ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
31 Aug 2022 - 8:39 am

रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.

अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.

ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.

अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.

त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2022 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, बरं झालं गुरुजी फ्रेश धागा सुरु केला. त्या व्हिडीयो लिंकाळ्या धाग्यात जीव गुदमरायला लागला होता. बाय द वे, सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! :)

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

31 Aug 2022 - 9:55 am | मदनबाण

सर्व मिपाकर मंडळी आणि वाचकांना श्रीगणेश चतुर्थी आणि श्रीगणेश उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! :)
बाप्पाच्या आशिर्वादाने आपल्या सगळ्यांच्या विघ्नांचा नाश होवो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभुन सर्व कार्यात यश प्राप्त होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी करतो. _/\_

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover

वामन देशमुख's picture

31 Aug 2022 - 10:33 am | वामन देशमुख

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.

ॐ शांती.

जेम्स वांड's picture

31 Aug 2022 - 10:33 am | जेम्स वांड

पेरेत्राईका

पेरेस्त्रोईका , म्हणजेच पुनर्बांधणी -

री - कन्स्ट्रक्शन

मिखाईल गोर्बाचेव्ह ह्यांना श्रद्धांजली.

##################

.

आपणा सगळ्यांना गणेशोत्सव पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा, बाप्पा कायम आपल्यासोबत राहो हीच प्रार्थना

हॅप्पी बर्थ डे टू यू मिसळपाव.

मदनबाण's picture

31 Aug 2022 - 11:01 am | मदनबाण

आत्ता पर्यंतचा इतिहास पाहिल्यास हिंदूंचे अपार रक्त सांडुन त्यांच्या स्त्रीयां ची भयंकर विटंबना करुन धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानने आपल्याला सातत्याने रक्तबंबाळ केले, कॉपीवुडला छुपा पतपुरवठा करुन हिंदू विरोधी, देश विरोधी चित्रपटांद्वारे वैचारिक आतंकवाद पोसला. अनेक वेळा देशभर बॉम्ब स्फोट घडवुन आणले,कारगिल आणि पुलवामा सारखे अमानुष हल्ले करुन आपल्या जवानांना क्रुरपणे ठार केले. सातत्याने त्यांच्या देशातील अल्पसंख्यक हिंदूंची या देशात हत्या केली जाते आणि हिंदू मुलींना पळवुन नेऊन एक तर जबरदस्तीने धर्म परिवर्तन करुन लग्न लावले जाते किंवा त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांची अमानुषपणे हत्या केली जाते. हे आपले शत्रु राष्ट्र असुन चीन सारख्या मुख्य शत्रुराष्ट्रा बरोबर या देशाची घनिष्ठ मैत्री आहे, ती आपल्या देशाला हानी पोहचवण्यासाठीच केलेली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
हाच पाकिस्ताना आत्ता पुर परिस्थीतीने ग्रस्त झाला असुन आपल्याकडे मदतीची याचना करण्या पर्यंत त्यांची स्थिती बिकट झालेली आहे. आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी पाकिस्तानच्या सध्य स्थितीवर एक ट्विट केले आहे, ते खालील प्रमाणे आहे :-

मला मोदीजींना सांगायचे आहे... ट्विट केले हेच जास्त झाले आहे, मदतीची भीक या कृतघ्न देशास आता तरी घालु नका ! कारगिल मधील त्यांनी पकडलेल्या आपल्या जवानांचे डोळे फोडणारा, त्यांच्या कानात तापलेल्या सळ्या घालणारा, त्यांचे नाक,जीभ आणि कान कापणारा, त्यांचे जनन इंद्रिय कापणारा हाच जिहादी साप आहे, त्याला दूध पाजण्याचे पाप करु नका !

