ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
8 Jan 2022 - 6:06 pm
गाभा: 

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.

निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-e...

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

19 Jan 2022 - 8:51 am | आग्या१९९०

त्यांनी असेही नमूद केले की दंगलखोर एका इमारतीत घुसले आणि इमारतीत लपून बसलेल्या मृताची हत्या केली.
मृतांची हत्या कशी करतात?

आग्या१९९०'s picture

19 Jan 2022 - 9:00 am | आग्या१९९०

माझा आवाज ऐकायला येतो का?
समोरचा हो म्हणतो तरी विचारतात Interpretar चा आवाज ऐकायला येतो का? आता त्याचाच आवाज ऐकायला येणार ना त्यांना ? गोंधळले होते teleprompter बंद पडल्याने. पितळ उघडे पडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Jan 2022 - 9:02 am | अमरेंद्र बाहुबली

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2022 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीयांच्या टेलीप्रॉम्टर सॉरी टॅलेंटबद्दल काही वादच नाही. पितळ वगैरे काही नसतं. तांत्रिक दोष असतात ते...! बाकी, कसंय, ज्या माध्यमांच्या वापर करुन आपण जनमानसात पक्ष व्यक्ती यांच्यावर आयटीसेल च्या माध्यमातून कै च्या कै गोष्टी पसरवल्या. पसरवत असतात. प्रतिमा खराब करत असतात. लोक अशा वेळी कसे शांत बसतील. पंतप्रधानांची गरीमा वगैरे सगळं मान्य. पण, लोकांच्या हातात असलेल्या या माध्यमांचा वापर लोकही हवे तसे करतातच. हिशेब बरोबर करायची भारतीय जनता कोणतीही संधी सोडत नाही. इतकंच त्या वादळाचा आणि टींगळ टवाळीचा अर्थ. पण, वाईट वाटतंय. सगळं पाहतांना. काळाचा महिमा दुसरं काय...!

-दिलीप बिरुटे

मौनी बाबा कसे शाळेतल्या पोरा सारखा भाषण कस वाचून दाखवायचे, तेच बर होत.

कपिलमुनी's picture

19 Jan 2022 - 11:34 am | कपिलमुनी

इंग्लिश असल्याने तुम्हाला कळलं नसेल, पण मौनी बाबाच्या भाषणाचे पुस्तक असेल तर जरूर वाचा.
गटार गॅस, पकोडे रोजगार , 100 लाख कोटींच्या रोजगार योजना , थाळ्या , दिवे असले फालतू प्रकार सापडणार नाहीत

धनावडे's picture

19 Jan 2022 - 1:13 pm | धनावडे

खाली नक्की काय घडलंय याची लिंक दिली आहे, कुणीतरी तुम्हाला नक्कीच इंग्लिश येत असेल तर वाचा.

सर टोबी's picture

19 Jan 2022 - 11:28 am | सर टोबी

हे नव्यानेच कायदेशीर लागू झालेले बंधन आहे का? प्रश्न निरागस आहे. हयात असलेल्या परंतु माजी पंतप्रधानांची व्यवस्थित संभावना होते म्हणून विचारतोय. खुद्द लोकसभेत ते पंतप्रधान असताना निकम्मा असा त्यांच्या काळात त्यांना संबोधलं गेलं आहे म्हणून विचारतोय.

टीप: प्रश्न प्रा डॉ. साठी नाहीय.

घडलेली घटना, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर घडली. आणि ती नक्की काय होती, ह्याविषयी अतिशय सविस्तर माहिती आल्टन्यूज ह्या, खरेतर मोदींविषयी फार आस्था नसलेल्या, पोर्टलने दिलेली आहे. ती जमल्यास पहावी.

तर, थोडक्यात, हा टेलेप्रॉम्टरचा बिघाड नव्हता, तर ते भाषण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर प्रक्षेपित करणार्‍या सिस्टीममधील काही बिघाड होता. ज्यामुळे तेथील उपस्थितांना मोदींचे भाषण व्यवस्थित दिसत नव्हते/ (भाषांतरीत) ऐकू जात नव्हते.

खुळचट टिका करून आपलेच हसू, भारतांतील एकेकाळचा प्रमुख राजकीय पक्ष, कोंग्रेस करीत आहे, ते ठीकच आहे, कारण त्यांच्याकडे ना टीकेसाठी ठोस मुद्दे, ना स्वतःच्या कार्यक्रमाविषयी सांगण्यासारखे काही. पण, कौतुक तथाकथित शिकलेल्यांचे वाटते, की ते कसलीही माहिती धड करून न घेता, तसल्या बावळट टिकेला उचलून धरतात! तेव्हा 'पितळ उघडे होते' हे खरे, पण नक्की कुणाचे, हे त्यांनी स्वतःस विचारून पाहावे.

आग्या१९९०'s picture

19 Jan 2022 - 2:17 pm | आग्या१९९०

" सगळे जॉईन झाले का? हे विचारायला सांगितले होते ना? मग "माझा आवाज ऐकायला येतो का? माझ्या teleprompter चा आवाज ऐकू येतो का?" असे प्रश्न का विचारले?
मी तर म्हणतो मोदींनी एखादी पत्रकार परिषद घेऊनच दाखवावी. दूध का दूध पानी का पानी.

प्रदीप's picture

19 Jan 2022 - 4:25 pm | प्रदीप

एकंदरीत, खुळचट टीका करतांना बातमीत काय लिहिले आहे, हे वाचावयास सवड नसते.

'माझ्या इंटरप्रीटरचा ( पक्षी, भाषांतरकाराचा) आवाज नीट ऐकू येतो आहे का', असे विचारले आहे. Teleprompter ला आवाज नसतो, हो !

