ताज्या घडामोडी मार्च - भाग २

निनाद's picture
निनाद in राजकारण
17 Mar 2022 - 5:24 am

ताज्या घडामोडी मार्च - भाग २ येथून पुढे...

ऑड्रे ट्रुशके, अमन वडूद, डॉ वारिस हुसेन हे हिंदुत्वाविरुद्ध होळी साजरी करणार आहेत.
यासाठी'स्टुडंट्स अगेन्स्ट हिंदुत्व आयडॉलॉजी' किंवा SAHI अशी संस्था स्थापन केली गेली आहे. येल, कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, वेलस्ली, मिशिगन स्टेट, ड्यूक आणि रटगर्ससह अमेरिकन युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये SAHI, HfHR आणि साधना या संस्थांनी एकत्रितपणे CAA आणि NRC विरुद्ध निदर्शने केली होती. संघटनेने भारतीय सरकारी अधिकार्‍यांवर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकन काँग्रेसला खुले पत्र लिहिले होते.
या वर्षी आता वेबिनार घेतला जाणार आहे.

लिबरल कट्टरवाद असा वाढवला जातो असे दिसते आहे.

प्रतिक्रिया

होळीचं महत्त्व काय कळणार. बॉन फायर म्हणजे काय?
-----------------
Daylight saving time-consuming बंद होणार.
हुशार लोकांनी शोधलेला फालतू उपाय होता.

वार्षीक वेळबदल आणि गोल्फ लॉबी.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Mar 2022 - 9:28 am | चंद्रसूर्यकुमार

आयसी-८१४ विमानाचे अपहरण करून ते कंदाहारला घेऊन जायच्या प्रकारातील एक झहूर मिस्त्री काही दिवसांपूर्वी कराचीत अज्ञात लोकांनी केलेल्या गोळीबारात मेला होता. आज झफरूल्ला जमाली म्हणून दुसरा असाच कराचीतून थेट ७२ अप्सरांकडे रवाना झाला आहे. https://www.sirfnews.com/another-ic-814-hijacker-killed-zafarullah-jamal...

पहिला मेला तेव्हा त्यात भारताचा हात असेल तर किती चांगले होईल असे वाटले होते. काही दिवसातच दुसराही टपकावला गेला असेल तर तो पूर्ण योगायोग नसावा. त्यामागे जर आपला हात असेल तर त्याचा प्रचंड अभिमान वाटेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Mar 2022 - 2:06 pm | चंद्रसूर्यकुमार

याविषयी वेगवेगळे क्लेम यायला सुरवात झाली आहे. काही लोक म्हणत आहेत की काही दिवसांपूर्वी मेलेल्या झहूर मिस्त्रीचेच टोपणनाव जमाली असे होते त्यामुळे दुसरा कोणी मेलेला नसून तोच मेलेला आहे. तर काही म्हणत आहेत कंदाहार विमान अपहरण प्रकरणात कोणी जमाली नवाचा नव्हता. नक्की काय आहे ते समजत नाही. बालाकोट हल्ल्यानंतरही मसूद अझर मेला की जिवंत आहे याविषयी बरेच दिवस वेगवेगळ्या चर्चा चालू होती. तेव्हा आता अशी चर्चा आणि गोंधळ चालू असणे अपेक्षितच आहे- अर्थातच त्या पहिल्या हल्ल्यात झहूर मिस्त्रीला आपल्या लोकांनी ठार मारले असेल तर आणि त्याउपर हा दुसरा हल्ला झाला असेल तरच. समजा आपापसातले गँगवॉर किंवा अन्य कोणत्या कारणाने पहिला मेला असेल आणि दुसरा मेलाच नसेल तर हा सगळा प्रतिसादच गैरलागू.

कधीनाकधी त्या अपहरण प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या सगळ्यांना ७२ अप्सरांकडे पाठविले जावे ही सदिच्छा नक्कीच आहे.

सोनिया गांधींची समाजमाध्यमांवर जाहीर नाराजी, आता राहुल गांधींनी पुरावेच दिले, फेसबुकवर केली सडकून टीका...