दर वर्षी दिवाळीत आपल्या जवानांना ठार करुन त्यांना शवपेट्यात घरी पाठवणारा हाच देश आहे याचा कोणाला विसर पडु शकतो का ? आपल्या देशातील लोकांचा या आतंकावादाचे जागतिक केंद्र असणार्‍या नीच देशाला कोणतीही मदत करण्यास मोठा विरोध आहे, तेव्हा जनभावनेच्या विरोधात जाऊन नापाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे पाप करु नका ! अमानविय अत्याचार करणार्‍या या देशास मानविययतेचा विचार करुन मदत करण्यास माझ्या सकट देशातील सर्व नागरिकांचा प्रखर विरोध आहे आणि तो कायम तसाच असेल.
जय हिंद !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover

वामन देशमुख's picture

31 Aug 2022 - 11:43 am | वामन देशमुख

अमानविय अत्याचार करणार्‍या या देशास मानविययतेचा विचार करुन मदत करण्यास माझ्या सकट देशातील सर्व नागरिकांचा प्रखर विरोध आहे आणि तो कायम तसाच असेल.

संपूर्ण सहमती

जय हिंद !

त्यामुळे, पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांना, कुठल्याही प्रकारची मदत करायची, माझी तरी इच्छा नाही ...

जेम्स वांड's picture

31 Aug 2022 - 11:18 am | जेम्स वांड

पाकिस्तानी डीप स्टेटची पापं पाकिस्तानी जनतेच्या माथी मारू नयेत.

उलट हा मोका वापरून उत्तम सायकॉलॉजीकल वॉरफेर राबवला जाऊ शकतो,

जगात आपली प्रतिमा धुवून घेण्याचा आणि पाकिस्तानी जनतेत पाकिस्तानी डीप स्टेट विरुद्ध मत पेरून पुढेमागे पाकिस्तान अंतर्गत अस्थिरतेकडे ढकलून "इम्प्लोड" करण्याचा हा उत्तम पर्याय असेल असे वाटते.

बाकी राज्यकर्ते जाणोत.

प्रत्येक गोष्टीला द्वेषमूलक उत्तर नसते, आपत्तीला इष्टापत्ती बनवून घेणारेच जगात पुढं जाणार हे सत्य आहे

उदाहरणे पण तीच आहेत,

दिवस रात्र इस्लामिक दहशतवाद, आजूबाजूला फक्त इस्लामिक शत्रुदेश असूनही शेतीवाडी करून रग्गड सुगी पिकविणाऱ्या इस्राएलने आपले वाढीव शेती उत्पादन पार सौदी वगैरेंना पण एक्सपोर्ट करणे कधीच थांबवले नव्हते, इम्पोर्टेड फ्रॉम इस्राएल स्टिकर न लावता खाडी देश सुद्धा हा माल बिनधोक आयात करत असत/ करतात.

त्यामुळे फुकट भावनिक उमाळे काढणे मला तरी अव्यवहार्य वाटते.

पाकिस्तानी डीप स्टेटची पापं पाकिस्तानी जनतेच्या माथी मारू नयेत.

पुरोगामी लोकांचा नेहमीचा युक्तीवाद.
त्या जनतेचे हिंदु लोकांच्या बद्दल काय मते आहेत ती बघा. अर्थात काही लोक हिंदुवर अत्याचार झाले की गप्प बसतात.
ते डिप स्टेट नसले तरी त्यांना हिंदु काफिर किंवा धिम्मी आहेत.

प्रत्येक गोष्टीला द्वेषमूलक उत्तर नसते, आपत्तीला इष्टापत्ती बनवून घेणारेच जगात पुढं जाणार हे सत्य आहे

हे म्हणजे मी शाकाहरी आहे म्हणुन मला वाघ खाणार नाही त्या पध्दतीचा युक्तीवाद झाला.

जगात आपली प्रतिमा धुवून घेण्याचा आणि पाकिस्तानी जनतेत पाकिस्तानी डीप स्टेट विरुद्ध मत पेरून पुढेमागे पाकिस्तान अंतर्गत अस्थिरतेकडे ढकलून "इम्प्लोड" करण्याचा हा उत्तम पर्याय असेल असे वाटते.

पाकीस्तान अस्थिर करण्यापेक्षा, त्याला कर्जबाजारी किंवा मोठ्या संकटात ढकलुन पुर्ण जम्मु आणि काश्मिर राज्य (गिल्गिट बाल्टिस्तान सकट) कसे ताब्यात येईल हे बघितले पाहिजे.
अफगाणिस्तान आणि वरती रशियाकडे जायचे मार्ग उपलब्ध होणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

जेम्स वांड's picture

31 Aug 2022 - 12:36 pm | जेम्स वांड

पाकीस्तान अस्थिर करण्यापेक्षा, त्याला कर्जबाजारी किंवा मोठ्या संकटात ढकलुन पुर्ण जम्मु आणि काश्मिर राज्य (गिल्गिट बाल्टिस्तान सकट) कसे ताब्यात येईल हे बघितले पाहिजे.