काँग्रेसच्या सदा तारुण्यात पदार्पण करणाऱ्या धडाडीच्या नेत्याचे व त्याच्या टोळीचे सोडा हो, तुम्ही स्वतः:चे काही मांडा की !

प्रसाद_१९८२'s picture

19 Jan 2022 - 6:45 pm | प्रसाद_१९८२

त्यांना याच कारणाने , 'मंद भक्त' असे म्हटले जाते.

sunil kachure's picture

19 Jan 2022 - 2:34 pm | sunil kachure

पण मोदी साहेब पण विविध विषयावरील ज्ञान teleprompter वापरूनच देतात हे जगाला माहित पडले.
Teleprompter ही अशी सिस्टीम आहे ती काय बोलायचे ते समोर स्क्रीन वर दाखवते..
फक्त ते वाचून बोलायचे असते
सर्व वापरतात ते.
पण खूप लोकांना आपण ज्या विषयात बोलत आहे त्याचे पूर्ण ज्ञान असते .
समोर ची मशीन बंद पडली तरी ते इतके ज्ञानी
असतात की त्यांचे काही आडत नाही ते त्या विषयावर बोलू शकतात.
पण हे फक्त ज्ञानी व्यक्ती लाच शक्य होते बाकी लोकांना नाही.

प्रदीप's picture

19 Jan 2022 - 4:31 pm | प्रदीप

करू मै क्या सुक्कू, सुक्कू ?

sunil kachure's picture

19 Jan 2022 - 3:47 pm | sunil kachure

हे एक पोर्टल आहे सिन्हा नावाचे इंजिनिअर नी स्थापन केलेले.
हेड ऑफिस अहमदाबाद
Fake न्यूज च सत्य सांगणे हा उष्येश
पैसा कमावणे हा उष्येष तर असणार च इंजिनिअर गिरी सोडून असले उद्योग कशाला कोण करेल
मोदी साहेब जिथे भाषण देत होते तिथे जगातील सर्व मीडिया हाऊसेस हजर होती.
आणि दुवा कोणता तर अहमदाबाद मध्ये मुख्य ऑफिस असलेल्या एका न्यूज पोर्टल चा.
लय मोठा जोक आहे.

प्रदीप's picture

19 Jan 2022 - 4:35 pm | प्रदीप

जग मेरा धक्कू, धक्कू !

प्रभू आपल्या सिग्नेचर स्टाईल* सकट परत

*- काहीही माहिती नसली तरी आत्मविश्वासाने जगातल्या कोणत्याही गोष्टीवर आपल्या "वैयक्तिक अनुभवांवरून" टिप्पणी करणे हीच ती सिग्नेचर स्टाईल. आल्ट न्यूज च्या इतर काही बातम्या वाचल्या असत्या तर जे बोलले ते बोलले नसते.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

19 Jan 2022 - 12:09 pm | रावसाहेब चिंगभूतकर

मग तसं असेल तर ज्यावेळी राहुल गांधी पंतप्रधान होतील आणि ज्यावेळी त्यांच्या आंतरराष्ट्रीय भाषणात काही technical प्रॉब्लेम होईल त्यावेळी विरुद्ध बाजूने पण जे विष ओकले जाईल त्याला ही तयार रहा प्राध्यापक डॉक्टर साहेब. त्या वेळी मग हाच प्रश्न उलट्या बाजूने विचारायचा नाही. शिवाय जर हीच ब्रिगेडी लेव्हल ची पातळी संभाषणात गाठायची असेल तर दुसर्याने काही बोलले तरी तक्रार करायची नाही. मी वरच्या दोन पपलू टपलू बद्दल समजू शकतो. त्यांची बौद्धिक पातळी गुढघ्याच्या बरीच खाली असल्याने त्यांना फक्त न्यूसंस व्हॅल्यू आहे. पण एखाद्या देशाच्या प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय ठिकाणी बोलताना वाचूनच बोलायचे असते, एखादा शब्द इकडचा तिकडे झाला तर आंतरराष्ट्रीय वाद निर्माण होऊ शकतो हे आपल्याला माहीत नसावे हे आश्चर्यकारक आहे.

सुबोध खरे's picture

19 Jan 2022 - 12:35 pm | सुबोध खरे

सबुरी धरा

त्यांना एकदा विश्वेश्वरैया पूर्ण बोलू द्या

मग आंतरराष्ट्रीय भाषण वगैरे

सुखीमाणूस's picture

19 Jan 2022 - 12:53 pm | सुखीमाणूस

काही जण केवळ गान्धी घराण्याच्या नावाचा फायदा करुन घेतात, काही गान्धी घराण्याचे हुजरे बनुन वर येतात.
कोणी कष्टाने चहावाला ते पन्तप्रधान बनत.
काहिजण केवळ सत्तेत रहाण्यासठी वाटेल त्या तड्जोडी करतात. शिव्सैनिक आधी मोदिचा उदोउदो करणारे message forward करायचे आता फजित्तीचे message forward करतायत.
काळाचा महिमा नाही सत्तेचे खेळ आहेत. निदान कौन्ग्रेस् सलग मुस्लिम लान्गुलचालन तरी करते आहे. आणि भाजपा हिन्दु राजकारण..

sunil kachure's picture

19 Jan 2022 - 12:35 pm | sunil kachure

लायक असलेले च उमेदवार होते.
Pv नरसिंहराव ,dr मनमोहन सिंग ह्यांना भाषण ठोकता यायची नाहीत पण तीव्र बुद्धिमत्ता ,असलेल्या ह्या लोकांनी देशाला प्रगती पथावर नेले हे कोणी नाकारू शकत नाही

धनावडे's picture

19 Jan 2022 - 1:10 pm | धनावडे

Welcom back