राहुल गांधी यांनी फेसबुककडून भाजपासाठी पुरक असणारी भूमिका घेतली जातेय, असा आरोप केलाय. त्यासाठी त्यांनी अल जजीरा या आंतरराष्ट्रीय माध्यमातील काही लेखांचे कात्रण आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. निवडणुकीदरम्यान फेसबुक भाजपाकडून इतर पक्षांच्या तुलनेत कमी पैसे घेते, रिलायन्सकडून आर्थिक पुरवठा केलेल्या फर्मकडून भाजपच्या बाजूने फेसबूकवर कशा प्रकारे मोहीम चालवली जातेय, हे सांगणाऱ्या लेखांचे शीर्षक त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत. तसेच या कात्रणांसोबत त्यांनी मेटा म्हणजेच फेसबूक लोकशाहीसाठी वाईट आहे, अशी टीका केलीय....

---------

फेसबुकवर, कॉंग्रेसला पाठिंबा देणारे लोक देखील असतीलच की ..... नाचता येइना, अंगण वाकडे आणि हिंदू एक झाले तर, माध्यमे विकल्या गेली....

फेसबुकवर भाजपवाले लोक जास्त आहेत इतका बाळबोध मुद्दा नाहीये राहुल गांधींचा. भाजप पक्षाकडून जाहिरातींसाठी कमी पैसे घेतले जातात असा राहुल गांधींचा मुद्दा आहे.

फेसबुकवर, कॉंग्रेसला पाठिंबा देणारे लोक देखील असतीलच की ..... नाचता येइना, अंगण वाकडे आणि हिंदू एक झाले तर, माध्यमे विकल्या गेली....

तुम्ही या मुद्द्याबाबत पण जरूर असहमती दर्शवा, पण उगाच मुद्दा आहे त्यापेक्षा बाळबोध असल्याचे नाटक करू नका.

प्रदीप's picture

17 Mar 2022 - 3:02 pm | प्रदीप

भाजप पक्षाकडून जाहिरातींसाठी कमी पैसे घेतले जातात असा राहुल गांधींचा मुद्दा आहे.

म्हणजे नक्की काय आहे? त्यांना असे म्हणायचे आहे का, की फेसबुक भाजपाच्या पोस्टींवर जाहीरातदारांना, इतर पक्षांच्या पोस्टींवर असतो त्यापेक्षा कमी चार्ज करते?

बहुदा. मला नक्की माहित नाही.

प्रदीप's picture

18 Mar 2022 - 12:01 pm | प्रदीप

मेटा, ही फेसबूकची मालक कंपनी, अमेरिकेत इन्कॉर्पोरेटेड आहे. त्याचप्रमाणे तिचे तेथे ऑफिसेस आहेत. तेव्हा, त्या देशाचे 'फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट' तिला लागू आहे. हा अ‍ॅक्ट, बाहेरच्या कुठल्याही सरकारी, निमसरकारी तसेच सरकारशी संबंधित कुठल्याही व्यक्तिस, संघटनेस काही 'स्पेशल फेवर्स' देत असेल, तर ह्या अ‍ॅक्टान्वये, तिच्यावर खटला होऊ शकतो, तिचे व्यवस्थापक व संबंधित कर्मचारी खटला होऊन तुरूंगवासात जाऊ शकतात. तेव्हा, राहून गांधींनी ह्या संबंधातली तक्रार तेथील सरकारच्या संबंधित हपिसात केल्यास पुढे कारवाई होऊ शकते. त्यासाठी अर्थात त्यांच्याकडे सबळ पुरावा हवा.

तसे न करता ते केवळ भारतांतच सभांतून वगैरे असले आरोप करत राहिले, तर त्याची किंमत शून्य समजणे रास्त ठरेल.

मनो's picture

23 Mar 2022 - 10:39 pm | मनो

तुम्ही एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त माल विकत घेण्याची खात्री देत असाल तर व्यापारी तुम्हाला discount देतात, त्याला volume discounts असे म्हणतात. भाजप मोठ्या प्रमाणात FB वर पैसे खर्च करत असल्याने त्यांना जास्त discount मिळणे आणि per impression त्यांना स्वस्त भाव मिळणे यात काहीही नवल नाही. राहुल गांधी यांनी तेवढे volume FB वर टाकावे, त्यांना त्या प्रमाणात discount नक्कीच मिळेल. फार काय, भारतातील कुणीही त्या प्रमाणात FB वर खर्च करणार असेल तर त्याला तोच भाव मिळणे सहज शक्य आहे. राहुल गांधी यांना हे सर्व माहीत आहे, पण सामान्य लोकांना हे तपशील माहीत नसल्याने उगाच राईचा पर्वत करणे चालू आहे.