ह्याला अस्थिर करणे नाही तर अजून काय म्हणायचं ?

पुरोगामी लोकांचा नेहमीचा युक्तीवाद.
त्या जनतेचे हिंदु लोकांच्या बद्दल काय मते आहेत ती बघा.

दाखवा की, ती पण बघू, पॉइंट फक्त मला लिबरल म्हणून तळतळाट द्यायचे असल्यास तेवढं असू देत मग. बाकी लिबरल असण्याची लाज मला नाही, पण लिबरल आहे म्हणून अँटी हिंदू बोलेनच मी, ही तुमची सोयीस्कर मांडणीही मला माझ्यापुरतं मंजूर नाही. तर्काला तर्क द्या, मजा येईल काही नवीन शिकायला समजून घ्यायला, उगाच ह्यांचा हाच प्रतिवाद त्यांचा तोच प्रतिसाद असणार वगैरे नाक मुरडणे इंटरेस्ट असल्यास आमचा सविनय पास.

हे म्हणजे मी शाकाहरी आहे म्हणुन मला वाघ खाणार नाही त्या पध्दतीचा युक्तीवाद झाला.

आपत्तीत संधी शोधण्याला जर आपण नेभळट पेंट करत असाल तर तो आपला वैयक्तिक चॉईस आहे पण "वीर भोग्या वसुंधरा" जगायचे असेल तर "साम दाम दंड आणि भेद" असे सगळे वापरावे, खासकरून पाकिस्तानवर तर जास्तच...

पटलं तर बघा, नाहीतर द्या सोडून :)

ह्याला अस्थिर करणे नाही तर अजून काय म्हणायचं ?

अर्थात तुम्ही पाकिस्थान म्हणजे काय समजता त्यावर अवलंबुन आहे. हेतुतः जम्मु आणि काश्मिर राज्य (गिल्गिट बाल्टिस्तान सकट) हे पाकिस्तानचा कायदेशीर भाग नाही. त्यामुळे माझी प्रतिक्रिया सिंधुदेश, बलुचीस्थान इ. प्रादेशिक भागांशी संबधित आहे. उत्तरेकडे जायचा मार्ग मोकळा होणे भारतासाठी महत्वाचे आहे.
पाकिस्तानचे बलस्थान त्यांचे सैन्य, किंवा आण्विक आयुधे नसुन माथेफिरु लोक त्यांच्या रिलिजनसाठी काहीही करायला तयार असलेले लोक आहेत.
जरी उद्या पाकिस्तानने भारतात सामील होण्याची तयारी दाखवली तरी शाहणे भारतीय तयार होतील असे वाटत नाही.

दाखवा की, ती पण बघू, पॉइंट फक्त मला लिबरल म्हणून तळतळाट द्यायचे असल्यास तेवढं असू देत मग. बाकी लिबरल असण्याची लाज मला नाही, पण लिबरल आहे म्हणून अँटी हिंदू बोलेनच मी,

बोला बिनधास्त हिंदु धर्माविरुध्द, पुर्ण पाठिंबा आहे. न तर आमचा हिंदु धर्म इतका लेचापेचा आहे जो टिकेला घाबरेल. पण कधीतरी इतर रिलीजनबद्दल ही बोला.
तथाकथित पुरोगामी लोकांची तिथे त त प प होते. हा मुळ मुद्द्याला उत्तर द्या. जेव्हा तुम्ही हा दुजाभाव बंद कराल तेव्हा मजा येईल. नाहीतर तुमच्याबरोबर चर्चा म्हणजे भाकड गायीचे दुध काढण्यासारखे आहे.
---

आपत्तीत संधी शोधण्याला जर आपण नेभळट पेंट करत असाल तर तो आपला वैयक्तिक चॉईस आहे पण "वीर भोग्या वसुंधरा" जगायचे असेल तर "साम दाम दंड आणि भेद" असे सगळे वापरावे, खासकरून पाकिस्तानवर तर जास्तच...

