घोरण्या वर काही उपाय सुचवा

कासव's picture
कासव in काथ्याकूट
20 Feb 2022 - 11:32 pm
गाभा: 

मला झोपताना खूप शांतता लागते. कधी कधी गाड्यांचे आवाज वगैरे चालून जातात पण काही कारणाने शेजारची व्यक्ती घोरायला लागली की माझी झोप उडाली च. (मानसिक आजार असेल)

प्रश्न असे आहे की
१. घोरण्याची सवय कशी कमी करता येईल. कमीत कमी हळू तरी कसे घोरता येईल. काही नाकाला लाऊन झोपायची उत्पादने आहेत त्याचा फायदा होतो का?
२. जरी शेजारच्या व्यक्ती ला बदलू शकत नसेल तर अश्या माणसा शेजारी सुखाने कसे झोपायचे (माणूस आणि जागा दोन्ही बदलू शकत नाही). हेडफोन लाऊन झोपण्याचा प्रयत्न केला पण फसला. कापसाच्या बोळ्याने पण काही फरक पडेल असे वाटत नाही.
३. पोर्टेबल साऊंड reduction device असते का आणि किती खर्चिक असते

काही लोकांना हा बावळट पणा वाटेल पण मी गेले काही महिने अक्षरशः भोगतो आहे. :)
अश्या प्रकारचा धागा आधी आला असेल तर सॉरी.

प्रतिक्रिया

आवाज करणारा की ऐकणाऱ्यावर?
------–-
पालथे झोपल्यास घोरणे बंद होते.

निनाद's picture

21 Feb 2022 - 5:35 am | निनाद

जेव्हा झोपेत श्वास घेतला जातो तेव्हा घशातून हवा वाहते आणि वायू वाहिन्या शिथील झाल्याने त्याचांचा आवाज होतो - घोरणे होते.
तरीही काही उपाय देतो - जे फारसे उपयोगी नाहीत!

  1. एका बाजूला झोपणे
  2. पुरेशी झोप घेणे
  3. पलंगाची उंची एका बाजूने वाढवणे - यामुळे तिरपे झोपल्यावर झोप लागत नाही हा निराळाच त्रास!
  4. अल्कोहोल न घेणे - दारू सोडवा!
  5. धूम्रपान थांबवा
  6. वजन कमी केल्याने फरक पडतो - हा उपाय खरच उपयोगी पडतो
  7. एअर मास्क वापरा - महाग असतो पण याने फरक पडतो म्हणतात!
  8. दातावर डेंटल कव्हर घाला - यामुले जबड्याचा पर्यायाने वायुमार्गाचा आकार वाढतो - ज्यामुळे घोरणे कमी होते.
  9. पॅलेटल इम्प्लांट्स - खर्चिक आणि खात्री नसलेला - उपाय
  10. अवुलोपॅलेटोफारिंगोप्लास्टी नावाचे श्वसनमार्ग रुंद करण्याची ऑपरेशन करता येईल

या सगळ्यात स्लीप एपनिया झालेला असतो - हा फार भयंकर प्रकार आहे.
यामध्ये हमखास लक्षणे

  1. रात्री वारंवार लघवी होणे
  2. हायपरसोम्निया
  3. दिवसा जास्त झोप येणे
  4. सकाळी जागे होतांना कोरडे तोंड पडणे
  5. जागे होतांना घसा खवखवणे
  6. डोकेदुखीसह जाग येणे
  7. कधी कधी झोपताना श्वास थांबतो

स्लीप एपनिया मध्ये तुम्ही झोपत असताना तुमच्या श्वासोच्छवासात वारंवार व्यत्यय येतो. उपचार न केल्यास, स्लीप एपनिया टाइप २ मधुमेह आणि हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतो आणि स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढवू शकतो.

एकुण परिस्थिती पाहता तुमची आणि तुमच्या जोडीदाराची समस्या ही फार मोठी आहे. त्यामुले वेळीच काळजी घ्या असे सूचवतो!

मुक्त विहारि's picture

21 Feb 2022 - 7:22 am | मुक्त विहारि

प्रतिसाद साठवून ठेवला आहे ...