आनन्दा's picture

19 Mar 2022 - 11:05 am | आनन्दा

माझ्यामते करतही असेल..
राजकीय बाजूपेक्षा देखील फेसबुक ला धंदा चालवायचा आहे.

जर भाजपच्या पोस्टचा क्लिक रेशो जास्त असेल आणि जर CTR रेव्हेन्यू जास्त मिळत असेल तर फेसबुक भाजपला चांगले *डील* नक्कीच देऊ शकते.

केवळ राजकीय हेतूने प्रेरित आरोप करण्यात काही अर्थ नाही.
उलट यातून हे अधिक स्पष्ट होते को काँग्रेसच्या प्रचारकी पोस्ट उघडण्यात लोकांना रस उरलेला नाही.

सामान्यनागरिक's picture

18 Mar 2022 - 11:42 am | सामान्यनागरिक

सोशल मेडियाचा भाजप वाले कल्पकतेने आणि प्रभावीपणे वापर करुन घेतात. पण विरोधी पक्षांना ते जमत नाही.

कोणी अडवलंय ? त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. तसंही सोशल मेडीयावर पोस्ट टाकायला पैसे लागत नाहीत. त्यांचे जाहिरातीचेदर सगळ्यांना सारखेच असतात. भाजप वाले त्यांचे जावई नाहीत.

खरा मुद्दा हा आहे की विरोधी पक्षांकडे सोशल मेडीया वर टाकण्या सारखे काही नाही.
मोदींनी नुसता खिशात कागदाचा बोळा कोंबला तरी त्याचे फोटो सोशल मेडीयावर फिरतात.

विरोधी पक्षाच्या लोकांना कोणी अडवलंय ? जा बीचवर कचरा गोळा करा-त्याचे व्हिडीओ, फोटो टाका ना सगळीकडे.

रोजगार हा मुद्दा आहे म्हणतात पण कोणाकडे काहीच माहिती नाही की आधी किती रोजगार निर्माण होत होते आणि आज मोदी काळात किती होतायत. ईंधन दरवाढी बद्दल ओरडतात- पण आधी सुद्धा इंधनाचे दर वाढतच होते. डाळ -तांदुळ वगैरे चे दर आधी सुद्धा खुप जास्त होतेच.
विरोधी पक्षांत एकही जरा चांगली अक्कल असलेला नेता नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणुन तो बिचारा राहुल गांधी जसं जमेल तसं करत रहातो. ते हास्यास्पद ठरतं हा मुद्दा वेगळा.

राज कारणात ७० वर्षे राहुन सुद्धा ' जाणते राजे' आणी त्यांचे कुटुंब एक सुद्धा फोटो मेडियावर टाकु शकत नाहीत. फक्त व्यासपीठावर भाषण करताना आणि उदघाटने करतानाचे सोडुन.

जर चांगलं मटेरियल असेल तर काही करता येईल. ते नाहीच आहे. सत्तेत राहुन सुद्धा आपली टक्केवारी बघण्या पलीकडे काही केले नाही.
मग हीच परिस्थीती होणार.

भाऊ तोरसेकर म्हणाले त्या प्रमाणे कोरोना मधे जशी आकडे वारी प्रसिद्ध होत होती - रोज ईतके आजारी पडले, ईतके मेले, ईतके बरे झाले तशीच आकडे वारी विरोधी नेते आणी चेले चपाटे यांच्याबद्दल प्रसिद्ध होऊ लागेल. रोक ईतक्यांना नोटिसा गेलया, ईतक्यांना चौकशीसाठी बोलावले, ईतक्यांना अटकपूर्व जामीन हवाय, ईतके कोठडीत गेले ई. आणी भाजप वाले त्याचा पुरेपुर उपयोग करुन घेतील.

उपयोजक's picture

24 Mar 2022 - 10:26 am | उपयोजक

खणखणीत +१११११११११

या कात्रणांसोबत त्यांनी मेटा म्हणजेच फेसबूक लोकशाहीसाठी वाईट आहे, अशी टीका केलीय.... कदाचित त्यांना मटा म्हणायचे असेल

या कात्रणांसोबत त्यांनी मेटा म्हणजेच फेसबूक लोकशाहीसाठी वाईट आहे, अशी टीका केलीय

नक्कीच. ज्या पध्दतीने युक्रेन - रशिया युध्दात समाजमाध्यमे युरोपियन प्रायोजित पक्षाला समर्थन देत आहेत आणि इतर पक्षाला लिहुनही देत नाहीत त्यावरुन उद्या भारत आणि युरोपियन यांच्या संघर्षात ते कोणाची तळी उचलणार ते दिसते.