दिखाव्यापुरते पाकिस्तानला मदत करायला किंवा मदतीचे नाटक करायला काही हरकत नाही.

जेम्स वांड's picture

31 Aug 2022 - 3:14 pm | जेम्स वांड

हा मुळ मुद्द्याला उत्तर द्या. जेव्हा तुम्ही हा दुजाभाव बंद कराल तेव्हा मजा येईल. नाहीतर तुमच्याबरोबर चर्चा म्हणजे भाकड गायीचे दुध काढण्यासारखे आहे.

नक्कीच साहेब, यथाशक्ती, यथायोग्य ठिकाणी मी मला जे बोलायचे आहे ते सुस्पष्ट बोलेन ह्याची खात्री बाळगा, फक्त तेव्हा नीरक्षिर विवेकाने वाचाल ही अपेक्षा.

कारण कोण लिहितं आहे ह्यापेक्षा काय लिहिलं आहे ह्याला प्रामाणिक प्रतिसाद असतील माझे तरी.

:)

चष्मेबद्दूर's picture

17 Sep 2022 - 7:05 pm | चष्मेबद्दूर

.

वामन देशमुख's picture

31 Aug 2022 - 11:41 am | वामन देशमुख

'
हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आगमनानिमित्त मिपाकरांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

---

मराठी आंतरजाल विश्वाचा मानबिंदू असलेल्या मिसळपाव.कॉमच्या वर्धापनदिनानिमित्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा!

- मिपाकर गणेशभक्त
वामन
'

गोर्बाचेव हे एक असे नेते होते ज्यांच्यामुळे जगाचा इतिहासच नव्हे तर भूगोलही बदलला.

जेम्स वांड's picture

1 Sep 2022 - 10:00 am | जेम्स वांड

बीएमसी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे का मुंबईत ?

बेस्ट बस थांब्यावर बहुसंख्य ठिकाणी आज हे पोस्टर पाहायला मिळाले

.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 4:04 pm | श्रीगुरुजी

एकूण १५ महापालिकांची मुदत संपली आहे. त्यातील ८ भाजपकडे व ४ सेनेकडे होत्या. आपण या महापालिका हरणार हे दोन्ही पक्षांना माहिती असल्याने दोघेही निवडणूक न घेता पुढे ढकलत आहेत. पुढील २ वर्षे निवडणूक होण्याची शक्यता नाही.

जेम्स वांड's picture

1 Sep 2022 - 4:23 pm | जेम्स वांड

उद्या गृहमंत्री अमित शहा पण येतायत मुंबईत. प्रयोजन काही कळले नाही, मीडिया म्हणतोय की बी.एम.सी. निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याचा चान्स आहे. अर्थात मीडिया वर गुर्जींचा भरवसा नाही म्हणा ते एक असो.

वरील बॅनरचे प्रयोजन पण कळले नाही मला, भाजपला स्वतःची हिंदुहितवादी भूमिका इतकी ओवर द टॉप मांडण्याची काय गरज पडली असेल ? ते पण optics त्यांनी पार राममंदिर मुद्दा निकालात काढून मंदिर निर्माण धसास लावल्याचे असताना ? ते ज्ञानवापी मस्जिदचे काय झाले पुढे ? हिंदूंना ऑप्शन नाही दुसरा पक्ष हे कैक लोक मानतात (मिपावर पण त्या अनुषंगाने बहुसंख्य प्रतिसाद सापडतात)

कपिलमुनी's picture

2 Sep 2022 - 11:30 am | कपिलमुनी

आपले सी एम शिंदे साहेब कुठे आहेत ?
सरकार मध्ये ते पण आहेत ना ?

जेम्स वांड's picture

2 Sep 2022 - 11:50 am | जेम्स वांड

पण पोस्टर मुंबई भाजपने छपाई करून बेस्ट थांब्याचे पैसे भरून लावले आहेत त्यामुळे त्याच्यात महाराष्ट्राचे सीएम असेल तरी शिंदेंना ठेवायचे धर्मदाय भाजप करेल असे वाटत नाही मला तरी.

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2022 - 12:02 pm | श्रीगुरुजी

शिंदे मुख्यमंत्री असले तरी भाजपचे नेते व फडणवीस तसे मानतात का?

