आणि मी ही वाचत सुटलो

सागरसाथी's picture
सागरसाथी in काथ्याकूट
18 Feb 2022 - 7:09 pm
गाभा: 

मी पण वाचत सुटलो त्याची गोष्टी.....
लहानपणी शाळेतल्या पुस्तकांच्या पेटीने वाचनाची सुरवात झाली की घरातल्या चांदोबांनी, हे फक्त आता ती पुस्तकंच सांगू शकतील.
जादूच्या गोष्टी,परी राक्षस यांच्या गोष्टी वाचता वाचता आजोबांनी पोटमाळ्यावर ठेवले चांदोबा आणि अमृत हाती लागले. जिवदत्त आणि खङगवर्मा आणि अमृत मधले असे आमचे पुर्वज हे खास जीवलग.
कल्याण आणि उद्यम मासिकं वाचणे म्हणजे पालथ्या घड्यावरचे पाणीच.
नंतर हाताला लागले वि.के.फडके यांचे स्वामींचे चरित्र आणि बेलसरे यांचे गजानन महाराज चरित्र जे अजूनही माझ्याकडे आहे.
ग्रामपंचयत लायब्ररीने पुस्तकांची भुक भागवली. ती भुताळी जहाजं,समुद्री चाचे,दडवलेले खजिने आणि खजीन्याची बेट अजूनही साद घालतात.
लहान असताना माझ्या हातून रंग लागून खराब झालेले "चार दरवेश" दोन वर्षांपूर्वी लायब्ररीतून शोधून काढले. ते त्याचे एकाकीपण माझ्यासोबत शेअर करु पाहत होते.
नंतर पंचक्रोशीतील सर्व वाचनालयं धुंडाळून झाली, अमूल्य असे मोती हाताला लागले, "ज्ञानसागरातील हे शिंपले" परत हाताला लागले.
आता पुस्तकांनावीना वाचकांना एकाकी वाटतयं तसेच पुस्तकांनाही वाटत असेल का ?
वाचकांवीना एकाकी पुस्तकांची माणसांच्या सहवासाची आसं कधी पुर्ण होईल. पुस्तकांनाचा माणसांकडे जाण्याचा रस्ता या पुस्तकातच कुठे तरी दडलेले असेल हे नक्की, ते समजून घेणारा,त्यावर संशोधन करणारा संशोधक हा दूरावा दूर करण्याचा मार्ग शोधून काढेलच.
ज्ञानसागरातील हे शिंपले उघडून बघत राहूया, आपल्याला हवा तो मोती हाती लागे पर्यंत.

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

18 Feb 2022 - 7:14 pm | कुमार१

**ज्ञानसागरातील हे शिंपले" परत हाताला लागले.
>>>
माझेही शालेय वयातील खूप आवडते पुस्तक.

Nitin Palkar's picture

18 Feb 2022 - 7:18 pm | Nitin Palkar

सुंदर छोटेखानी लेख.

कर्नलतपस्वी's picture

18 Feb 2022 - 8:06 pm | कर्नलतपस्वी

वया प्रमाणे पुस्तक अणि विषय बदलत असतात, कुमार, चांदोबा, गुलबकावली, सिंदबादच्या सफारी, नारायण धारप ,काकोडकर,.

सरिता बांदेकर's picture

19 Feb 2022 - 10:14 am | सरिता बांदेकर

छान लिहीलंय.

चौथा कोनाडा's picture

19 Feb 2022 - 10:48 am | चौथा कोनाडा

सुंदर लेख !
चांदोबा, सिंदबादच्या सफरी हे वाचता वाचता कधी बाबुराव अर्नाळकर, एस एम काशीकर, गुरुनाथ नाईक यांच्या रह्स्य कथांनी गारूड केलं ते कळलंच नाही !
नंतर मग पुढे बरंच काही वाचण्यात आलं. गेली १०-१२ वर्षे मिपा वाचतोच आहे !