हिजाबशिवाय वर्गात न जाण्याबाबत कर्नाटकातील विद्यार्थिनींचा हट्ट कायम

https://www.loksatta.com/desh-videsh/karnataka-students-insist-class-wit...

हिजाब वादामुळे पूर्वी अशांततेचे वातावरण पाहिलेल्या शिवमोगातील कमला नेहरू महाविद्यालयातही, आपण हिजाब घातल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश करणार नाही असे सांगून १५ मुस्लीम विद्याथिर्नी परत गेल्या. याच जिल्हा मुख्यालयाच्या शहरात हिजाब वादातून बजरंग दलाच्या एका तरुण कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी भररस्त्यात हत्या करण्यात आल्याने तणाव पसरला होता....

---------

कायद्याचे पालन करायलाच हवे, मग तो कुठल्याही धर्माचा का असेना....

सामान्यनागरिक's picture

18 Mar 2022 - 11:47 am | सामान्यनागरिक

त्या विद्यार्थिनींना लवकरात लवकर काढुन टाका महाविद्यालयातुन. अशी घाण नसलेलीच बरी.
सुप्रीम कोर्टाने निर्णय देउन सुद्धा यांना हट्ट्च करायचा असेल तर पाकिस्तानात जाउन शिक्षण घ्या.

मुस्लीम पंडीत(?) एक सुद्धा पुरावा देऊ शकत नाहीत की कुराणात, ईतर धर्मग्रंथांत हिजाब घालायला सांगीतले आहे म्हणुन.

आणी ईतके दिवस याच विद्यार्थिनी गुपचुप गणवेश घालुन जात होत्याच. आज्च का हा माज ?

ईतका सोपा विषय - शालेत जातांना गणवेश घालावा जो त्यांनी सुद्धा मान्य केलाय. यात कोर्टात जाण्याचे कारण काय ? कोर्टाने उलत यांना जबरी दंड लावावा कोर्टाचा वेळ वाया घालवल्या बद्दल,

मुक्त विहारि's picture

17 Mar 2022 - 10:00 am | मुक्त विहारि

शाळेतील चुली पेटल्याच नाहीत!; शासनाकडून खाद्यपदार्थाचा पुरवठाच नाही; ‘उसनवारीवर’ वस्तू घेण्याचा आदेश...

https://www.loksatta.com/maharashtra/school-stoves-fire-food-supply-gove...

पुरवठादाराकडून तांदूळ व अन्य मालाचा पुरवठा होईपर्यत शाळास्तरावर पर्यायी व्यवस्था करावी. तिखट, हळद, मोहरी आदी वस्तू उसनवारीवर घेऊन विद्यार्थ्यांना शाळेतच आहार दिला जावा. आहार तयार करण्यासाठी लागणाऱ्या इंधन, भाजीपाला व तेलाची खरेदी मुख्याध्यापकांनी करावी, असे निर्देश आहेत.....

ढकलंपंची राजवट....खुर्ची आमची, सत्ता आमची, जबाबदारी मात्र इतरांची..... शिक्षकांनी शिकवायचे? की, स्वैपाकपाणी बघायचे?

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; पोषण आहारात सिमेंट अन्‌ गुटखा!

https://maharashtratimes.com/maharashtra/gondiya/cement-and-gutkha-found...

उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; पीडित गायब मुलगी सापडली चित्रा वाघ यांची माहिती...

https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/shiv-sena-deputy-leader-ragh...

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून 24 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर कुचिक यांनी जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा आरोप करत कुचिक यांच्यावर 17 फेब्रुवारीला पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये (Shivajinagar Police Station)बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीमध्ये पीडित युवतीने गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला.....

--------

गुन्हा सिद्ध झाला तर, अशा नेत्यांवर, कठोर कारवाई व्हायलाच हवी... मग तो, कुठल्याही पक्षाचा का असेना ...

शक्ती कायद्यावर अखेर राष्ट्रपतींची सही, दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेत माहिती...

स्त्रियांना अधिकाधिक संरक्षण देणाऱ्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांनी शक्ती कायद्यावर (Shakti Act) आज सही केली आहे. खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी याबाबतची माहिती विधानसभेत दिली आहे. शक्ती कायद्याच्या माध्यमातून महिलांना सर्वाधिक संरक्षण देणारं पहिलं राज्य ठरलं आहे.....