शाम भागवत's picture

2 Sep 2022 - 1:33 pm | शाम भागवत

जोपर्यंत मोदी शहा हे शिंदेंच्या मागे उभे आहेत तोपर्यंत मानावेच लागेल. फडणवीस तर माननाणरच. त्यांचेचमुळे शिंदेसाहेब मोदी-शहांपर्यंत पोहचू शकले आहेत. शिंदेसारखा एक चांगला माणूस मिळालाय तो मोदी-शहा गमावणार नाहीत असे वाटते.

१५ वर्षे भाजपा विरोधात असताना भाजपाची लोकं उघडपणे म्हणत असत की, भाजपा सत्तेत येऊ शकत नाही. भाजपा स्वतःचा फायदा करू शकत नाही. यास्तव स्वतःचा तरी फायदा करून घ्यावा. तेव्हां भाजपाची लोकं तोडपाणी करण्यात धन्यता मानत असत. जे कर्तृत्ववान भाजपा नेते होते त्यात फडवीस हे एकमेव अपवाद होते. स्वच्छ नेतृत्वाची ही त्यांची छबी १९९५ पासून आहे. त्यांचे वडीलही तसेच होते व त्यांच्या काकूही तशाच होत्या.

"माझा आमदारकीचा पगार, माझ्या बायकोचा पगार आणि शेतीतील उत्पन्न यातूनच मी माझी संपत्ती मिळवली आहे." असे फडणवीस म्हणतात. भाजपातील असे किती जण म्हणू शकतील? आणि जे म्हणू शकतील ते फडणवीसांइतके कर्तृत्ववान आहेत का? ते तपासायला लागेल.
शेवटी मला काय वाटते ते महत्वाचे नाही. तर मोदींना फडणवीस भरवशाचे का वाटतात त्याचे कारण मी वर स्पष्ट केले आहे. मात्र शिंदेंच्या रूपाने अजित पवार, जयंतराव व आव्हाड यांचेसारखेंवर ताबा ठेऊ शकणारे व उठा यांना शह देऊ शकणारे शिंदे यांचा उपयोग मोदी-शहा करून घेणार हे नक्की.

मात्र माझे वरील विवेचन समजून घेण्यासाठी भाजपा प्रेम बाजूला ठेऊन महाराष्ट्राचे भले कशाने होईल या विचारात राजकारणाकडे बघता आले पाहिजे.
असो.

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2022 - 1:58 pm | श्रीगुरुजी

हहपुवा

शाम भागवत's picture

2 Sep 2022 - 1:59 pm | शाम भागवत

:)

जेम्स वांड's picture

1 Sep 2022 - 10:08 am | जेम्स वांड

चिनुक हेलिकॉप्टर संबंधी ही बातमी वाचली

भारताने हे पांढरे हत्ती पोसायला कश्याला घेतले असतील हेच मला कळत नाहीये अजूनही, युएसची डिझाईन फिलॉसॉफी वेगळी आहे राव, चिनुक ज्या रोलमधील हेलिकॉप्टर आहे त्याची भारताला गरज काय तेच कळेनासे होते आहे मला तरी अजूनही.

निनाद's picture

2 Sep 2022 - 5:34 am | निनाद

खबरदारीचा उपाय म्हणून चिनूक हेलिकॉप्टर ग्राउंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समस्या हनीवेल इंटरनॅशनल इंक द्वारा निर्मित इंजिनची आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की इंजिनचे काही घटक ओ-रिंग डिझाइन वैशिष्ट्यांनुसार नव्हते. ही भारतात असलेल्या चिनूक हेलिकॉप्टरच्या इंजिनात नसतीलही.

भारताने हे पांढरे हत्ती पोसायला कश्याला घेतले असतील हेच मला कळत नाहीये

चिनूक एक multi-role, vertical-lift प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर सैन्य, तोफखाना, उपकरणे आणि इंधन वाहतूक करण्यासाठी केला जातो . हे आपत्ती निवारण कार्यांसाठी आणि मदत पुरवठा वाहतूक आणि निर्वासितांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर यासारख्या मोहिमांमध्ये देखील वापरले जाते.
चिनूकमध्ये माल चढवण्याची अनेक साधने आहेत ज्यात फ्यूजलेजमध्ये अनेक दरवाजे, फ्यूजलेजच्या मागील बाजूस असलेला एक विस्तृत लोडिंग रॅम्प आणि अंडरस्लंग लोड वाहून नेण्यासाठी तीन बाह्य हुक आहेत.

