मुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासाला आल्यापासून रोज रात्री झोपताना त्याच एकचं गाणं असतं मला शिवाजी महाराजांची स्टोरी सांगा. मग त्याला बऱ्यापैकी कथा सांगून झाल्यावर त्याला ओढ लागली ती गड किल्ले प्रत्यक्ष पाह्यची. आदल्या रविवारीच त्यांना सिंहगडावर घेऊन गेलो होतो पण ते गाडीवर. तिथे ते चालताना कुर कुर करत होते आणि फिरण्यापेक्षा पण त्यांचा कल खाण्याकडे जास्ती होता तिथले खेकडा भजी आणि दही. मग या रविवारी त्यांना दुसऱ्या गडावर घेऊन जायचा होता आता कोणता गड निवडावा हा विचार करत होतो मग जवळचाच असा तोरणा गड निवडला.
मुले चढतील कि नाही हि शंका होती. जिथून चढणार नाहीत तिथून त्यांना परत घेऊन यायचा असा ठरवून मेहुणी साडू बायको मी आणि माझा मुलगा आणि साडू चा मुलगा असे आम्ही गाडीवर निघालो.
सकाळी उठून तयार होऊन ७.३० च्या सुमारास घर सोडला मग पाबे घाट मार्गे पुढे गेलो पाबे घाटाच्या शेवटच्या ठिकाणी १५-२० मिनिटे फोटो सेशन झालं. वेल्ह्यामध्ये मस्त पैकी मिसळ आणि वडा पाव चापून आम्ही तोरण्याच्या पायथ्याला पोचलो.आणि चढाई सुरु केली
सहज काढलेला एक फोटो
सहज काढलेला एक फोटो
पाबे घाट माथा
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
छोटू चढताना सारखा विचारायचा इथे यायचा प्लॅन कोणाचा होता रे? सगळे खूप हसायचो अन मग तो परत गड चढायला सुरुवात करायचा.
वाटेत चढताना खूप साऱ्या ट्रेकर ने दोघं चिमुरड्यांचा खूप कौतुक केला कि एवढ्या छोट्या वयात गड किल्ल्यांवर यायला सुरुवात केली म्हणून. दोघेही न कंटाळता गड चढले आणि उतरले सुद्धा.
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
ट्रेकिंग दरम्यानची काही क्षणचित्रे
प्रतिक्रिया
8 Jan 2022 - 10:00 pm | मार्कस ऑरेलियस
उत्तम प्रवास वर्णन !
फोटोही छान !
लहान मुलांनी गड सर केला ह्याचे कौतुक आहेच !
पण लहान मुलांना ट्रेक्ला घेऊन जाणे ही रिस्क आहे, मुळात लहान मुले कन्सेंट देऊ शकत नाहीत आणि त्यांच्यावतीने आपण रिस्क घेणे हे मला व्यक्तिशः पटत नाही. तोरणा त्या मानाने अवघड ट्रेक आहे , यु नेव्हर नो व्हॉट कॅन गो राँग ! माझा एक अनुभव सांगतो : २००५ सालची गोष्ट आहे, मी कासच्या घनदाट जंगलात ट्रेक करत होतो एका ग्रुप सोबत ज्यात ६ अॅड्ल्ट आणि ६ लहान मुले होती. आणि ट्रेक मध्ये आम्ही अशा एका पॉईंट वर येऊन अडकलो कि तिथुन पुढे लहान मुलांना जाणे शक्यच नव्हते ! ६ पैकी ४ अॅड्ल्ट वेगवेगळ्या मार्गांनी बेस कॅम्प्वर गेले, पण तोवर खुप रात्र झाली होती, त्यांनी वरुन रोप च्या सहाय्याने आम्हाला जेवण पाठवले , मी आणि माझ्या मित्राने ही ६ लहान्मुले सोबत घेऊन अस्वले आणि बिबट्यासाठी फेमस असलेल्या घनदाट जंगलात कुडकुडत रात्र काढली आहे ! तेव्हापासुन कानाला खडा ! लहान मुलांना सोबत घेऊन ट्रेक नाही.
असो.
मिपावर लिहित राव्हा ! असे लेखन वाचले की परत एकदा ट्रेक्स करायची उर्मी येते !
9 Jan 2022 - 1:03 pm | चौथा कोनाडा
सुंदर ट्रेक वर्णन आणि तितकीच सुंदर प्रचि !
कौतुक आहे चिमुकल्यांचे ट्रेक केला त्याबद्दल, मी तर डोंगरच पहिल्यांदा १८ व्या वर्षी पाहिला होता.
आताची पिढी स्मार्ट आणि स्टाँग आहे !
9 Jan 2022 - 3:07 pm | गोरगावलेकर
फोटोही आवडले.
9 Jan 2022 - 6:25 pm | Bhakti
छोट्या मुलांचे खरच कौतुक वाटलं!
मोठ्यांपेक्षा जास्त एनर्जी त्यांच्यामध्ये असते :)
10 Jan 2022 - 4:20 pm | सौंदाळा
दोन्ही लहान मुलांचे विशेष कौतुक, तोरणा तसा दमवणाराच आहे.
बुधला माची पाहिली की नाही?
नविन वर्षाची सुरुवात मस्तच
12 Jan 2022 - 10:47 am | कॅलक्यूलेटर
तिथे शिडी अन दोर लावलेले आहेत उतरायला पण मुले खाली उतरतील कि नाही हि शंका होती मग वरूनच पाहिली खाली गेलो नाही. पुढच्या वेळी मित्रांसोबत गेलो कि जाता येईल
23 Jan 2022 - 9:10 pm | श्रीगणेशा
खूप छान.
मिपावर तोरणा किल्ल्याविषयी वाचून आनंद झाला. लहानपणीच्या आठवणी आहेत तेथील. काही वर्षे आम्ही पायथ्याच्या गावी, वेल्हे येथे राहायला होतो. त्यावेळी दोनदा किल्ला पाहता आला, बरीच वर्षे झाली आता.
अवघड आहे किल्ला. वरपर्यंत रस्ता तयार करणं शक्य नाही एवढा अवघड. ते संवर्धनाच्या दृष्टीनेही चांगलं आहे म्हणा.
19 Feb 2022 - 12:32 pm | कॅलक्यूलेटर
घर असेल तर बोलवा एकदा. तोरण्या वरून आलो कि संध्याकाळी मस्त इंद्रायणी तांदळाचा भात त्यावर साजूक तूप आणि रस्सा भाजी. अप्रतिम मेजवानी.