--------

ह्या राजवटीत, हे एक अतिशय उत्तम काम झाले आहे ... ज्या देशांत, स्त्रीयांचा मान ठेवल्या जातो, तोच देश उत्तम प्रगती करतो...

निनाद's picture

24 Mar 2022 - 11:18 am | निनाद

विधेयक मंजूर झाल्यामुळे, आंध्र प्रदेश नंतर बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या जघन्य गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा मंजूर करणारे ते भारतातील दुसरे राज्य बनले. या
कायद्यामध्ये अ‍ॅसिड हल्ला अंतर्भूत आहे हे फार चांगले झाले.

कलम ३२६अ अंतर्गत अ‍ॅसिड हल्ल्यामुळे गंभीर दुखापत झाल्यास, शिक्षा किमान १५ वर्षांपर्यंत वाढवली गेली आहे ही आयुष्याच्या उर्वरित कालावधीपर्यंत वाढविली जाऊ शकते. अ‍ॅसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणांमध्ये कलम ३२६ब अंतर्गत शिक्षा किमान सात वर्षे आणि कमाल दहा वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम प्लास्टिक सर्जरी आणि फेस रिकन्स्ट्रक्शनसह वैद्यकीय खर्चासाठी वापरली जाण्याची तरतूद आहे.
अर्थात यासाठी पुरेसे निर्णायक पुरावे असणे आवश्यक असेल.
पण अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात पुरावे मिळत नाहीत कारण हे अ‍ॅसिड कुठेही मिळते आणि हल्ला झालेली मुलगी काही पाहूच शकत नाही! बहुदा हल्लेखोर क्षणात पळून जातात. पुरावे शोधायचे तरी कसे?
त्यामुळे अ‍ॅसिडची सहज असलेली उपलब्धी कमी करणे हा खरा उपाय आहे.

तसेच या तरतुदींमध्ये कोणत्याही लैंगिक कृत्यातील स्त्रीच्या कोणत्याही भागाचे वास्तविक किंवा बनावट चित्रणासह कोणतीही ध्वनी किंवा व्हिडिओ फाइल अपलोड किंवा प्रसारित करण्याची धमकी देखील समाविष्ट आहे. या कायद्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, मोबाइल डेटा कंपन्यांना बलात्कार, लैंगिक छळ, अ‍ॅसिड हल्ला आणि पॉक्सो कायद्यांतर्गत संबंधित तरतुदींच्या प्रकरणांमध्ये तपासाच्या उद्देशाने मागवलेला डेटा तीन कामकाजाच्या दिवसांत शेअर करणे बंधनकारक केले आहे.

कायद्यानुसार या प्रकरणांमधील खटला दररोज चालविला जाणे आणि आरोपपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे (अधिकृत कामकाजाचे ३० दिवस). तसेच एफआयआरच्या एका महिन्याच्या आत तपास पूर्ण करणे आवश्यक आहे.

आता या कायद्याला विरोध कुणी केला असेल - तर कोळसे पाटिल यांनी!!

“तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”

https://www.loksatta.com/maharashtra/bjp-ram-kadam-on-maharashtra-govern...

होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन राज्य सरकारने घातलं आहे. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे.

-------

अतिशय योग्य निर्णय, प्रदूषण टाळायलाच हवे.....
-------

इतर पक्षांनी देखील, हा नागरिकांच्या हिताचा निर्णय, पाळायला हवा, उगाच धार्मिक रंग देण्याला अर्थ नाही...

sunil kachure's picture

17 Mar 2022 - 2:21 pm | sunil kachure

योग्य मत.
पहिल्याच वेळी योग्य मत.
तुमच्या सारखी भूमिका राज्यातील bjp नेत्यांनी घेतली. तर bjp पासून लांब गेलेले bjp च्याच idealogy चे समर्थन करणारे परत bjp जवळ येतील.

मुक्त विहारि's picture

17 Mar 2022 - 6:20 pm | मुक्त विहारि

मी धोरणांना समर्थन देतो किंवा विरोध करतो ....

ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे; नवी नियमावली जाहीर

https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-government-cancels-guid...