फक्त ३ क्रू वापरून हे उडते. वापरून पक्के अनुभव असलेले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे हा पांढरा हत्ती मला तरी दिसत नाही.
आपल्याकडे हिमालयात हे चिनूक प्रामुख्याने वापरात आहेत. त्यात नेमक्या ठिकाणी तोफखाना वेगाने हलवणे हा मोठा फायदा दिसतो.
आता आपण सिकोर्स्की CH-37 मोजावे पण घ्यायला हवे असे वाटते. किंवा multi-role, vertical-lift प्लॅटफॉर्म भारताने तयार करावे असे ही वाटते.

जेम्स वांड's picture

2 Sep 2022 - 6:30 am | जेम्स वांड

आपल्याकडे हिमालयात हे चिनूक प्रामुख्याने वापरात आहेत.

Are you sure ? चिनूकची सर्व्हिस सीलिंग काय आहे ?? हिमालयाच्या विरळ वातावरणात डबल रोटर इंजिन कार्यक्षमता किती अन् कशी बदलते ह्यावर काहीतरी सांगा सर....

चिनूकमध्ये माल चढवण्याची अनेक साधने आहेत ज्यात फ्यूजलेजमध्ये अनेक दरवाजे, फ्यूजलेजच्या मागील बाजूस असलेला एक विस्तृत लोडिंग रॅम्प आणि अंडरस्लंग लोड वाहून नेण्यासाठी तीन बाह्य हुक आहेत.

हे तर मी पण वाचले विकिपीडियावर, त्याच्या पुढे जाऊन अजून काही fact आहेत.

.

हा चिनूकचा performance.

.

ही सर्व्हिस सिलिंगची परिभाषा

.

क्रमांक ६, चिनूकने सेट केलेले आजवरचे एल्टीट्युड रेकॉर्ड. (प्रॅक्टिकल फ्लाइंग कंडीशन मधील)

त्यामुळे चिनूक हिमालयन हाईट्स वर किती परिणामकारक असेल ह्याबाबत मी अजूनही साशंक आहे.

अर्थात तुम्ही aviation expert असल्यास मला कल्पना नाही, त्यामुळे माझे काही चुकत असल्यास नक्की दुरुस्त करा.

गवि शेठ ह्यांचे मत इथे यावे अशी विनंती करतो, मला वाटतं प्रोफेशनल विमानशास्त्र जाणणारे ते आहेत एक आपल्यात.

सुबोध खरे's picture

2 Sep 2022 - 10:21 am | सुबोध खरे

सर्व्हिस सिलिंग हे एक मानक आहे.

हे आपल्याला कोणत्याही वातावरणात जास्तीत जास्त वजन घेऊन जास्तीत जास्त किती उंचीवर सुरक्षितपणे १२ महिने उडता येईल याचा एक अंदाज दिलेला असतो.

उदा. मिग २५ चे सर्व्हिस सिलिंग ८० हजार फूट आहे पण रशियन वैमानिकाने ते सव्वा लाख फुटावर क्षितीजाच्या पार उडवून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
चेतक /चित्ता या हेलिकॉप्टर चे सर्व्हिस सिलिंग १०५०० फूट आहे पण ती सर्रास १२ ते १५ हजार फूट सियाचेन बेस कॅम्प पासून ते उंचावरच्या ठाणी येथे उड्डाणे करत आली आहेत.

tandem contra rotating twin rotars चा फायदा असा आहे कि एकाच मोठा मुख्य पंखा असेल तर त्याची लांबी फारच जास्त असावी लागते आणि त्या पंख्यामुळे हेलिकॉप्टर गोल फिरू नये म्हणून शेपटीवर एक दुय्यम पंख बसवावा लागतो आणि या दोन्ही पंख्यात अंतर ठेवावे लागते कारण हे काटकोनात फिरत असतात.