शशिकांत ओक's picture

20 Feb 2022 - 7:23 pm | शशिकांत ओक

या शीर्षकाचा माझ्या मनावर प्रभाव असावा जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत यावर रसग्रहणात्म लेखन झाले व तेथील वेचक विचार ज्ञानसागरातील मोती म्हणून सादर केले.
एकदा श्री के फडके यांचे सुरेख हस्ताक्षरातील लेखन करताना प्रत्यक्ष पहायला मिळाले. त्यांचा घरी ऑटोरायटिंग करायला एक ग्रहस्थ आले होते. ते पहायला मला बोलावले होते. नंतर प्लॅंचेट करायला ते काचकूच करताना मजा वाटली.
६१, ६२ साली कोकणात गोळप येथे अंबे खायला मे महिन्यात गेलो होतो तेव्हा तिथे दोन मोठ्या पेटाऱ्यात चांदोबा मासिकाचे १९५३ पासूनचे अंक बाईंड करून ठेवले होते ते मी आधाश्या सारखे वाचून काढले.
जुळ्या बहिणी हे धारावाहिक कथानक तेंव्हा भावल्याचे आठवते.
ज्यांच्यामुळे आपले किशोरत्व फुलले त्या चांदोबातील चित्रे काढणारे कोण? या कुतुहलापोटी चेन्नई वडपळणी भागातील कार्यालयात जाऊन भेट घेतली. शंकर निवृत्त झाले होते. वपांशी बोललो. मुख्यतः तेलुगू लेखन पाहून त्याला साजेल असे प्रसंग निवडून चित्राचे आकार आणि व्यक्तिमत्त्व ठरवत होतो. वगैरे ते बोलत होते. मराठीत भाषांतर करून देणारे कोणी पांडेचरीचे होते असे ही ते म्हणाले होते.

शशिकांत ओक's picture

20 Feb 2022 - 7:38 pm | शशिकांत ओक

कै बाबुराव अर्नाळकरांच्या सुरस कादंबर्‍या पटापट वाचल्या. ते श्रेय एका फिरत्या वाचनालय चालवणार्‍यांना आहे. ते सांगलीतून दोन मोठ्या पिशव्या पुढे व एक सायकलच्या कॅरियरला मागे भरून माधवनगरात आठवड्यातून दोनदा येत. तेंव्हा आमच्या गुरुवार पेठेत प्रथम येत. नंतर इतर पेठांमध्ये फिरत फिरत परत सांगलीला जात. मी बाबुरावांची एक कादंबरी घेऊन वाचून फस्त करून त्यांना इतर पेठेत गाठून ती परत करून दुसरी घेत असे...!
हा धागा वाचून काही आठवणी जाग्या झाल्या.

सागरसाथी's picture

21 Feb 2022 - 4:22 pm | सागरसाथी

सुरवातीला खुप वाचन झाले, शाळेतील वाचनाची पेटी आणि हायस्कुलमधील शिक्षिकांनी हा पुस्तकं नावाचा कल्पवृक्ष मनात रुजवला.

रामचंद्र's picture

22 Feb 2022 - 1:32 am | रामचंद्र

'मुलांचा श्याम'चे सचित्र अंक कुणाला आठवतात का? आणि वसतिगृहातल्या शाळकरी मुलींवरचे 'वेलीवरची फुले', मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडेल असे मेजर साळवींचे ' स्वाधीन की दैवाधीन', रघुवीर सामंतांचे टॉम सॉयरवरचे पुस्तक, भानू शिरधनकरांचे 'उधान वारा', भा.रा. भागवतांचे 'एक होते सरोवर', प्रगती प्रकाशन, मॉस्कोचे तिमूर, चुक आणि गेक, गुलाबी आयाळीचा घोडा, बालपण...
राम वाईरकर, कवडी, रीडर्स डायजेस्टच्या ७०-८० दरम्यानच्या शेवटच्या संक्षिप्त कादंबरीत किंवा ड्रामा इन रिअल लाईफमधली समुद्राच्या पार्श्वभूमीवरची भीतिदायक चित्रे.
पुस्तकांचं जगच वेगळं, अद्भुत.