एक अत्यंत उत्तम निर्णय घेतला होता, तो पण फिरवला....काय गौडबंगाल आहे, कुणास ठाऊक?

sunil kachure's picture

17 Mar 2022 - 1:57 pm | sunil kachure

Punjab मधील नवीन आप सरकार नी
मुख्यमंत्र्याच्या केबिन मधील महाराजा रणजित सिंग ह्यांचा फोटो हटवला आहे.
आणि असे करण्या मागे खूप मोठे देश विरोधी षडयंत्र असावे अशी शंका घेण्यास जागा आहे.
पंजाबी अस्मितेला ज्वलंत करून खलिस्तानी , अलग्वादी वृत्ती उफाळून यावी हाच हेतू असावा असे वाटत आहे
आप खलिस्तान वादी आहे .
ह्याचे हे उदाहरण आहे
इथे काही आयडी नी ते सांगितले होते ते योग्य च होते असे वाटत आहे.

हिन्दुत्व विरोधि कि हिन्दु विरोधि होलि सजिरि करनार आहेत hfhr ?

मुक्त विहारि's picture

17 Mar 2022 - 10:03 pm | मुक्त विहारि

“कारगिलच्या मास्टरमाईंडसोबत बॉलिवूड अभिनेता?”; संजय दत्त – परवेझ मुशर्रफ भेटीवरून नेटकऱ्यांनी उंचावल्या भुवया

https://www.loksatta.com/manoranjan/sanjay-dutt-meets-parvez-musharraf-i...

बाळासाहेब ठाकरे यांनी, संजय दत्तला माफी दिली आणि मी शिवसेना सोडून दिली...मला आजही, मी घेतलेल्या, त्या निर्णयाचा पश्र्चात्ताप होत नाही ...

निनाद's picture

18 Mar 2022 - 4:23 am | निनाद

संजय दत्तला माफी दिली हा माझ्यासह अनेकांच्या आयुष्यात डोळे उघडणारा क्षण ठरला आहे!

मुक्त विहारि's picture

18 Mar 2022 - 7:06 am | मुक्त विहारि

कल्पना अयैरवर, जाहीर कार्यक्रमात चप्पल फेकणे, (स्त्रीचा अपमान)... असेच एक उदाहरण म्हणजे, सोनिया गांधी यांची, पांढरी पाल, असा उल्लेख करणे, कॉंग्रेसची धोरणे आवडत नसली तरी, हिंदू कधीच स्त्रीयांचा अपमान करत नाहीत.... आणि कुणी केला तर, अशा हिंदूंना, हिंदू जवळ करत नाहीत, रामायण आणि महाभारत, पण हेच सांगते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पण हाच धडा घालून दिला, कल्याणच्या सुभेदाराची सून आणि रांझेपाटील, ही उदाहरणे पुरेशी आहेत ...

Enron परत चालू करणे, (शब्द न पाळणे)

पुल देशपांडे यांचा भर सभेत अपमान करणे , (बुद्धिवंताची हेटाळणी)

आणि

संजय दत्तला माफी देणे, (गून्हेगाराला संरक्षण, कारण नंतर आरोप सिद्ध होऊन, तुरंगवास देखील झाला)

--------

वैचारिक मतभेद व्यक्त न करता, शारिरीक व्यंगावर टोमणे मारणे आणि वेळ प्रसंगी हातघाईवर येणे, ही मानसिक प्रगल्भता नाही ....

शाम भागवत's picture

18 Mar 2022 - 6:07 pm | शाम भागवत

संजय दत्तला माफी देण्याबद्दल मला काही म्हणायचे नाही कारण माणूस सुधारू शकतो. संजय सुधारला की नाही ते मला माहीत नाही. माहीत करून घ्यायची इच्छाही नाही.
त्यामुळे माझे बाळासाहेबांद्दल मत वगैरे काही बदलले नाही.
मात्र
जेव्हां आदरणीय अब्दुल कलाम यांना ते मुस्लीम आहेत, म्हणून अतिरेक्यांच्या फाशीचे बाबतीत निर्णय घ्यायला वेळ लावत आहेत असा आरोप केला तेव्हां खूप दु:ख झाले होते. तसेच त्यांना पुन्हा राष्ट्रपती करायला विरोध केला तेव्हां मात्र बाळासाहेबांना खरेच माणसे ओळखता येतात का? असा प्रश्न पडला होता व खूप वाईट वाटले होते.
असो.
निव्वळ मराठी म्हणून प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. हरकत नाही पण त्यांच्याही काळात अतिरेक्यांना फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला नाही पण ते त्याबद्दल एका शब्दाने पण बोलले नाहीत. किंवा अब्दुल कलामांबाबतचे ते विधान त्यांनी मागे घेतले नाही, हे मला विसरता येत नाही.
असो.