हा प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने चिनुक मध्ये दोन पंखे एक पुढे आणि एक मागे बसवले तर रशियाने कामोव्ह हेलिकॉप्टर मध्ये एकाच अक्षावर एक घड्याळाच्या दिशेने आणि एक घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरणारे पंखे बसवले. यामुळे या दोन्ही हेलिकॉप्टरचा आकार बराच कमी झाला

भारताने मि २६ आणि मि १७ या रशियन हेलिकॉप्टर्स च्या मधल्या आकाराचे पण अधिक जलदगतीने काम करणारे आणि भरवशाचे म्हणून चिनूक हे हेलिकॉप्टर विकत घेतले आहे.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस रशियाची एकंदर स्थिती फारशी चांगली नव्हती यामुळे रशियाकडून घेतलेल्या हेलिकॉप्टरचे सुटे भाग मिळणे सुद्धा कठीण झाले होते. एकंदर या हेलिकॉप्टरची विश्वसनीयता कमी होत चालली होती अशा वेळेस कमी आकाराचे पण जास्त चपळ आणि दऱ्याखोऱ्यात जास्त उत्तम तर्हेने नेता येण्यासाठी भारताने चिनूकची निवड केली.

https://swarajyamag.com/news-brief/india-negotiating-purchase-of-more-ap...

RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप

बातमी :
https://www.loksatta.com/desh-videsh/rss-ex-pracharak-claimed-that-bomb-...

चित्रफीत :
https://twitter.com/i/status/1565217854970281984

अर्थात अधिक माहिती व पुरावे समोर आल्याशिवाय कोणतेही आरोप सत्य मानणे अयोग्य ठरेल. खासकरुन या यशवंत शिंदेंची विश्वासार्हता तपासली पाहिजे

वामन देशमुख's picture

2 Sep 2022 - 10:46 am | वामन देशमुख

RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप

बातमी अजिबात विश्वसनीय नाही.

अहो ते काय बॉम्बस्फोट करणार? त्याला हिम्मत लागते*. स्वतःच्या पक्ष्याच्या राष्ट्रीय प्रवक्त्या महिलेचे रक्षण ते करू शकले नाहीत ते काय बॉम्बस्फोट करणार?

---

* बॉम्बस्फोट करायला माझे समर्थन नाही, जस्ट तार्किक विधान करतोय.

विवेकपटाईत's picture

2 Sep 2022 - 11:05 am | विवेकपटाईत

लोकसत्तेतील 99 टक्के बातम्या खोट्या असतात. संपादकीय तर विचारूच नका. तसे ही मी फेकसत्ता हे नाव ठेवले आहेय. बाकी आरएसएस जेवेढे मी ओळखतो, असले फालतू प्रकार तिथे नसतात.

सुबोध खरे's picture

2 Sep 2022 - 12:47 pm | सुबोध खरे

Medha Patkar’s name as AAP CM candidate for Gujarat lands Kejriwal into trouble as 13 out of 19 candidates threaten to quit party ahead of polls

https://www.opindia.com/2022/09/medha-patkar-gujarat-aam-aadmi-party-arv...

उत्तम आहे.

या बाईंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करूच द्या आप चा गुजरात मध्ये मोठा पराभव नक्की.

याच बाईंनी सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये नर्मेदेचे पाणी पोचणे अशक्य आहे आणि सरदार सरोवर प्रकल्प विकास कसा आतबट्ट्याचा आणि जनतेच्या नुकसानीचा आहे असे अनेक वेळेस बोलून दाखवले होते

काही तरी करून चर्चेत राहायचं हाच अजेंडा आहे या बाईंचा

https://www.newsclick.in/Narmada-Water-Unfit-Organic-Farming-Medha-Patkar

कपिलमुनी's picture

2 Sep 2022 - 2:12 pm | कपिलमुनी

ही बाई फक्त उपद्रव देण्यापुरती मर्यादित आहे.

तिला गुजरात मध्ये आणणे आप ची सर्वात मोठी घोडचूक ठरेल ..

