये ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम, चोखामेळा, शेख महंमद यांचा समावेश आहे. "जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ॥ असले तुकारामाचे अभंग मुसलमानांसही शिकवता येतात."
असल्या शिक्षणास भागवतांच्या मते तीन किंवा चार वर्षे बस झाली.
"ज्या शाळा अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात येतील, त्या शाळांस 'शिवाजी शाळा' असे नाव देण्यात यावे आणि जो फंड जमविण्यात येईल त्यासाठी 'शिवाजी फंड' नाव द्यावे. ज्याची जन्मभाषा मराठी असेल त्यास हे शिक्षण तीन किंवा चार वर्षे फुकट मिळाले. जो कोणी आपला मुलगा पाठवणार नाही, त्यास शिक्षा मिळण्याचा कायदा सरकारकडून पसार करून घ्यावा, पांढरपेश्यांच्याही मुलांकडून फी घेऊ नये, तर दर माणसी प्रत्येक वर्षी त्यांनी 'शिवाजीची पट्टी' इतकी घ्यावी असा म्युनिसीपालटीने नियम ठेवावा. असे केल्याने खालचे शिक्षण एकंदरीत लोकांच्या हाती येईल आणि शिवाजीचे नाव सर्वतोपरी गाजेल. इतकेच नव्हे तर लोकास भक्तीचा मार्ग दाखवण्यासारखा होऊन संत मंडळींचीही आठवण जागती राहील,"
***
28 Apr 2025 - 4:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"असले तुकारामाचे अभंग मुसलमानांसही शिकवता येतात."
मान्य आहे पण हे सगळे कश्मिरी लोकांना कोण शिकवणार?सर्वधर्म समभावाचे धडे हिंदु-मुस्लिम दोघांनीही गिरवले पाहिजेत. सेक्युलर असणे आजच्या काळात चेष्टेचा विषय झाला आहे. काफीरांना मारा हे डोक्यातुन गेलेच पाहिजे आणि सगळे मुस्लिम वाईट आहेत. त्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे. हेही डोक्यातून गेले पाहिजे.
28 Apr 2025 - 4:56 pm | मुक्त विहारि
१९४७ पासून हिंदूंनी उदारमतवादी भूमिका घेतली आहे आणि त्याचे परिणाम..
१. नुह हिंसाचार
२. संदेशाखाली
३. संभल
४. लव जिहाद
५. राजस्थान, अजमेर, काश्मीर, पश्चिम बंगाल आणि केरळ मधील घटना...
आता गंमत अशी आहे की, किती मुस्लिम संघटनांनी वरील गोष्टींचा विरोध केला? किंवा किती मुस्लिम मोर्चे निघाले?
आज देखील, पहलगाम मधील धार्मिक हल्ल्या नंतर काही मुस्लिम जनतेने, पाकिस्तानचे झेंडे जाळायला विरोध केला.
ओवेसी सारखा नेता, भर सभेत, गैर मुस्लिम जनतेला ठार मारायची धमकी देतो. त्या विरोधात किती मुस्लिम संघटना उतरल्या किंवा किती मुस्लिम जनतेने विरोध केला?
माई, प्रत्येक मुस्लिम पाकिस्तानी नसतो आणि प्रत्येक मुस्लिम गैरमुस्लिम स्त्रियांचा आदर करतो आणि प्रत्येक मुस्लिम "एक राष्ट्र आणि एक राष्ट्रीय कायदा" ह्यावर विश्वास ठेवतो आणि प्रत्येक मुस्लिम इतर राष्ट्रांच्या मुस्लिम जनतेला थारा देणार नाही, हे सिद्ध करायची जबाबदारी आता सामान्य मुस्लिम जनतेची आहे. असे तुला वाटत नाही का?
28 Apr 2025 - 6:36 pm | मुक्त विहारि
’29वां नंबर तेरा होगा…देशभक्ति ट्रेन में मत दिखा’, पहलगाम हमले की रील्स देख रहे युवक को पीटा
https://www.patrika.com/indore-news/mp-news-29th-number-will-be-yours-do...
-----
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. अफवा नाही...
---
28 Apr 2025 - 7:42 pm | मुक्त विहारि
बजरंग दल के कार्यकर्ताओं ने जलाया पाकिस्तानी झंडा तो भिड़े अल्पसंख्यक समुदाय के लोग- Video
https://www.aajtak.in/india/maharashtra/story/bajrang-dal-burnt-flags-of...
-----
29 Apr 2025 - 11:57 am | चौथा कोनाडा
धाग्याचे काश्मिर होणे हा वाकप्रचार वाचण्यात आला होता ... आता धाग्याचे पहलगाम होणे ....
29 Apr 2025 - 2:30 pm | मुक्त विहारि
माझा भाऊ धर्मयोद्धा, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याच्या बहिणीने गरळ ओकली, पोलिसांनी 20 लाखांचे...
https://marathi.indiatimes.com/india-news/my-brother-is-mujahideen-says-...
....... पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या एका दहशतवाद्याच्या बहिणीने माझा भाऊ मुजाहिदीन (धर्मयोद्धा) आहे, अशी दर्पोक्ती केली. या दहशतवाद्याचे घर शुक्रवारी पाडण्यात आले.....
-----
1 May 2025 - 11:05 am | मुक्त विहारि
पहलगाम आतंकी हमले से आहत मुस्लिम लड़की ने की घर वापसी, अपनाया सनातन धर्म
https://panchjanya.com/2025/04/30/404660/bharat/uttar-pradesh/ghar-wapsi...
---
"गाजियाबाद की एक मुस्लिम युवती ने कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले से आहत होकर सनातन धर्म अपनाने का निर्णय लिया है। इस निर्णय के पीछे उसका कहना है कि अब वह खुद को मुस्लिम धर्म से जुड़ी हिंसा और कट्टरता से अलग करना चाहती है। हिंदू रक्षा दल की मदद से युवती ने विधिवत धार्मिक अनुष्ठानों के साथ हिंदू धर्म अपना लिया।"