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Feb 2022 - 11:02 am | राजेंद्र मेहेंदळे

मी हा त्रास काही काळ सहन केलाय. व्हायचे असे की मी रात्री १२-१ ला घरी येउन झोपायचो. झोप लागेपर्यंत अजुन एखाद तास जायचा. आणि सकाळी ७ वाजल्यापासुन घरात आवाज सुरु व्हायचे शिवाय बाहेरचे आवाज चालु होत ते वेगळेच. परीणाम झोपमोड आणि अपुरी झोप. त्यावेळी शोधलेले काही उपाय

१. शक्य असल्यास घोरणार्‍यापासुन ५-६ फूट किवा जास्त अंतर ठेवा
२. पोहताना कानात घालायचे बड्स मिळतात स्पोर्टस शॉपमध्ये ते घालुन झोपा,कापसाच्या बोळ्यापेक्षा जास्त परीणामकारक ठरेल.

Trump's picture

21 Feb 2022 - 11:28 am | Trump

घोरणारा:
१. प्राणायाम: श्वसनमार्ग जर मोकळा असेल तर फरक पडतो.
२. पोटावर झोपणे: त्यामुळे श्वसनमार्ग मोकळा राहतो.

तुम्ही
१. कानात बोळे घाला.
२. घोरणार्‍या व्यक्तीपेक्षा तुम्ही लवकर झोपा.

कुमार१'s picture

21 Feb 2022 - 11:43 am | कुमार१

वरील सर्व उपाय छान आहेत
वैद्यकीयदृष्ट्या एकच भर घालतो
घोरणाऱ्या व्यक्ती संदर्भात :

लठ्ठ असल्यास वजन कमी करणे. रक्तदाब अधिक असल्यास त्यावरही उपचार करणे. मुळात रक्तदाब कधी बघितला नसल्यास तो मुद्दामहून तपासून येणे

सुखीमाणूस's picture

21 Feb 2022 - 12:45 pm | सुखीमाणूस

https://www.amazon.in/s?k=3m+ear+plugs+for+noise+reduction&crid=2U9EKL33...

घोरणारा माणुस जर sleep apnea च्या आजाराने त्रस्त असेल तर वैद्यकिया सल्ला घेणे. cpap machine चा वापर उपयोगी ठरतो.
https://www.amazon.in/s?k=cpap+machine+for+sleep+apnea&crid=YEOBR54ZC0TB...

अर्जुन's picture

21 Feb 2022 - 12:52 pm | अर्जुन

https://www.resmed.com/us/en/consumer/products/devices.html वरील लिंक पहा. माझ्या सहकाऱ्यांना चांगला फायदा झाला आहे.

घोरणार्‍या माणसावर मनापासून प्रेम करा ;)

चौकस२१२'s picture

22 Feb 2022 - 1:05 pm | चौकस२१२

स्लीप एपनिया वाटले म्हणून रात्री झोपेची चाचणी करून आलो पण २ गोष्टीन मुले त्यावरील विश्वास बसेना
१) नवीन ठिकाणी झोप येत नाही त्यात डोकयावर किती ५० कि काय ते इलेक्ट्रोड लावले असल्यामुळे ते निसटले तर तंत्रन्या रात्री खोलीत आल्यामुळे झोपमोड झाली त्यामुळे काळात नाही कि हि चाचणी योग्य पद्धतीने होते कि नाही ?
२) चाचणी झाल्यावर चाचणी घेणारी कंपनी हि त्यावरील उपाय म्हणून आयुध विकणाऱ्या कंपनी च्या मालकीची आहे हे कळले , कॉन्फ्लिकट ऑफ इंटरेस्ट वाटले त्यामुळे हि विश्वास बसेना .. खर तर असे या देशात व्हायला नको कारण डॉक्टर आणि पॅथॉलाजी किंवा डॉक्टर आणि खाजगी रुग्णालये यांच्या साटेलोते शक्यतो होणार नाही यासाठी कडक नियम आहेत !
पुढे त्रास कमी झाला त्यामुळे विषय सोडून दिला

वामन देशमुख's picture

22 Feb 2022 - 3:12 pm | वामन देशमुख

दुर्दैवाने, मागच्या पाच-सहा वर्षांत मलाही घोरण्याचा त्रास सुरु झाला आहे; म्हणजे माझी पत्नी तसं सांगते! सुदैवाने मला अंथरुणावर पाठ टेकल्यावर पाचेक मिनिटांत गाढ झोप लागते आणि सातएक तासांनंतर मी ताजेतवाने होऊन उठतो. दरम्यान मला क्वचितच जाग येते.