कपिलमुनी's picture

22 Feb 2022 - 2:44 am | कपिलमुनी

लेखकाला योग्य वयात योग्य पुस्तके मिळाली नाहीत याचे फार वाईट वाटले.

चिगो's picture

3 Mar 2022 - 12:47 pm | चिगो

ये बढीया था, गुरु..

चौकस२१२'s picture

25 Feb 2022 - 9:23 am | चौकस२१२

काही पुस्तकं अशी असतात कि ती कथा किंवा कादंबरी संपू नये असे वाटते
- प्रकाश नारायण संत, लंपन या मुलाचं जीवनावरच्य कादंबर्यांची मालिका
- श्री ना पेंडसेंच्या कादंबऱ्या ( पुढे मात्र थोड़ त्याचा त्याच व्यक्तिरेखा येतात असे वाटत राहिले आणि थोडा कंटाळा आला )
- खानोलकरांच्या कादंबऱ्या
- अगणित वेताळ आणि मँड्रेक चित्रमासिकें ( दोन्ही मराठी ) चांदोबाचे वेड होते पण कमी झाले
- जत्रा मध्ये येणाऱ्या ग्रामीण कथा ( नाव आठवत नाही )
- दळवीनची "सारे प्रवासी घडीचे"
- पोलीस कथा ( आता वाचल्या तर कदाचित नाही आवडणार )
- बाबा कदमांची एक कादंबरी ... थोडीशी कामुक.. रेस जॉकी च्या जीवनावरची ,
आणि अजून एका काल्पनिक जगाची फार ओढ आहे ते म्हणे गलिव्हर ट्रॅव्हल , परत कधीतरी हॉलिवूड मधील एखादा दिग्गज दिगर्दीग्दर्शक यावर भव्य चित्रपट काढेल अशी अपेकशा

सागरसाथी's picture

27 Feb 2022 - 8:09 pm | सागरसाथी

पुर्वी वाचलेले लेखक आता वाचावे असे वाटत नाहीत,का कुणास ठावूक. द.मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर,शिकारकथा, साहसकथा हे अपवाद.

जादूची अंगठी ,हार अशा पुस्तकानंतर, टिळक , नेहरू, शिवाजीमहारजांच्या गोष्टी इथून वाचायला सुरूवात करून ते नाथमाधवांची पुस्तके आता आठवत नाही त्यात काय होत्या गोष्टी इथून ऐतिहासिक पुस्तके, थोरला बाजीरावावरची , नंतर एकदम दुसरा बाजीराव व मराठा साम्रज्यय बुडले व शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला ते दुःखदायी वर्णन वाचून सुन्न होउन बसणे. त्यानंतर वि.स.वाळिंबेंची हिटलर वरची, ज्यूंच्या छळांची प्रभावी वर्णने वाचनात आली. मुबंईच्या मग local मधे ती मोठी,लांबरूंद पुस्तके गर्दीत तशीच पसरून वाचताना कितीक सहप्रवासी बायकांच्या शिव्या , तिरकस टोमणे लक्ष न देदता वाचली असतील नंतर अतिशय गर्दीच्या train मधे आता न वाचता आपण vrs घेऊ तेव्हाच खूप ‌वाचन करू असे ठरविले. तरी शनिवार, रवि चा मटा गर्दीत पसरुन वाचणे वतो दीर्घ, लांबलचक प्रवास सुसह्य करून घेणे शिव्या खात हे चालेले असायचेच. कधीतरी नोकरीच्या सुट्टीत एखादे सुंधर मासिक, पुस्तक हाती पडल्यावर घरातिल कामे ,घरातले कायबोलतात, सांगतात ते जराही लक्ष न देता वाचतच बसणे व घरातल्यांचबोलणी दुर्लक्ष करत वाचणे हा क्रम अजून चालू असतोच. मग vrs च्या वेळी not without my daughter, अवघड अफगाणिस्तान-----निळू दामले यांचे अशी या बर्याच मोठ्या वयात पुस्तके वाचून काढली वनोकरी संपवल्यावर पहिली 10/12 वर्षे liabrri लावून काही विकत घेऊन तसेच you tube ‌र भरपूर नवीजुनी गाणी शोधून वेगळीच गाणी , व खूपसे सिनेमेही डोळे दुखून कंटाळा येईपर्यत वाचन, रेडीओ, ऐकणे वसिनेमे मनसोक्त बघणे हे केले vrs नंतर 10 वरषे मनाच्रया अतिव आनंददायी गोष्टी केल्या. आता मात्र खूप दीवसांनी एखादे पुस्तक वाचणे कधितरीच गाणी ऐकणे माझा अति आवडता सैगल ऐकणे एवढेच होते व यावर्षी खूप दिवाळी अंक घेतलेत ते वाचायचे आहेत