निनाद's picture

18 Mar 2022 - 4:27 am | निनाद

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि मुस्लिम आक्रामक परवेझ मुशर्रफ यांनी बॉलीवूडचा आयकॉन संजय दत्त यांची भेट घेतल्याचे गुरुवारी समोर आले आहे असे दिसते.
पण कुणालाच या विषयी बोलायचे नाही त्या अर्थी काहीतरी भयंकर शिजले असणार असा संशय येतो.
कारण परवेझ मुशर्रफ हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गुह्नेगार आहे. हा इसम पाताळयंत्री असूसमसहजपणे खोटे बोलतो. आणि दुसरा तर देशद्रोही आहेच असे वाटते.

नवाब मलिकांकडील मंत्रिपदांबाबत अखेर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; जयंत पाटील यांनी दिली माहिती

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ncp-decides-to-hand...

आघाडी सरकारने मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नसला तरी देखील त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच मलिक यांच्याकडील परभणी आणि गोंदिया या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे देखील इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मलिकांकडे असलेले परभणीचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे....

-------

थोडक्यात काय तर.....मी मारल्या सारखे करतो, तू रडल्या सारखे कर....

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंबड शहरात रामेश्वर अंकुश खरात नावाच्या २० वर्षीय हिंदू तरुणाची इस्लामी जमावाने हत्या केली अशी बातमी आहे. रामेश्वर खरात यांना जमावाने लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने, लाथा बुक्क्याने मारून मारून हत्या केली. असहाय्य आई न्यायासाठी रडते आहे.

मात्र हिंदूंचा जीव भारतात स्वस्त असल्याने त्यावर मराठी तसेच इतर माध्यमे बोलायला तयार नाहीत.

या प्रकरणातील आरोपी इब्राहिम सिराज शेख अदनान सुलानी शफीक सुलानी, शोएब सुलानी शफीक सुलानी, अझहर इजाज अली शेख, फैजान अमजद पठाण, अरबाज शाह मोहम्मद पठाण, मुरादी मेहरा शेख , आवेज सिराज शेख, शोहेल शाहमोहम्मद पठाण, अनिस गफ्फार शेख, वाजेद इस्माईल शेख, अमीर चांद पठाण, अभय बाबासाहेब खरात, अर्शद खुर्शीद जिलानी, आणि शेख नासेर शेख इस्माईल अशी आहेत, हे सर्वजण अंबड येथे राहतात.

मुक्त विहारि's picture

18 Mar 2022 - 6:42 am | मुक्त विहारि

ह्या राजवटीत, जिथे सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली जाते, निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली जाते, साधू हत्याकांड होते, त्या राजवटीत, अजून काय अपेक्षा आहेत?

ध्वनीप्रदूषण होऊ नये म्हणून होळी सणा संदर्भात उत्तम निर्णय घेतला होता, तो देखील फिरवला ....

सर्व सामान्य माणसांच्या जीवाला, ह्या राजवटीत, खरोखरच काही किंमत आहे का?

ऑड्रे ट्रुशके, अमन वडूद, डॉ वारिस हुसेन हे हिंदुत्वाविरुद्ध होळी साजरी करणार आहेत.>>> मुस्लिमान्च्या धर्मान्धतेविरुद्ध लिहायला वा त्याचा निशेध करायला यान्च्या त दम नाही. हिन्दु हिम्सक नाहीत म्हणुन हे आणि यान्ची इकोसिस्टम हे करु शकत आणि करतात.

जर, निषेध केला नसेल तर अशा लोकांना, जास्त किंमत न देणेच योग्य ...

निनाद's picture

24 Mar 2022 - 11:31 am | निनाद

यांच्याकडे बारीक लक्ष ठेवले पाहिजे. हे भयानक लोक आहेत.
खरे तर यांना हिंदूफोबिया पसरवल्या प्रकरणी खटले दाखल केले पाहिजेत.