घोरणे थांबवण्याचे अनेक उपाय ऐकले आहेत आणि ते फारसे उपयोगाचे नाहीत असेही ऐकले आहे. मी स्वतः अजून कोणतेही उपाय केले नाहीत.

---

घोरणे थांबवण्यासाठी वजन आटोक्यात आणणे हा उपाय माहित नव्हता, तो करून बघतो. (मागच्या दोन तीन वर्षांत माझे वजन ८-१० किलोंनी वाढले आहे.) तथापि पुरेसे सडपातळ असलेले माझे एक नातेवाईक पट्टीचे घोरणारे आहेत, त्यांनी घोरणे थांबवण्यासाठी काय उपाय करावा बरे?

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Feb 2022 - 3:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

दहा बारा वर्षांपूर्वी नोकरी निमित्त एकट्याने रहात होतो. त्या वेळी भेटलेला रुम पार्टनर घोरी घराण्याचा थेट वंशज होता. पहिले दिड दोन आठवडे अक्षरशः उशी डोक्यावर दाबत काढले.

आम्ही दोघे एकाच ऑफीस मधे काम करत असल्याने सहसा एकत्र बाहेर पडायचो. घरी जाउन तरी काय कराचे? म्हणून मग रोज कुठेतरी चालायला जायला लागलो.

हळू हळू हे चालणे वाढत वाढत एक दिड तास रोज व्हायला लागले, कधी कधीतर बोलता बोलता दोन तासांच्यावरची रपेट व्हायची, तसेच चालत मग आम्ही खानावळीत जेवुन मगच रुम वर यायचो.

या दरम्यान माझ्या लक्षात आले की ज्या दिवशी मी माझ्या मित्राला दमेपर्यंत चालवतो त्या दिवशी तो अजिबात घोरत नाही. मग जेवढे दिवस आम्ही एकत्र होतो तेवढे दिवस मी त्याला कितीही उशीर झाला तरी आग्रह करुन चालायला न्यायचो.

रुम सोडल्या नंतर बर्‍याच दिवसांनी मी त्याला हे सिक्रेट सांगितले तेव्हा, त्याचे म्हणणे असे होते की त्याचे घोरणे बंद झाले नाही, पण मी चालुन चालुन दमल्यामुळे माझ्या झोपेवर त्याच्या घोरण्याचा परीणाम होत नसावा, कारण त्याची पत्नी त्याच्या घोरण्यामुळे त्रस्त होउन बर्‍याच वेळा दुसर्‍या खोलीत झोपते.

मग मी वहिनींना विश्वासात घेउन हे सिक्रेट सांगितले, आणि मग वहिनींनीही रोज संध्याकाळी चालण्याचा वसा घेतला.

पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

22 Feb 2022 - 5:12 pm | चौथा कोनाडा

हे लई रोचक आहे !!!

मुक्त विहारि's picture

23 Feb 2022 - 8:39 am | मुक्त विहारि

धन्यवाद

गावठी फिलॉसॉफर's picture

26 Feb 2022 - 8:52 pm | गावठी फिलॉसॉफर

जेवल्यानंतर 1 तास चाललो तर रूम मेंट ना चांगली झोप लागते. नाही चाललो तर सकाळी शिव्या खाव्या लागतात

भ्रामरी व उज्जयी प्राणायाम आणि सिंहमुद्रा यामुळे घशाच्या नलिकांना व्यायम होतो आणि त्या जागेवर येतात/राहतात.
हा व्यायाम दीर्घकाल केल्यास घोरणे पुर्णपणे बंद होते.

भ्रामरी

इतका साधा व्यायामही दीर्घकाल करावा लागत असल्याने होत नाही आणि घोरणे मात्र तसेच राहून जाते! :(

Trump's picture

23 Feb 2022 - 11:47 am | Trump

+१

प्राणायामने नक्कीच खुप फायदा होतो.

विजुभाऊ's picture

27 Feb 2022 - 9:53 pm | विजुभाऊ

माझा एक रूम मेट प्रचंड घोरायचा.
त्याच्यावर उपाय म्हणून मी त्याच्या उशीभोवताली निलगिरी तेल लावून ठेवायचो. त्या नंतर मात्र घोरणे बंद झाले.
त्यालाही हा उपाय बराच उपयोगी पडला