nutanm's picture

1 Mar 2022 - 10:43 am | nutanm

मला आठवतेय, 6वी पास झाल्यावरच्या उन्हाळी सुट्टीत मला अर्नाळकरांच्या पुस्तके रहस्यकथा, विशेष करून झुंजार हा माझा लाडका हिरो वत्याचे रहस्य भेद करणे गुन्हे शोधून ठगांना ईन्स्पेक्टर आनंदरावांच्या हाती देणे व स्वतः नामानिराळे राहून प्रिय पत्नी विजूसाठी काहीतरी अनमोल घेऊन पळणे हे माझे त्या वयातले वेड लागलेले वाचन होते, चांदोबा अमृत विशेष खिळविणारे वाटले नाही. त्यांचा काळापहाडही आवडे पण झुंजार इतका नाही काळापहाड योगायोगाने पोहोचलेल्या चोरांची दुनिया अजूनही लक्षात चांगलेच आहे व लेखकाच्या कल्पनाशक्तिचे कौतूख वाटल्यावाचून रहात नाही

ईसापनिती, अलिबाबा चाळीस चोर, अकबर बिरबलाच्या हजरजबाबी पणाच्या कथा हे सर्वही कधी वाचून काढले कळलेच नाही ऐंशी दिवसात जगाची सफर हे 19 व्या शतकातला challenge घेणारा इंग्लडच्या धनाढ्यांच्या क्लबातला चक्रम म्हातारा फिलिअस फॅाग आठवतो व आपण जगाची सफर नाही पण दैनंदिन स्वतःचे रोजचे काम आटवून त्याप्रमाणे घराबाहेर पड असे मुलीने करायला सांगितले हेही आठवते.

सागरसाथी's picture

1 Mar 2022 - 8:44 pm | सागरसाथी

भा.रा.भागवतांनी अनुवाद केलेल्या लपवलेल्या खजिन्यांच्या गोष्टी,समुद्र सैतान अजून आठवते,आता समुद्र सैतान मिळते बाकीची मिळणे कठीणच.

कंजूस's picture

3 Mar 2022 - 11:51 am | कंजूस

मराठीत नाहीत. आहेत त्या पलिकडच्या उचललेल्या.

कंजूस's picture

3 Mar 2022 - 12:02 pm | कंजूस

दोन वर्षं टिकलं.
नंतर दक्षता पोलीस कथा एक वर्षं.
बाबा कदम,सुशि आणि इतर कथा कधीच वाचल्या नाहीत.
पेंडसे एक पुस्तक.
व्यंकटेश दोन तीन पुस्तकं.
गावाकडील खरात,पाटील एकदोन पुस्तकं.
जीए सर्व.
पुलं एक दोन. नंतर क़टाळा.
परदेशी लेखक - पंचवीस निवडक लोकप्रिय - एकेक पुस्तक वाचून पाहिले.
दिवाळी अंक - नाही.
ललित, मौज सत्यकथा- अधुनमधून.
माणूस - नाही.
आता इंडिय टुडे, टाइम्स मध्ये परीक्षणं येतात ती पुस्तकं वाचून पाहतो.
विल्यम डर्लिंमपल दोन पुस्तकं.

मायबोली, मासिकं यातल्या कथा - कधीही नाही. झोप येते शंभर ओळींत.