कारण हे पाहा : https://dismantlinghindutva.com/

  1. हा पहा हिंदूंच्या बुद्धीभेदाचा प्रकार - हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नाही
  2. हिंदुत्व Harassment फील्ड मॅन्युअल म्हणजे यांचा प्रतिवादही करता आला नाही पाहिजे हिंदूंना!
  3. कुणी जर प्रतिवाद केलाच तर बचाव कसा करावा आणि इतरांवर हल्ला कसा याचा कोर्स येथे आहे.
  4. जर तुम्ही दोन चार जणांनी यावर आवाज उठवला तर संघटीत छळ होतो आहे हे कसे सिद्ध करायचे या बद्दल मार्गदर्शन आहे.
  5. विद्यार्थ्यांना यात लक्ष्य केले जाते आहे. कॅम्पसवरील हिंदुत्वाचा प्रभाव तुम्ही कसा ओळखता? यासारखे मार्गदर्शक तयार आहेत.

या विरुद्ध साधा आवाज उठवला गेला नाहीये.
आता हेच सारे साहित्य ख्रिस्ती किंवा इस्लाम विषयक असते तर काय झाले असते?

निनाद's picture

25 Mar 2022 - 6:14 am | निनाद

इतकी माहिती देऊनही यावर एक ही उप प्रतिसाद आला नाही - यावरूनच आपली मानसिकता या डाव्या विचारसरणीने कितविचारसरणीनेकरून ठेवली आहे हे दिसते!

निनाद's picture

25 Mar 2022 - 6:15 am | निनाद

दिगोचि यांच्याशी सहमत आहे!

इस्लामोफोबिया पर भारत ने संयुक्त राष्ट्र में ने खींची बड़ी लकीर, भविष्य के खतरों से भी कर दिया आगाह

https://navbharattimes.indiatimes.com/india/islamophobia-day-can-divide-...

संयुक्त राष्ट्र ने यह मानते हुए कि दुनिया में इस्लाम और मुसलमानों के प्रति पूर्वग्रह व्याप्त है, हर वर्ष 15 मार्च को इस्लामोफोबिया डे ( (International Day to Combat Islamophobia) ) मनाने के प्रस्ताव को मंजूरी दे दी। पाकिस्तान के राजदूत मुनीर अकरम ने मुस्लिम देशों के संगठन ओआईसी (Organisation of Islamic Cooperation) के प्रस्ताव को 193 सदस्यों वाली संयुक्त राष्ट्र महासभा के सामने रखा जिसे कई देशों के समर्थन से पास कर दिया गया, लेकिन भारत और फ्रांस ने इसका विरोध किया।

---------

धर्मा आधारित भेदभाव वाढत जाण्याची शक्यता जास्त आहे...

सामान्यनागरिक's picture

18 Mar 2022 - 11:53 am | सामान्यनागरिक

उद्या ' पवार भाजपशी युती करणार ; अशी बातमी आली तरा आश्चर्य वाटायला नको.

अनेक फायली अमित शहांकडे उघडल्या गेल्या आहेत. त्यातुन कसे वाचणार?

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Mar 2022 - 7:31 pm | अमरेंद्र बाहुबली

अनेक फायली अमित शहांकडे उघडल्या गेल्या आहेत. त्यातुन कसे वाचणार? मोदींच्या गुरूंवर कारवाई करायची हिंमत शहांमध्ये असती तर एव्हाना एकतरी फाईल ऊघडली गेली असती. :)

अनिल परब यांच्या निकटवर्तीयांकडे सापडलं 'एवढं' घबाड; आयकर विभागाने केला खुलासा

https://marathi.abplive.com/news/maharashtra/income-tax-department-discl...

आता, राज्य सरकार काय Action घेते? हे बघणे रोचक ठरेल ...

सामान्यनागरिक's picture

18 Mar 2022 - 11:55 am | सामान्यनागरिक

उद्या कारागृहात एक मंत्रालय एक्सटेन्शन उघडले जाईल. कदाचित जागा करण्यासाठी सगळ्या कैद्यांना सोडुन देण्ञात येइल.

साडे तीन जिल्ह्यांच्या जिल्हे-इलाहींच्या राज्यांत काय होत आहे पहा :

Mha bhakas aghadi

साहनाजी, व्हाट्स ऍप वरचे लगेच ऐकायचे नसते.
हि बातमी २०१४ची आहे.
https://m.timesofindia.com/city/mumbai/bmc-babus-bribe-rate-card-for-bui...

अच्छा. म्हणजे २०१४ मध्ये असले की चालते का? तुमचा लढा भारतासाठी आणि कि कोणत्या पक्षासाठी आहे?