धर्मराजमुटके's picture

2 Sep 2022 - 10:42 pm | धर्मराजमुटके

आज भारतीय बनावटीची आय एन एस विक्रांत समुद्रात उतरली. त्याच्या गुण अवगुणाबद्द्ल चर्चा करणारी ही चित्रफीत पाहिली. उत्तम वाटली.
हा दुवा

https://indianexpress.com/article/political-pulse/kavita-krishnan-quits-...
‘Admit our gods’ atrocities (in USSR, China)’: CPI(ML)-free Kavita Krishnan stirs up fiery Left debate

श्री कविता कृष्णनने तथाकथित पुरोगाम्यांचा दांभिकपणा चांगलाच फोडला आहे. मिपावरील पुरोगाम्यांची मते ऐकायला मजा येईल.

थोडक्यात:
आरोपी सीमा पात्रा या झारखंडच्या रहिवासी असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. मागील आठ वर्षांपासून आरोपी सीमा पात्रा पीडित आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. त्यांनी पीडित महिलेला आपल्या जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय पीडित महिलेच्या शरीरावर अनेक जखमाही आढळल्या आहेत. आरोपी सीमा पात्रा यांनी आपल्याला गरम वस्तूंने चटके दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.
रम्यान, खुद्द आरोपी सीमा पात्रा यांचा मुलगा आयुष्मान यानंच पीडितेची त्यांच्या जाचातून सुटका केली आहे. त्यानं यासंदर्भात आपल्या एका मित्राला कल्पना दिल्यानंतर या मित्रानं पीडितेला वाचवण्यास आयुष्मानची मदत केली. यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांना पात्रा यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पात्रा यांना अटक करण्यात आली आहे.
पुर्ण बातमी

इतर माध्यमांतील बातमी (ज्यांचा लोकसत्तावर विश्वास नाही त्यांच्याकरिता)

वामन देशमुख's picture

3 Sep 2022 - 4:53 pm | वामन देशमुख
वामन देशमुख's picture

3 Sep 2022 - 11:14 pm | वामन देशमुख
वामन देशमुख's picture

3 Sep 2022 - 11:15 pm | वामन देशमुख
मदनबाण's picture

4 Sep 2022 - 12:01 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bal Bhakta Laagi Tuchi Aasara

मुक्त विहारि's picture

4 Sep 2022 - 11:20 am | मुक्त विहारि

जम्मू-कश्मीर: पाकिस्तानी आतंकवादियों को संवेदनशील सूचना भेजने के आरोप में मदरसा शिक्षक गिरफ्तार

https://www.google.com/amp/s/navbharattimes.indiatimes.com/state/jammu-a...

https://maharashtratimes.com/business/business-news/india-beats-uk-to-be...

ब्रिटनला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीवरून तयार करण्यात आलेला एका अहवालात ही माहिती देण्यात आली. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी या जगातील सर्वांत मोठ्या, पहिल्या चार क्रमांकाच्या अर्थव्यवस्था आहेत. त्यानंतर ब्रिटनचा क्रमांक लागत होता. मात्र, ब्रिटनला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी आली आहे.

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 4:27 pm | जेम्स वांड

अन् त्यावरून जळजळ पण बरीच झाली आहे इंग्लंडची, लॉर्ड फॉकलंडच्या जमान्यातून बाहेर न आलेले फिरंगी अंग्रेज बघा कश्या नथीतून दुगाण्या झाडतायत.

.

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 4:22 pm | जेम्स वांड

टाटा समूहाचे औटघटकेचे सर्वेसर्वा झालेले अन् वादळी अल्पजीवी कार्यकाळ संपवून टाटा समूहातून बाहेर पडलेले उद्योगपती सायरस मिस्त्री ह्यांचा पालघर जवळ अपघाती मृत्यू

अरेरे, वय फक्त ५२ वर्षे.

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 5:22 pm | जेम्स वांड

वयाची कल्पनाच नव्हती,

एकंदरीत टाटा समूहातील नाही तर आयुष्याची कारकीर्दच वादळी होती म्हणायची.

याचे पोल खुलले आहेत( त्यांचे air bags ) उघडून जीव काही वाचत नाही. मोठ्या हाइवेवरती १२०+ किमी तासाने जाणारे वाहन ( सेकंदात ४०मिटरस वेग) आदळते तेव्हा अर्ध्या सेकंदात शून्यावर येते. तर काय इतक्या कमी वेळात वेगाचा अंदाज घेणारा सेन्सर ते मोजून air bag मध्ये हवा भरेल का हे गणिती कोडे आहे.